८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी

मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)

शाळा उन्नती अभियानाचे प्रणेते, तसेच जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी -
बी राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील कुडुकुथाई जिल्ह्य़ातला. कृषी महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या राधा कृष्णन यांनी २००८ मध्ये आयएएस झाल्यानंतर अहमदनगर, तळोदा, नंदुरबार या जिल्ह्य़ांमध्ये उपविभागीय जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. शिक्षण, आरोग्य, कृषी हे त्यांचे आवडीचे प्रांत आहेत.
प्रश्न- शाळा उन्नत अभियानाची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?
बी. राधाकृष्णन- बालकाच्या गुणवत्ता विकासासाठी अनुवांशिकता व परिस्थिती (वातावरण) हे दोन घटक प्रमुख असतात, असे मानसशास्त्र सांगते. अनुवांशिकता ही बालकांच्या माता-पित्याकडून आलेली असते. मात्र शालेय वातावरणाच्या माध्यमातून गुणवत्ता कशा प्रकारे वाढवता येईल, तसेच जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षक कसे मिळतील यावर मी विचार करत होतो. त्यासाठी मी सुरुवातीला म्हणजे जून महिन्यात काही शाळांना भेटी दिल्या. जुनाट अवस्थेतल्या, मळकटलेल्या शाळांच्या इमारती पाहून मला वाटले की हे सगळं बदललं पाहिजे. शाळांना रंगरंगोटी केली पाहिजे, नवनवीन उपक्रम आणले पाहिजे. त्यासाठी या वातावरणाला संजीवनी द्यायची असेल तर काय केले पाहिजे याचा विचार करत असताना मला हे अभियान सुचले.
प्रश्न- या अभियानातून काय साध्य करायचं होतं?
बी. राधाकृष्णन- हो निश्चितच. जिल्हा परिषदेच्या जवळजवळ एक हजार पाचशे ५६ शाळांमधून हा उपक्रम राबविला जातोय. या उपक्रमातून आम्ही ज्ञानरचनावादी वातावरण शाळाशाळांत तयार केले आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासविषयक दृष्टिकोन बदलणे तसेच त्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लावून त्यांची बौद्धिक क्षमता वाढविणे हा आमचा उद्देश आहे. या सगळ्या शाळांना एकसारखाच रंग दिला गेला. सगळ्या वर्गामध्ये सारखेच शैक्षणिक साहित्य, चित्रे, अभ्यासफलक उपलब्ध करून दिले गेले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेत जा, सगळ्या मुलांना सगळ्या प्रकारच्या शिकण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. कोणत्याही शाळेतील विद्यार्थी ज्ञानापासून वंचित राहता कामा नये, अशी आमची भूमिका होती.
या अभियानातून तुमचं उद्दिष्ट साध्य झालं असं तुम्हाला वाटतं का?
बी. राधाकृष्णन- मला अपेक्षित असलेले बदल ८० टक्के झाले आहेत असं मला वाटतं. मुलांच्या डोळ्यांसमोर शाळेच्या भिंतींवर सतत नवनवीन माहिती आल्यामुळे त्यांना सतत नवनवीन गोष्टी कळत गेल्या. त्यांची चौकस बुद्धी वाढली. या अभियानामुळे मुलांना शाळेची गोडी लागली. पुढच्या शैक्षणिक वर्षांत आम्ही आणखी लक्ष केंद्रित करून गुणवत्ता विकासाला या अभियानाचा कसा फायदा होईल हे पाहणार आहोत.
प्रश्न- या उपक्रमाविषयी आणखी काय सांगाल?
बी. राधाकृष्णन- प्रश्नमंजूषा स्पर्धेच्या व जालना जिल्हा सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड लागावी, पुढील काळात माझ्या जिल्हा परिषद शाळातील अधिकाधिक मुले आय.ए.एस. व्हावीत, यासाठी हे अभियान उपयुक्त आहे. निसर्गसंवर्धन, जलनियोजन व बचत जलपुनर्भरणाच्या कामांचं महत्त्व या माध्यमातून मुलांच्या मनावर बिंबवलं जात आहे. या अभियानासाठी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी खूप मेहनत घेत आहेत. या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया बदलायला आम्हाला नक्कीच यश मिळेल.
response.lokprabha@expressindia.com
मार्च महिन्यापासून शाळा उन्नती अभियान तपासणी पथक जिल्ह्य़ातील आठ तालुक्यांमधील पहिली ते चौथीच्या २४, पाचवी ते सातवीच्या २४ शाळा तपासतील. या ४८ शाळांमधून ते पाच शाळांची निवड करेल. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती या शाळांना भेट देऊन त्यातून तीन क्रमांक काढतील. या तपासणी पथकात पाणीपुरवठा विभाग वगळता सर्व विभागांतील खातेप्रमुख , गटशिक्षणाधिकारी असतील.
जालना जिल्ह्यतील शाळांचे पालटलेले रुप पहा ‘लोकप्रभा’ फोटो गॅलरीमध्ये.
facebook.com/Lokprabha