Lokprabha.com
५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य
२९ मार्च ते ४ एप्रिल २०१३
 

मेष प्रगतीची वाट खडतर आहे. नेटाने प्रयत्न केलेत तर इच्छित फळ नजरेच्या टप्प्यात येईल. व्यवसाय-धंद्यात नवीन आर्थिक वर्षांकरिता काही योजना आखल्या असतील तर त्या पैसे किंवा इतर कारणांनी लांबवणे भाग पडेल. त्यामुळे त्याविषयी वाच्यता न करणे चांगले. हातामध्ये रोख रक्कम कमी असल्यामुळे खेळत्या भांडवलाकरिता धावपळ करावी लागेल. नोकरीमध्ये मौजमजेच्या वेळेला सर्व जण पुढे असतील, पण कामाच्या वेळेला मात्र तुम्ही एकटेच पडाल. म्हणून स्वत:च्या नियोजनावर विश्वास ठेवा. वेळेचा दुरुपयोग झाल्यास वरिष्ठांना आवडणार नाही.
.......................................................

वृषभ सर्व प्रकारची सुखे तुम्हाला हवी असतात. विशेषत: पैशाने ज्या गोष्टी साध्य होतात. त्या करण्याकडे तुमचा विशेष कल असतो. तशी संधी मिळाल्यामुळे तुम्ही खूश असाल. व्यापार-उद्योगात भव्यदिव्य स्वप्न साकार करण्याकरिता जी आर्थिक कुमक आवश्यक आहे ती मिळेल. फक्त हे करताना स्पर्धकांचा अंदाज घ्या. नोकरीमध्ये संस्थेतर्फे उपलब्ध होणाऱ्या सवलतींचा फायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. मात्र त्याचा गैरवाजवी वापर करू नका. नाही तर गुप्त शत्रूंना तुमच्यावर कुरघोडी करण्याची संधी मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल. घरात शुभकार्य ठरेल.
......................................................

मिथुन सर्व ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत. जेव्हा नावीन्यपूर्ण उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर असते त्या वेळी तुम्ही स्वत:ला हरवून बसता. एखादी भुरळ पाडणारी कल्पना तुम्हाला गर्क ठेवेल. तुमच्याकडे कोणतेही कौशल्य अवगत असेल तर त्यातून प्रसिद्धीचे दालन खुले होईल. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता आणि स्पर्धकांना मागे टाकण्याकरिता एखादी चांगली संधी चालून येईल. नोकरीमध्ये स्वत:च्या कामाचे महत्त्व वाढवून पर्यायाने नेहमीपेक्षा जादा सवलती मिळवाल. लांबच्या प्रवासाला जाण्याचे योग येतील. वृद्धांना दूरच्या आप्तेष्टांना भेटता येईल.
.......................................................

कर्क सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल आहे. जनसंपर्क ही तुमची खास आवड. ज्या वातावरणामध्ये तुम्ही जाता तिथलेच होऊन बसता. त्यामुळे सगळ्यांना तुम्ही हवेहवेसे वाटता. याचा फायदा देणारा हा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात योग्य व्यक्तींशी संपर्क साधला गेल्यामुळे किंवा गाठभेट घडल्यामुळे काही कामे गती घेतील. ज्यांना नोकरी किंवा इतर कारणांकरिता परदेशी जायचे आहे त्यांना अनुकूल वातावरण लाभेल. घरामध्ये एखादा छानसा सोहळा ठरल्यामुळे नातेवाईक किंवा आप्तेष्टांचा सहवास लाभेल. तरुणांचे विवाह जमतील. कलाकार व राजकारणी व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल.
.......................................................

सिंह तुमचे काही खर्च वाढणार आहेत. ते अपरिहार्य कारणांकरिता असल्यामुळे काही इलाज चालणार नाही. स्वत:ची प्रकृती किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचे मन:स्वास्थ्य टिकविणे जड जाईल. देणी-घेणी किंवा एखाद्या शुभकार्याकरिता आर्थिक तरतूदही करून ठेवावी लागेल. व्यापार-उद्योगामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार तुमची धोरणे किंवा कामाची पद्धत बदलणे भाग पडेल. एखादा वेगळा प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा विचार मनात येईल. नोकरीमध्ये तुमचे काम किंवा संस्थेविषयी मतप्रदर्शन करू नका. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधण्याचे काम तुमच्यावर सोपवतील.
.......................................................

कन्या चैन आणि मौजमजा करणे हे तुमच्या स्वभावातच नाही. उलट सतत भविष्याविषयी नियोजन करून तुम्ही स्वत:ला दैनंदिन कामामध्येसुद्धा इतके जखडून ठेवता की स्वत:करिता वेळ काढत नाही. व्यापार-उद्योगात काही नवीन बेत आखले असतील तर त्यासंबंधीची माणसांची व पैशाची जुळवाजुळव करण्यात वेळ जाईल. नवीन प्रसिद्धी तंत्राचाही वापर करा. नोकरीमध्ये काम कमी पण दिखावा जास्त असेल. सहकारीही तुमच्या आनंदामध्ये सामील होतील. नवीन नोकरीच्या शोधामध्ये गती येईल. घरामध्ये शुभकार्याच्या निमित्ताने सगळ्यांचा मजेचा मूड असेल.
.......................................................

तूळ एकामागून एक प्रश्न आल्यामुळे तुमचे अनेक बेत आणि योजना तुम्हाला सध्या स्थगित कराव्या लागतील. आणि अखेरीस तुम्ही या निष्कर्षांवर याल की, आपण खूप बेत करूनही काहीही घडत नाही. प्रत्येक गोष्ट घडायला एक विशिष्ट वेळ यावी लागते. व्यवसाय-उद्योगामध्ये फारशी इच्छा नसूनही जाहिरात, प्रसिद्धी, जनसंपर्क यांसारख्या गोष्टींमध्ये वेळ घालवावा लागेल. कदाचित पैसेही खर्च करावे लागतील. नोकरीमध्ये लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे काय हे समजेल. घरामध्ये तुमचे बजेट किती आहे याला महत्त्व न देता इतर सदस्य हट्टी भूमिका घेतील.
.......................................................

वृश्चिक जी गोष्ट तुमच्या मनात असते ती पूर्ण करण्याकरिता तुम्ही अधीर असता आणि योग्य वेळेला एखादी कल्पना तुम्ही साकार करता. एखाद्या निमित्ताने तुमचा हट्टी आणि आग्रही स्वभाव जागृत होईल. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाईकांची ये-जा वाढेल. एखाद्या व्यक्तीकडून तुमचे कौतुकही ऐकायला मिळेल. धनप्राप्तीमध्ये सुधारणा करण्याकरिता कारखानदार व्यक्ती आधुनिक पद्धतीचा अवलंब करतील. नोकरीत काम करता करता काही हलकेफुलके क्षण अनुभवता येईल. कामाचा तणाव ओसरल्यामुळे वातावरण आनंदी असेल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी झाल्यामुळे त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल.
.......................................................

धनू ग्रहमान तुमचे लक्ष गृहसौख्यावर केंद्रित करायला लावणार आहे. नित्य कर्तव्यापासूनही सुटका नसेल. व्यवसाय-उद्योगामध्ये कामाची धावपळ जरी काही प्रमाणात कमी झाली तरी हातामध्ये असलेली जबाबदारी पूर्ण करावी लागेल. आर्थिक स्थिती समाधानकारक असल्यामुळे तुम्ही नििश्चत असाल. नवीन आर्थिक वर्षांकरिता काही बेत केले असतील तर त्याची सुरुवात व्हायला मात्र वेळ लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी कितीही तगादा केला तरी तुम्ही तुमच्या पद्धतीनेच काम कराल. नवीन नोकरीचे काम रेंगाळेल. घरातील अंतर्गत सजावट, पाहुण्यांचे येणे-जाणे यासंबंधी नियोजन होईल.
.......................................................

मकर जी संधी समोर आहे त्याचा फायदा कसा करून घ्यायचा ते तुम्हाला चांगले माहीत असते. तुमच्या गुणांचा आता विशेष उपयोग होईल. चैन किंवा आराम करणे हे तुमच्या तत्त्वात बसत नाही; परंतु जेव्हा अशी संधी मिळेल तेव्हा जीवनाचा आस्वाद घ्याल. हे करताना कर्तव्यात कसूर होणार नाही याकडेही तुमचे लक्ष असेल. व्यापार-उद्योगामध्ये नवीन आर्थिक वर्षांकरिता काही योजना केल्या असतील तर त्याचा श्रीगणेशा करण्याची तुम्हाला घाई असेल. नोकरीमध्ये एखाद्या सवलतीची मागणी केली असेल तर ती द्यायला वरिष्ठ तयार होतील. घरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम ठरतील. .......................................................

कुंभ तुमच्या कल्पकतेला भरपूर वाव देणारे ग्रहमान आहे. फक्त तुमच्या सहवासातील व्यक्तींना माहीत असते की पैसे खर्च करणे, हे तुम्हाला आवडत नाही. उलट कमावलेल्या पैशांचा संचय कसा करायचा याचा विचार तुमच्या मनामध्ये असतो. त्याला योग्य संधी मिळाली की तुम्ही त्याचा फायदा उठवता. अशी चांगली संधी या आठवडय़ामध्ये उपलब्ध होईल. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीचे बेत साकार होतील. व्यवसाय-उद्योगामध्ये पूर्वीच्या कामातून वसुली होईल. नोकरीमध्ये जादा भत्ते किंवा सवलती मिळतील. घरामध्ये शुभकार्याच्या निमित्ताने खरेदी किंवा पार्टीचे बेत ठरतील.
.......................................................

मीन चालू ग्रहमान म्हणजे वाळवंटात पाणथळ असल्याप्रमाणे आहे. जो तणाव निर्माण झाला होता तो अंशत: कमी होईल. आपुलकीच्या व्यक्तींकडून तुमच्या भावना जाणून घेतल्या जातील. व्यापार-उद्योगामध्ये पैशाची किंवा इतर काही मदत हवी असेल तर ती अपेक्षित व्यक्तींकडून किंवा वित्तीय संस्थेकडून मिळेल. नोकरीमध्ये ज्या कामांचा तुम्ही बाऊ केलेला होता ते काम लांबल्यामुळे किंवा रद्द झाल्यामुळे दिलासा लाभेल. घरामध्ये काही मतभेद झाले असतील तर त्यात समेट घडेल. एखादे शुभकार्य ठरेल / पार पडेल.
.......................................................

विजय केळकर Email : response.lokprabha@expressindia.com