८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चिंतन

ब्रेकिंग न्यूजच्या पलीकडे..
रमेश द. गळंगे

सध्या जमाना ब्रेकिंग न्यूजचा आहे. ताबडतोबीच्या बातम्यांना त्यामुळे महत्त्व आहे. पण जगात त्यापलीकडेही अनेक घडामोडी घडत असतात. त्या त्या समाजाचा त्या आरसा ठरतात. अशा ब्रेकिंग न्यूज पलीकडच्या बातम्यांचा धांडोळा-

जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी घटना बातमी बनून इंटरनेटच्या माध्यमातून विश्वसंचार करते. अनेक टीव्ही चॅनेल्स व वृत्तपत्रसृष्टीच्या माध्यमातून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोचते. यातील काही बातम्या रंचक, अजब, करुणाजनक तर काही विचारप्रवर्तक असतात. आणखी काही आपल्या दृढविचारांचा कडेलोट करून नव्या विचारांना जागा करून देतात. कधी या नुसत्या बातम्या नसतात तर अन्य देशातील राजकारण, समाजकारण आणि समाजाचे नेतृत्व करणाऱ्या सत्ताधीशांनी केलेल्या कायद्यांचा तो आरसा असतो. उदा. अरब राष्ट्रांतील शासकांनी स्त्रियांच्या बाबतीत केलेले नियम, कायदे इतर देशांतील स्त्रीमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेणारे आहेत तर आपल्याकडील सामान्य वाचकांना अचंबित करणारे आहेत.
कुत्रा आणि माणूस यांची दोस्ती जगप्रसिद्ध आहे. संरक्षक व शोधक म्हणून तो माणसाला उपयोगी पडतो. गंधज्ञानामुळे आधुनिक काळातही कुत्रा गुन्हा वा स्फोटके शोधण्यात पोलीस व लष्करी दलाला तो सहाय्यक ठरला आहे. गल्लीबोळातील भटकी कुत्री याला अपवाद. अशी उनाड कुत्री बऱ्याचदा माणसाला तापदायक ठरतात. ती मानवी वस्तीच्या जवळपास फिरत असतात. कायद्याने त्यांच्यावर कारवाई करणे अवघड झाले आहे. हल्ली एका सोसायटीच्या परिसरात कुत्र्यांच्या पिलावळीने उच्छाद मांडला. सगळे जेरीस आले. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने शक्कल काढली. ती कुत्री त्याने गोणीत भरून भल्या पहाटे रिक्षातून एका निर्जन ठिकाणी नेली. रिक्षातून गोण बाहेर काढून जमिनीवर ठेवली तोच पोलिसांच्या गस्ती गाडीतून शिपायांनी त्याला हेरले. गाडी थांबवून पोलिसांनी त्याला हटकलं आणि झडती घेतली. पोत्यात काही ऐवज वा दारू नसून कुत्री आहेत हे पाहून निराशाच झाली, पण ती क्षणभरच! त्यांनी रक्षकावर मुक्या प्राण्यांना क्रूर वागणुकीचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली! सोसायटीच्या सेक्रेटरीला पाचारण करण्यात आलं. शेवटी हो-ना करता (पहिला गुन्हा) म्हणून दीड हजार रुपयांवर ‘सुटका’ झाली ती रक्षकाची व सेक्रेटरीची. तीसुद्धा भरलेली गोणी तशीच परत नेण्याच्या अटीवर! त्या भो-कुलदीपकांना सन्मानाने सोसायटीत प्रवेश देण्यात आला.
इराण सरकारने याबाबत केलेला कायदा पाहूया. कुत्री पाळणे व त्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरवणे यावर सक्त बंदी घातली. कुत्र्यांची आयात करण्यास प्रतिबंध केला आहे. इराणचे प्रशासन अधिकारी म्हणतात, तेथील धार्मिक श्रद्धेनुसार कुत्रा हा ‘गलिच्छ प्राणी’ आहे. इराणच्या पावलावर पाऊल टाकून त्याचे शेजारी राष्ट्र सौदी अरेबियाने कुत्री-मांजरी पाळणे व त्यांची आयात करणे बेकायदेशीर ठरवले आहे. सार्वजनिक जागी कोणी कुत्र्याला फिरवताना आढळल्यास त्याला (म्हणजे कुत्र्याला नव्हे तर त्याच्या मालकाला) मानेला पट्टा बांधून तुरुंगात रवानगी होईल तीसुद्धा बेमुदत!
ही कथा आहे अमेरिकेमधील शाळांची. इलिनॉइस व कनेक्टिकट या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची आपसातील भांडणं हिंसक बनली. मारामाऱ्या विकोपाला गेल्या. शाळेची आवारे म्हणजे मुष्टियुद्धाचे आखाडे (बॉक्सिंग िरग) बनले. याचे पर्यवसान म्हणजे सतावणुकीच्या आरोप-प्रत्यारोपावरून न्यायालयात खटले भरले गेले. त्याचा त्रास शाळांच्या व्यवस्थापनाला झाला. शाळा चालवायच्या की खटल्यांना तोंड द्यायचं! शाळांची प्रतिमा यामुळे घसरू लागली. तेव्हा काही शाळांनी कडक धोरण स्वीकारले. विद्यार्थी व विद्यार्थिनींवर कठोर र्निबध घालणारे नियम तयार केले.
शाळेतील वर्गात व वर्गाच्या समोरील मार्गिका व आवारात एकमेकांना भेटणे, मिठी मारणे, टिंगलटवाळी करणे, खोडय़ा करणे, टपल्या व चापटय़ा मारणे, दांडगाई करणे इतकेच नव्हे तर एकमेकांना स्पर्श करणे अशा सर्व प्रकारांना सक्त मनाई केली. हे का व कसे घडले? नव्या पिढीवरील संस्कारात काही उणिवा आहेत का? शिक्षणतज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ याचा शोध घेत आहेत.
जगातल्या पर्यटकांमध्ये फ्रान्स हा लोकप्रिय देश. अजोड फॅशन्स डिझाइन्स, उत्कृष्ट सुगंधी अत्तरे, कला व कलावंतांची पंढरी, मद्य व चविष्ट खाद्यपदार्थ, प्रणय, रम्यता व मुक्त व्यक्तिस्वातंत्र्य अशा गोष्टींनी फ्रान्स जगभरात ओळखला जातो. अनेक राष्ट्रांतून हद्दपार झालेले बंडखोर लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांचे फ्रान्स हे आश्रयस्थान. जग या देशाकडे नवलाईने पाहात असते. सध्या हा देश काही वेगळ्याच कारणामुळे जगात चर्चेचा वा वादाचा विषय बनला आहे. कुठल्याही शैक्षणिक संस्थेने ‘धार्मिक बोधचिन्ह’ आवारात लावू नये वा त्याचे प्रदर्शन करू नये असा आदेश फ्रान्स सरकारने जारी केला आहे.

आपल्या देशात, शहर असो गाव रस्त्याच्या कडेलगत चौकाच्या आसपास फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेते ठाण मांडून बसलेले दिसतात. पण आता बहुतेक देशांनी सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास बंदी घातली आहे.

या देशातील दुसरी बातमी आहे बुरखा बंदीची. फ्रान्सच्या संसदेने बहुमताने असा कायदाच संमत करून घेतला. या कायद्यानुसार पूर्ण चेहरा झाकलेला बुरखा वा नकाब घालून बाहेर फिरण्यास मनाई केली. या नियमाचा भंग करणाऱ्या स्त्रीला १५० युरोज (भारतीय चलनात रु. ९०००) दंड भरावा लागेल. जी व्यक्ती स्त्रीला बुरखा वा नकाब घालण्याची सक्ती करेल ती दोषी ठरेल व अशा व्यक्तीस तीस हजार युरोज (भारतीय चलनात रु. १८,०४,२०६) इतका दंड ठोठावला जाईल. हा कायदा अमलात येण्यापूर्वी देशात जनजागरणाची मोहीम आयोजित करण्यात आली. यानंतरची ताजी बातमी अशी की, फ्रान्स सरकारने आता सार्वजनिक जागी व रस्त्यावर नमाज पढण्यास बंदी घातली आहे. मुक्त व्यक्तिस्वातंत्र्याची हमी देणाऱ्या या देशाने ही बंधने का आणली असावीत? सर्वच देशांना भेडसावणारा राक्षस अर्थात दहशतवाद हेच कारण असावं!
वाढदिवस साजरा करणे म्हणजे बर्थडे पार्टी करणे. जगभरात अशा पाटर्य़ा होत असतात. पण सौदी अरेबिया राष्ट्राला ते मंजूर नाही. वाढदिवसाला केकपार्टीला त्यांनी रेड अ‍ॅलर्ट दिला आहे. पाश्चिमात्य देशातील केक पाटर्य़ाचे अनुकरण म्हणजे स्वतच्या देशाच्या प्रथापरंपरांना काळिमा फासणे असे सौदीतील शासकांना वाटते. सौदी अरेबियाच्या सरकारने शहरातील सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकांना अशा पद्धतीने बर्थडे पाटर्य़ा आयोजित न करण्याचे आदेश दिले आहेत.
काळं सोनं म्हणजे पेट्रोल. अरब राष्ट्रे धनसंपन्न झाली ती या काळ्या सोन्यामुळे. या दौलतीचा विनियोग करून सौदी अरेबियन शहराने उजाड प्रदेशाला आधुनिकतेचे रूप देऊन कायापालट केला. गगनचुंबी देखण्या इमारती, प्रशस्त चकचकीत- गुळगुळीत रस्ते तेही खड्डे विरहित! आलिशान हॉटेल्स, भव्य मॉल्स अशा वास्तुशिल्पांनी साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं अन् दिपवून टाकलं. सौदी अरेबियाने शहरांचा विकास करताना पश्चिमी देशांचे अनुकरण केलं. मात्र सामाजिक सुधारणांना मनाची कवाडं बंद केली. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी केलेले नियम हेच दर्शवतात:-
१. स्त्रियांना शहरातील कुठल्याही हॉटेलमध्ये प्रवेश नाही वा राहण्याची परवानगी नाही.
२. स्त्रीला फक्त पुरुषासोबत शहरातील हॉटेलमध्ये प्रवेश मिळू शकेल, पण तो पुरुष तिचा पती वा नातेवाईक असला पाहिजे. परपुरुषासोबत ती हॉटेल वा रेस्टारंटमध्ये आढळल्यास गंभीर गुन्हा होईल. त्याची शिक्षा मृत्युदंड!
३. मुलींना घराबाहेर जाऊन शिक्षण घेण्यास मनाई आहे. शिक्षण घ्यायचेच असेल तर ते घराच्या चार भिंतीच्या आत मुलींना एकत्र बसून शिक्षण घेण्यास संमती आहे.
४. स्त्रीला वाहन चालवण्यास परवानगी नाही.
वरील कलमांवरून अरब राष्ट्रातील सत्ताधीशांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, याची कल्पना येते. घर-परिवाराला वारस निर्माण करणे हे तिचे परमकर्तव्य. एकाधिकारशाही असलेल्या या राष्ट्रातील जनतेला समाजसुधारणेची, महिलावर्गाच्या विकासाची स्वप्ने पाहणे व ती प्रत्यक्षात आलेली दिसणे शक्य आहे का?
आज माहिती-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच परदेशातली समाजाची भौतिक, आर्थिक, वैज्ञानिक व सामाजिक स्थितीची वास्तव माहिती उपलब्ध होऊ शकते. काही महिला अंतराळातून परग्रहावर जाऊन आल्या तर काहींना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही!
आपल्या देशात, शहर असो गाव रस्त्याच्या कडेलगत चौकाच्या आसपास फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्रेते ठाण मांडून बसलेले दिसतात. लहानथोर, तरुणतरुणी विक्रेत्याकडचे खाद्यपदार्थ चवीने खातात. संध्याकाळी तर या विक्रेत्यांना गर्दी आवरत नाही. भाववाढीमुळे हॉटेलमधील गिऱ्हाईक ओसरलं. परदेशात जाणारे पर्यटकही (इथल्या सवयीमुळे) रस्त्यावरील वा गल्लीतील विक्रेत्याकडील चमचमीत खाद्यपदार्थावर ताव मारतात. पण आता बहुतेक देशांनी सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास बंदी घातली आहे. सिंगापूर शहातील प्रशासनाने रस्ते, चौक, रेल्वे स्थानक, भूमिगत मार्ग, इ. ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास सक्त मनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास भलामोठा दंड भरावा लागतो.
चीनमध्ये सफेद रंग दुखवटा वा सुतक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. आता चीनमधील टीव्हीवरील कार्यक्रमात संयोजकाने सफेद पोशाख घालू नये असा आदेश सर्व कार्यक्रम निर्मात्यांना दिला आहे. सार्वजनिक सभेत वा कार्यक्रमात सफेद पोशाखात उपस्थित राहिल्यास श्रोत्यांना तो अपशकुन वाटेल अशी चीन सरकारची धारणा आहे. या हेतूनेच ही बंदी.
मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत यमनियम त्याची पाठ सोडत नाहीत. तरीही जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही. ते सद्विचाराने चालते हे तितकेच खरे आहे.
response.lokprabha@expressindia.com