८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

वर्णातर ३
सत्त्वशीला सामंत

वर्गीय व्यंजने व वर्गेतर व्यंजने यांच्यातला व्यवहारदेखील कांहीसा समान उच्चारस्थानामुळे होत असावा, कारण ‘प’, ‘ब’, ‘भ’ आणि ‘म’ ही जशी ओष्ठय़ वर्गव्यंजने आहेत तसे ‘व’ हें वर्गेतर व्यंजनही ओष्ठय़ आहे. म्हणून ‘भाद्रपद’ चा ‘भादवा’, ‘नीप’ (कदंब)चा ‘नीर’ होतो. ‘ज्ञानदीप  लावूं जगीं’ म्हणत असताना ‘अंतरिंचा ज्ञानदिवा  मालवूं नको रे’ अशीहि आळवणी होते. ‘कपि त्थ’ या फळाचें मराठीत ‘कवीठ/कवठ’ होते. ‘येथें आड मज न साहवे वारा। देऊनि कपा ट आलें तें दुसरें वारा हो’ असं तुकाराममहाराज म्हणतात, तर ‘नेत्रद्वारीची कवा डे लागू पाहती।’ अस ज्ञानेश्वरमाऊली म्हणते. ‘नापि ता’ चा ‘न्हावी’ झाला नि ‘कप र्दिक’ला मराठीत ‘कव डी’ मोल आलें.
‘हृ’ धातूपासून तयार झालेली दोन मराठी क्रियापदे ‘हरपणे/हरवणे’ या जोडगोळीची कहाणीहि रंजक आहे. ‘हृ’ धातूचें ‘हृपयति’ हे प्रयोजक causative) रुप असून त्यापासून मराठीत ‘हरप णे’ व पुढे ‘प’चा ‘व’ होऊन ‘हरवणे’ हे क्रियापद झाले. इंग्रजीतील to lose ची कथाही समांतर आहे:-
to lose . v. t. & i.
1. (to be deprive of) (वस्तू. इ.) हरवून बसणे
२. (to be defeated) (डाव, शुद्ध इ.) हरणे
मराठीतहि ‘हरवणे’ --> स. क्रि. (शत्रु इ. ना) हरवणे
अ. क्रि. (वस्तू इ.) सांडणे, गमावणे असे अर्थ आहेत.
काही वेळा ‘हरपणे/हरवणे’ दोन्ही एकाच अर्थाने वापरली जातात. ‘हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?’ हे भावगीत प्रसिद्धच आहे. पण ‘हरपले श्रेय’ या कवितेत ‘त्रिखंड हिंडुनि धुंडितसें। परि न हरपले ते गवसे।’ असं केशवसुत म्हणतात तेव्हा त्याला किंचित उच्चतर आध्यात्मिक छटा असते. दत्ताची आरती करताना भाविक भक्त ‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान। हरपले मन झाले उन्मन।’ अशी आर्त आळवणी करतात. मग ‘हरपणे’ व ‘हरवणे’ या दोहोंत नेमका फरक काय? ‘हरपणे’ हे क्रियापद अकर्मक असून त्याला ‘आपोआप हरवणे’ (शुद्ध/भान इ. हरपणे) असा अर्थ आहे; उलट, ‘हरवणे’ हे सुद्धा अकर्मक (गमावणे, सांडणे) क्रियापद तर आहेच, शिवाय ते ‘हरणे’ या क्रियापदाचे प्रयोजक व सकर्मक (पराभूत/ पराजित करणे) रुपहि आहे.
‘व-प’ असा उलटा , प्रवासहि झालेला दिसतो. संस्कृत ‘वापीह’ हिंदीत ‘पपीहा’ (‘बोल रे पपीहरा..’) बनून येतो. ‘व - ब’ याची तर असंख्य उदाहरणे आहेत. विघड --> बिघाड, वारंवार --> बारबार (हिं), ‘खर्व’--> खरब (हिं), व्रज (गोकुळ) --> ‘ब्रज’ ही नेहमींची उदाहरणं. महाशक्तिमान् हनुमंताचं मूळ नाव ‘वज्रांग बली’ (वज्रासारखा बलवान) असं असताना त्याचा प्रथम ‘ब ज्रांग बली’ व नंतर ‘ब जरंग बली’ केव्हा झाला तें आपल्याला समजलंच नाही. एखाद्या युवतीने युवकाला ‘वरणे’ (to choose) यावरूनच त्या प्रसंगाला ‘स्वयंवर’ हे नाव पडलें (स्वयंवर झालें सीतेचें) पण संत मीराबाई गिरिधर गोपालाला वरताना म्हणते-
‘माई म्हांने सुपन मां ब री गोपाल।’
मात्र ‘विलगणे’ म्हणजे ‘वि लग होणे’ असा अर्थ असताना ‘बिलगणे’ (चिकटणे) असा नेमका उलटा अर्थ कसा होतो?
‘बव’ हे प्रकरणसुद्धा मजेशीर आहे. फारसी ‘ब रात’ म्हणजे ‘वचनचिठ्ठी’ ही मराठीत ‘वाऱ्यावरची व रात’ बनून येते, तर मराठीतली ‘व रात’ (‘वरयात्रा’) हिंदीत ‘बा रात’ बनून जाते.
‘सौरभ  गांगुली’ चं नाव बऱ्याच वेळा ‘सौरव  गांगुलि’ म्हणून प्रसिद्ध होतं. ‘म’चा ‘व’ होण्याची उदाहरणं तर असंख्य आहेत. ‘ग्राम - गाव, नाम - नांव, सीमा - शींव, चमर - चंवर, इ.’ संस्कृतमधल्या चम रीमृगाच्या शेपटीच्या केसापासूनच चंव ऱ्या तयार करतात. खोडकर बाळकृष्णाला यशोदेने त्याच्या पोटाभोवती ‘दामन्’ (दोर) गुंडाळून त्याला उखळाशीं जखडून ठेवलं होतं. म्हणून त्याला ‘दामोदर’ (दामन् उदरे यस्य) हे नाव पडलं. ‘दामन् म्हणजे ‘हार’ असाहि अर्थ असून ज्याच्या गळ्यातील हार पोटावर रुळतो आहे तो ‘दामोदर’ असाहि एक अन्वयार्थ लावला जातो. याच ‘दामन्’ पासून ‘दावे’ तयार झाले व पशुपालक गुरांना दावणीला बांधू लागले.
‘छ’ आणि ‘स/शह्ण यांचंहि कांहितरी साटलोटं आहे. ‘उत्सवउच्छाव’, ‘मत्स्यमच्छी/मछली’, ‘छाल’ (हि)साल (म.), यांसारख्या उदाहरणांतून तें दृग्गोचर होतं. संस्कृ त ‘शकटा’ पासून आजचा ‘छकडा’ तयार झाला.
वर्गेतरांमध्ये पुन्हा ‘श, ष, स’ या व्यंजनांमध्ये आपसांत दळणवळण चालू असतं. ‘गवेष णा गवस णे, शुष्क  सु का, केश  केस , शा ल (वृक्ष) सा ल (वृक्ष), आदर्श  आरसा , श्वा न सु णें, विष  बिस  (खपडम) (हिं), नाश न नास णे/ नास वणे, अशी कित्येक उदाहरणं सांगतां येतील. ‘शिला’ हा संस्कृत शब्द हिंदीमध्यें ‘सि ल (बट्टा)’ (पाटा - वरवंटा) होऊन जातो. ‘आश्रम एक दीख मग माहीं। पूछा मुनिहि सि ला प्रभु देखी।। असं ‘रामचरितमानस’मध्ये तुलसीदास म्हणतात. मराठी जवान तळहातावर ‘शि र/शी र’ घेऊन लढतात, तर हिंदी नौजवान ‘स रफरोश की तमन्ना’ बाळगतात शुं डा - सूँ डा/सोंड, शा रंग - सा रंग, शं बर - साँ भर, सां बर, पोष ण - पोस णे या सर्व शब्दांत ‘स’कडे प्रवास झालेला दिसतो. ‘मषि’ हा संस्कृत शब्द शाईवाचक आहे. सुलेखन कलेचं वर्णन करताना, मराठी संत रामदासस्वामी म्हणतात - ‘मशी चें वोतलें काळें..’ तर ‘मसी  क़ाग़ज छुयो नहीं’ असं संत कबीर म्हणतात. संस्कृत ‘प्रावृष ’ म्हणजे पर्जन्य. प्राकृत मराठीत त्याचा ‘पाऊस ’ पडतो.
निसि दिन बरसत नैन हमारे।
सदा रहति पावस  ऋतु हम पै।। - सूरदास;
कशाच्या तरी मिषाने वा बहाण्याने धूर्त माणसं साध्या भोळ्या माणसांना फसवतात. पण विश्वाचा पसारा आपणांस प्रकृतीच्या मिस ने नजरेस पडतो.
पैं अष्टधा भिन्न ऐसें। जें दाखविलें प्रकृतिमिसें। (जाने. १५.४८४)
याउलट, कधींकधीं हिंदी ‘स्याही’ मराठीत ‘शाई’ रुपाने प्रविष्ट होते.
‘मृच्छकटिक’ नाटकातील ‘पालक’ या जुलमी राजाचा श्या लक म्हणजे सा ळा (मेहुणा) हा राज्यातील एक बडा अधिकारी होता. त्याचं खरं नाव ‘संस्थानक’ असं असलं तरी, बोलताना तो श, ष, स या वर्णाची गल्लत करून सर्वाचे सारखेच उच्चार करीत असे, म्हणून लोकांनी त्याला ‘शकार’ हे टोपणनांव दिल होतं. अशीच ही ‘शकारकथा’.
response.lokprabha@expressindia.com