१५ मार्च २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

महिला विशेष
तिच्या ऊर्जेला सलाम!
सुकाणू तिच्या हाती...
विलक्षण चळवळीचं नेतृत्व
२४ तास टांगती तलवार
आधुनिकतेची व्याख्या जगणारी!
योग्य माणूस मिळवणे हेच आमचे टार्गेट...
प्रभावी व्यवस्थापनामागची संवेदनशीलता

महिला विशेष
अनाघ्रात मातृत्वाचे संभाव्य अद्भुत!
स्त्रीधार्जिणे जनुकविज्ञान
माझा आवडता सण - ८ मार्च!

स्मरण

क्रीडा
यूथ
कविता
द्या टाळी...
आरोग्यम्
एकपानी
शब्दरंग
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
माझं शेतघर
शून्य प्रहर
ट्रॅव्हलोग्राफी
संख्याशास्त्र
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
‘नजर’ बदला.. अगर नष्ट व्हा !
जागतिक महिला दिन यंदाही धूमधडाक्यात साजरा होणार.. कारण आता त्याचा इव्हेंट झाला आहे. महिला दिन साजरा होण्याच्या प्रमाणात प्रतिवर्षी वाढच होत आहे. त्या निमित्ताने साजरे होणारे कार्यक्रम सातत्याने वाढत आहेत. आता तर जवळपास सर्वच राजकीय पक्ष आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या महिला दिवसाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यातही सौंदर्यप्रसाधने आणि ज्या उत्पादनांचा ग्राहकवर्ग हा प्रामुख्याने महिला आहेत, अशा उत्पादक कंपन्या महिलांसाठी नानाविध प्रकारच्या स्पर्धा आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. महिला, तरुण मुली यांच्यावर बक्षिसे, पुरस्कार, शिष्यवृत्त्या यांची खैरात करतात. एरवी राजकीय पटलावर महिला आरक्षणाला कडाडून विरोध करणारे राजकीय पक्षही या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये आघाडीवर असतात. आपण सारे असे गृहीत धरतो की, महिलांच्या हक्कांविषयी जाणीवजागृती करण्यात आपल्याला यश आले आहे. पण हे कितपत खरे असते?

महिला विशेष
सुकाणू तिच्या हाती...
समुद्रातून परतीच्या प्रवासात बंदर जवळ येऊ लागले की मग जहाजाच्या डेकवरून कॅप्टनचा आवाज अधिक घुमू लागतो. जहाजाने नांगर टाकण्यासंदर्भातील सूचना एकामागोमाग एक करत सुरू असतात. हा पहाडी आवाज असतो एका महिलेचा! ‘एमटी सुवर्ण स्वराज्य’ या टँकरनौकेच्याच बाबतीतील हे वेगळेपण नाही तर मर्चंट नेव्हीतील समस्त भारतीयांसाठीही ही नावीन्याचीच गोष्ट आहे. १९१७ रोजी भारतामध्ये मर्चंट नेव्हीची मूहूर्तमेढ रोवली गेली.. त्यानंतर एका भारतीय महिलेने कॅप्टन म्हणून मर्चंट नेव्हीत सूत्रे हाती घेण्यास तब्बल ९५ वर्षांचा कालावधी जावा लागला. पहिली भारतीय महिला कॅप्टन म्हणून एमसी राधिका मेनन हिने आता सूत्रे हाती घेतली आहेत. ‘जहाजाची प्रमुख म्हणून सूत्रे हाती असणे आणि तुम्ही इतर कोणत्याही संस्था- संघटनेमध्ये प्रमुख म्हणून काम करणे यात मूळ भेद काहीच नाही.

महिला विशेष
विलक्षण चळवळीचं नेतृत्व
इंटरनेटशिवायच्या जगाची आता कल्पनाही करता येणार नाही. तशीच इंटरनेटवर कोणतीही माहिती शोधायची असेल तर गुगल आणि विकिपिडियाशिवाय कुणी पुढे जाऊ शकत नाही. विकिपिडियाच्या मुळाशी आहे विकिमीडिया फाउंडेशन. विकिमीडिया फाउंडेशन ही जगभर ज्ञान-माहितीचा प्रसार करणारी अनोखी चळवळ आहे. माहिती स्रोताचा खुलेपणा हे तिचं वैशिष्टय़ं आहे. माहितीवर सगळ्यांचा अधिकार म्हणून ती द्यायचीही सगळ्यांनी असं म्हणून विकिमीडिया फाउंडेशनने विकिपिडियाची निर्मिती केली. विकिपिडियावर माहिती टाकणाऱ्या, ती संपादित करणाऱ्या कार्यकत्यांचं जाळं तयार केलं. विकिमीडिया जे काही करतं, ज्या नवनवीन कल्पना आणतं, त्यामागे जी धोरणं असतात, त्यांच्या रचनेत एका भारतीय व्यक्तीचाही हात आहे. ती भारतीय व्यक्ती म्हणजे बिशाखा दत्ता.


महिला विशेष
२४ तास टांगती तलवार
‘‘क्लायंटने सांगितलेले असते की, त्याची जाहिरात अमुक प्रकारच्या अमुक इतक्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मीडिया एजन्सीने त्याप्रमाणे प्लानपण दिलेला असतो. कधी कधी अगदी जाहिरात प्रसारित होण्याआधी एक-दोन दिवसांपर्यंतदेखील प्लानमध्ये बदल सुरू असतात. सगळे सोपस्कार होऊन जाहिरात माध्यमांमध्ये प्रसारित करणे सुरू असते, पण आयत्या वेळी एखादी घटना घडते. लोकांचे लक्ष विचलित होते. ज्या ज्या लोकांना टाग्रेट करून प्लािनग केलेले असते ते अशा वेळी दुसरी वाहिनी पाहू लागतात. इकडे क्लायंटची घालमेल सुरू होते. तो सांगतो, चेस देम.. आणि मग मीडिया एजन्सीची पळापळ सुरू होते. हे आता नेहमीचेच झाले आहे. तो पसे मोजत असतो, त्याच्या ३० सेकंदांच्या जाहिरातीच्या प्रसारणाची किंमत लाखांमध्ये असते. अशा वेळेस त्याला व्ह्य़ूअरशिप मिळाली नाही, तर मग आमचा रोल काय राहणार?

महिला विशेष
आधुनिकतेची व्याख्या जगणारी!
अरुंधती क्षीरसागर मूळच्या अकोल्याच्या. पूर्ण वेळ समाजसेवा करण्याची स्वप्नं बघणाऱ्या. पण वडिलांचं अकाली निधन झालं आणि आपली सगळी स्वप्नं बाजूला ठेवून घरची जबाबदारी उचलायची आहे, हे त्यांनी स्वीकारलं. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीयिरग केलं. कॉम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. शिक्षण सुरू असतानाच रिसेप्शनिस्टपासून मिळतील त्या नोकऱ्या केल्या. अशा नोकऱ्या करता करता आयटी क्षेत्रात काम करण्याच्या संधी मिळत गेल्या आणि तेच त्यांचं पुढच्या काळातलं कामाचं क्षेत्र असणार हे जणू ठरून गेलं. आज त्या रिलायन्स ग्रुपमध्ये आयटी एन्टरप्राइजच्या जनरल मॅनेजर आहेत. या सगळ्याची सुरुवात करून देणारी पुण्यामधली बजाज टेम्पोची त्याची पहिली पूर्ण वेळ नोकरी त्यांना आजही आठवते. १९९९ हे वर्ष होतं. सगळीकडे वाय टू केचा बोलबाला होता.

महिला विशेष
योग्य माणूस मिळवणे हेच आमचे टार्गेट...
बऱ्याच वेळा असे समजले जाते की, सेल्स आणि मार्केटिंगमध्येच टार्गेट असते. अमुक इतक्या रुपयांची विक्री करून त्यांना कंपनीला फायदा मिळवून द्यायचा असतो. म्हणजेच कंपनीला फायदा हेच टार्गेट म्हटले तर कंपनीसाठी योग्य माणूस मिळवणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. कारण योग्य माणूसच कंपनीचे काम चांगले करून कंपनीला फायदा मिळवून देऊ शकतो. आणि असा योग्य माणूस मिळवणे हे टार्गेट तर मनुष्यबळ विकास विभागाचे (एचआर) हमखास असते. अर्थात तो फक्त मिळवून देऊन चालत नाही, तर पुढे त्याच्या विकासाची-वाढीची तसेच तो पुढे कंपनीबरोबर कसा राहील याची जबाबदारीदेखील त्यांचीच असते. नेमणुकीपासून ते त्याच्या निवृत्तीपर्यंत हा विभाग त्या कर्मचाऱ्याच्या बरोबर असतो. त्यातच जर कंपनी औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असेल, तर मग अशा मनुष्यबळ विकास विभागाचे काम म्हणजे तर एक मोठा व्यापच असतो. असाच भलामोठा व्याप पेलण्याचे काम सुजाता पटेल करत आहेत.

महिला विशेष
प्रभावी व्यवस्थापनामागची संवेदनशीलता
विठ्ठल गांधी हे मूळचे स्वातंत्र्यसैनिक. वाढत्या रोगराईला आळा घालणारी प्रभावी औषधे सामान्यांना कमी किमतीत आणि सहज उपलब्ध झाली पाहिजेत या त्यांच्या जाणिवेतून आकाराला आली यू.एस.व्ही. प्रायव्हेट लिमिटेड. गांधी यांच्या स्वप्नाला आकार दिला तो त्यांचे चिरंजीव अरविंद विठ्ठल गांधी यांनी. त्यांनी मुंबईमध्ये औषधनिर्मिती प्रकल्प उभारला आणि आज बहुराष्ट्रीय कंपनीचा पसारा समर्थपणे साभाळत आहेत अरविंद यांच्या कन्या लीना गांधी-तिवारी. १९८६ साली वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे कंपनीची संपूर्ण सूत्रे लीना तिवारी यांना हाती घ्यावी लागली. त्यांना केवळ कंपनीचा डोलाराच सांभाळायचा नव्हता, तर सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांचा उपयोग व्यवसायवाढीच्या कामात करायचा होता.

 

भविष्य