८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संमेलन

ग़ज़लेच्या गावा जावे..
पवन नालट

ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे यांच्या जन्मगावी म्हणजे अमरावतीमधल्या मोर्शी इथल्या आष्टगावमध्ये नुकतेच अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन झाले. या संमेलनावर एक दृष्टिक्षेप..

‘‘गावामध्ये मनांची नाती जुळून आली
मातीमध्ये सुखांची स्वप्ने फुलून आली’’
‘माती’ मनात साचलेली, आठवणीत पुलकित होणारी, मायेच्या रोपटय़ाला घट्ट रुजवणारी, स्वप्नांचा पारिजातक जन्मभर फुलवणारी.. असाच काहीसा अनुभव ९ व १० फेब्रुवारी रोजी अमरावतीतल्या आष्टगावात ग़ज़ल सागर प्रतिष्ठानव्दारे आयोजित ग़म्ज़लेच्या महासोहळ्याला आलेल्या प्रत्येकाच्या मनात दरवळत होता. संमेलनाचं मानचिन्हच ग्मज़लेचं माहेरकुळ सांगत होते. परिस्थितीचे तडाखे सोसलेली, घराचा जिव्हाळा जपणारी भिंत आणि त्यावर ग्मज़लेची पाऊलवाट स्पष्ट करणारी सूचक खिडकी व चतन्याचे गुपित स्पष्ट करणारी पिंपळाची पानं ग़ज़लेची समृद्धता आणि मातीशी असलेले ऋणानुबंध व्यक्त करत होते. पंढरपूरला गेल्यावर जितकं पवित्र व भावपूर्ण आपल्याला वाटतं त्याहून अधिक चिरसुखाचा अनुभव विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेल्यावर आपल्याला येतो. अमरावती म्हणजे ग्मज़लेची पंढरीच आहे. तर आष्टगाव म्हणजे गम्ज़लेच्या रसिकांसाठी गाभारा असाच प्रत्यय येणाऱ्या प्रत्येकाला येत होता. प्रत्येकाच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा न भूतो न भविष्यती असा सोहळा आष्टगावच्या मातीत पार पडला.
मराठी ग़ज़लचे खलिफा सुरेश भट यांच्या नावाने असणाऱ्या ‘सुरेश भट ग़ज़ल नगरी’मध्ये संपन्न झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलनाला महाराष्ट्रातील, देशातील व विदेशातील ग़ज़लेच्या चाहत्यांनी हजेरी लावलेली होती. आष्टगावच्या मातीत संमेलनासाठी उभारलेला भव्य सभामंडप व गावात सुव्यवस्थितपणे लावलेल्या ग़ज़लेच्या द्विपदी, अत्यंत कलात्मकतेने सुशोभित केलेले व्यासपीठ, परिसरातील वाळलेल्या झाडांनाही कौशल्याने सजीवता देण्याचा केलेला प्रयत्न, पिंपळाच्या झाडावर ग़ज़लेची समृद्धता व्यक्त करण्यासाठी लावलेली प्रतीके यामुळे सातव्या अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलनाला आनंदाची भरती आलेली होती. खरं म्हणजे मोठमोठय़ा शहरांतील साहित्य संमेलने आपण अनेकदा बघतो पण आष्टगावसारख्या कमी लोकवस्ती असणाऱ्या गावात ग़ज़लेचा महासोहळा व्हावा ही अनोखी आणि आनंददायी घटना होती. जिथून ग़ज़लेची पताका ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे यांनी खांद्यावर घेतली, त्या आष्टगावातील हे दृश्य मराठी ग़ज़लरसिकांच्या मनात भरून राहिले.
संमेलनाचे आकर्षण ठरली ती ग़ज़ल ग्रंथिदडी. शनिवार, ९ फेब्रुवारी रोजी गावातील प्रत्येक गल्ली बोळातून ही दिंडी ग़ज़लेचे मांगल्य सोबत नेत होती. सजवलेली बलजोडी. ग़ज़लग्रंथाची पालखी, प्रत्येक घरासमोर मनमोहून घेणाऱ्या सुरेख रांगोळ्या, आलेल्या पाहुण्यांचे अगत्य म्हणून पाय धुणारे गावकरी. घराच्या चार भिंतींच्या कक्षा ओलांडून ग्रंथिदडीत सहभागी झालेल्या महिला आणि संमेलनाच्या सुरुवातीचा उद्घोष कणाकणात दुमदुमून राहिला होता.
संमेलनाध्यक्ष होते ज्येष्ठ ग़ज़लकार प्रल्हादजी सोनेवाने तर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष होते, ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके. गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे अध्यक्ष संदीप कडवे (दुबई) हे उद्घाटक होते. तसेच मंचावर संमेलनाच्या यशस्वी आयोजनाची धुरा वाहणारे ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे, लावणीचे अभ्यासक मधुकर नेराळे, उर्दू शायर नसीम रिफअत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मदन जोशी, सामाजिक कार्यकत्रे अमर हबीब, आमदार यशोमती ठाकूर, आमदार डॉ. अनिल बोंडे, आष्टगावच्या सरपंच कांता इंगळे, ग़ज़लसागर प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक भगत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे यांनी आष्टगावात सातवे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन होत असल्याने स्वप्नाची पूर्ती झाल्याचे सांगितले. तर संमेलनाध्यक्ष प्रल्हादजी सोनेवाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ग़ज़लचे शब्द विश्वशांती व राष्ट्रशांतीचे दूत व्हावेत, असे मत व्यक्त केले. तर संदीप कडवे यांनी मराठी ग़ज़लेचा कारवा विदेशातही अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला. ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी ग़ज़लेत वास्तवाचे व वर्तमानाचे भान आवश्यक असल्याचे मत मांडले. याप्रसंगी नसीमजी रिफअत यांनीही आपले विचार मांडले. याच कार्यक्रमात ग़ज़लसागर प्रतिष्ठान प्रकाशित आणि भीमराव पांचाळे, डी. एन. गांगन संपादित ‘मराठी ग़ज़ल सुरेश भटांनंतर..’ या प्रातिनिधिक ग़ज़लसंग्रहाचे आणि ‘ग़ज़लसागर’ या संमेलन विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले. सोबतच स्व. विठ्ठल नळकांडे यांच्या ‘आभार आसवांचे’ या संग्रहाचेही प्रकाशन झाले. संमेलनात ग्रामीण जीवन आणि ग़ज़ल यांच्या सहसंबंधावर सखोल चिंतन झाले. या परिसंवादात सिद्धार्थ भगत यांनी ग्रामीण जीवनातील ग़ज़लेत येणाऱ्या प्रतिमा व जीव यांचा समन्वय ग़ज़लकारांनी कसा साधला हे नवीन ग़ज़लकारांच्या गम्जम्लेचे दाखले देऊन स्पष्ट केले. तर शिवाजी जवरे यांनी ग्रामीण प्रतिमेचा अन्वयार्थ व या प्रतिमांचा ग़ज़लेत केलेला उपयोग यावर खुमासदारपणे भाष्य केले. शिवाय पुरुषोत्तम माळोदे यांनीही ग्रामीण जीवनाचा ग़ज़ल लेखनावरील परिणाम विशद केला.
ग़ज़ल मुशायरा :

‘भोगण्यात ही मजा हवीच यायला..
दुख देखणेच यौवनात पाहिजे..
सूर ऐकूनी तुझे जगून राहिलो..
तू असाच दिवसरात गात पाहिजे’..

मराठी ग़ज़लेच्या आशय, अभिव्यक्तीमध्ये होत असलेल्या स्थित्यंतराचीच ग्वाही पहिल्या ग़ज़ल मुशायऱ्यात मिळाली. या ग़ज़ल मुशायऱ्यात ज्येष्ठ ग़ज़लकार ए.के. शेख, डी. एन. गांगन, शिवाजी जवरे, अरुण सांगोले, प्राजक्ता पटवर्धन, आबेद शेख, सुप्रिया जाधव, अनंत नांदूरकर यांच्यासह अनेक मान्यवर ग़ज़लकारांनी आपल्या ग़ज़लांनी रसिकांची दाद मिळविली.
‘विदर्भाची लोकधारा : एक झलक’ या कार्यक्रमातून विदर्भाच्या सांस्कृतिकतेची व अस्सल वऱ्हाडी लोककलेची प्रचीती करून देणाऱ्या हरहुन्नरी कलांचा थाट रसिकांपुढे या कार्यक्रमातून सादर झाला. यात महादेवाची गाणी, नागोबाच्या बाऱ्या, गोंडी नृत्य गायन, अवधूती भजन, गवळण, बहिरम बोवाच्या डायका इ. अभिजात कला प्रकारांनी रसिकांच्या काळजाचा ठेका धरला.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मुक्तांगणात ए.के. शेख यांनी स्त्री ़ग़ज़लकारांनी पुषांच्या आणि पुरुषांनी महिलांच्या भावविश्वात जाऊन लिहिणे टाळले पाहिजे, असे सांगितले. तर सचिन परब यांनी ‘फेसबुक’ माध्यमाविषयी विचार व्यक्त केले. प्रल्हाद सोनेवाने यांनी ‘गझल’ व ‘हजल’ प्रकाराविषयी फरकही यात स्पष्ट केला.
त्यानंतर ग़ज़लगायन मफल संपन्न झाली. श्रोत्यांनी खच्चून भरलेल्या सभामंडपात महाराष्ट्रातील प्रतिभावान ग़ज़लगायकांच्या स्वरांनी वातावरण भारून टाकले होते. ‘पुन्हा तेजाब दुखाचे उरी फेसाळूनी गेले. ऊन पाऊस अन् गारवा पाहिजे’, जगायचे नसेल ही जगून जा हे असे बागेवरी उपकार केले’ अशा एकाहून एक सरस ग़ज़लांनी रसिकांच्या मनात घर केले. या ग़ज़ल मफिलीत गौरी पंडित, भाग्यश्री पांचाळे, राम पंडित, डॉ. शिल्पा पाटील, प्रतिभा पवित्रकार, सूरजसिंग, दत्ता डोईफोडे, कीर्ती पिंपळकर, गीताताई पांचाळे, धीरेंद्र गावंडे, सानिका अग्निहोत्री यांच्यासह अनेक मान्यवर ़ग़ज़लगायकांनी आपल्या गझला पेश केला. मफिलीतील ग़ज़लांनी रसिकांच्या मनातील सामाजिक वास्तवाचा वेध घेतला तर प्रेमातील हळव्या भावनांनाही स्पर्श केला.
दुसऱ्या ग़ज़ल मुशायऱ्यात प्रमोद खराडे, दिवाकर चौकेकर, डॉ. गिरीश खारकर, विद्यानंद हाडके, पवन नालट, विरेंद्र बेडसे, केशोर मुगल यांच्यासह अनेक ग़ज़लकारांनी रसिकांची वाहवा मिळविली. याच मुशायऱ्यात ग़ज़लकार लक्ष्मण जेवणे यांच्या ग़ज़लेच्या पुढील शेरांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली -
‘भोगण्यातही मजा हवीच यायला
दु:ख देखणेच यौवनात पाहिजे
सूर ऐकूनी तुझे जगून राहिलो
तू असाच दिवसरात गात पाहिजे’
संमेलनाच्या समारोप सोहळ्याला प्रत्येकाचेच डोळे भरून आले होते. समारोपीय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डॉ. अक्षयकुमार काळे होते. याप्रसंगी गावकऱ्यांनी भीमराव पांचाळे व गीताताई पांचाळे यांचा सत्कार केला. या प्रसंगी ग़ज़लसागर प्रतिष्ठान व इंद्रायणीकाठी कवितेसाठी प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘अन ग़ज़लेचे गाव ते’ या ऑनलाइन संग्रहाचेही उद्घाटन करण्यात आहे.
ग़ज़ल मफिलीच्या संमेलनाच्या या शेवटच्या मुक्कामावर ग़ज़लनवाज भीमराव पांचाळे यांच्या ग़ज़ल गायकीने ‘अंदाज आरशाचा’, ‘तू नभातले तारे माळलेस का?’, ‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय’ या एकाहून एक सरस ग़ज़लांचे पलू आष्टगावच्या मातीत उलगडले.
‘खुलासे अधुरेच राहतात आणि निघायाची वेळ होते.
दिसणार नाही कुणा असे डोळ्यामध्ये दव तरळते’
अशा शब्दांत सातव्या अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलनाची सांगता झाली.
response.lokprabha@expressindia.com