८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

विज्ञान तंत्रज्ञान

‘क्युरिओसिटी’ मंगळस्वारीची
प्रशांत जोशी

क्युरिओसिटी हे मंगळावर उतरणारे पहिले यान नाही, ही बाब खरी असली तरी क्युरिओसिटी हे मंगळावर उतरणारे सर्वात मोठे आणि अद्ययावत सुविधांनी सज्ज असे यान आहे. क्युरिओसिटीमुळे गेल्या सहा महिन्यांतच मंगळाबद्दलच्या आपल्या ज्ञानात बरीच भर पडली आहे. क्युरिओसिटी, त्याने मंगळावर आतापर्यंत केलेले संशोधन, त्याचे उद्दिष्ट याबद्दल-

अवकाशात चमकणाऱ्या मंगळाच्या टपोऱ्या लाल चांदणीबद्दल मानवाच्या मनात प्रागैतिहासिक काळापासून भीतीयुक्त आदर होता. पुढे ही चांदणी म्हणजे पृथ्वीसदृश दिसणारा एक ग्रह आहे हे कळल्यावर ही भीती कुतूहलामध्ये रूपांतरित झाली आणि ते कुतूहल आजतागायत प्रत्येक मानवी मनात जिवंत आहे. आज पृथ्वीला पर्याय म्हणून चंद्रासोबत मंगळाचाही विचार करण्यात येत आहे. त्याचदृष्टीने गेल्या दशकभरापासून मंगळावरील संशोधनाला वेग आलेला दिसतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी म्हणावी अशी एक घटना घडली, ती म्हणजे ‘मार्स सायन्स लॅबोरेटरी’ याअंतर्गत असणारे मार्स रोअर (क्युरिओसिटी) मंगळावर यशस्वीरीत्या उतरविण्यात नासाला यश आले. क्युरिओसिटी हे मंगळावर उतरणारे पहिले यान नाही, ही बाब खरी असली तरी क्युरिओसिटी हे मंगळावर उतरणारे सर्वात मोठे आणि अद्ययावत सुविधांनी सज्ज असे यान आहे. क्युरिओसिटीमुळे गेल्या सहा महिन्यांतच मंगळाबद्दलच्या आपल्या ज्ञानात बरीच भर पडली आहे. याच क्युरिओसिटीबद्दल व त्याने मंगळावर आतापर्यंत केलेल्या संशोधनाबद्दल, त्याच्या नक्की उद्दिष्टांबद्दल जाणून घेण्यासाठी केलेला हा लेखप्रपंच..
आपल्याकडे पुराणकाळापासून मंगळ आणि पृथ्वी यांच्यातील साधम्र्याचे वर्णन केलेले आहे. काही ठिकाणी मंगळाचा पृथ्वीचा मुलगा तर कधी पृथ्वीची बहीण असा उल्लेख आढळतो. तसे ते बऱ्याच अंशी खरेही आहे, कारण पृथ्वी आणि मंगळ यात अगदीच नाही, पण बरेच साम्य आढळते. सर्वप्रथम दोघेही स्थायूरूप ग्रह आहेत. आकाराच्या बाबतीतही खूप फरक आढळत नाही. त्यामुळेच मंगळ हा शास्त्रज्ञांच्या कुतूहलाचे कारण बनला होता. त्यासाठी १९७६मध्ये व्हायकिंग प्रोजेक्ट राबविण्यात आला, ज्या अंतर्गत व्हॉयकिंग-१ आणि व्हॉयकिंग-२ असे दोन प्रोजेक्ट होते. काही मानवी आणि नैसर्गिक चुकांमुळे हे दोन्ही बंद पडले. त्यानंतर पाथफाईंडर, स्पिरिट, अपॉच्र्युनिटी ही याने मंगळावर उतरविण्यात आली होती. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचविली. २००४ साली पाठविण्यात आलेले अपॉच्र्युनिटी यान आजही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवित आहे. या साऱ्यांनंतर मंगळाचा जैविक इतिहास आणि भूगर्भ शास्त्राविषयी माहिती मिळविणे आवश्यक होते. त्यासाठी प्रयोगशाळाच मंगळावर पाठविण्याचा निर्णय नासाने घेतला आणि त्याअंतर्गत ‘मार्स सायन्स लॅबोरेटरी’ची संकल्पना समोर आली. २६ नोव्हेंबर रोजी क्युरिओसिटी यान अवकाशात पाठविण्यात आले आणि ५ ऑगस्ट रोजी ते मंगळावरील ‘गेल’ क्रेटरमध्ये सुखरूप उतरविण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना यश आले.
‘क्युरिओसिटी’ म्हणजे मार्स सायन्स लॅबोरेटरी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले यान. प्रकल्पाच्या नावानुसारच क्युरिओसिटीची रचना करण्यात आली आहे. हे नासातर्फे मंगळावर उतरविण्यात आलेले ४थे आणि सर्वात मोठे यान आहे. सुमारे ७ फूट उंच व १टन वजन असलेले हे यान म्हणजे एक चालती फिरती प्रयोगशाळाच आहे. १९७६ मध्ये मंगळावर पाठविण्यात आलेले व्हॉयकिंग यान काही चुकांमुळे सपशेल बिघडले. त्यानंतर १९९७ मध्ये पाठविण्यात आलेले पाथफाईंडर बॅटरी खराब झाल्यामुळे निकामी झाले होते. क्युरिओसिटी तयार करताना या साऱ्या चुका सुधारण्याचा पूर्णत: प्रयत्न केला आहे. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला दिसतो. क्युरिओसिटीवर सुमारे १७ वेगवेगळे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. ज्यापैकी १२ कॅमेरे हे नेव्हिगेशन कॅमेरे आहेत. यापैकी एक विशेष म्हणजे यात बसविण्यात आलेला ‘केम-कॅमेरा.’ याचे विशेष असे की, यामध्ये २ प्रमुख भाग असून एकामध्ये मंगळावरील विविध मातीच्या नमुन्यांची जवळून हाय रेझोल्यूशन प्रतिमा शास्त्रज्ञांना उपलब्ध करून देतो आणि दुसऱ्या भागात मंगळावरील मातीच्या नमुन्यांना इन्फ्रारेड किरण वापरून त्यांचे उध्र्वपतन (व्हेपोरायझेशन) घडवून आणले जाते आणि त्यातून निघणाऱ्या किरणांचा (स्पेक्ट्रमचा) अभ्यास केला असता, त्या नमुन्यात उपलब्ध असणारी विविध मूलद्रव्ये लागलीच ओळखता येतात. याखेरीज एक्स-रे वापरून तेथील मातीत असणाऱ्या विविध मूलद्रव्यांचा शोध घेणारे एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, तेथील हवामान, आर्द्रता, हवेचा वेग, हवेचा दाब मोजण्यासाठी रोअर इनव्हायरमेंटल मॉनिटरिंग स्टेशन, आजुबाजूच्या हवेतील किंवा जमिनीत उपलब्ध असणारी जैवी मूलद्रव्ये शोधण्यासाठी सॅम्पल अ‍ॅनालाइसिस्ट अ‍ॅट मार्स, सुमारे ६ फूट लांब व ३५० अंशांनी वळू शकणारा, मंगळावरील मातीचे नमुने गोळा करू शकणारा विविध कॅमेरा व उपकरणांनी सुसज्ज असणारा रोबोटिक आर्म, तेथील मातीचे अथवा नुमन्यांचे अतिसूक्ष्म चित्रण करू शकणारा महाली (मार्स हॅन्ड लेन्स इमेजर), धूळ बाजूला करण्यासाठी विशेष ब्रश, जमिनीत खड्डा खणण्यासाठी ड्रील, ज्याने नुकतेच चाचणी म्हणून ७ फेब्रुवारी रोजी मंगळावर २ सेंटीमीटर खोल खड्डा खणला. याखेरीजही अनेक वैज्ञानिक उपकरणे या क्युरिओसिटीवर बसविण्यात आली आहेत. तसेच यामधील विविध कॅमेऱ्यांनी काढलेल्या प्रतिमा सुधारून पाठविण्यासाठी इमेज प्रोसेसिंग सिस्टमही या यानावरच बसविण्यात आलेली आहे. या प्रतिमा साठविण्यासाठी आवश्यक तेवढी मेमरीही यानावरच पुरविण्यात आली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे क्युरिओसिटी म्हणजे चालतीफिरती प्रयोगशाळाच आहे.

मंगळावर जैवी मूलद्रव्यांचा म्हणजेच कार्बन, ऑक्सिजन यांचा साठा फार प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणजेच येथे कधी काळी जीवन असण्याची किंवा यापुढे ते निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे.

क्युरिओसिटी यानाला देण्यात येणाऱ्या सूचनांची देवाण-घेवाण कशी करावी याबाबत मोठा प्रश्न होता, साधारणत: इतर यानांमध्ये वापरली जाणारी प्रणाली क्युरिओसिटीसाठीही वापरली गेली आहे. यानुसार यानापासून माहिती त्या ग्रहाभोवती फिरणाऱ्या ऑरबिटपर्यंत येते. मग ती उपग्रहाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते, आपणांस काही सूचना द्यावयाची असल्यास ती उपग्रहाद्वारे ऑरबिटरला देण्यात येते व तो ऑरबिटर यानापर्यंत ती सूचना पोहोचवितो. क्युरिओसिटीशी संपर्क साधता येण्यासाठी सध्या दोन ऑरबिटर वापरण्यात येत आहेत, हे ऑरबिटर दिवसभरातून फक्त ८ मिनिटे क्युरिओसिटीशी संपर्क साधू शकतात. परंतु या बाबतीतही क्युरिओसिटी हे बरेच प्रगत यान म्हणता येईल. कारण हे यान पृथ्वीशी डायरेक्ट संपर्क साधू शकते. त्यावेळी सूचनांची होणारी देवाण-घेवाण बरीच हळू होत असते. पृथ्वीपासून दिलेला संदेश क्युरिओसिटीपर्यंत पोहचण्यासाठी साधारणत: १४ मिनिटे ८ सेकंद इतका वेळ लागतो. त्यामुळे मुख्य संदेशाची देवाणघेवाण ही ऑरबिटरमार्फतच केली जाते.
पृथ्वीला पर्याय म्हणून सध्या चंद्रासोबत मंगळाचाही विचार करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात मंगळग्रहावरील संशोधनाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. यानांपाठोपाठ आता माणसालाच मंगळापर्यंत पोहचविण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. याखेरीज आपल्या शेजारी ग्रहांबद्दल जाणून घेण्याचा शेजारधर्म थोडक्यात माणसाची क्युरिओसिटी (किंवा गरज) माणसाला मंगळापर्यंत घेऊन गेलेली दिसते. मंगळावरील पाणी, कार्बन, ऑक्सिजन यांची उपलब्धता शोधणे हा क्युरिओसिटीचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी पाठविलेली ३ याने आणि हे ४थे यान या साऱ्यांच्या तळाशी एक मुख्य उद्देश म्हणजे भविष्यात मंगळावर पाठविण्यात येणाऱ्या मानवसहित यानासाठी आवश्यक ती माहिती गोळा करणे म्हणजे मानवाच्या मंगळस्वारीची रंगीत तालीम म्हणता येईल.
क्युरिओसिटी यान मंगळावर उतरून साधारणत: ६ महिने झालेत. या सहा महिन्यात मंगळाबद्दल बरीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे, त्यानुसार जैवी मूलद्रव्यांचा म्हणजेच कार्बन, ऑक्सिजन यांचा साठा फार प्रमाणात उपलब्ध नाही. म्हणजेच येथे कधी काळी जीवन असण्याची किंवा यापुढे ते निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. परंतु आतापर्यंत झालेले संशोधन हे अगदीच कमी आहे. एकाच गोष्टीसाठी अनेक नमुने घेतले जातील आणि अनेक चाचण्या केल्या जातील व नंतरच ठोस निष्कर्ष काढता येतील, असे मत नासाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. मंगळावरील विविध भागाच्या हाय रेझोल्यूशन प्रतिमा क्युरिओसिटीने पाठविल्या आहेत. त्यावरून तेथील भूपृष्ठाचा अभ्यास करण्याचे काम चालू आहे. सध्या मंगळावरील विविध ठिकाणच्या मातीचे नमुने घेऊन त्यांचे संशोधन क्युरिओसिटीमार्फत केले जात आहे. त्याबाबतीतले निष्कर्ष लवकरच आपल्यासमोर येतील. परंतु सध्या महत्त्वाची बाब म्हणजे क्युरिओसिटीवर ‘आरूढ’ करण्यात आलेली चालतीफिरती प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून मंगळाचे अंतरंग आपल्यासमोर उलगडले जाईल यात शंका नाही. याद्वारे नासाने मंगळावर मानवसहित यान पाठविण्यासाठी मोर्चेबांधणी चालू केली आहे. त्यासाठी आवश्यक चाचण्या घेण्याचे काम शास्त्रज्ञ सध्या करीत आहेत. २०२० ते २०३० दरम्यान आपल्याला मानवाच्या मंगळावरील पहिल्या पावलाचे चित्र नक्कीच पाहावयास मिळेल.
response.lokprabha@expressindia.com