२२ मार्च २०१३
मथितार्थ
चर्चा
फोटो गॅलरी

कव्हरस्टोरी
पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव
दुष्काळ आवडे सरकारला..?

दखल
दुनिया कांजीवरमची
‘गूढ’ इथले उकलत नाही..

सेकंड इनिंग

क्रीडा
युवा
कविता
विज्ञान तंत्रज्ञान
आरोग्यम्
एकपानी
शब्दरंग
वाईल्डक्लिक
भंकसगिरी
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अगतिक
‘मीलन’
मनोरंजन
लोकप्रभा उपक्रम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाईल्डक्लिक

‘बुगुन’चा अरुणाचल प्रदेश
बिभास आमोणकर

फिरायला जायचं आहे, वेगळा अनुभव हवा आहे, तर अरुणाचल प्रदेशसारखं दुसरं ठिकाण नाही. पण तिथे जायचं असेल तर थोडं नियोजन करणं आवश्यक ठरतं.

भारतातील उगवत्या सूर्याचा प्रदेश असं बिरुद मिरवणाऱ्या अरुणाचलचं निसर्गसौंदर्य आजही अबाधित आहे. म्हणून त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळलेल्या भटक्या लोकांसाठी अरुणाचलची वेगळ्या वाटेवरची सहल निसर्गसौंदर्यानी नटलेल्या आविष्कारांची सफर केल्याचाही आनंद देईल.
अरुणाचल प्रदेशात इगलनेस्ट, सेसा ऑर्किड, पाके, इटानगर, काणे, योडी रबे सुक्से, डिइरिंग मेमोरिअल, कामलांग अशी एकूण सात अभयारण्ये आहेत. तर माऊलिंग, मेहाओ आणि नामडापा ही राष्ट्रीय उद्याने असून दिहांग-दिबांग हे बायोस्पीअर रिझव्‍‌र्ह आहे. त्यामुळे एकाच सहलीत हे सर्व पाहणे तसं सोयीचं नाही. त्यामुळे येथे जाताना नक्की कुठं, कसं आणि का जायचं याचे प्लानिंग करणं खूप गरजेचं आहे.
पर्यटकांना येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. त्यासाठीच जाण्याआधी तेथील सरकारी कार्यालयांशी संपर्क साधून आवश्यक त्या परवानग्या घेणे गरजेचे आहे. एप्रिल हा महिना तेथे जाण्यासाठी सर्वात उत्तम समजला जातो. कारण संपूर्ण जंगल फुलांनी बहरलेले असते. साहजिकच विविध प्राणी आणि पक्षी त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांच्या विविध अ‍ॅक्टिव्हिटी आपल्याला तेथे पाहायला मिळतात. या बाबीचा फायदा छायाचित्रकारांना घेता येतो.
अरुणाचल प्रदेश जागतिक नकाशावर पुन्हा एकदा ठळकपणे पाहिला जाऊ लागला तो म्हणजे २००६ साली. कारण रमण्णा अत्रे या निसर्ग अभ्यासकाने स्थानिकांच्या मदतीने २००६ साली बुगुन लिओसिचला पक्षाचे अस्तित्व या जंगलांमध्ये असल्याचा शोध लावला. त्यामुळे अतिशय दुर्मीळ असलेल्या या पक्ष्याची जागतिक पक्ष्यांच्या यादीत नोंद करण्यात आली.
अरुणाचलमध्ये एप्रिलच्या अखेरीस पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास जंगलात सर्वत्र जळवा पसरू लागतात. अनेक वेळा छायाचित्रकारांना याला तोंड देणे भाग पडते. तसेच डाम-डुम नावाच्या सँडफ्लाइज अतिशय उपद्रव करतात. म्हणूनच पावसाच्या सरींपासून कॅमेरा सामग्रीचा बचाव करण्याची तयारी येथूनच करून गेल्यास उत्तम.
येथील जंगलांमध्ये फोटोग्राफी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. इथल्या दाट जंगलांमुळे एक्सपोजर/रीडिंग मिळणे खूप कठीण असते. त्यामुळे हाय आयएसओ वापरण्याची गरज कायम भासते. बारीकसारीक प्राणीपक्षी हे नेहमी दाट झाडांमध्ये असल्यामुळे त्यांची छायाचित्रे काढताना हीच पद्धत अवलंबावी लागते. शक्यतो टार्गेट/सब्जेक्ट आय लेव्हलला असणे उत्तम ठरते आणि बऱ्याचदा एखादा अतिशय उंच झाडावर बसलेला पक्षी किंवा प्राण्याची छायाचित्रे काढताना अँगल चुकीचा ठरतो, अशा वेळी आपल्याकडे वेळ आणि संयम असणे खूप आवश्यक असते.
या प्रदेशात रात्री तापमान उतरते आणि याचा परिणाम आपल्या कॅमेऱ्याच्या बॅटरी लाइफवर होतो. येथे बऱ्याच ठिकाणी विजेचा अभाव असल्यामुळे जादा बॅटरी सोबत बाळगणे आणि त्या एखाद्या गरम कपडय़ाच्या आवरणात ठेवणे गरजेचे आहे.
फिरायला जाणारे सर्वच प्रोफेशनल फोटोग्राफर असतात असं नाही आणि ज्यांना आवड असते अशा सर्वानाच महागातले कॅमेरे विकत घेता येत नाहीत. पण आजघडीला वाइल्डलाइफ फोटोग्राफीकडे नवोदित फोटोग्राफर्सचा ओढा वाढताना दिसत आहे. तो वाढत असतानाच बाजारात कमी किमतीत जास्त फंक्शन्स असलेले डिजिटल कॉम्पॅक्ट कॅमेरे घेणाऱ्यांकडे त्यांचा कल असतो. असं असलं तरी या कॅमेऱ्यांनीसुद्धा चांगली छायचित्रे काढता येतात. परंतु त्याआधी याच्या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करणे अतिशय गरजेचे असते. यातील लो लाइट सेन्सिटिव्हिटी, झूम लेन्सची रेंज आणि व्हिडीओ मोड हे सर्व एकाच साधनात वापरायला मिळतात. याउलट एसएलआरचा लवाजमा हाताळणे हे सीरियस किंवा प्रोफेशनल वाइल्डलाइफ फोटोग्राफर्सचेच काम ठरते.
कॉम्पॅक्ट कॅमेरा ही अलीकडे एक जादूची कांडी झाली आहे. एखाद्या फुलपाखराचा वा फुलाचा (मायक्रो) फोटोग्राफ घेत असताना अचानक एखादा पक्षी दिसला तर तोसुद्धा झटकन टिपणे यामुळेच शक्य होऊ शकते. तसेच याची लाइट सेन्सिटिव्हिटी उत्तम असल्यामुळे अगदी दाट झाडीत छायाचित्रे काढणेही शक्य होते.
येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आजवर असा समज होता की, वाइल्डलाइफ फोटोग्राफी करताना अतिशय उच्च दर्जाची साधनसामग्री लागते, परंतु कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेऱ्यामधील या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हा समज तसा फोल ठरतो. या विषयाची (वाइल्डलाइफ फोटोग्राफी) सुरुवात करणाऱ्यांनी सहज खिशाला परवडेल असा एखादा कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेरा घ्यावा आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा प्रवास सुरू करावा. हा प्रवास करत असताना या एकाच कॅमेऱ्याने मायक्रोपासून वाइड ते टेलीपर्यंतचे विविध विषय टिपता येतात. हे करत असताना आपल्या आवडीचा विषय हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागेल आणि मग या विषयाची सखोल फोटोग्राफी करण्यासाठी आवश्यक ती उच्च दर्जाची सामग्री घेण्याचा निर्णय घेता येईल. कालांतराने विषय आणि तंत्रज्ञान याचा भरपूर अनुभव घेऊन व अभ्यास करून मगच वरचा दर्जा गाठावा.
पाके अभयारण्य
पाके अभयारण्याचा प्रदेश साडेआठशे किलोमीटरवर पसरलेला आहे. अरुणाचल प्रदेशातील कामेंग जिल्ह्यामध्ये याचा समावेश होतो. १९७७ मध्ये या प्रदेशाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. त्याआधी तो खेलाँग जंगलाचा भाग होता. २००२ मध्ये त्याला वाघांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
हे अभयारण्य प्रू्व, पश्चिम आणि ईशान्य बाजूंनी नद्यांनी वेढलेले आहे. वर्षभर वाहणाऱ्या भरेली आणि पाके नद्या तसेच अनेक लहान-मोठय़ा नद्यांनी हा प्रदेश व्यापून टाकला आहे. येथे नोव्हेंबर ते मार्च या काळात कडाक्याची थंडी पडते. तर एप्रिल ते नोव्हेंबर हा काळ ईशान्य-पूर्व मान्सूनचा असतो. पण हाच काळ येथे भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो. येथे जवळपास ४० सस्तन प्राण्यांच्या जाती आढळतात. येथे आढळणाऱ्या सात तृणभक्षी जातींमध्ये हत्ती, बाìकग डियर, गवा आणि सांबर अगदी सहजपणे नजरेस पडतात. ऱ्हीसस, असामीज मॅकाक आणि कॅप्ड लंगूर ही इथल्या जंगलात दिसणारी माकडे आहेत.
या जंगलात पक्ष्यांच्या जवळपास २९६ जाती आढळतात. त्यामध्ये व्हाइट िवग वूड डक, अतिशय दुर्मिळ इबिसबिल आणि ओरिएंटल डे आउल यांचा समावेश आहे. हॉर्नबिल पाहण्यासाठी पाके हे अतिशय योग्य ठिकाण आहे. येथे जेरडोन्स बाझा, अमुर फालकन, व्हाइट-चिक्ड हिल पाट्र्रीज, ग्रे पिकॉक-फिसन्ट, एल्वस क्रेक, आयबिस बिल, एशियन एमब्राल्ड ककू, रेड हेडेड ट्रोगोन, ग्रीन पिजन, फॉरेस्ट ईगल, ग्रेट हॉर्नबिल, कॉलर्ड ब्रॉडबिल आणि लाँग टेल्ड ब्रॉडबिल, ब्लू नेप्ड पिट्टा, लेसर शॉर्टिवग, व्हाइट ब्राव्हड् शॉर्टिवग, पोर्कटेल, सुलतान टीट, रुबी चिक्ड सनबर्ड, मरून ओरिअल आणि क्रो-बिल्ड ड्राँगो हे पक्षी आढळतात.
भारतात फुलपाखराच्या १५०० हून अधिक जाती आढळतात, त्यापकी जवळपास ५०० फुलपाखरांच्या जाती येथे आढळतात. या सर्व गोष्टी ध्यानात घेता पक्ष्यांच्या फोटोग्राफीसाठी हा किती महत्त्वाचा प्रदेश आहे याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे तेथे जाण्याच्या आधी जर या विषयाचा व्यवस्थित अभ्यास केला तर अनेक चांगले फोटोग्राफ काढता येऊ शकतात.
हॉर्नबिल हा आकाराने अतिशय मोठा आणि आकर्षक पक्षी असून जंगलात त्याचा कॉल आणि जवळ असल्यास अनेकदा त्यांच्या पंखांचा आवाज सहज ऐकू येतो. यावरून त्याला लोकेट करणे सोपे जाते. बहुधा यांची जोडी एकमेकांना/ पिल्लांना भरवताना फोटो मिळण्याची शक्यता असते. हा पक्षी उडताना (फ्लाइटमध्ये) त्याच्या पंखांचा कृष्णधवल रंग अतिशय सुंदर टिपता येतो. हे पक्षी संध्याकाळी आपल्या विश्रांतीच्या जागी परततात तेव्हा अशा जागा कोणत्या हे जाणून घेतल्यास त्यांचे सुंदर फोटो काढणे शक्य होते. दिवसभर सबंध जंगलात फिरणारा हा पक्षी खूप अलर्ट असतो, त्यामुळे त्याची फोटोग्राफी करताना जंगलात वावरण्याचे बेसिक नियम पाळणे आपल्याच फायद्याचे ठरते.
ईगलनेस्ट अभयारण्य
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील ईगलनेस्ट अभयारण्य हा अतिशय संरक्षित प्रदेश आहे. सेसा ऑर्किड अभयारण्य ते ईशान्यपूर्व आणि पाऊई वाघ संरक्षित प्रदेशापलीकडील पूर्वेच्या केमांग नदीच्या मधोमध हा प्रदेश आहे. अतिशय दुर्लभ अशा पक्ष्यांच्या जाती आणि प्रजातीसांठी ईगलनेस्ट हा अतिशय महत्त्वाचा प्रदेश मानला जातो. भारतीय लष्कराच्या रेड ईगल डिव्हिजनला १९५० मध्ये या प्रदेशात तनात करण्यात आले होते, त्यावरून याचं नाव ईगलनेस्ट असं पडलं.
येथे शंभर मीटर उंच पर्वतरांग असून जवळपास ३५०० किलोमीटर हा परिसरावर पसरलेला आहे. विविध पक्ष्यांच्या येथे ४५४ जाती आढळतात. या अभयारण्यामध्ये भारतातील एकमेव अशा तीन ट्रगोपान जाती येथे आढळतात. २४ प्रकारच्या सापांच्या जाती, गेकोससह सात प्रकारच्या पालींच्या जाती तसेच अबोर हिल्स अगामाचा जवळपास १२५ वर्षांनी शोध याच अभयारण्यामध्ये लावण्यात आला.
लंगूर, बेंगॉल टायगर, आशियाई हत्ती, रेड पांडा, आशियाई ब्लॅक बीअर, अरुणाचल मॅकाक आणि गवा यांच्यासह मॅमलच्या एकूण १५ जाती येथे आहेत. भूतान ग्लोरी, ग्रे अ‍ॅडमिरल, स्केर्स रेड-फॉरेस्टर, डस्की लेबििरथ, टायगर ब्राऊन, व्हाइट-एड्ज बुश-ब्राऊन आणि व्हाइट आऊल अशा प्रकारच्या दुर्मीळ फुलपाखरांच्या जवळपास १६५ जाती येथेच पाहायला मिळतात. येथे आढळणारा आशियाई हत्ती नेहमीच फोटोग्राफर्ससाठी आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. हत्तीची छायाचित्रे काढताना आपल्याला खबरदारी घेणे आवश्यक आहे. हत्ती हा कळपाने फिरणारा प्राणी आहे. त्यामुळे अनेक वेळा कळपामध्ये अतिशय लहान पिल्लांचाही समावेश असतो. असे असल्यास शक्यतो त्या कळपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न टाळावा. एखादा नर हत्ती आढळल्यास अतिशय सावधता बाळगावी लागते. कारण तो जर माजावर असला तर अतिशय हानिकारक/ धोकादायक ठरू शकतो. हत्तींना पाणी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हे प्राणी जलक्रीडा करत असताना त्यांचे सुरेख मूड्स टिपता येतात, तसेच माद्या आणि पिल्ले यांच्या हालचालीदेखील अतिशय मोहक असतात.
नामडापा राष्ट्रीय उद्यान
जैवविविधतेने नटलेले नामडापा अभयारण्य समुद्रसपाटीच्या वर जवळपास २०० ते ४५०० मीटर परिसरात पसरलेले उंच आणि घनदाट सदाहरित पर्जन्यवन आहे. येथील बांबूचे जंगल आणि केनब्रेकर्स व्हॅलीमधील सर्वात घनदाट प्रदेश मानण्यात येतो. येथे कॉन्स्पिक्युअसपासून वोकल हूलॉक गिबन ते ठिपक्याच्या लिनसांग अशा मॅमलच्या जवळपास शंभर जाती आहेत. वाघ, चित्ता आणि क्लाऊडेड चित्ता अशा मांजरीच्या सर्वात मोठय़ा आकाराच्या तीन जाती आढळणारे नामडापा हे फक्त भारतातीलच नव्हे, जर जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. या जंगलात ग्लोबल रेरिटिससारख्या स्नोवी थ्रोटेड बॅबलर, व्हाइट-बेलिड हेरॉन, रूफोस-नेकेड हॉर्नबिल आणि वार्ड्स ट्रोगोन अशा विविध पक्ष्यांच्या जवळपास पाचशे जाती आढळतात. येथील सरपटणारे प्राणी आणि भूजलचर प्राण्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन होणं बाकी आहे. त्यामुळे तुम्हाला एखादा सरपटणारा किंवा भूजलचर दिसला तर त्याचे फोटो काढून त्याची माहिती मिळवून ती योग्य व्यक्तींना पोहोचवल्यास पर्यटनाला अभ्यासाची आणि संशोधनाचीही साथ लाभेल. किंग कोब्रा, विविध प्रकारचे पीट वायपर आणि मोठाले झाड बेडूक या येथे आढळणाऱ्या माहितीतील प्रजाती आहेत. या प्रदेशातील प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या अनेक प्रकारच्या जाती-प्रजाती अद्यापही शोधण्याचे काम सुरू आहे. म्हणूनच या विषयासाठी तुम्ही सीरियस फोटोग्राफी करणार असाल तर हा प्रदेश आदर्श म्हणावा लागेल.
नामडापामध्ये आढणारा हुलॉक गिबन हा भारतात सापडणारा एकमेव प्रायमेट आहे. याला शेपटी नसून हात मात्र अतिशय लांब असतात. कायम उंच झाडांच्या कॅनोपीमध्ये वावर करणारे हे माकड क्वचितच जमिनीवर दिसते. याचा कॉल अनेक किलोमीटर दूपर्यंत ऐकू येऊ शकतो आणि अशा ठिकाणी पोहोचल्यास सहसा एखादी जोडी आपल्या पिलासकट तेथे खानपान करताना दिसते. यांच्या लांब हाताच्या साहाय्याने हे प्राणी अतिशय सुबकतेने फांद्यांमध्ये झोके घेतात. यांच्या हालचाली टिपण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. खासकरून सतत खेळकर पिल्लू सांभाळण्याची जबाबदारी आलटून-पालटून नर व मादी त्यांच्या दिनक्रमात पार पाडत असतात. ही माकडं झाडावरील फुलं आणि फळं खात असताना आसपास अनेक पक्षी किंवा नशीब चांगले असल्यास एखादी मलयन खारही दिसून येते. त्यामुळे जंगलात फोटोग्राफी करताना आपलं टार्गेट जरी एक असलं तरी त्याच्या साथीने फोटोग्राफीसाठी अनेक पर्याय आपसूक चालून येत असतात, त्यांना टिपणे मेजवानी ठरत असते.
अरुणाचल हे भारतातलेच राज्य असले तरी इथे जाण्यासाठी भारताच्या इतर भागांतील नागरिकांना आय एल पी (इनर लाइन परमिट) लागते. हे परमिट मिळण्यासाठी नवी दिल्ली आणि भारतातील इतर काही शहरांमधून अर्ज करता येतो. अर्ज मंजूर झाल्यावर अरुणाचलमध्ये प्रवेश मिळतो. अर्थात, भारतीय नागरिकांना हे परमिट मिळणे तसे अवघड नसते. अतिशय विरळ वस्तीचा हा प्रदेश डोंगराळ आणि नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेला आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक यामुळे पृथ्वीवरील नंदनवन समजला जाणऱ्या या प्रदेशाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. response.lokprabha@expressindia.com