८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

माझं शेतघर

जमीन महसूल संहिता
डॉ. रवींद्रनाथ पडवळ

सकाळी सकाळीच मित्राचा फोन आला. त्याच्या मुलाला दुसऱ्या दिवशी एका कंपनीत मुलाखतीला जायचे होते. त्यासाठी त्याला रेफरन्स लेटर व अर्थशास्त्रावरील काही नोट्स हव्या होत्या. कॅरेक्टर सर्टिफिकेटचे ठीक, पण अभ्यासाच्या नोट्स वाचून एका दिवसात विषयाची खोली कशी समजणार होती? पुष्कळ व्यक्ती या तहान लागल्यावर पाणी शोधणाऱ्या असतात. माझ्या दुसऱ्या एका मित्राला शेतजमिनीसंबंधी तहसील कार्यालयात जायचे होते. तेव्हा हे साहेब शेतजमिनीचे पेपर शोधावयास लागले. आता ते पेपर मिळविण्यासाठी धावपळ व कितीतरी जास्त पैसे खर्च होणार. ते आधीच तयार असतील तर?
आपल्या देशातील अजूनही जवळपास ६० टक्के लोक कृषीउत्पन्नावर अवलंबून आहेत. अर्थशास्त्रीय भाषेत कृषीक्षेत्रात छुपी बेकारी आहे. युरोपीय देशांच्या तुलनेने शेतामधील जे कार्य ४ ते ५ व्यक्ती यंत्राच्या सहाय्याने करू शकतात ते करण्यासाठी आपल्याकडे, भरपूर मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे २० ते २५ माणसे करतात. त्यावेळी ते बैल, रेडे, गाढव, घोडा अशा जनावरांचा मदत म्हणून उपयोग करून घेतात.
आपण इस्राएल, जपान या देशांसारखे आधुनिक पद्धतीने शेती ही कृषीव्यवसाय म्हणून केल्यास आपले छोटे शेतकरीही सधन शेतकरी होतील. पण त्यासाठी मुख्य म्हणजे जमीन तर आपल्या मालकीची पाहिजे! पण जमीन आपल्या मालकीची आहे हे कसे म्हणता येईल. एखादी चारचाकी/ दोनचाकी वाहन, गाडी आपल्या मालकीची आहे, असे आपण म्हणतो तेव्हा त्या गाडीचे नोंदणी सर्टिफिकेट/ कार्ड, आपल्या नावावर असते. आपण राहत असलेले घर आपले असते. कारण त्याची सरकारी कचेरीमधील नोंद आपल्या नावावर असते व तो दाखला आपल्याजवळ असतो. तसेच जमिनीची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी पुढील मुख्य पेपर, सरकारी कचेरीतील सक्षम अधिकाऱ्यांच्या सही, शिक्क्य़ांनी आपल्याजवळ पाहिजेत. १) ७/१२ चा उतारा, २) गाव नमुना सहा- अ, ब, क, ड ३) गाव नमुना ८ आणि ४) खाते पुस्तिका
७/१२ चा उतारा- ७ व १२
खरे तर सात वर्षांत असे दोन उतारे एकत्र, एकाच कागदावर पुढे/मागे दिलेले असतात. त्यामुळे त्या कागदाचे ७/१२ असे नाव प्रचलित झाले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्य़ा (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ मागील नियम ३, ५, ६ आणि ७ या अनुसार गाव नमुना सात व बारा उपलब्ध होतात. गाव नमुना सात मध्ये १) गाव, तालुका, जिल्हा. २) भूमापन क्रमांक, भूमापन क्रमांकाचा उपविभाग, भूधारण पद्धती. ३) शेतीचे स्थानिक नाव. ४) लागवडीयोग्य क्षेत्र - हेक्टर, आर (या मापकामध्ये) खरीप, बागाईत, वरकस असे, एकूण पोटखराबा (लागवडयोग्य नसलेली) वर्ग (अ) व (ब) चे जमीन क्षेत्र. ५) आकारणी- जुडी किंवा विशेष आकारणी, रुपये पैसामध्ये. ६) भोगवटादारांचे नाव. ७) खाते क्रमांक. ८) कुळाचे नाव, खंड (रु. पैसा). ९) इतर अधिकार. १०) सीमा आणि भाषावार चिन्हे, इत्यादी.
गाव नमुना बारा
(१) वर्ष (२) हंगाम (३) पिकाखालील क्षेत्राचा तपशील - (अ) मिश्र पिकाखालील क्षेत्र (ब) निर्भेळ पिकाखालील क्षेत्र. (४) लागवडीखालील उपलब्ध नसलेली जमीन (स्वरूप व क्षेत्र) (५) जलसिंचनाचे साधन (६) जमीन कसणाराचे नाव व शेरा (७) तलाठी सजा, तालुका, जिल्हा (८) तलाठीची सही, शिक्का, तारीख.
सरकारने राज्यातील सर्व जिल्हा, तालुका, गावे यांचा ७/१२ चा उतारा इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तो आपण पाहू शकतो. ७/१२ चा उतारा मिळाल्यावर पुढील गोष्टी बरोबर आहेत, याची खात्री करावी.
१) गाव, तालुका, जिल्हा, भूमापन तसेच सक्षम अधिकाऱ्यांची सही, त्यांच्या कचेरीचा शिक्का. २) ७/१२ वरील फेरफाराच्या नोंदी कशा झाल्या व त्या बरोबर आहेत का, हे पाहावे. ३) शेतीसाठी घेतलेले कर्ज, पिकाची तगाई, पैसे/ कर्ज देण्याच्या संस्थेचे बँकेचे नाव, रक्कम बरोबर आहे का ते पाहणे. ४) कुळाची माहिती, वहिवाट इ. माहिती पाहा ५) नवीन खरेदी, विक्री, व्यवहारांची नोंद बरोबर आहे का, ते पाहावे.
जमिनीच्या मालकी हक्कातील बदलांची नोंद पुढीलप्रमाणे केली जाते.
१) शेतीच्या जमिनीसंबंधी जे वादविवाद, निर्माण झाले असतील ते गाव नमुना सहा ‘अ’मध्ये उपलब्ध असतात. २) सरकारतर्फे काही दंड झाला असल्यास त्याची नोंद सहा ‘ब’ मध्ये मिळते. खरेदी व्यवहारामध्ये ती रक्कम विचारात घेतली जाते. ३) जमिनीचे एकूण किती लोक वारस आहेत, त्याची नोंद ७/१२ तसेच सहा ‘क’ मध्ये मिळते. ४) जमिनीचे नव्याने जे पोटहिस्से पाडले जातात त्याची माहिती सहा ‘ड’ मध्ये मिळते. ५) एका गावात एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, याची नोंद गाव नमुना आठमध्ये मिळते.
एखाद्या जमिनीचा शेतीव्यतिरिक्त वापर करावयाचा असल्यास ती जमीन सक्षम अधिकाऱ्याकडून ‘बिनशेतीची’ करून घेणे कायद्याप्रमाणे योग्य आहे.
शेतीच्या जमिनीचे लहान हिस्से करण्यास कायदेशीर व व्यावहारिक मर्यादा आहेत. पण बीज शेतीच्या जमिनीचे योग्य असे व्यावहारिक १ गुंठा (१००० चौ.मीटर अंदाजे) पर्यंत हिस्से करता येतात व ते कुणालाही विकत घेता येतात. परंतु, शेतजमीन फक्त शेतकऱ्यालाच विकत घेता येते, तसेच सरकारने सामाजिक न्याय तत्त्वानुसार आदिवासी, भूमिहीन, सैनिक, स्वातंत्र्यसैनिक यांना दिलेली जमीन ही त्यांच्या कौटुंबिका उदरनिवार्हासाठी दिलेली असते. ती कोणीही खरेदी करणे कायद्याला धरून होत नाही. उदा.- आदिवासी शेतकऱ्याची जमीन, गैरआदिवासी शेतकरी विकत घेऊ शकत नाही. तेव्हा खरेदीचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे चांगले.
आदिवासी व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीनेच बिगर-आदिवासी व्यक्तीला जमीन हस्तांतरण करता येते. अशा वेळी अशा जमिनीचे हस्तांतरण होऊन तीस वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे का याची चौकशी करावयास पाहिजे. आदिवासी खातेदाराच्या जमिनीच्या हस्तांतरणास र्निबध असले तरी आवश्यक ती अनर्जित रक्कम/ नजराणा रक्कम (१० टक्के) भरणा करून घेऊन हस्तांतरणास परवानगी दिली जाते. (पूर्वी ५० टक्के नजराणा आकारला जाई.)
response.lokprabha@expressindia.com