५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

पक्या.. पिऊ आणि पाणी!
कौस्तुभ केळकर

आमच्या हॅपी सोसायटीतलं पाणी एक दिवस अचानक गायब झालं. पक्या के ‘स्टील’ बॉडीने हॅपी सोसायटी को संभाला. बादल्या घेऊन पिऊच्या फलाटावर गाडी लगाने की बहोत कोशीश की, पर ‘पिऊ मा’ पार्किंगमधूनच कटवायची.

परवाच्याला बाल्कनीत चहा ढोसत उभा होतो. अर्ली मॉर्निग साडेआठचा टाइम भरत होता. तेवढय़ात पलीकडच्या बिल्डिंगमधील पिऊ वॉकी डॉकी करताना दिसली. सोबत तिचा सदाशेंबडा यंगर ब्रदर चिनू ऊर्फ चिन्मयानंद होता. असल्या हार्ट ब्रेकर पोरींना यंगर ब्रदर असणं, म्हणजे पन्नासच्या रिचार्जवर हंड्रेडचा टॉकटाइम मिळण्यासारखं लक्की वाटतं. या शेंबडय़ा भाऊसाहेबांचा फ्युचर प्लॅनिंग में वापर हो सकता है ये बात हमने नोटली.
वैसे पक्या के ‘जग’ में प्यार व्यार के वास्ते फुरसत कहाँ? अपून का एकच फंडा. एव्हरी डे इज फन डे. अर्ली मॉर्निग साडेनवाला टेन्या अपून के होम पिकअप के वास्ते टपकता है. मग त्याच्याबरोबर एज्युकेशन टेंपलच्या दिशेने. वाटेत अब्दुलच्या टपरीवर कडक कटिंग. एक-दोन लेक्चर्सचा कोरम भरला की वापस खुले मैदान में. पार्किंगच्या गाडय़ांवर ‘टेकू’. मग पोरा-पोरींच्या जोडय़ा लावा, ढाँसू आणि कातिल फरक स्पष्ट करा, ‘ब्युटी’ची व्याख्या करा अशा अभ्यासू गावगप्पा. मग एखाद्या बर्थ डे बॉय नाही तर गर्लला गाठायची. पिझ्झा नाही तर बर्गर ‘हटा’त ‘जयंती’ साजरी करायची आणि ढलती श्याम को टेन्या के साथ वापस होम डिलिव्हरी. पण दुनिया इधर की उधर हो जाने दो, पक्या शाम के बाद ‘जिम’मेच मिलेंगा. गेली पाच वर्षे जिम मारतोय. नुसता हात कोपरात फोल्डला, तर दंडावर शर्टाची शिवणा उसवते. आया क्या समझ में?
पण आत्ता ‘पिऊ’ला वॉचली आणि अपून के स्टील बॉडी के अंदर ‘दिल’ है याचा एहसास झाला. मस्त ब्ल्यू कॅप्री, त्यावर पिंकी फ्लोराचा टॉप, हवा में उडते लंबे घने काले बाल, हसतानाचा गालावर दिसणारा स्पीडब्रेकर पक्या का दिल पानी पानी हुवा. लेकिन न जाने कैसे, ही ‘ब्रेकिंग न्यूज’ टेन्यापाशी फुटली. नंतर अब्दुलच्या टपरीवर त्याने आपल्याला जाम पेटवला. म्हणाला, ‘‘हिंमत है, तो पिऊ का प्यार भरा रिप्लाय लुक पा के दिखा.’’ लुक्या सुक्या चाळीस किलोच्या टेन्याचा चॅलेंज ये नब्बे किलो के हिंमतवाल्या पक्याने अ‍ॅक्स्पेटा.
नेक्स्ट डेपासून कामाला सुरुवात केली. म्हणलं पहिल्यांदा घरात एंट्री मिळवावी. दोन-चार वेळा शेंबडय़ा भाऊसाहेबांना चॉकलेटचा डोस दिला. पण त्या पठ्ठय़ानं बिल्डिंगच्या पार्किंगमधूनच आपल्याला कटवला आणि पक्या का हिरव्या रंगाचा, लाल चोच का पक्षी बनाया. मग पिऊ के ‘बापू’ का बायो डाटा मिळव्या. अक्कडबाज मिशांचे ‘पिऊबाबा’ र्मचट नेव्हीत असतात आणि समद्या पोरांना ‘पाण्या’तच बघतात ऐसी खबर मिली. फिरभी अपून ने हिंमत नही हारी. एका अर्ली मॉर्निगला अपनी गाडी सहाव्या मजल्यावर पियूच्या फलाटावर धडकडली. बापूसाहेबांना म्हणलं, ‘मला पण र्मचट नेव्हीत जायचंय.’ पिऊ बाबा मिशीतल्या मिशीत खुषले. म्हणाले, ‘पोहता येतं का? नाही, मग ये उद्यापासून सोसायटीच्या ‘पुला’वर.’ पुढचे पंधरा दिवस पिऊ बाबा या पक्याला पाण्यात बुचकाळत होते आणि पिळून वाळत घालत होते. पण एकदाही स्वगृही चहा ढोसायला बोलावलं नाही. पोहायला शिकलो पण ‘पिऊ दर्शना’च्या बाबतीत मात्र कोरडाच राहिलो. शेवटी एकदाचे बापूसाहेब सहा महिन्यांसाठी कही दूर चले गए आणि अपून फायनली पानी के बाहेर आया. पक्या सही मौके की तलाश मे वेट कर रहा या.
भगवान के दरवाजे के उपर जो मैने नॉक नॉक किया था, वो भगवान ने सुन लिया. झालं काय, आमच्या हॅपी सोसायटीतलं पाणी एक दिवस अचानक गायब झालं. वैसे इस साल पावसाचा पार ‘भज्जी’ झाला होता. म्युन्सिपाल्टीचा ‘धोरणलकवा’ भोवला. दोन-चार दिवस निर्जळीचा योग होता. मैने अपने मदर इंडिया को समझाया ‘माते, मन स्वच्छ तर शरीर स्वच्छ. दोन दिवस मी घरासाठी त्याग करीन. मी आंघोळीचं ड्रायक्लिनिंग करीन’ सुकलेल्या डोळ्यात पाणी आणून ‘पक्या’च्या आईनं ते अ‍ॅकस्पेटलं. पक्या के ‘स्टील’ बॉडीने हॅपी सोसायटी को संभाला. सगळ्या घरच्या बादल्यांना दोऱ्या लागल्या. स्विमिंग पुलाचा पाणवठा झाला. दोन हातात, दोन बादल्या घेऊन पक्या दोन दोन मजले सहज पार करीत होता. एका दिवसातच ‘तलाव’ आटला. बादल्या घेऊन पिऊच्या फलाटावर गाडी लगाने की बहोत कोशीश की, पर ‘पिऊ मा’ पार्किंगमधूनच कटवायची पिऊदर्शनाची आस काही पुरी होत नव्हती. पाणी भरून पिऊ मा ‘जाम’ झाल्याची खुफियाँ खबर ‘चिनूंबां’नी दिली.
वॉट नेक्स्ट? टेन्याला उचकवला. म्हणलं तुझे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स या क्रिटिकल कंडिशनला वापर. कुछ भी करो मुझे एक पानी का टँकर चाहिए. टेन्यानं त्याचं चाळीस किलोचं वजन वापरलं आणि नेकस्ट डे अर्ली मॉर्निग मी टँकरमध्ये बसूनच सोसायटीत अराईव्हलो. गेटावरच बाजूच्या गावठाणातली लोकं टँकरकडे उम्मीदसे देख रहे थे. त्यांना तिथेच स्टॉपलं, गेट लावलं आणि टँकर हॅपीली ‘हॅपी’त घेतला. टेन्यानं आधीच सेटिंग लावली होती. हातात दोन बादल्या घेऊन पिऊ पार्किंगली होती. टँकरचा वॉल्व्ह चालू केला पिऊ टँकर के तरफ धीरे धीरे आ रही थी. म्हणलं आता पिऊच्या बादल्या पाण्यानं भरायच्या. तिचा एक थँक्स भरा, प्यार भरा लुक घ्यायचा, प्रीतीच्या झुळझुळ पाण्याचा बदाबदा धबधबा करायचा असा होमवर्क करीत होतो. दिल मे बडासा लड्डू फुटनेही वाला था, की अचानक गॅलरीतून पिऊमा केकाटली. ‘पिऊ नळाला पाणी आलं, चल वर ये लवकर.’ पिऊची गाडी तिथल्या तिथं रिव्हर्सली. दिल शाहरुख शाहरुख झाला. आपल्या ‘पंख्यां’च्या गर्दीला आपण ऑटोग्राफ्स देतोय. तिकडून यावा सलमान आणि आपल्यापुढचे ‘पंखे’ क्षणात गायब व्हावेत, असं कसंसंच वाटू लागलं. पक्या के दिल का पानी पानी हुवा.
फिर अपना ‘थंडा करके खावो’ पॉलिसी वापऱ्या. हिंदी पिक्चरातला हीरो जसा आरशात स्वत:शी टोकलो. अरे होल महाराष्ट्र पाण्यासाठी तडफडतोय आणि आपण इथे पाण्याच्या तव्यावर प्रेमाची पोळी भाजतोय. खुद के डर्टी पिक्चरसे शरमाया. तसाच टँकर सोसायटीबाहेर काढला. अजूनही गावठाणातली मंडळी वस्तीतल्या ड्राय नळाशी ओलावा शोधत होती. टँकर पुढय़ात नेला. म्हणलं, ‘चला पाणी भरून घ्या.’ वस्तीवरच्या बायाबापडय़ा, पोरंटोरं वेगवेगळ्या डायमेन्शनच्या भांडय़ात पाणी भरत होती. दिल में कुछ बयाँ न कर सकनेवाली फिलिंग्ज उकळत होती. एकदम एका म्हातारीने माझ्या दिशेने बोटं मोडली आणि ‘गॉड ब्लेस यू’ सारखं केलं. साला, पुण्यवान लोकांच्या विशीनं विदाऊट टिकट फुल टाइमपास केल्यासारखा वाटला. साला आमचं पोट भरल्यावर उरलेला खाऊ वाटणारे आम्ही डोनर नाही, चिटर चिटर असं बोंबलावसं वाटलं. लेकीन हिम्मतवाला पंक्चरलेल्या टायरसारखा फुस्स झाला होता. दीड तास पाणी वाटलं, टँकरवाल्याचा हिशेब चुकता केला आणि हॅपीली ‘हॅपी’त परतलो. तहान लागल्याचा फील येत होता. गेटाशीच शेंबडे भाऊसाहेब भेटले. हातात पाण्याची बाटली आणि पारले जीचा पुडा. म्हणाला, पियूताईने पाठवलाय. फेस गॅलरीकडे अपलिफ्ट केलं. वो जुल्फों का संवरना, मधूनच मानेला झटका, गालावरचा स्पीड ब्रेकर आणि पक्या के तरफ किया हुवा हाथों का इशारा. दिल की धडकन बढ गई, पैर काँपने लगे, घसा सुकने लगा. अरे कोणीतरी पाणी द्या रे. पक्या तैरना भूल गया ‘बापू’, पक्या प्रेमसागर में डूब गया
गटांगळ्या खात प्रेमाच्या..
response.lokprabha@expressindia.com

माझ्या बायकोचा वाढदिवस
माझ्याकडे एप्रिल फूलचा खरा किस्सा आहे. तो लग्नानंतर घडल्यामुळे आठवणीत राहिलेला असा. माझ्या पत्नीचा वाढदिवस एक ऑगस्टला असतो. लग्नानंतर पहिल्यांदाच तिचा वाढदिवस येणार असल्याने मी जाणीवपूर्वक तिला रात्रभर जागून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे ठरविले. पण पहिलाच वाढदिवस असल्याने तारखेच्या बाबतीत मी जरा गोंधळलेलो होतो. म्हणजे तिचा वाढदिवस एक ऑगस्टला असतो. मी मात्र ३१ मार्चच्या रात्री १२ पर्यंत जागून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा काही कळलेच नाही ना. म्हणजे आपला वाढदिवस आहे एक ऑगस्टला आणि आपल्या नवऱ्याने ३१ मार्चच्या मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एक ऑगस्ट आणि एक एप्रिल या तारखांमध्ये माझा झालेला तो गोंधळ होता आणि तो मला नंतर लक्षात आला. मग तेव्हा अगं मी तुला एप्रिल फूल केलं, असं सांगून मीच तिला गंडवलं. पण खरे म्हणजे माझीच चांगली फसगत झाली असल्याने तो माझ्यासाठीच एप्रिल फूल होता. माझ्या अभिनय कौशल्यामुळे मी कसं तिचं एप्रिल फूल केला, अगदी जागून शुभेच्छा देऊन तिची कशी गंमत केली, असं सगळं मी तिला छान पटवून दिलं. पण अजूनही मी ती रात्र जागून काढली होती आणि लग्नानंतरचा तो पहिलाच प्लॅन होता आणि तो फसला हे मला सतत आठवत राहतं. अजूनही तिला वाटतं की कुठेतरी मी तिचा वाढदिवस विसरलो होतो. मी मात्र बेमालूमपणे एप्रिल फूल केल्याचं तिला आजपर्यंत पटवून देत आलो आहे.
- मकरंद अनासपुरे
(शब्दांकन - रेश्मा राईकवार)