२९ मार्च २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

कव्हरस्टोरी
संमतीवयाचा सरकारी घोळ
वयाचा वाद नेमका कुणासाठी?
काही नकोसे प्रश्न..
विचारांवर सेन्सॉर नाही अन् संस्कारांचा अभाव!
वयात येताना.. संमती देताना

दखल

स्त्री-मिती

थरार
उपक्रम
शिक्षण
क्रीडा
युवा
द्या टाळी..
कविता
विज्ञान तंत्रज्ञान
माझं शेतघर
एकपानी
शब्दरंग
शून्य प्रहर
पर्यटन
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
बूमरँग
नशीब
सिनेमा
लोकप्रभा उपक्रम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
गैरव्यवहारांची महासत्ता!
एखादी विदेशी व्यक्ती सुमारे २० वर्षांपूर्वी स्थायिक होण्यासाठी किंवा कामानिमित्ताने भारतात आलेली असेल आणि दररोजचे वर्तमानपत्र वाचत असेल तर त्या व्यक्तीला असे लक्षात येईल की, दरदिवशी या देशात कोणत्या ना कोणत्या बडय़ा गैरव्यवहारांची चर्चा सुरूच असते. एकही दिवस असा जात नाही की, त्या दिवशी कोणतीही गैरव्यवहारांची चर्चा झालेली नाही. काय विचार येतील त्या व्यक्तीच्या मनात? भारत हा गडबड-घोटाळ्यांचा आणि गैरव्यवहारांनी बरबटलेला देश आहे, अशीच काहीशी प्रतिमा त्या व्यक्तीच्या मनात अनेक वर्षे घर करून राहील. कधी तरी एकदा जागतिक स्तरावरील देश म्हणून आपण या घटनांचा गांभीर्याने विचार करणार आहोत का? की येत्या काही वर्षांत आपण सुपरपॉवर अर्थात महासत्ता होणार याच भ्रमात दिवस काढणार आहोत. अर्थात महाघोटाळ्यांची महासत्ता होण्याची असलेली आपली क्षमता मात्र या सर्व घटनांमध्ये पुरेपूर लक्षात येते आहे.

कव्हरस्टोरी
संमतीवयाचा सरकारी घोळ
कोणतीही अव्यवस्था, गोंधळ टाळण्यासाठी कायदा केला जातो. कायदा झाला की नियम येतात. ते पाळण्याची जबाबदारी येते. हक्क येतात. कर्तव्य येतात. पण एखादा गोंधळ कायद्यानेच निर्माण झाला असेल तर काय करायचं? बलात्कार विरोधी कायद्यासंदर्भात जी बदलाची प्रक्रिया सुरू आहे, तिने असंच वातावरण निर्माण केले आहे. शरीरसंबंधांच्या संमतीचे वय १८ वरून १६ करण्याची शिफारस केंद्रीय मंत्र्यांच्या गटाने केल्यानंतर सगळीकडे त्याबद्दल चर्चा सुरू झाली. सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर असा समज निर्माण झाला की सरकार हा विनाकारण बदल घडवू पहात आहे. हे बदलाचं वारं आपल्या तरुण मुलामुलींना कुठे घेऊन जाईल अशी एक सुप्त भीतीही पालकांच्या मनात निर्माण झाली. पण या सगळ्या चर्चा हे सगळं का सुरु आहे, ही वस्तुस्थिती मांडत नव्हत्या. फक्त शरीरसंबंधांच्या सहमतीचं वय कमी होणार ही शक्यता व्यक्त करणारा एकच मुद्दा मांडत होत्या. शरीरसंबंधांच्या संमतीचं वय काय असावं या प्रश्नाला वेगवेगळे पैलू आहेत. त्यामागे विशिष्ट कारणं आहेत. आणि एक घोळही आहे. हा घोळ निर्माण झाला आहे दोन वेगवेगळ्या कायद्यांमुळे. तो कसा हे मुळातूनच समजून घ्यायला हवं.

कव्हरस्टोरी
वयाचा वाद नेमका कुणासाठी?
बालक म्हणजे वय र्वष १८ खालील व्यक्ती ही गोष्ट बहुतेक सर्व जगाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालकहक्कविषयक संकेतावर उत्साहाने सह्य़ा करून मान्य केली आहे व सदस्य राष्ट्रांनी त्या संकेतानुसार आपापल्या कायदय़ात योग्य ते बदल करायला सुरुवात केली आहे. भारतातही विविध कायदय़ातील बालकविषयक व्य़ाख्येत विसंगती आहे व ती काढून टाकण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लैंगिक संबंधांच्या संमतीचं वय हे त्याअनुषंगानेच वाढवून वटहुकुमात १८ केलं गेलं आहे. लैंगिक संबंध हे व्यक्तीवर दूरगामी व गंभीर परिणाम करणारे असतात व त्यातील काही परिणाम अन्य जिवांना भोगावे लागतात, जसे की गर्भधारणा व अपत्य जन्म. बालक-बालिकांना लैंगिक संबंधाची क्लीष्टता, त्यानुसार होणारे शारीरिक मानसिक बदल, गर्भधारणा या वा अशा गोष्टींसाठी लागणारी शारीरिक मानसिक सामाजिक परिपक्वता नसल्याने संमतीचा अधिकार १८ नंतर देण्यात यावा, हा एक महत्त्वाचा आधार या धोरणाला आहे.


कव्हरस्टोरी
काही नकोसे प्रश्न..
दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर आपल्या समाजात बलात्कारासंदर्भात चर्चा सुरू झाली. विचारमंथन झाले. आता तर बलात्कारविरोधात सुधारित कायदा येऊ घातला आहे. पण वकील या नात्याने या सगळ्या चर्चेकडे बघताना मला काही मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात. माझे मुद्दे अनेकांना पटणार नाहीत, आवडणार नाहीत. पण वकील म्हणून काम करताना, समाजाची विविध रूपे पाहताना जे दिसते त्यातून म्हणजे अनुभवातून आलेले माझे मुद्दे आहेत. माध्यमांमधून, न्यायालय, कायदे यांच्यामार्फत आपल्यापर्यंत जे पोहोचतं ते तसंच असंत असं नाही, खूपदा परिस्थिती आपण समजतो त्यापेक्षा वेगळी असते असं मला म्हणायचं आहे. कायदे करताना स्त्रीला झुकतं माप दिलं गेलं आहे आणि त्याबरोबरच पुरुषावर अन्याय करण्यात आला आहे असं माझं अनुभवातून आलेलं निरीक्षण आहे. कायद्याने आपल्याला दिलेल्या या अवकाशाचा स्त्रिया गैरवापर करतात असंही मला वाटतं. मी या संदर्भात उदाहरणंही देऊ शकतो. कायद्याने स्त्रीला झुकतं माप दिलं आहे असं जे माझं म्हणणं आहे. त्यासंदर्भातलं सगळ्यात स्पष्ट उदाहरण म्हणजे बलात्काराच्या प्रकरणात संबंधित स्त्रीचं नाव प्रसिद्ध करायचं नसतं. तिची बदनामी होईल आणि उर्वरित आयुष्यात त्याचा तिला त्रास होईल असा हेतू त्यामागे असतो.

कव्हरस्टोरी
विचारांवर सेन्सॉर नाही
अन् संस्कारांचा अभाव!

समाजाच्या विविध क्षेत्र व स्तरांतून लैंगिक परवानगी केवळ कायद्याच्या आधारावर असलेल्या नियमानुसार देता येईल का? हा प्रश्न तसा गुंतागुंतीचा आहे. अर्थात प्रत्येक समाजाच्या नियमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे वय हे त्या नियमांच्या (कायद्याच्या) तुलनेत कमी असताना लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो, पण समाजपरंपरेमुळे बऱ्याचदा या गोष्टी कायद्याच्या चौकटीत डिक्टो बसवता येतात असे म्हणणेसुद्धा चुकीचे आहे, पण जेव्हा कायद्याने आपण अशा व्यक्तींवर एखादी कारवाई करतो तेव्हा प्रत्यक्षात समाजाला स्वीकृत नसलेले वयाचे अंतर आपण गृहीत धरतो किंवा अशा प्रकारचे गुन्हेगार जर आपल्या अधिकाराच्या जोरावर एखाद्या कायद्याने अज्ञात मुलाला किंवा मुलीला काबूत ठेवून लैंगिक बळजबरी करत असेल तर आपण तो गुन्हा मानतो. कुठल्या वयात साधारणपणे लैंगिक संबंधांना स्वेच्छेने परवानगी देण्यात येईल याचे मापन देशोदेशी, राज्याराज्यांत बदलू शकते. अर्थात या सगळ्या मापनावर तेथील संस्कृतीचा वा परंपरेचा पगडा असतो. कुणी १४, कुणी १८ हे वय लैंगिक संमतीसाठी धरू शकतं. आपल्या देशातसुद्धा व इतर आशियाई देशांतसुद्धा पूर्वी बालविवाह होत असत. अशा वेळी घोडनवरा व नुकतीच जाण आलेली बालिश वधू यांच्यात लैंगिक संबंध होत असत.

कव्हरस्टोरी
वयात येताना.. संमती देताना
ती सोळा वर्षांची. तो सतरा वर्षांचा. एका अनामिक ओढीने ते दोघे एकत्र आले. त्या आकर्षणाला ‘प्रेम’ म्हणू लागले. एक दिवस एका निवांत वेळी त्याने तिच्या डोळय़ात पाहिले. भाव वाचले. तिला जवळ ओढून अचानक तिचे चुंबन घेतले. ती थरथरली. घाबरली. तोही मग गडबडला. त्याने तिला विचारले, ‘काय झाले?’ ती म्हणाली, ‘मला अपराधीपणा वाटतोय रे.’ त्याने चकित होऊन विचारले, ‘कसला?’ ती म्हणाली, ‘आपण दोनदा पाप केल्याचा.’ त्याने बुचकळय़ात पडून म्हटले, ‘अगं, पण आपण तर एकदाच किस घेतला!’ ती उत्तरली, ‘हो, पण आता परत एकदा घेतल्याशिवाय तू सोडणार आहेस का?!’ अशी स्त्री-पुरुष संबंधांमध्ये मूक का होईना, पण संमती दर्शवणारे एक उदाहरण वर सांगितले आहे. कुठलीही अशी संमती, मुखसंमती वा मूकसंमती, देणारी स्त्री, ही संमती देण्यास सक्षम आहे का हे समाजाने जाणून घेण्यासाठी स्त्रीची मनोशारीरिक लंगिकता कशी निर्माण होत असते हे लक्षात घेतले पाहिजे. संमती वयाचा विचार करताना आपण स्त्रीचा विचार करतो.

दखल
निमित्त ‘मोनोरेल’च्या पहिल्या प्रवासाचे..
‘या मुंबईमध्ये लंडनसारखी मेट्रो रेल्वे येणार!’ असे वाक्य बालपणी अनेकदा आजोबांकडून ऐकल्याचे आठवते. त्या वेळेस लंडन आणि तिथली मेट्रो रेल्वे कशी दिसते हे आपल्याला कळण्याची किंवा समजण्याची तशी काही सोय त्या वेळेस नव्हती. नंतर दूरदर्शनच्या पडद्यावर एकदा बीबीसीने तयार केलेला लघुपट पाहण्याचा योग आला तेव्हा त्या लंडनच्या मेट्रोचे पहिले दर्शन झाले! आणि मग त्या लंडनच्या मेट्रोचे स्वप्न मुंबईत पाहायला सुरुवात केले. म्हणजे मेट्रो लंडनचीच होती पण ती मुंबईत जमिनीखालून धावते आहे असे ते चित्र मनोमन रेखाटले जायचे. त्यानंतर कॉलेजच्या वयात चर्चा सुरू झाली होती ती गोराई- नरिमन पॉइंट फेरीची. बोरिवलीहून अध्र्या तासात समुद्रमार्गे थेट नरिमन पॉइंट गाठता येणार.. केवळ कल्पनेनेच आनंद मिळाला होता तेव्हा! नंतर पत्रकारितेला सुरुवात झाली तेव्हा कळले की, हे मुंबई मेट्रोचे प्रकरण १९६२ सालापासून कागदावरच आहे. फक्त त्याचे आराखडे बदलत गेले इतकेच. त्याचा पहिला आराखडा करणाऱ्या पी. एस. पाटणकरांपासून ते अनेकांशी या विषयांवर चर्चा झाल्या, बातम्याही करून झाल्या.

भविष्य