८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
संख्याशास्त्र
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संख्याशास्त्र

प्रसूतिकाळ आणि संख्याशास्त्र
उल्हास गुप्ते

स्त्रियांच्या बाबतीत प्रसूतिकाळ हा खूपच महत्त्वाचा काल मानला जातो. संख्याशास्त्राच्या नवीन अभ्यासात त्या संदर्भातील खूपच महत्त्वाची आणि दिलासा देणारी उपयुक्त माहिती मिळाली आहे.
मातेचा जन्म महिना जर प्रसूतिकाळाचा येणारा महिना किंवा मित्र महिना असेल तर बऱ्याच वेळा प्रसूती सुलभ रितीने होते. प्रसूती होण्यास त्रास होत नाही, पण हीच परिस्थिती जर विरुद्ध असेल तर प्रसूतीकालात मातेच्या घरातील वातावरणामुळे किंवा तिला मानसिक ताण येईल, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पर्यायाने त्या मातेबरोबर गर्भालाही तसाच त्रास होऊ शकतो. कारण गर्भातील बाळालाही संवेदना असतात. भावना असतात अलीकडील वैद्यकीयशास्त्र अभ्यासाच्या संशोधनात आढळून आले आहे.
अशाच प्रकारचा वेगळा विचार संख्याशास्त्राच्या अभ्यासात केला आहे. आईचा जन्म महिना अपत्य जन्माच्या महिन्याच्या विरोधात असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते किंवा काहीतरी गर्भदोष आढळतो. काही वेळा बाळाच्या गळ्यात नाळेचा विळखा बसलेला असतो. पण आईच्या जन्म महिन्यात किंवा मित्र महिन्यात प्रसुती असेल तर ती खूप वेळा सुखरूप व व्यवस्थित होते. त्यामुळे मातेच्या जन्म महिन्यास व त्याच्या मित्रमहिन्यास खूपच महत्त्व आहे. प्रसूती होणाऱ्या स्त्रियांच्या जन्मतारखांना कोणते महिने प्रसूती लाभदायक ठरतात व कोणत्या महिन्यात विशेष काळजी घ्यावी ते विस्तृतपणे देत आहोत.
एक - ज्या मातेची जन्मतारीख एक, दहा एकोणीस व अठ्ठावीस आहे अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २१ मार्च ते १९ एप्रिल तसेच २१ जुलै ते २० ऑगस्ट. मात्र पुढील महिन्यात प्रसूतीकाळ आला तर त्या स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. २१ डिसेंबर ते २० जानेवारी व २० एप्रिल ते २० मे तसेच अशा व्यक्तींनी रक्तातील घटकांचे प्रमाण चांगले राहण्यासाठी बीट गाजराचा उपयोग करावा. कडधान्ये खावीत. दुपारची विश्रांती, रात्रीची झोप नीट घ्यावी.
दोन - ज्या मातेची जन्मतारीख दोन, अकरा, वीस व एकोणतीस आहे अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २० एप्रिल ते २० मे, २१ जून ते २० जुलै व २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर. तसेच पुढील काळात या स्त्रियांनी आपली स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी, २१ डिसेंबर ते २० जानेवारी अशा व्यक्तींनी या काळात लोणची, पापड अतितिखट पदार्थ अतिमीठ वज्र्य करावे. त्यामुळे रक्तदाब योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते.
तीन - ज्या मातेची जन्मतारीख तीन, बारा, एकवीस व तीस आहे. अशांचा उत्तम प्रसुतीकाल २० फेब्रुवारी ते २० मार्च, २० एप्रिल ते २० मे व २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर आणि २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर हा आहे. मात्र २१ मे २० जून व २१ जुलै ते २० ऑगस्ट या काळात प्रसूतीकाळ आला तर त्या काळात या स्त्रियांची विशेष काळजी घ्यावी. अशा स्त्रियांनी रोज शरीराची हालचाल ठेवावी. शक्य तितके चालावे. भजने, संगीत ऐकावे. मनाला त्रास होईल अशा टीव्ही मालिका बघू नयेत. दूध, फलाहार, जेवण नियमित घ्यावे.
चार - ज्या माताची जन्मतारीख ४, १३, २२ व ३१ आहे अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २१ जून ते २० जुलै व २१ जुलै ते २० ऑगस्ट आहे. मात्र २१ डिसेंबर ते २० जानेवारी व २० एप्रिल ते २० मे आणि २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या काळात प्रसूतीकाळ आला तर विशेष काळजी घ्यावी. लोणची, पापड, खारट पदार्थ तसेच अतिमीठ वज्र्य करावे. मानसिक ताणतणाव, वादविवाद टाळावेत.
पाच - ज्या मातांची जन्मतारीख ५, १४ व २३ आहे अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २० एप्रिल ते २० मे तसेच २१ मे ते २० जून, २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर आहे. मात्र २१ डिसेंबर ते २० जानेवारी व २० फेब्रुवारी ते २० मार्च आणि २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या दरम्यान जर प्रसूतीकाळ झाला तर त्या स्त्रीने आपली विशेष काळजी घ्यावी. रक्त वाढण्यासाठी बीट व गाजराचा उपयोग करावा. कडधान्ये खावीत. दुपारी विश्रांती घ्यावी, तसेच रात्री व्यवस्थीत झोप घ्यावी. अतिश्रम टाळावेत.
सहा- ज्या मातांची जन्मतारीख ६, १५, २४ आहे अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २० एप्रिल ते २० मे, २१ जून ते २० जुलै आणि २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर आहे. मात्र २१ जुलै ते २० ऑगस्ट या काळात प्रसूतीकाळ येत असेल तर त्या स्त्रीची विशेष काळजी घ्यावी. जमेल तितके चालावे. शरीराची हालचाल ठेवावी. भजने, संगीत ऐकावे. मनाला त्रास होणारे प्रसंग आणि ताण-तणाव निर्माण करणाऱ्या टीव्ही मालिका शक्य तो टाळाव्यात. दूध, फलाहार नियमित घ्यावा. वेळेवर जेवण घ्यावे. रात्रीची जागरणे टाळावीत.
सात - ज्या मातांची जन्मतारीख ७, १६, २५ आहे. अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २० एप्रिल ते २० मे, २१ जून ते २० जुलै आणि २१ जुलै ते २० ऑगस्ट आहे. मात्र २१ डिसेंबर ते २० जानेवारी व २१ मार्च ते १९ एप्रिल आणि २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात प्रसुतीकाळ येत असेल तर विशेष काळजी घ्यावी. लोणची, पापड, तिखट पदार्थ अतिखारट पदार्थ खाऊ नयेत. मानसिक ताणतणाव, वादविवाद टाळावेत. सकाळ संध्याकाळ शांतपणे ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करावा.
आठ - ज्या मातांची जन्मतारीख ८, १७ व २६ आहे. अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २१ डिसेंबर ते २० जानेवारी, २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी व २० फेब्रुवारी ते २० मार्च आणि २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर आहे. मात्र २१ जून ते २० जुलै आणि २१ जुलै ते २० ऑगस्ट या काळात येत असेल तर विशेष काळजी घ्यावी. औषधे वेळेवर घ्यावीत. शरीराची हालचाल चालू ठेवावी. मानसिक शांततेसाठी घरात किंवा बागेत शांतपणे बसून सकारात्मक विचार करा. शक्यतो दूध फलाहार नियमित घ्या.
नऊ - ज्या मातांची जन्मतारीख ९, १८, २७ आहे अशांचा उत्तम प्रसूतीकाळ २१ मार्च ते १९ एप्रिल व २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर आणि २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर आहे. मात्र २१ डिसेंबर ते २० जानेवारी, २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी आणि २१ जून ते २० जुलै या काळात प्रसूतीकाळ येत असेल तर त्या स्त्रीने स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. त्रागा करू नका. मन शांत ठेवा. तिखट, तेलकट जास्त खाऊ नका. ताणतणाव टाळा. नियमित झोप घ्या.
विशेष सूचना - प्रतिकूल काळातही अपत्यप्राप्ती चांगली होते. मात्र त्यासाठी औषधे, आहार आणि मन:स्थिती या गोष्टी काळजीपूर्वक हाताळाव्यात.
response.lokprabha@expressindia.com