८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी

आवडते मज माझी शाळा

धनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील प्राथमिक शाळेत पाचवीतील विशाल सांगतो की, मला आधी शाळेत जायला अजिबात आवडायचे नाही. रंग गेलेल्या, पडक्या भिंती असलेली शाळा अगदी जुनाट, भकास वाटायची. मात्र अचानक ऑगस्ट महिन्यात आमच्या शाळेला शिवाजी देशमुख सरांनी रंग दिला. त्यावर चित्रं काढली, गणिताची शब्दकोडी, मराठीतील इंग्रजीतील वर्णमाला काढली. आम्हाला फारच आवडलं ते. सारखी ती चित्रं, माहिती नजरेसमोर असल्यामुळे आम्हाला अभ्यास आवडायला लागला.
मंढा तालुक्यातील धोंडी पिंपळगाव येथील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणारी साक्षी सांगते की, शाळेतील भिंतीवर केलेल्या रंगकामामुळे आम्हाला शाळा आवडायला लागली. प्रश्नमंजूषा घेतल्यामुळे सामान्यज्ञान आवडायला लागलं. मी आमच्या केंद्रातून या परीक्षेत पहिली आली, तसेच तालुक्यात दुसरी आली. माझी आई खूप खूश झाली. सगळ्यांनी माझे कौतुक केले. मलासुद्धा ती परीक्षा द्यायला खूप मजा आली.
श्रीराम तांडय़ावरील पवन राजेश चव्हाण हा पाचवीतील मुलगा सांगतो की, आम्हाला नकाशाचे प्रकार, नकाशा कशा पकडावा, नकाशा कसा वाचावा, दिशांची नावे, देशांच्या राजधान्या या सगळ्याची माहिती नकाशावाचन या उपक्रमामुळे मिळाली. माझे आई-वडील निरक्षर आहेत. मी हे सगळं शिकलो, तालुक्यात जाऊन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा दिली याचा माझ्या आई-वडिलांना फार अभिमान वाटला.

शाळा उन्नती अभियानात काय आहे?
- सर्व जिल्हा परिषद शाळांना सारखाच रंग दिला गेला. त्यामुळे एकसंधता आली.
- जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या शाळांतील प्रत्येक वर्गात अध्ययन अनुभव देणारे सारखेच तक्ते आहेत.
- प्रत्येक पायरीवर पावलांच्या ठशांत १ ते १० अंक रंगवले गेले आहेत. पहिलीतील मुले आवडीने हे अंक वाचतात.
- अभियानामुळे लोकसहभाग वाढला. त्यामुळे शिक्षक वेळेवर शाळेत जायला लागले. शिक्षकांच्या अनुपस्थितीबद्दलच्या, उशिरा येण्याबद्दलच्या तक्रारी कमी झाल्या.
- अभियानात १५५६ शाळा सहभागी झाल्या आहेत.