८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

स्टार रेसिपी्

स्टार रेसिपी
भुवनेश कलबुर्गी

भुवनेश यांनी मेफेअर बँक्वेट्स, बीजेएन बँक्वेट्स, रॅडीसन स्पा रिसॉर्ट, रमाडा हॉटेल्स या ठिकाणी सु शेफ, युनिट शेफ, शेफ द कुझीन, एक्झिक्युटिव्ह शेफ अशा पदांवर काम केलेआहे. केवळ सहा वर्षांत आपल्या कौशल्यामुळे त्यानी शेफगिरीत नाव कमावले आहे. सध्या ते िवध्यम् ग्रॅण्ड हॉटेल आग्रा येथे िवध्यम् ग्रॅण्ड हॉटेलमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून काम पाहात आहेत.

स्वीट अ‍ॅण्ड सोअर फिश (चायनीज रेसिपी)
साहित्य : व्हाइट फिश (छोटय़ा पट्टय़ा) ग्रॅम, बटाटा कुस्करून (स्टार्च) टेबल स्पून, मीठ पाऊण चमचा, व्हाइट पेपर पाव चमचा, अंडे (पांढरा भाग) १
स्वीट अ‍ॅण्ड सोअर सॉस साहित्य : व्हाइट माल्ट व्हिनेगर ३०० मिली, वोरकेस्टर (Worcester) सॉस ३० मिली, खडी साखर १८० मिलीगॅ्रम, मीठ चवीप्रमाणे, टोमॅटो केचअप ६० मिली, १ लिंबाचा रस, गाजर / कांदा बारीक चिरून, तेल टेबल स्पून, अननस (चतकोर तुकडे) ६० ग्रॅम, दीड चमचा बटाटा कुस्करून (स्टार्च) चार टेबल स्पून पाण्यात मिक्स करून, तिळाचे तेल.
कृती : व्हाइट फिश (छोटय़ा पट्टय़ा), कुस्करलेला बटाटा, मीठ, व्हाइट पेपर, अंडे हे सर्व चांगले एकत्र करून घ्यावे. स्वीट अ‍ॅण्ड सोअर सॉसचे सर्व घटक पदार्थ (कांदा, गाजर आणि बटाटा सोडून) एका मोठया बाऊलमध्ये एकत्र करावे. चव पाहून सिझिनग घालावे, थोडेसे घट्टसर करावे आणि बाजूला ठेवावे. माशाचे तुकडे बटाटय़ामध्ये घोळून घ्यावेत आणि उकळत्या तेलात सोनेरी रंगावर चांगले कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करावे. टिश्यू (किचन पेपर) पेपरवर तेल निथळू द्यावे, मग सìवग डिशमध्ये ठेवावे. बारीक चिरलेला कांदा आणि गाजर तेलात तळून त्यावर वरील स्वीट अ‍ॅण्ड सोअर सॉस घालावे. चव पाहून सिझिनग घालावे. तीळ तेलाचा हलकासा शिडकावा मारून हे सर्व मिश्रण तळलेल्या तेलावर ओतावे. गरम गरम सर्व करावे.

वेंडकाई पल्ले (मैसूर रेसिपी)
साहित्य :
१ किलो भेंडी, २ मोठे टोमॅटो, १/४ टीस्पून लाल मिरची पावडर, १/४ टीस्पून धणे पावडर, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून साखर, गूळ, मध, चवीपुरते मीठ, १ टेबलस्पून खोवलेला नारळ, ३ टेबलस्पून तेल, १/२ टेबलस्पून मोहरी, चणा डाळ, १ टीस्पून उडीद डाळ, १ चिमूट हिंग.
कृती : हरभरा डाळ, उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्या. त्यात पाणी घालून तासभर ठेवून द्या. तासाभरानंतर त्यातले पाणी काढून निथळून घ्या. भेंडी चिरा. बाजूला ठेवून द्या. तेल गरम करून फोडणी करून घ्या. त्यात भिजवलेल्या डाळी घाला. चांगल्या परतून घ्या. हिंग घाला. आता भेंडी घाला. चांगली परतून घ्या. तार येऊ नये यासाठी सतत परतत राहा. ती कोरडी झाल्यावर त्यात टोमॅटो, तिखट, हळद, धणे पावडर,गूळ, मीठ घाला. नारळ घाला. सतत ढवळत राहा. दहा मिनिटांनी भाजी तयार झाल्यावर खाली उतरवा.

व्हिएतनामी राइस पेपर रोल्स (व्हिएतनाम रेसिपी)
तयारीसाठी : ५० मिनिटे + भिजण्यासाठी लागणारा वेळ.
शिजविण्यासाठी : २५ मिनिटे.
साहित्य : मोठी कोळंबी (शिजवून / उकडून) २०, ग्लास नुडल्स १०० ग्रॅम, राइस पेपर रपर्स (अंदाजे १६ सेमी राऊंड) २० ते २५, पुदिना (मिंट) पाने ४०, पातीचा लसूण १०
डीपिंग सॉस साहित्य : होसिन (hoisin) सॉस तीन टेबल स्पून, एक लाल मिरची बारीक चिरून, एक चमचा शेंगदाणा कूट जाडसर, एक चमचा लिंबाचा रस.
कृती : कोळंबी धुऊन साफ करून तिचे प्रत्येकी दोन तुकडे करावेत. शेवया गरम पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर सर्व पाणी काढून टाकून सुरीने अथवा कात्रीने तिचे बारीक तुकडे करावेत. एक एक राइस रॅपर कोमट पाण्यात ३० सेकंद भिजवून मऊ करावा. हे काम अतिशय हळुवारपणे करावे, अन्यथा रॅपर तुटू शकतो.
नंतर एका रॅपरवर खालून व दोन्ही बाजूने जागा सोडून एकतृतीयांश भागात एक टेबल स्पून शेवया ठेवाव्यात. उर्वरित भागात कोळंबीचे दोन तुकडे, दोन िमट पाने ठेवून लसूण पातमध्ये ठेवून बंद करावे. नंतर उर्वरित सर्व रॅपरमध्ये असेच मिश्रण भरावे व डिपिंग सॉसबरोबर सव्‍‌र्ह करावे.
(हा पदार्थ कॅलरी कॉन्शिअस लोकांसाठी असल्यामु़ळे तो न तळताच खावा.)

================

खाणे आणि खिलवणे..
पूर्वा सांवत
जगण्यासाठी खाणाऱ्या नव्हे, तर खाण्यासाठी जगणाऱ्या तमाम खवय्यांसाठीचे रुचकर पान..

चीजी नुडल
साहित्य : नुडल- २00 ग्रॅम, प्रोसेस्ड चीज - २ क्युब, क्रीम- १/४ कप, दही- १/४ कप, उभा चिरलेला कांदा- १ मध्यम आकाराचा, उभा चिरलेली भोपळी मिरची- १ मध्यम आकाराची, बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून, टोमॅटो केचप- सजावटीसाठी.
कृती : मीठ आणि थोडेसे तेल टाकून पाणी उकळत ठेवा. त्यात नुडल्स टाकून शिजवून घ्या. पॅनमध्ये बटर गरम करून त्यात लसून, भोपळी मिरची आणि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मीठ आणि मिरपूड टाका. नुडल आणि चीज टाकून एकत्र परतून घ्या.
दही आणि क्रीम एकत्र फेटून त्यात घाला व एकत्र करा. कोथिंबीर आणि टोमॅटो केचअपने सजवा.

भरलेल्या मिरच्या
साहित्य : भावनगरी मिरच्या- ८ ते १०, खोवलेले ओले खोबरे- १ कप (अंदाजे अर्धा नारळ), मोहरी- १ टेबलस्पून, तीळ - १ टेबलस्पून, मेथीदाणे- ४ ते ६ दाणे. लिंबाचा रस- २ टेबलस्पून, हळद- १ टीस्पून, िहग- १/४ टीस्पून, साखर- १/२ टीस्पून, मीठ चवीनुसार, तेल- आवश्यकतेनुसार.
कृती : मिरच्या धुऊन पुसून घ्याव्यात. मिरच्यांना मधोमध उभी चीर द्यावी. आतून-बाहेरून थोडे मीठ चोळावे. त्यामुळे मिरच्या मऊ होतात आणि भरताना तुटत नाहीत. शिवाय लवकर शिजतात. मोहरी, तीळ आणि मेथीदाणे छान खमंग भाजून घ्या. खलबत्त्याने कुटून घ्या. एका बाऊलमध्ये खोबरं, कुटलेला मसाला, हळद, लिंबाचा रस, साखर आणि मीठ सर्व एकत्र करून हाताने कालवा. हे सारण सर्व मिरच्यांमध्ये भरा. एका पसरट नॉन-स्टीकपँनमध्ये थोडेसे तेल गरम करून मंद अग्नीवर मिरच्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर खमंग परताव्यात.

डबल चीज आणि पालक ब्रेड रोल
साहित्य : उभा कापलेला पालक - २ कप, उकडलेले मक्याचे दाणे- १ टेबलस्पून, मोझ्झेरेल्ला चीज- १ कप, प्रोसेस्ड चीज- १/२ कप, बारीक चिरलेला लसून- ६ पाकळ्या, ओरेगनो- १ टीस्पून, काळी मिरी पूड-मीठ चवीप्रमाणे, ऑलिव तेल किव्हा बटर - २, तेल (तळण्यासाठी)- आवश्यकतेनुसार, ब्रेड स्लाइस -आवश्यकतेनुसार.
कृती : एका पॅॅनमध्ये ऑलिवतेल गरम करून त्यात लसूण जरासा परता. त्यात कापलेला पालक, मक्याचे दाणे, ओरेगनो, मिरपूड आणि मीठ टाका. ३ ते ४ मिनिटे परता. थंड झाल्यावर त्यात दोन्ही चीज घालून व्यविस्थत एकत्र करा.
ब्रेडच्या कडा काढून टाका. एक स्लाइस पाण्यात किंव्हा दुधात बुडून लगेच हातावर घेऊन दाबा. त्यात तयार केलेले सारण भरून त्याला रोलचा आकार द्या. अशा प्रकारे सर्व रोल करून घ्या.
गरम तेलात सोनेरी रंगावर तळून काढा. चटणी आणि केचअपबरोबर गरमागरम खा.

पाठवा तुमच्या रेसिपी
तुमची वेगळी डिश जगासोबत शेअर करण्याची एक अनोखी संधी लोकप्रभाह्ण उपलब्ध करून देत आहे. या वर्षांत ‘लोकप्रभा’तील एक पान सजणार आहे ते आपण पाठवलेल्या वेगळ्या डिशने. चला तर मग, तुमची आगळीवेगळी, रुचकर रेसिपी आम्हाला पाठवून द्या. सोबत रेसिपीचा आणि तुमचा फोटोही पाठवायला विसरू नका. रेसिपी शक्यतो टाइप करून पाठवावी. टाइप करणे शक्य नसेल तर लिहूनही पाठवू शकता.
लोकप्रभाह्ण, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०
E-mail: response.lokprabha@expressindia.com