८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा

लोकांशी बोलायला आवडतं..
प्रतिनिधी
अचिव्हर्स क्लब या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते बोमन इराणी यांची मुलाखत

‘अचिव्हर्स क्लब’ हा तुमचा दुसरा टेलीव्हिजन शो आहे आणि तुमचे टेलीव्हिजनवरचे करिअर चांगले चालले आहे. तुम्ही याकडे कसे पाहता?
‘बिजनेस गेम शो’च्या निमित्ताने मी पहिल्यांदा टेलीव्हिजन शोमध्ये आलो. हा शो मी खूप एन्जॉय केला. ‘अचिव्हर्स क्लब’ हा माझा दुसरा कार्यक्रम आहे. मला टेलीव्हिजनवर काम करायला आवडतं म्हणूनच मी ‘अचिव्हर्स क्लब’सारखी आलेली चांगली संधी सोडली नाही.
‘अचिव्हर्स क्लब’ या कार्यक्रमाची संकल्पना काय आहे? हा कार्यक्रम का करावासा वाटला?
आपल्याकडे असे काही लोक आहेत ज्यांचे आयुष्य म्हणजे एक नाटय़मय प्रवास आहे. त्यांनी असे काही करून दाखवले आहे जे इतरांना प्रेरणादायी आहे. अशा काही उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा हा कार्यक्रम आहे. आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये ज्यांना आपलं नाव कमवायचं आहे अशा लोकांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. मला या कार्यक्रमाची संकल्पना भावली. स्वत:ची कोणतीही ओळख नसणाऱ्या व्यक्तीपासून सुरू होणारा जीवन प्रवास इतरांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वापर्यंत पोहचतो हे सर्व जाणून घेण्यात आणि मुलाखतीच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात एक वेगळाच आनंद आहे. या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आपला जीवनप्रवास येथे उलगडतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी केलेली मात, महत् प्रयत्नाने त्यांनी मिळवलेले यश. हे सर्व जाणून घेण्यात मला व्यक्तिश: आवडते. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
तुमच्या कार्यक्रमात कोण कोण येऊन गेलं..?
नारायण मूर्ती, चित्रपट निर्मात्या मीरा नायर, फॅशन डिझायनर सब्यासची, प्रियांका चोप्रा, ही काही प्रातिनिधिक नावं आहेत. याशिवाय बिझनेस, क्रीडा, चित्रपट या क्षेत्रातील आणखी काही व्यक्ती आहेत.
तुम्ही तुमच्या पाहुण्यांची निवड कशी करता?
त्यासाठी मी आणि आमची प्रॉडक्शन टीम एक मीटिंग घेतो. त्यामध्ये आम्ही काही नावं नक्की करतो. त्यासाठी आम्ही त्यांच्या कार्याचा आढावा घेतो. मग काही जणांशी मी संपर्क करतो तर काही जणांशी आमची प्रॉडक्शन टीम संपर्क साधते. जसं की प्रियांका चोप्राशी या शोबाबत मी बोललो होतो, तर मीरा नायर यांच्याशी आमच्या प्रॉडक्शन टीमने संपर्क साधला होता.
या कार्यक्रमात येणाऱ्या लोकांना बोलतं करण्यासाठी तुम्ही काय तयारी करता?
या कार्यक्रमाने मला अभ्यास करण्याची आणि या कर्तृत्ववान लोकांशी संवाद साधण्याची संधी दिली आहे. मी या लोकांचे जीवन जाणून घेतो. त्यांनी आयुष्यामध्ये केलेला संघर्ष, जीवनातले चढ-उतार आणि काही महत्त्वाच्या घटना हे सर्व जाणून घेतो. त्यासाठी त्यांच्या जुन्या मुलाखती पाहतो. काही व्यक्तींना भेटतो. या सगळ्या अभ्यासातून काही मुद्दे काढतो आणि या लोकांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो.
शूटिंग आणि इतर कामातून हा सगळा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतो?
जे काम तुम्हाला करायला आवडतं, त्यासाठी वेळ काढणं काही फार अवघड नसतं.
अशी कोणी व्यक्ती आहे का, जिला या शोमध्ये बोलवायला तुम्हाला आवडेल?
जे. आर. डी. टाटा असते तर त्यांना या शोमध्ये बोलवायला मला आवडलं असतं. त्यांनी समाजासाठी जे केलं आहे ते अमूल्य आहे.
response.lokprabha@expressindia.com