Lokprabha.com
८ मार्च २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
जालना आणि फिनलॅँड शिक्षणाचा आनंदमार्ग!
अभियानाने शिक्षकांना दिले चैतन्य..
आवडते मज माझी शाळा
मुलांची चौकसबुद्धी वाढली! - बी. राधाकृष्णन (आय.ए.एस.)
आनंदाने शिकता शिकता..

नियोजन

यूथ

सेकंड इनिंग
संमेलन
चिंतन
आरोग्यम्
वादविवाद
क्रीडा

स्टार रेसिपी

विज्ञान-तंत्रज्ञान
एकपानी
कविता
भंकसगिरी
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
आधी केले..
पर्यटन
क्राईम
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य
दि. १ ते ७ मार्च २०१३
 

मेष ग्रहस्थिती थोडी फसवी आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून राहाल त्यांच्या बाबतीत ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा अनुभव येईल. पण तुम्ही सावध राहिलात तर या परिस्थितीवर मात करू शकाल. व्यापार उद्योगात पशाची गुंतवणूक करताना भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. वसुली करताना गिऱ्हाईक तुटणार नाही याची काळजी घ्या. उत्पन्नाचे प्रमाण खर्चाइतकेच राहील. नोकरीमध्ये सहकाऱ्याचा चेहरा आणि मुखवटा यातील फरक लक्षात येईल. कामाचा तणाव नकोइतका वाढेल. घरामध्ये सर्वाची मोट बांधणे जड जाईल. विद्यार्थ्यांनी मित्रांच्या सांगण्यावरून स्वत:चे अंदाज बांधू नयेत.
.......................................................

वृषभ तुमचे विचार आणि कृती तसेच महत्त्वाचे निर्णय यांचा केंद्रिबदू तुम्हाला होणारा लाभ हाच असणार आहे. व्यापार उद्योग व कारखानदारीत पूर्वी जे काम तुम्ही केलेले होते त्यातून पशाचा ओघ सुरू होईल. त्यामुळे नवीन आणि मोठय़ा योजना मनात डोकावतील. नोकरीमध्ये विशेष सवलती किंवा पदोन्नतीकरिता तुमची निवड होण्याची शक्यता आहे. पण याचा सुगावा तुमच्या गुप्तशत्रूंना लागू देऊ नका. घरामध्ये वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. एखादा छानसा कार्यक्रम ठरेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.
.......................................................

मिथुन अनेक स्तरांवरील व्यक्तींशी गाठीभेटीचा योग चालून येईल. त्यांच्या विचारांनी तुम्ही भारावून जाल. व्यवसाय-उद्योगात नवीन आíथक वर्षांत काय करायचे याचा मसुदा मनात तयार असेल. त्यासंबंधीच्या सुयोग्य व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही राहाल. कारखानदारांना नवीन करार करून कार्यपद्धतीत आधुनिकता आणावीशी वाटेल. पण पशाची बाजू अडवून धरेल. नोकरीमध्ये तातडीच्या कामानिमित्त देशात किंवा परदेशात प्रवासाची संधी लाभेल. तुमच्या कौशल्याला बराच वाव मिळेल. घरामध्ये शुभ कार्याची तयारी करावी लागेल. तरुणांचे विवाह जमतील. विद्यार्थ्यांनी स्वप्नरंजन करू नये.
.......................................................

कर्क विपरीत परिस्थितीशी सामना करायला आवश्यक असणारे मनोधर्य तुमच्यात येईल. बरेच प्रयत्न करूनही ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या होत्या त्या आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. आवश्यकता पडल्यास एखादा धाडसी निर्णयही घ्याल. व्यापार-उद्योगात हाताखालच्या माणसांना खूश ठेवून काम करून घ्यावे लागेल. आíथक बाजू तात्पुरती सुधारेल. नोकरीमध्ये कामाचा पसारा वाढता असेल. त्यामुळे तुमची अडचण वरिष्ठांना सांगून काहीतरी उपाय योजावा लागेल. घरामध्ये गरसोय करणारी परिस्थिती सुधारल्याने बरे वाटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रयोग करू नयेत.
.......................................................

सिंह ग्रहमान थोडेसे अनुकूल असल्यामुळे जी संधी पुढे आहे त्याचा ताबडतोब फायदा उठवा. नंतर त्याच कामात विलंब झाल्यामुळे तुमची गरसोय होईल. व्यवसाय उद्योगात कामाचे प्रमाण चांगले असेल. हाताखालच्या व्यक्तींना खूश ठेवा. त्याकरिता जास्त पसेही खर्च होतील. इतरांवर काम सोपवले असेल तर तुमची देखरेख ठेवा. त्याने कामाचा दर्जा टिकून राहील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांकडून जी मदत मिळेल ती उपयोगी पडेल. नवीन नोकरीच्या कामात तांत्रिक अडथळे असल्यास ते पार करा. घरामध्ये जोडीदाराचे तंत्र सांभाळणे तुम्हाला कठीण जाईल.
.......................................................

कन्या ‘पेरल्याशिवाय उगवत नाही’ हे नुसतेच तुम्ही मानत नाही तर त्याला अनुसरून कृतीही करीत असता. तुम्ही केलेल्या कामाचा लगेच उपयोग होणार नाही, हे तुम्हाला माहीत असूनही हे काम तुम्ही कराल. त्याचा फायदा नजीकच्या भविष्यात तुम्हाला मिळेल. व्यापार-उद्योगात नवीन हितसंबंध जोडायला तुम्ही उत्सुक असाल. कारण त्यातून उत्पन्नामध्ये आणि फायद्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना चांगले संकेत मिळतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक ऐकायला मिळेल. घरामध्ये मुलांना मार्गदर्शन देऊन आधार द्याल.
.......................................................

तूळ तुमचे ग्रहमान जरी साधारण असले तरी ज्या व्यक्तींनी तुमच्याविरुद्ध कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यांना थोडीफार समज देण्याची संधी मिळेल. सर्व ठिकाणी आपल्याला अडथळे येतात ही भावना कमी करणारी एखादी घटना अचानक घडेल. व्यवसाय-उद्योगात नवीन काम मिळाल्यामुळे तुम्हाला हुरूप येईल. नोकरीमध्ये कष्टाचे प्रमाण कमी करायला एखाद्या व्यक्तींकडून साथ मिळेल. घरामध्ये नातेवाईक किंवा हितसंबंधीयांविषयी एखादी खूशखबर कळेल. बरेच दिवस लांबलेला कार्यक्रम ठरल्यामुळे ‘गंगेत घोडे न्हाले’ असे वाटेल. विद्यार्थ्यांना आलेल्या शंकांचे निरसन होईल.
.......................................................

वृश्चिक ग्रहमान तुमचे मनोधर्य वाढवायला उपयोगी पडणार आहे. कर्तव्य करता करता विरंगुळेचा एखादा क्षण जरी मिळाला तरी त्याचा तुम्हाला आधार वाटेल. त्याच्याच जोरावर तुम्हाला कार्यरत राहायचे आहे. व्यवसाय-धंद्यात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्याची तरतूद करण्यामध्ये बराच वेळ जाईल. पण अखेर या कामात तुम्ही यशस्वी व्हाल. जुन्या ओळखींचा उपयोग होईल. कामगारांना युक्तीने हाताळा. नोकरीमध्ये अवघड काम शक्कल लढवून मार्गी लावाल. घरामध्ये मुलांकडे आणि प्रिय व्यक्तींकडे लक्ष ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पद्धतीने अभ्यास करावा
........................................................

धनू ज्या सांसारिक जबाबदाऱ्यांकडे काही कारणाने दुर्लक्ष झालेले होते त्याकडे आता लक्ष द्यावे लागेल. ग्रहमान उत्साहवर्धक आहे. तुमच्यातील विशेष कौशल्यांना वाव असल्यामुळे काय करू आणि काय नको असे तुम्हाला होईल. नवीन व्यक्तींशी ओळख करून घेऊन परिचय वाढवण्याची तुमची हौस विशेषरूपाने जागृत होईल. नोकरीमध्ये एखादा नवीन प्रयोग करून बघता येईल. तुमचे महत्त्व वाढेल. घरामध्ये प्रत्येक व्यक्तींची गरज महत्त्वाची असल्यामुळे बरीच धामधूम असेल. विद्यार्थ्यांनी मन एकाग्र करून अभ्यास करावा.
.......................................................

मकर तुमच्यातील जिद्द आणि साहस वाढेल. जे काही घडत असते त्यामागे बऱ्याच वेळेला तुमची दूरदृष्टी आणि नियोजन जबाबदार असते. याचा फायदा देणारे हे ग्रहमान आहे. ज्या इच्छा मनामध्ये बराच काळ तरळत राहिलेल्या होत्या, त्या पूर्ण होण्याचे समाधान लाभेल. व्यवसाय-उद्योगात जेवढे काम कराल तेवढे थोडेच. नोकरदार व्यक्तींना जादा काम करून जादा भत्ते किंवा सवलती मिळवता येतील. घरामध्ये लांबलेले कार्य निश्चित होईल. पण त्याला थोडा अवधी लागेल. विद्यार्थ्यांना नशिबाची साथ आहे. त्यांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये.
.......................................................

कुंभ नवीन आणि जुन्याचा सुरेख समन्वय साधून तुम्ही तुमचे यश द्विगुणित करू शकाल. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींशी साथ मिळविणे हेच फक्त तुमच्यापुढील आव्हान असेल. व्यवसाय-उद्योगात स्पर्धकांना तुमच्या कल्पना कळणार नाहीत याची दक्षता घ्या. जादा भांडवलाची सोय करण्याकरिता प्रयत्न करा. नोकरीमध्ये कमी बोला, जास्त काम करा. त्याचे वरिष्ठ कौतुक करतील. एखाद्या चांगल्या कारणाकरिता घरातील व्यक्तींशी ताटातूट होईल. विद्यार्थ्यांना असलेल्या शंका त्यांनी वेळीच दूर केल्या तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
.......................................................

मीन अनेक वेळा तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकता आणि त्या क्षणी तुम्हाला जे योग्य वाटते ते करून मोकळे होता. नंतर आपण नियोजन केले असते तर बरे झाले असते असे वाटते. जे काम तुम्हाला नजीकच्या भविष्यात करायचे आहे, त्याविषयी सखोल माहिती मिळवा. व्यापार-उद्योगामध्ये नवीन गुंतवणूक करीत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. उलाढाल वाढवण्यासाठी जादा भांडवलाची गरज पडेल. नोकरीमध्ये एखादी चांगली संधी नजरेच्या टप्प्यात येईल.घरामधल्या व्यक्तीत्यांच्या मतलबापुरत्या तुमच्याशी गोड बोलतील. विद्यार्थ्यांना थोडा तणाव जाणवेल.
.......................................................

विजय केळकर Email : response.lokprabha@expressindia.com