५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भन्नाट

गुहांच्या साम्राज्यात
सुहास जोशी
डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या गुहा म्हणजे निसर्गाचा गूढरम्य आविष्कार. त्यामुळे गुहा बघण्याची एक सुप्त ओढ प्रत्येकाच्याच मनात कायम असते. त्यातही इतर ठिकाणच्या गुहा फारशा मोठय़ा नाहीत, पण मेघालयातील चुनखडीच्या गुहा हा तर निसर्गाचा स्तिमित करणारा कलाविष्कारच आहे. गुहांपर्यंत पोहोचण्यासाठी गिर्यारोहणातील वेगवेगळ्या कौशल्यांचा कस लागतो. म्हणूनच गुहा शोधणं हा एक साहसी प्रकारच म्हणायला हवा.

या महिन्यात आपण एका वेगळ्याच साहसी खेळाच्या मोहिमेवर जाणार आहोत. तेथे असणार आहे केवळ आणि केवळ अंधाराचेच साम्राज्य. बोट डोळ्यात घातले तरी दिसणार नाही म्हणतात ना तसेच. विशेष म्हणजे या साहसी प्रकारचा संबंध येतो तो मानवाच्या आदिम निवासस्थानाशी आणि निसर्गाच्या अद्भुत चमत्काराशी. थेट आपल्या आदिम वसाहतींची आठवण करून देणाऱ्या गूढ आणि निसर्गसंपन्न गुहांकडे घेऊन जाणारा हा खेळ आहे. म्हणूनच की काय, या खेळातील भारतातला अव्वल दर्जाचा खेळाडू ब्रायन डेल तुमचे स्वागत करताना म्हणतो, ‘वेलकम टू द वर्ल्ड ऑफ डार्कनेस’. चक्रावलात ना. तुम्ही म्हणाल की येथील अंधारात काय पाहायचे. पण तेथे गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा सुंदर कलाविष्कार पाहायला मिळेल असे जर कोणी तुम्हाला सांगितले तर? एखाद्या शिल्पकाराने मन लावून रात्रंदिवस खपून उभे केलेले ते विराट आणि अद्भुत असे निसर्गशिल्प आपल्याला सामोरे येते. निसर्गाची चमत्कृतीपूर्ण अशी असंख्य रूपेच तुमच्यासमोर उभी राहतात.
अर्थात या गुहांमध्ये शिरण्याआधी त्यांची भूशास्त्रीय आणि भौगोलिक माहिती करून घेणे श्रेयस्कर ठरेल. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुहांचे स्थान खूप महत्त्वाचे राहिले आहे. अर्थात त्या नसíगक की मानवनिर्मित हा वाद आपण थोडा वेळ बाजूला ठेवू या. माणूस जसजसा उत्क्रांत होत गेला, तसतसा तो निसर्गापासून दुरावत गेला. कधी काळी जंगलामध्ये, गुहांमध्ये राहणारा माणूस घर बांधून राहू लागला. पुढे वसाहती आल्या, त्यांच्या रक्षणासाठी किल्ले बांधले. पुढील काळात तर वास्तुशास्त्राने प्रचंड प्रगती केली. असे असले तरी गेल्या शतकापर्यंत वसाहतींमध्ये, किल्ल्यांमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडावे म्हणून, छुपे हल्ले करता यावेत म्हणून मानवनिर्मित गुहा तसेच भुयारे खणली गेली. कालौघात ती विस्मरणात गेली तर काही पार नष्टदेखील झाली. लेणी, मंदिरे यांच्या अनुषंगाने वसतिस्थाने असणाऱ्या काही गुहा आजदेखील शिल्लक आहेत आणि बऱ्यापकी सुस्थितीत आहेत. अर्थात अशा मानवनिर्मित गुहांचे गूढ बऱ्यापकी उकलले आहे. काही गावांमध्ये आजदेखील अशा भुयारांबद्दल कथा-दंतकथा प्रचलित आहेत. काही धाडसी मंडळींनी त्यांचा वेध घेऊन बहुतांश वास्तू प्रकाशात आणल्या आहेत. तूर्तास आपण या मानवनिर्मित गुहांकडे थोडेसे दुर्लक्ष करू या. कारण येथे जाण्यास शारीरिक श्रम अधिक आणि थरार कमी असाच प्रकार आहे. अर्थात येथील अंधारात मात्र तुम्हाला जैवविविधतेचे अनोखे साम्राज्य नक्की नजरेस पडू शकते. त्यासाठी मात्र तुम्हाला थोडय़ा अभ्यासाचीदेखील जरुरी आहे.

महाराष्ट्रातील गुहा / भुयारे
महाराष्ट्रात मुख्यत: बेसॉल्ट खडक प्रामुख्याने आढळतो. त्यामुळे येथे नसíगक गुहा अथवा भुयारे खूपच कमी आहेत. जी आहेत ती मानवनिर्मित आहेत. आपल्याकडील हिरा पंडित, अरुण सावंत या गिर्यारोहक मंडळींनी ८०च्या दशकात डोंगर-दऱ्यातील अनेक भुयारे, गुहा शोधल्या होत्या. हिरण्यकेशी व रत्नदुर्ग येथील अवघड आणि भलीमोठी भुयारे त्यांनी शोधली आहेत. त्याच दरम्यान खास गुहा शोधणारी केव्ह एक्सप्लोर्सह्ण नावाची संस्थाच होती. पण गेल्या १५-२०वर्षांत महाराष्ट्रातील गुहा संशोधनात फारशी प्रगती झाली नाही. पण मागील वर्षांपासून युथ हॉस्टेलच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या हृषीकेश यादव, मुकेश मसेरी, सुरेश यांनी पुढाकार घेऊन तब्बल ३५ जणांची मेघालयातील भुयार शोधमोहीम आखली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील साहसवेडय़ांना एक नवे दालन खुले झाले आहे. तसेच भुयारे संशोधनावर कालपरवापर्यंत मराठीत पुस्तक नव्हते. पण डोंबिवलीचे बाळ बेंडखळे यांनी त्यांच्या भटकंतीवर ‘भुयार’ हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. भुयारातील त्यांचे अनुभव, तेथील जैववैविध्य, भुयारांची रचना या साऱ्याची अतिशय वेधक अशी मांडणी यात केलेली आहे. त्यामुळे साहसवेडय़ा लेखकांनादेखील आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे असे म्हणता येईल.

पण निसर्ग हा कसा थोर शिल्पकार आहे हे जर पाहायचे असेल तर मात्र तुम्हाला जावे लागेल ते थेट मेघालयात. येथील अक्षरश: शेकोडो गुहा या संपूर्णत: नसíगकरीत्या तयार झाल्या आहेत. येथील चुनखडीचे डोंगर आणि येथे कोसळणारा धुवांधार पाऊस याच्या अनेक वर्षांच्या घमासानातून निर्माण झालेल्या गुहा म्हणजे केवळ एक स्तिमित करणारा कलाविष्कारच आहे. वर्षांनुवर्षांच्या निसर्गाच्या या अनोख्या घुसळणीतून येथे इतके विविध रूपे आकारास आली आहेत की, क्षणभर आपण स्तब्ध व्हाल. छतातून वर्षांनुवष्रे पाणी पडून तयार झालेले स्तंभ आढळतात. त्याला स्टॅलग्माइट (Stalagmite) असे म्हणतात. चुनखडीचे हे स्तंभ अगदी छोटय़ा काठीच्या आकारापासून ते अगदी एखाद्या मोठय़ा वृक्षाच्या बुंध्याइतके प्रचंड आहेत. एखाद्या वटवृक्षाच्या पारंब्या जशा जमिनीत परत घुसतात तसेच काहीसे. काही गुहांमध्ये तर आपणास विविधरंगी असे चक्क पडदेच पाहायला मिळतात. याला स्टॅलक्टाइट (stalactite) म्हणतात. अर्थात खूप सांभाळून, याला जरा जरी हात लागला तरी त्याची ही नसíगक वाढ खुंटू शकते. कारण आपल्या हाताला चिकटलेले घटक हे तेथील त्या वातावरणात बाधा आणतात आणि तो प्रवास थांबतो. कोठे डिस्क फॉर्मेशन दिसते. यामध्ये खडकाच्या चकत्या पायऱ्यांप्रमाणे आढळतात. भुयारांमध्ये मुबलक तळी आहेत. काही ठिकाणी तर चक्क नसíगक धरणेदेखील तयार झाली आहेत. २१ किमीच्या एका भुयारात २.५ किलोमीटर लांबीची अशी तीन तळी आहेत.
मेघालयातील गुहांचे, भुयारांचे आकडेवारीत वर्णन करायचे तरीदेखील ऐकणाऱ्याची छाती दडपून जाते. आजवर मेघालयातील नोंदल्या गेलेल्या भुयारांची संख्या आहे १३०४. अजूनही किमान इतक्याच भुयारांची नोंद होणे बाकी आहे. येथील सर्वात लांब भुयार आहे ३१ किलोमीटर तर सर्वात खोल भुयार आहे तब्बल ३१७ मीटर. येथील इतके सारे निसर्गवैभव असेल तर नक्कीच थोडीशी वाट वाकडी करायला काहीच हरकत नाही.

भुयार शोधन मोहिमेसाठी लागणारी साधनसामग्री

अंगात बॉयलर सूटसारखा गळ्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर झाकणारा केिव्हग सूट, गम बूट, कमरेला बेल्ट, मजबूत असे हेल्मेट, उच्च दर्जाचे टॉर्च आणि प्रस्तरारोहणासाठी लागणारे सारे साहित्य, रोप, कॅरीबिणर, डिसेंडर, हान्रेस, बोल्ट, लडर, झुमार, त्याबरोबरच फ्लड लाईट. या बरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक मार्गदर्शक अत्यंत आवश्यक आहे.

अर्थात हे सारे पाहण्यासाठी तुम्हाला थोडे तरी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. कारण भुयार संशोधन या खेळांमध्ये दोन-तीन साहसी खेळांचा समावेश होतो. एक तर या सर्व गुहा भुयारे ही डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे त्यांच्या मुखापर्यंत जाण्यासाठी प्रथम तुम्हाला बऱ्यापकी डोंगरातील तंगडतोड करावी लागते. कधी कधी भुयाराचे तोंड अतिशय अडनिडय़ा जागी असते. अशा वेळेस गिर्यारोहणाचे कसब वापरत तुम्हाला तेथपर्यंत जावे लागते. दुसरे असे की काही भुयारांमध्ये तुम्हाला बरेच अंतर खाली उतरावे लागते. अशा वेळी एका रोपवर रॅपल्िंाग करत जाणे गरजेचे असते. कधी कधी तर चक्क रांगत, सरपटत जावे लागते. वाटेत पाण्याचे मोठे साठे आले तर पोहावेदेखील लागते, कधी कधी पाणबुडय़ादेखील व्हावे लागते. एकदा का मुख्य भुयारात प्रवेश केलात की मग निसर्गाचे सारे चमत्कार आपल्यासाठी जणू हात जोडून उभे असतात. वर्षांनुवर्षे अंधार असूनदेखील तेथील अद्भुत चित्र पाहून आपण थक्क होतो. निसर्गाला सर्वात श्रेष्ठ चित्रकार, शिल्पकार का मानले जाते, त्याचे पुरेपूर प्रत्यंतर येथे येते. अर्थात तुम्ही एकदा का भुयारात शिरलात की तुमचा आणि बाहेरच्या जगाचा संपर्क संपूर्णत: तुटतो. येथे कसलेच अगदी आजकालचे प्रगत संपर्काचे साधनदेखील निष्प्रभ ठरते.
थोडक्यात काय, तर साहसाने ओतप्रोत भरलेला असा हा खेळ आहे. एक मात्र आहे की यात कसलीही स्पर्धा नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे केवळ साहसच नाही तर अभ्यासकांसाठी खूप संधी आहेत. येथील एका चुनखडीच्या स्तंभाचे पृथक्करण केले असता त्याचे आयुर्मान तब्बल ४० हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही जिवांच्या प्रजाती फक्त आणि फक्त भुयारांमध्येच सापडतात. येथील सजीवांच्या जीवनात मिट्ट काळोखामुळे अनेक बदलदेखील झाले आहेत. त्यांच्या डोळ्यांचे अस्तित्व नसल्यासारखे होते. परिणामी, लांबच लांब अन्टेना आढळतात. एका कोळ्याचे तर अन्टेना त्याच्या शरीराच्या दहापट मोठे आहेत, तर सूर्यप्रकाश नसल्यामुळे पांढरा फटफटीत असा बेडूकदेखील येथे आपणास पाहायला मिळतो.
आता कदाचित कोणी याला साहसी खेळ म्हणणार नाही. पण साहसी खेळाला जी काही परिमाणे लावली जातात ती सर्व येथेदेखील लागू पडतात. जिज्ञासा शमविण्याचा प्रकार, निसर्गाशी लढत (अर्थात त्याचा आदर राखीत), धोके आहेत म्हणून घेतली जाणारी काळजी, गिर्यारोहणाच्या कौशल्यांचा वापर, पोहणे, स्कुबा डायिव्हगच्या तंत्राचा वापर, या सर्वाचा एकत्रित विचार केला तर हा एक साहसी खेळच आहे असे म्हणावे लागेल. कारण निसर्गाशी केवळ शारीरिक क्षमतेच्या बळावर केला जाणारा हा उपक्रम आहे. मागील वर्षीच मेघालय व मिझोराम येथील भुयारांमध्ये भटकून आलेले धनंजय मदन सांगतात की, ‘‘एकदा का तुम्ही भुयारात गेलात आणि जर का तुमच्या जवळचा टॉर्च बंद पडला तर मात्र आयुष्यात कधीच बाहेर पडू शकणार नाही अशी येथील परिस्थिती आहे. एक मात्र खरे की महाराष्ट्रातील भुयारे अथवा गुहा या मेघालयातील गुहांच्या मानाने खूपच छोटय़ा आहेत.’’ त्यामुळे एकाच वेळी इतक्या साहसाचा अनुभव घ्यायचा म्हणजे नक्कीच ही दुनिया औरच असणार यात कसलीच शंका नाही.

अनुकूल कालावधी
मेघालयात गुहा पाहायला जायचे असेल तर साधारण ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम कालावधी आहे. अर्थात तेथपर्यंत पोहचणे यासाठी पूर्वतयारी वगरे गृहीत धरली तर किमान ४-५ महिने तरी आधी नियोजन करणे श्रेयस्कर. मेघालयात ब्रायन डेल हे गेली २२ वष्रे भुयार/ गुहा शोधन मोहिमेत सक्रिय आहेत; तर त्यांच्या साहाय्याने युथ हॉस्टेलने महाराष्ट्रातून भुयार संशोधन मोहिमा आखल्या होत्या. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी मुकेश मसेरी यांच्याशी संपर्क साधू शकता.

अशा अडनिडय़ा भुयारांकडे सर्वानाच जाणे शक्य नसते. म्हणूनच मेघालय सरकारने मोसमयी हे ५०० मीटर लांबीचे भुयार सर्वसामान्य पर्यटकांसाठी सुसज्ज केले आहे. विजेचे दिवे, शिडय़ा मार्गदर्शक यांच्या साहायाने आपण या अनोख्या दुनियेचा लाभ घेऊ शकता. मध्य प्रदेश येथे भीम बेटका गुहादेखील अशाच प्रकारे पर्यटकांसाठी वेगळे आकर्षण आहे. चुनखडीचे डोंगर व प्रचंड पाऊस हे निसर्गनिर्मित गुहांसाठी लागणारे समीकरण देशात मेघालयाशिवाय अन्यत्र फारसे कोठे जमून येत नाही. त्यामुळे साहसाचा आनंद आणि निसर्गाचे वैभव अनुभवायचे असेल तर मात्र मेघालयात जावेच लागेल, तर मग करणार तुम्हीदेखील अंधाराच्या साम्राज्यातील अनोखा प्रवास.
response.lokprabha@expressindia.com