२२ मार्च २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चर्चा
फोटो गॅलरी

कव्हरस्टोरी
पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव
दुष्काळ आवडे सरकारला..?

दखल
दुनिया कांजीवरमची
‘गूढ’ इथले उकलत नाही..

सेकंड इनिंग

क्रीडा
युवा
कविता
विज्ञान तंत्रज्ञान
आरोग्यम्
एकपानी
शब्दरंग
वाईल्डक्लिक
भंकसगिरी
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अगतिक
‘मीलन’
मनोरंजन
लोकप्रभा उपक्रम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
जीवाश्मांचा सांगावा!
मराठवाडा म्हणजे बहुतांश दुष्काळी भाग असे एक समीकरणच गेल्या अनेक वर्षांमध्ये रूढ झाले आहे. पण आपल्याला असे कुणी सांगितले की, आता दुष्काळी असलेला मराठवाडय़ाचा बराचसा भाग हा काही हजार वर्षांपूर्वी मात्र अतिशय हिरवागार होता, हा देशातील सदाहरित असा भाग होता.. तर? तर कदाचित आपण असे सांगणाऱ्याला वेडय़ात काढू. गेली अनेक वर्षे दुष्काळ भोगणारा आणि आता वाळवंटसदृश परिस्थितीच्या दिशेने प्रवास करणारा हा भाग सदाहरित होता, याचा पुरावा आपल्याला याच परिसरात सापडणाऱ्या हजारो वर्षे जुन्या असलेल्या जिवाश्मांमध्ये सापडतो. या परिसरात सापडलेल्या जिवाश्मांवरून संशोधकांना असे लक्षात आले आहे की, हा भाग केवळ सदाहरित नव्हता तर इथे अतिशय उत्तम जैववैविध्य सुखाने नांदत होते. अतिशय घनदाट असे जंगल होते आणि नानाविध प्रकारचे प्राणीही होते. त्या तत्कालीन नदीला अनेकदा मोठा पूरही येत असे. आता मात्र तीच नदी आटलेल्या अवस्थेत दिसते.. आणि आता तर सततच्या दुष्काळामुळे या प्रदेशाचा प्रवास वाळवंटसदृश प्रदेशाच्या दिशेने होतो आहे. या साऱ्याचा विचार अतिशय गांभीर्याने करणे हा आता जीवन-मरणाचा प्रश्न आहे.

कव्हरस्टोरी
पुरातन जलस्रोत बारवांची धूळधाण!
आज महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट आले आहे. गावोगावी शेतीला सोडा, प्यायला पाणी नाही. धरणांतील जलसाठा सरासरी ३५ टक्केवर आला आहे. मृत साठे वापरायची वेळ लवकरच येणार आहे. हे निसर्गनिर्मित संकट नसून मानवनिर्मित संकट आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहे. चुकीच्या जलखाऊ पीकपद्धतींनी पाण्याची अक्षम्य उधळपट्टी होत आहे. त्यात आम्ही आमच्याच पूर्वजांनी शोधलेल्या शाश्वत जलपुरवठा पद्धतींचा विनाश करत आणला आहे. बारव हा त्यातीलच एक जलव्यवस्थापनाचा लोकोपयोगी प्रकार. आज महाराष्ट्रात खेडोपाडी १५ हजारांच्या आसपास बारवा आहेत. त्यातील हजारो केवळ दुर्लक्षामुळे निरु पयोगी झाल्या आहेत. आज गरज आहे ती या बारवांच्या पुनरुज्जीवनांची, ज्यायोगे किमान पिण्याच्या पाण्याची समस्या कमी व्हायला मदत होऊ शकेल.बारव हा केवळ भारतात आढळणारा सार्वजनिक जलव्यवस्थापनाचा व स्थापत्यशास्त्राचाही एक अद्भुत नमुना आहे. बारवेलाच बावडी, बाव अशी प्रादेशिक नांवे आहेत. तीन हजार वर्षांपूर्वीची सर्वात जुनी बारव गुजरातमध्ये उत्खननात सापडलेली आहे. मोहेंजोदरो-हरप्पा येथे उत्खननात सापडलेली साडेपाच हजार वर्षांंपूर्वीची सार्वजनिक स्नानगृहेही आजच्या बारवांची आद्य रूपे आहेत.

कव्हरस्टोरी
बारव नव्हे, परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण
बारव म्हणजे नेमके काय, हे समजून घेण्याआधी मानवी वसाहतीच्या इतिहासात थोडेसे डोकवावे लागेल. जगभरात जेथे कोठे मानवी वसाहत स्थिरावली, विकसित झाली, ती मुख्यत: नदी अथवा जलाशयाच्या काठावर. बहुतांश वेळा हे पाण्याचे स्रोत बारमाही असत (उदा. सिंधू आणि गंगा नदीच्या किनारी तयार झालेल्या वसाहती). असे निसर्गत: उपलब्ध पाणीस्रोत सोडले असता भूगर्भातर्गत पाण्याचे अनेक प्रवाह असतात. त्यांचा शोध कसा घ्यायचा याचे नेमके तंत्र आमच्या ऋषी-मुनींनी उत्तम शोधून ठेवले आहे. भूमीअंतर्गत जलशोध ही संकल्पना जशी जशी विकसित होत गेली तसतसे नदी अथवा निसर्गनिर्मित जलाशय नसतानादेखील नवनव्या वसाहती उदयास आल्या. ज्या ठिकाणी विशिष्ट अशा अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे नगराचा विकास करणे योग्य ठरले, अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा शोध घेऊन विविध प्रकारचे आड, विहीर, बारव व पोखरणी निर्माण करण्यात आली. उदा. कंधार ही राष्ट्रकूट राजांची उपराजधानी, येरगी, धर्मपुरी, गणेशवाडी ही चालुक्य सामंतांनी विकसित केलेली नगरे, तर अंबाजोगाई, चारठाणा, अंबड यांसारखी यादवकालीन स्थाने. गरज ही शोधाची जननी असल्यामुळेच बारव स्थापत्य म्हणजे परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण आहे, असे मला म्हणावे वाटते.


कव्हरस्टोरी
आजही वापरता येतील मराठवाडय़ातील बारव
औरंगाबाद-परभणी मार्गावर शयना नदीच्या काठावर चारुस्थान (चारू- सुंदर, स्थान - ठिकाण) म्हणजेच आजचे चारठाणा परभणी जिल्ह्य़ातील ठिकाण वसलेले असून येथील विविध देवदेवतांची मंदिरे, ५५ फुटी झुलता दीपस्तंभ यासह गोकुळेश्वर मंदिराच्या बाजूलाच असणारी बाराव्या शतकातील बारव प्रसिद्ध आहे. या बारवेला चारही बाजूंनी दरवाजे असून प्रत्येक खांबावर उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आजही पाहावयास मिळतात. साधारण पंधराव्या-सोळाव्या शतकापर्यंत या बारवेचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी करत होते. मात्र सद्य:परिस्थितीत बारवेतील पाण्याचा रंग हिरवा झाला आहे. पाण्यात शैवालजन्य सूक्ष्म वनस्पतीची वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही. वास्तविक बारमाही पाणी असणारी ही पुरातन बारव आजही या गावातील नागरिकांची तहान भागविण्यास समर्थ आहे. गरज आहे ती फक्त स्वच्छतेची.हेमाद्रीपंताचे मूळ गाव असणाऱ्या हेलस, ता. मंठा, जि. जालना येथील बारव हेमाडपंथीकालीनच असून महादेव मंदिराच्या समोर असणारी ३०x३० चौरसाकृती ५०-५५ फूट खोल असणारी बारव आजमितीसदेखील गावातील बऱ्याच कुटुंबांची तहान भागवते. पुरातन काळात या ठिकाणी पाणी काढण्यासाठी विशिष्ट प्रकारची सोय केली जायची, हे आजही आपणास दिसते. दगडी बांधकाम असणाऱ्या या बारवेत पावसाळ्यात पाणीच पाणी असते. तसेच उन्हाळ्यातसुद्धा येथील पाणी आटत नाही हे विशेष.

कव्हरस्टोरी
दुष्काळ आवडे सरकारला..?
गंगापूर तालुक्यात चारा छावणीवर हजारो जनावरे दावणीत तोंड खुपसून बसलेली, भर उन्हात रवंथ करणारी. छावणीच्या वरच्या दोन काठय़ांना बांधलेल्या डिजिटल फलकावर अपक्ष आमदार प्रशांत बंब यांचा चेहरा ठसठशीतपणे दिसतो. शेजारीच दोन बैलांच्या पाठीमागे एक लोखंडी पलंग. तेथे जनावरांच्या देखभालीसाठी आलेले शेतकरी. छगन विठोबा रावते यांचे वय झालेले. त्यांची मुले लासूर स्टेशनला हमाली करतात. तीन एकर शेती, तशी बागायती. म्हणजे विहीर आहे, पण या वर्षी जुलैमध्येच पाणी आटले. त्यांनी कापूस लावला होता. पाऊस आला नाही, हाती काही लागले नाही. ८ क्विंटल कापूस झाला. त्याचे ३६ ते ४० हजार रुपये आले. एवढय़ा पैशांत वर्षभर घर चालविणे कठीणच. पैसे कसे संपले ते कळलेदेखील नाही. आता जनावरांना चारा आणि पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांची गुरे आणि ते छावणीत मुक्कामी. दुष्काळ या शब्दाभोवतालचे जनजीवन निराळे आणि त्याच शब्दाचा रंगमंच वेगळा. मराठवाडय़ातील अनेक चित्रे विरोधाभासी. संगतीला छेद देणारी. एका बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब घागरीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला ऊस. शिवारात ऊस आणि गावात टँकर, असे चित्र गावोगावी.

दखल
दुनिया कांजीवरमची
दोन शतकं लोकांच्या तोंडी नाव असणं हे भाग्य फार कमी नावांच्या वाटय़ाला येतं. कांचीपुरम हे अशा काही भाग्यवान नावांच्या मधलं एक. दक्षिण भारतातील एक छोटेखानी शहर. या शहरवजा गावामध्ये मंदिरांची संख्या ही तिथल्या घरांपेक्षा फार कमी नसावी. एकेकाळी येथे चोल राजाचं राज्य होतं, पण कांचीपुरमचं नाव जगासमोर आलं ते राजा कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीत. त्या काळी काही विणकर ठिकठिकाणाहून येथे आले आणि त्यांनी जागतिक कीर्तीची एक कलाकृती जन्माला घातली, ‘कांजीवरम’ साडी. आज जगभरातल्या बाजारपेठांमध्ये कांजीवरम साडीने आपले बस्तान बसवलं आहे. आपल्याकडे तर नववधूचे सौंदर्य खुलवण्याचं कार्य कांजीवरम साडी वर्षांनुवर्षे करत आहे. साडीच्या पदरावर असणारे विविध रंग, नक्षीकाम आणि या साऱ्याला झळाळी आणणाऱ्या सोन्याच्या तारा हे कांजीवरम साडीचं वैशिष्टय़ आहे. चेन्नईपासून अवघ्या ७० किलोमीटरवर कांचीपुरम हे शहर आहे. इथे वर्षांनुवर्षे कांजीवरम साडी बनवण्याचं काम केलं जातं.

दखल
‘गूढ’ इथले उकलत नाही..
विदर्भातील भंडारा जिल्ह्य़ात असणारे मुरमाडी गाव आज देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. खरे तर भारतातल्या कोणत्याही गावांसारखे हे गाव. १६ फेब्रुवारीच्या दुपारी गावातील विहिरीमध्ये गावातच राहणाऱ्या तीन मुलींचे मृतदेह आढळले. या तिघीजणी सख्ख्या बहिणी होत्या. तिघी अनुक्रमे सहा, नऊ आणि दहा वर्षांच्या होत्या. या तिन्ही मुली आपल्या आई आणि आजी-आजोबांसोबत राहात होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. १४ फेब्रुवारीला त्या तिघी शाळेला गेल्या, त्या परत आल्याच नाहीत. त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या आजीने पोलीस स्टेशनमध्ये मुली हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह विहिरीत आढळले. तेव्हा लहान मुलीच्या अंगावर शाळेचा गणवेश होता (पांढरा शर्ट आणि निळा स्कर्ट), तर मोठय़ा मुलीच्या अंगावर निळी पँट आणि लाल टी-शर्ट होता. डॉक्टरांच्या पथकाने तिन्ही मृतदेहांचे पोस्ट मार्टेम केले, पण त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते अजूनही समजू शकलेले नाही. वैद्यकीय अधिकारी सांगतात, ‘‘सगळ्यात मोठीचा तसंच धाकटीचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला नाही. कारण त्यांच्या फुप्फु स आणि पोटामध्ये पाणी आढळलेले नाही.

भविष्य