१ मार्च २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी

विज्ञान-तंत्रज्ञान विशेष
पंचवीस वर्षांत नोबेल आवाक्यात
न्यूटन ४० मार्काचा तर आइनस्टाइन १०
विज्ञानाचं मुक्तांगण
समाजाने नाकारले.. ..ते विज्ञानाने दिले!
ते आणि आपण - फरक मनोवृत्तीतला!
अंगणातल्या प्रयोगशाळा!
कोण होणार इंटेलचा मानकरी ?

क्रीडा

स्त्री-मिती

आरोग्यम्
द्या टाळी..
कविता
शून्य प्रहर
शब्दरंग
सिनेमा
माझं शेतघर
लग्नाची वेगळी गोष्ट
किनारा
ठमीचे लग्न ..
संख्याशास्त्र
भन्नाट
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

विज्ञान-तंत्रज्ञान विशेष
पंचवीस वर्षांत नोबेल आवाक्यात
* सध्याच्या काळातली आपल्या देशातली सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती कशी आहे असं तुम्हाला वाटतं..
आपला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपला देश भविष्यात म्हणजे २०३० पर्यंत सर्वसाधारण वयोमानाच्या दृष्टीने जगात सर्वात तरुण देश असणार आहे. १५- ३० या वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण पुढच्या वीस वर्षांत भरपूर असणार आहे. या वयोगटातील पिढी नवीन विचार करणारी असते. ही वष्रे त्यांची सगळ्यात जास्त उत्पादक वर्षे असतात. तेव्हा त्या काळातील समाजाच्या उत्पादकतेचा विचार केला तर या तरुण पिढीची उत्पादकता कशी वाढेल यावर सर्व लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यातदेखील आपणास सामान्य स्तरावरील उत्पादकता नकोय, तर कौशल्याधारित उत्पादकता हवी आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात मुलभूत सुधारणा होणे गरजेचे आहे. एकूण गुणवत्ता वाढणे देशाच्या भविष्यासाठी हितावह आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये राज्यकत्रे, प्रशासन, शिक्षक, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक आणि माध्यमं या सर्वाचीच भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कदाचित यासाठी आपल्याला एरवीपेक्षा जास्त काम करावे लागेल. पण ही आपली ऐतिहासिक जबाबदारी आहे. कदाचित ऐतिहासिक हा शब्द राजकीय/ भावनिक वाटेल पण खरोखरच ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. ही संधी जर आपण घेतली नाही तर ज्या दृष्टीने पुढे जायचे ते होणार नाही. आपण सुपर पॉवर वगरे शब्द नको वापरायला. त्याला खूप अवकाश आहे. पण ही एक चांगली संधी आहे ती आपण गमावून चालणार नाही.

विज्ञान-तंत्रज्ञान विशेष
न्यूटन ४० मार्काचा तर आइनस्टाइन १०
आधुनिक विज्ञानाच्या विकासात प्रयोगाचे स्थान गॅलिलिओच्या काळापासून फार महत्त्वाचे ठरत गेले. केवळ मानसिक कल्पनांवर आधारित, अनुमानित तत्त्वज्ञान हा त्याआधी बराच काळ विज्ञानाचा आधार होता. पण गॅलिलिओच्या नंतर अशा अनुमानित नसíगक नियमांची निरीक्षणात्मक प्रायोगिक चाचणी घेतल्यानंतरच, सर्व निकष पूर्णपणे लागू ठरत असतील तरच तो ग्रा धरायचा अशा तऱ्हेने विज्ञानाचा पाया बनत गेला. त्यामुळे प्रत्यक्ष निरीक्षणे घेण्यासाठी आणि नंतर संकल्पना सिद्ध करण्यासाठी प्रयोगांची आखणी, मांडणी आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास अशी एकूणच विज्ञानाच्या विकासातील विज्ञान-तंत्रज्ञानाची गुंफण बनत गेलेली आहे. ही प्रायोगिक पद्धत सुरू झाली त्याला काही फार काळ लोटलेला नाही. गॅलिलिओला आधुनिक विज्ञानाचा जनक मानतात, त्याला जेमतेम ४०० वष्रे झाली आहेत. पण या ४०० वर्षांच्या काळात एकूणच झालेली विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती पाहता आणि त्याचा सध्याचा वेग पाहता, सध्याच्या विज्ञान शिक्षणात या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समावेश नीट झाला पाहिजे ही एक अनिवार्य बाब ठरत आहे.विज्ञानाच्या संकल्पना शिकवताना प्रयोगांच्या साहाय्याने त्यांचा अनुभव देणे अत्यावश्यक आहे. सध्या आपल्या देशभरात असणाऱ्या सर्वच भाषा आणि राज्यांमधील विज्ञानाच्या पुस्तकांचा आढावा घेतला तर त्यात पुरेशा प्रमाणात प्रयोगांची उपयोजना विज्ञान संकल्पनांच्या शिक्षणासाठी, अनुभूतीसाठी केलेली दिसते. पण पाठय़पुस्तकात समावेश केलेले हे प्रयोग प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मात्र करून दाखवले जातातच असे नाही.


विज्ञान-तंत्रज्ञान विशेष
विज्ञानाचं मुक्तांगण
‘प्रयोग’शाळा

मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. डोंगर कुठून आले, पाऊस वरून खाली असाच का पडतो, झाड जमिनीतच का उगवतं, सूर्य का आहे. अशा प्रश्नांच्या माऱ्याला वैतागलेले पालक शिक्षक मुलांना गप्प बसायला फर्मावतात आणि त्यांचं कुतूहल मारून टाकलं जातं. त्याबरोबरच या प्रश्नांमधूनच उद्याचे, शास्त्रज्ञ, संशोधक निर्माण होण्याच्या शक्यताही आपण संपवून टाकत असतो. पण तसं होऊ नये, मुलांच्या या कुतूहलाला, त्यांच्या प्रश्नांना वाव मिळावा, काहीतरी शोधण्याच्या त्यांच्या ऊर्मी जाग्या राहाव्यात यासाठी भारतीय विद्या भवनचं पुण्यामध्ये असलेलं मुक्तांगण एक्सप्लोरेटरी सायन्स सेंटर काम करतं. या सेंटरची स्थापना झाली तीस वर्षांपूर्वी. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. जी. भिडे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या कल्पनेतून ते उभं राहिलं. प्रयोगांमधून, प्रत्यक्ष अनुभवातून मुलांनी विज्ञान शिकणं हा त्यामागचा हेतू होता. गेल्या पंचवीस वर्षांत त्याचा विस्तार वाढला आहे. पुण्यात गोखले रोड परिसरात आज संस्थेची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत सात वेगवेगळय़ा प्रयोगशाळा आहेत. वेगवेगळय़ा शाळांमधील पाचवी ते दहावीमधील मुलं इथे येतात. त्यांच्यासाठी जून ते मार्च या कालावधीसाठीचा कार्यक्रम निश्चित केलेला असतो. खूपशा शाळांमध्ये प्रयोगशाळा नसतात. या शाळा मुलांना इथे पाठवतात किंवा विज्ञानाची आवड असलेली मुलं वैयक्तिक पातळीवरही इथे येतात. प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करतात.

विज्ञान-तंत्रज्ञान विशेष
समाजाने नाकारले.. ..ते विज्ञानाने दिले!
‘नाही मुकुंद, हरकत नाही मला त्रास झाला तर, मी करीन सहन. मला आई व्हायचं आहे.’
रेशमा-मुकुंदच्या लग्नाला पाच र्वष झाली तरी पाळणा हलेना. या एकविसाव्या शतकातही घरच्यांच्या काही अधीर, काही काटेरी नजरा रेश्माला बोचायला लागल्या. म्हणून त्यांनी डॉक्टरी तपासणी करून घेतली. मुकुंदच्या शुक्राणूंत थोडा दोष होता. त्यांना कश हे गर्भधारणेचं तंत्र वापरायचा सल्ला मिळाला. पण त्यातही तीन-चार वेळा अपयश आलं. खर्चापरी खर्च, मानसिक ताण, पोटातल्या कळा आणि उपचारांतल्या हॉर्मोन्समुळे होणारी चिडचिड आणि रडारड यांनी रेश्मा रंजीस आली होती. मुकुंदला तिचे हाल बघवत नव्हते. पण तरीही ‘आई होण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी रेशमा ते सगळं सहन करायला तयार होती. त्या सगळ्या दिव्यातून गेल्यावर अलीकडेच तिला जुळं झालं- एक मुलगा आणि एक मुलगी. एक प्रथितयश वकील असलेल्या रेश्माला सध्या कोर्टाची आठवणही येत नाही; बाळं थोडी मोठी होईपर्यंत ती त्यांच्यातच गुंतून राहणार आहे. रेश्मा सध्या फक्त आई आहे. ते भाग्य तिला केवळ विज्ञानाने, नव्या तंत्रज्ञानाने मिळवून दिलं आहे. दोष मुकुंदमध्ये असूनही वंध्यत्वाचा शिक्का जुन्या काळात रेश्माच्याच कपाळी बसला असता. समाजाने तिचं जिणं कानकोंडं करून टाकलं असतं.
निसर्गाने मातृत्वाची जबाबदारी स्त्रीवर सोपवली; तिने ती स्वीकारली आणि ती कामगिरी तिच्या आयुष्याचं मुख्य कर्तव्य झाली. स्त्री-जन्माचीच नव्हे, तर समस्त स्त्री-जातीची सारी कहाणी त्या एका कर्तव्याभोवती गुंफली गेली; गुंतत गेली.
लाख-दीड लाख वर्षांपूर्वी कंदमुळं-फळं गोळा करणाऱ्या भटक्या मानवाच्या कळपांत गरोदर बाईला, बाळंतिणीला अधिक संरक्षणाची गरज असे. पुरुषाकडून ते संरक्षण लाभलं. त्या बदल्यात तिने त्याला गृहसौख्य द्यावं असा अलिखित करार झाला. स्त्री पुरुषाची आज्ञाधारक दासी बनली. पुढल्या काही वणवणत्या सहस्रकांत ती वृत्ती तिच्या अंगी बाणली; तिचा स्थायी स्वभाव बनली.

विज्ञान-तंत्रज्ञान विशेष
ते आणि आपण - फरक मनोवृत्तीतला!
युरोप खंडामध्ये ऑस्ट्रिया नावाचा देश आहे. उत्तरेला जर्मनी व चेक प्रजासत्ताक, पूर्वेला स्लोवाकिया आणि हंगेरी, दक्षिणेला स्लोवेनिया व पश्चिमेला स्वित्र्झलड या देशांनी वेढलेला ऑस्ट्रिया हा लहान म्हणता येईल असाच देश आहे. शेजारी असलेल्या जर्मनी देशाची जर्मन ही मातृभाषा या देशाने राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली आहे. व्हिएन्ना या ऑस्ट्रियाच्या राजधानीच्या शहराची लोकसंख्या १७ लाख एवढी आहे. मोठय़ा शहराची जशी भरमसाट वाढ जगात इतरत्र पाहायला मिळते तशी या शहराची मात्र झालेली नाही. या लोकसंख्येव्यतिरिक्त अजून ७ लाख लोक या शहराच्या आजूबाजूच्या परिसरात राहत आहेत. म्हणजेच ऑस्ट्रियाची २५ टक्के जनता या शहरात व त्याच्या परिसरात राहते असे म्हणावयास हरकत नाही. मुंबईची लोकसंख्या या देशाच्या लोकसंख्येपेक्षा सव्वा पटीने अधिक आहे! २०१२ साली केलेल्या एका पाहणीत एकूण १४० शहरांमध्ये व्हिएन्ना शहराचा राहण्यासाठी योग्य म्हणून जागतिक क्रमवारीत दुसरा नंबर आला होता. पहिला नंबर ऑस्ट्रेलियामधील मेलबोर्न या शहराचा आला होता. कार्यालयातून जेव्हा अधिकृत बठकीसाठी व्हिएन्नाला जाता का अशी विचारणा करण्यात आली तेव्हा या माहितीच्या पाश्र्वभूमीवर लगेच हो म्हणून टाकले. व्हिएन्ना शहरात असे काय आहे म्हणून त्याचा जागतिक स्तरावर दुसरा नंबर यावा हे पाहण्याची अनावर उत्सुकता मनात होती, एरवी कंटाळवाणा वाटणारा विमान प्रवासदेखील तेवढा तसा वाटला नाही म्हणूनच ही जमेची बाजू बोनस मिळाली.

भविष्य