५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

रेडिओवरचे एप्रिल फूल
एप्रिल फूल म्हणजे कुणाला तरी मस्तपैकी बनवायचं.. रेडिओ स्टेशनवर मनोरंजनासाठी कुणाला तरी बनवायचे ‘शेंडी’सारखे कार्यक्रम सुरू झाले आणि बघता बघता लोकप्रियही झाले. त्यातलेच हे काही किस्से-

पारंपरिक कार्यक्रमातून रेडिओ बाहेर पडला तो एफएमच्या जमान्यात. केवळ बातम्या आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम याही पुढे जाऊन काही तरी वेगळे करण्याची गरज या माध्यमाला भासू लागली. त्यातूनच एक अभिनव संकल्पना जन्मास आली, ती म्हणजे लोकांना फोन करून त्यांची खेचायची. अचानक आलेल्या काहीशा आगाऊ फोनमुळे समोरचा माणूस वैतागतो, कधी कधी मर्यादा सोडून शिव्यादेखील देतो, तर कधी कायद्याची भाषादेखील सुनावतो, पण शेवटी जेव्हा त्याला सांगितले जाते की, आम्ही अमुक अमुक रेडिओ स्टेशनवरून तमुक तमुक बोलत आहोत, तेव्हा मात्र समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अनोखे हसू खेळत असते. तोदेखील आपल्या विनोदात सामील झालेला असतो, भले त्याचा बकरा बनला असो वा मुर्गा झाला असो, की त्याची शेंडी खेचली गेली असो. त्या वेळी फोनवरील व्यक्तीचा नेहमीचा चिरपरिचित आवाज कानी आला की, हा कोणी बाबूराव बोलतोय असे लक्षात येते आणि आपोआप काही क्षणापूर्वीचा राग विसरून तो खळाळून हसत राहतो. अर्थातच हे एक प्रकारचे एप्रिल फूलच असते असेच म्हणावे लागेल. फसवणुकीतून केलेली हसवणूक हाच या सर्वाचा मुख्य आधार असतो. वेगवेगळ्या रेडिओ स्टेशनवरील मलिष्का, नवेद, यशवंत कुलकर्णी अशा रेडिओ जॉकींनी या प्रांतात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आजवर हजारो लोकांना उल्लू बनवलेल्या या रेडिओ जॉकींच्या पसंतीच्या काही एप्रिल फूलचे हे संकलन.

पायधुनीमधील एका जवाहिऱ्याला अचानक एक फोन येतो. आम्ही सीआयएएचबी (याचा अर्थ अर्थातच त्या जॉकीलादेखील माहीत नसतो) मधून बोलत आहोत. तुम्ही खूप चांगले हिरे व्यापारी आहात. आम्हाला देशासाठी तुमची मदत हवी आहे. तुम्ही एक बनावट हिरा तयार करायचा, अगदी कोहिनूरसारखा. पुढचे काम आम्ही करू. तो व्यापारी गयावया करू लागतो. रेडिओतून लगेच देशभक्तीची जाणीव करून दिली जाते (मध्येच जय िहदचा कोरस ऐकू येतो). अखेरीस तो व्यापारी तयार होतो. रेडिओ जॉकी त्याला इमारतीच्या छतावर जायला सांगते, तिकडे तुम्हाला नेण्यासाठी हेलिकॉप्टर येईल. ती व्यक्ती आधीच इतकी घाबरलेली असते की लगेच छतावर जाते. इकडे स्टुडिओमध्ये चॉपरचा आवाज वाजवला जातो. एकदम सॉलिड वातावरणनिर्मिती. वर गेल्यावर चॉपर तर दिसत नाही. पुन्हा फोनवर रेडिओ जॉकी सांगतो, हेलिकॉप्टर अदृश्य आहे, तुम्ही तुमचा शर्ट काढून हवेत फडकवा. तो व्यापारी खरेच शर्ट काढून तसे करतो. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. अखेरीस वेळ येते, रेडिओ जॉकी त्याला सांगतो, आम्ही अमुक अमुक रेडिओ स्टेशनवरून बोलत आहोत. तुम्ही उल्लू बनला आहात. हास्यकल्लोळ उसळतो...
त्या व्यापाऱ्याच्या बहिणीनेच रेडिओ स्टेशनला आपल्या भावाबद्दल सांगितलेले असते, तो स्वत:ला सर्वात शहाणा समजतो ना, मग तुम्ही त्याला उल्लू बनवा.

एका व्यक्तीला तिची बुलेट अत्यंत प्रिय असते. गेली कित्येक वष्रे स्वत:वर प्रेम करावे तसे ती त्या बुलेटवर प्रेम करत असते, तिची काळजी घेत असते. एके दिवशी तिला एक फोन येतो. फोनवरील व्यक्ती बुलेट खरेदीची ऑफर देत असते. हा बुलेटप्रेमी फोनवरील व्यक्तीला सांगतो, नाही हो मला बुलेट विकायची नाही. पलीकडचा माणूस काही आपला हेका सोडायला तयार नसतो. संपूर्ण बुलेट नाही तर मग एक टायर तरी द्या. नाही तर किमान हँडल तरी विका. अगदीच काही नाही तर हेडलाइट तरी द्याच. काही नाही तर गाडीची सीट विका, पण मला तुमची बुलेट खरेदी करायचीच आहे. अखेरीस बुलेट मालक इतका वैतागतो की त्याला चक्क शिव्याच देऊ लागतो, तरीही हा पठ्ठय़ा काही ऐकत नाही. आता दोन टायर तरी द्याच म्हणून अडून बसतो. शेवटी बुलेट मालक अगदी जेरीस आल्यावर हा सांगतो, मी अमुक अमुक बोलतोय..

अशा उल्लूगिरीमध्ये कायमच थिल्लरपणा नसतो, तर कधी कधी सामाजिक दृष्टिकोनदेखील असतो. एका रेडिओ जॉकीने एकदा एका गल्लीदादाला फोन केला, मला एक मुलगी पटवायची आहे म्हणून. तो दादा जाम बढाया मारू लागला. मी एवढय़ा मुली पटवल्या, इतके पसे दे. तुला म्हणशील ती मुलगी पटवून देतो. हे ऐकल्यावर मात्र त्या रेडिओ जॉकीने त्या दादाला इतका जोरदार दम दिला, की तो दादा चक्क फोनवर रडू लागला.

लोकांना उल्लू बनवताना तुमचे सामान्यज्ञान एकदम अद्ययावत असावे लागते. असेच एका व्यक्तीला उल्लू बनविण्याबद्दल रिक्वेस्ट आली होती. त्या व्यक्तीकडे एक हीरो होंडाची बाइक होती. तेव्हा नुकतेच हीरो आणि होंडा दोन्ही वेगवेगळे झाले होते. नेमकी ही संधी रेडिओ जॉकीने साधली. उल्लू बनवणारा पहिला फोन केला तो होंडा कंपनीचा प्रतिनिधी म्हणून. आम्ही आता वेगळे झालो आहोत. तुमच्या बाइकचे पिस्टन आणि टायर आमचे आहेत, ती तुम्ही आम्हाला परत द्या. नवीन पार्ट दुसऱ्या कंपनीकडून घ्या. समोरील व्यक्ती पुरती गोंधळून गेलेली, असे कसे परत देणार, असे कोणती कंपनी करते का.. दुसरा फोन जातो तो हीरो कंपनीकडून. तुमच्या गाडीचा दिवा, सीट, हँडल हीरोची आहे, ते परत द्या. असाच काही मिनिटे हा खेळ झाल्यावर मात्र बाइक मालक जाम भडकतो. पोलिसांकडे जाण्याची धमकी देतो. अखेरीस रेडिओ जॉकी आपली ओळख देतो, त्या वेळी मात्र त्या बाइक मालकाला डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय नसतो.
विशेष म्हणजे हा किस्सा हीरो आणि होंडा या दोन्ही कंपन्यांतील कर्मचारी आजदेखील अगदी आवडीने ऐकत असतात.