८ मार्च २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
संख्याशास्त्र
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
आनंदी, स्वच्छंदी शिक्षणासाठी सध्या फिनलॅँडचं उदाहरण दिलं जातं. गेली चाळीस-पन्नास वर्षे अथक परिश्रम करून फिनलॅँडने शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी बनवली आहे. पण ते पाहण्यासाठी फिनलॅँडला जायची गरज नाही. हे असे कौतुक आपल्या जालना जिल्ह्य़ातही अवतरले आहे. गेले आठ महिने जालन्यात सुरू असलेल्या ‘शाळा उन्नत अभियाना’मुळे तिथल्या जिल्हा परिषद शाळांचा कायापालट झाला आहे. बदलाच्या प्रक्रियेच्या जाणिवेने थरारून गेलेले शिक्षक आणि त्यात सहभागी झालेले विद्यार्थी हे चित्र आपल्याच राज्याच्या एका जिल्ह्य़ात शक्य झाले आहे. शिक्षण आनंददायी करण्यासाठी इतर कशापेक्षाही इच्छाशक्तीची गरज असते हे अधोरेखित करणाऱ्या या अभियानाविषयी-

कव्हरस्टोरी
आनंदाने शिकता शिकता.
कल्पना करा. तुमच्या घरात बाळ जन्माला आले आहे. दवाखान्यातून घरी जाताना शासनातर्फे तुम्हाला एक भेट मिळते. त्यात तीन पुस्तके आहेत- एक आईसाठी, एक वडिलांसाठी तर एक चक्क बाळासाठी! अर्थात बाळाच्या पुस्तकात आई-वडिलांचे चेहरे आहेत. शासन बाळाच्या पालकांना सांगते आहे की तुमच्या माध्यमातूनच हे बाळ बाहेरचे जग पाहणार आहे, तेव्हा तुम्हीच बाळासाठी महत्त्वाचे आहात! हे सारे कल्पनारंजन इथेच संपत नाही. हे बाळ थोडे मोठे झाल्यावर शासनाच्याच बालवाडीत जाते. या बालवाडीत त्याला मुक्त खेळायची, समवयस्क मुलांसोबत मत्री करायची संधी असते. त्याचे औपचारिक शिक्षण वयाच्या सातव्या वर्षांपासून चालू होते, जेव्हा हे मूल शासनाच्या शाळेत पाऊल टाकते. होय, शासनाच्याच, कारण फिनलँडमधल्या सर्व शाळा शासनच चालवते, आणि एकदा का हे मूल शाळेत जायला लागले, की या मुलाला घडवायची, त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी तयार करायची जबाबदारीच शाळेतील शिक्षक स्वीकारतात, आणि मग ते करण्यासाठी योग्य ते मार्ग स्वत:च शोधतात.


नियोजन
उसाचं खूळ, दुष्काळाचं मूळ!
मी एक पावसाचा अभ्यासक आहे. संशोधनासाठी मी हा विषय निवडला. १०० वर्षांची सांख्यिकीय माहिती जमा केली. या १०० वर्षांत असे एकही वर्ष नव्हते की ज्या वर्षांत पाऊस पडलाच नाही. सरासरी एवढा पाऊस तर दरवर्षी पडतोच पडतो. कधी थोडा जास्त तर कधी थोडा कमी. माझ्या अभ्यासात मला दिसून आले की पावसाने आपला स्वभाव बदलला आहे. संशोधनात मला पावसाबद्दल कळलेल्या गोष्टी अशा -
१- पावसाळा उशिरा सुरू होत आहे.
२- तो लवकर संपत आहे.
३- पावसाचे दिवस कमी होत आहेत.
४- पाऊस जवळपास सरासरीइतका पडतोच आहे.
५- फक्त त्याचा स्वभाव बदलला आहे. तो आपल्या नव्हे तर त्याच्या मर्जीप्रमाणे पडत आहे.
दरवर्षी पडणारा पाऊस पुढील अडीच वर्षे माणसाला पुरू शकतो. असे जर असेल तर मग आपणास दुष्काळाला सामोरे का जावे लागत आहे? याचे कारण असे की पावसाच्या पद्धतीत जो बदल होत आहे त्याची नोंद आपण घेतलेली नाही.

संमेलन
ग़ज़लेच्या गावा जावे..
‘‘गावामध्ये मनांची नाती जुळून आली
मातीमध्ये सुखांची स्वप्ने फुलून आली’’
‘माती’ मनात साचलेली, आठवणीत पुलकित होणारी, मायेच्या रोपटय़ाला घट्ट रुजवणारी, स्वप्नांचा पारिजातक जन्मभर फुलवणारी.. असाच काहीसा अनुभव ९ व १० फेब्रुवारी रोजी अमरावतीतल्या आष्टगावात ग़ज़ल सागर प्रतिष्ठानव्दारे आयोजित ग़म्ज़लेच्या महासोहळ्याला आलेल्या प्रत्येकाच्या मनात दरवळत होता. संमेलनाचं मानचिन्हच ग्मज़लेचं माहेरकुळ सांगत होते. परिस्थितीचे तडाखे सोसलेली, घराचा जिव्हाळा जपणारी भिंत आणि त्यावर ग्मज़लेची पाऊलवाट स्पष्ट करणारी सूचक खिडकी व चतन्याचे गुपित स्पष्ट करणारी पिंपळाची पानं ग़ज़लेची समृद्धता आणि मातीशी असलेले ऋणानुबंध व्यक्त करत होते. पंढरपूरला गेल्यावर जितकं पवित्र व भावपूर्ण आपल्याला वाटतं त्याहून अधिक चिरसुखाचा अनुभव विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेल्यावर आपल्याला येतो. अमरावती म्हणजे ग्मज़लेची पंढरीच आहे.

पर्यटन
बिग फाइव्हच्या जंगलात
आफ्रिकेचा विस्तारच एवढा प्रचंड आहे की, प्रत्येक भागात वाइल्ड लाइफसाठी नॅशनल पार्कस् आहेतच. मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही ट्रकमधून ओव्हरलँड सफारीमधून बोतस्वाना, झंबेझी, झिंबाब्वे करून साऊथ आफ्रिकेतील सर्व परिचित क्रुगर नॅशनल पार्क येथे पोहोचलो. दूरदृष्टीने तिथल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पूर्वी बराचसा भाग आरक्षित म्हणून ठेवला होता. सॅबी रिझव्‍‌र्ह हा त्यात एक होता. १८९८ मध्ये पॉल क्रुगर याने हा भाग घेऊन त्याचे नॅशनल पार्क केले. १९२३ मध्ये वाइल्ड लाइफसाठी पहिले पर्यटक गेले होते. त्यानंतर हळूहळू पर्यटकांचा ओघ वाढत गेला. लिंपोपो जिल्ह्यत मुमालांगा व मोझेंबिकच्या सरहद्दीला लागूनच असलेल्या ह्य पार्कची लांबी ३२० कि.मी व रुंदी ८०कि. मी. आहे. जगात सर्वात जुने व मोठे नॅशनल पार्क अशी याची ख्याती आहे. एलीफंटस्, व्हाइट ऱ्हायनो, लायन, लेपर्ड व बायसन् किंवा आफ्रिकन बफेलो अशा बिग फाइव्हसाठी प्रसिद्ध असलेल्या या पार्कला दर वर्षी सुमारे नऊ लाख पर्यटक भेट देतात.

भविष्य