२२ फेब्रुवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी
दखल

कव्हरस्टोरी
बजेट नव्हे, मतांचा जोगवा!
आर्थिक सुधारणांशी बांधीलकी
गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्त होणार...

प्रासंगिक
...इथे ओशाळतील शिवराय!
ऑस्कर २०१३ : इतिहास, भविष्य आणि प्रेम!
अंधारातल्या उजळ वाटा

कला

वेध
क्रीडा
विज्ञान तंत्रज्ञान
आरोग्यम्
भंकसगिरी
कविता
स्टार रेसिपी
खाणे आणि खिलवणे...
पुस्तक परीक्षण
शब्दरंग
एकपानी
लग्नाची वेगळी गोष्ट
दैव जाणिले कुणी?
पोलीस ठाण्यात शुभमंगल
पाठलाग
माझं शेतघर
संख्याशास्त्र
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी
बजेट नव्हे, मतांचा जोगवा!
ऐन २००८ च्या अखेरीस आलेल्या आर्थिक मंदीनंतर महत्त्वाच्या खात्यापासून दुरावलेले चिदम्बरम देशाची तिजोरी नेमकी रिकामी असताना अर्थमंत्री म्हणून परतले. व्यवहार हाती घेताच आर्थिक सुधारणांचे पर्व त्यांनी सुरू केले. प्रणब मुखर्जी यांनी किचकट केलेल्या अनेक वादग्रस्त विषयांना लांबणीवर टाकण्याचे संकेत देऊन त्यांनी तमाम उद्योग क्षेत्राच्या आशा पल्लवित केल्या आहेतच. त्यांच्या हास्याची लकेर अर्थसंकल्प-२०१३ वरही दिसेल, असे चित्र विविध उद्योगांतून समोर येत आहे. स्वत:ला गुंतवणूकमंत्री म्हणवून घेणारे पी. चिदम्बरम यंदा कोणत्या उद्योग क्षेत्राला पोषक वातावरणाच्या पारडय़ात टाकतात, ते पाहायचे आहे. पायाभूत सेवा क्षेत्रासाठी पंतप्रधानांचीच री ओढणारे अर्थमंत्री देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालण्यासाठी भांडवली बाजार, वित्त-विमा, बांधकाम आणि त्याच्याशी निगडित विविध उद्योगांना हात घालतील.

कव्हरस्टोरी
आर्थिक सुधारणांशी बांधीलकी
‘पठ्ठा आहे चाणाक्ष मद्रासी (दक्षिण भारतीय), पण पक्का धोरणी गुज्जू (गुजराथी- आकडेमोड आणि काटकसरीत पटाईत) आणि व्यवहाराने मात्र पंज्जू (पंजाबी, मोठय़ा दिलाचा!)’ मुंबईतील दलाल स्ट्रीटवरच्या वर्दळीत देशाच्या प्रादेशिक विविधतेत एकात्म भाव साधणारे हे पुरुषाचे वर्णन आता पुरते रुळलेले दिसून येते. अगदी पार १९९७ साली त्यांनी सादर केलेल्या स्वप्नवत अशा (‘ड्रीम बजेट’ असेच विशेषण त्याला वापरले गेले होते) अर्थ अंदाजपत्रकापासून ही ख्याती त्यांनी आजवर कायम जपली आहे. दलाल स्ट्रीटवरच्या या वर्दळीला समजेल, उमजेल आणि रुचेल असे अर्थकारण मांडणारे देशाचे अर्थमंत्री पलिनिअप्पन चिदम्बरम म्हणूनच फेब्रुवारीअखेरीस आपल्या अर्थसंकल्पाच्या पोतडीतून काय बाहेर काढतील यापेक्षा शेअर बाजाराच्या निर्देशांकाचा पारा आणखी किती चढेल या चर्चेलाच स्वाभाविक महत्त्व प्राप्त झालेले दिसते.


कव्हरस्टोरी
गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्त होणार...
आपल्याकडे अर्थसंकल्पाने नेमका किती आणि कोणाला फरक पडतो ते अजूनही नक्की माहिती नसले तरीही नेहमीप्रमाणेच यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. अर्थसंकल्पाचा माहोल साधारण नवीन कॅलेंडर वर्षांपासून सुरू होऊ लागतो. २०१३-१४ चा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे सर्वश्रुत आहे. तरीदेखील याची मुख्य कारणे पाहून घेऊ या:
(१) वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि चलनवाढ;
(२) वाढती वित्तीय तूट;
(३) जागतिक मंदी आणि घसरलेली निर्यात;
(४) रुपयाचे अवमूल्यन;
(५) घसरणारा अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर
२०१४-१५ मधील सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष ठेवून वरील सर्व समस्यांवर उपाय करणारा अर्थसंकल्प मांडणे किती कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी.
गेल्याच आठवडय़ात केंद्रीय सांख्यिकी संघटनेने चालू आíथक वर्षांचा वाढीचा दर दशकातील सर्वात कमी म्हणजे ५% जाहीर केल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने नवीन वर्षांतला नीचांक गाठला.

वेध
बालगुन्हेगारीचे आव्हान
‘बालकांचे हक्क’ हा शब्दप्रयोग पहिल्यांदा ऐकला की मोठे विचित्र वाटते. अजाण, अज्ञानी आणि परावलंबी मुलांना हक्क ते कसले? आई-वडिलांच्या सावलीत वाढायचे आणि आई-वडील ठेवतील तसे राहायचे हेच त्यांचे आयुष्य. त्यांना कसले आले आहेत हक्क? यांना ते कसे समजणार आणि कसे बजावता येणार? पण सुशिक्षित आणि सुसंस्कृत आई-बापांच्या छायेत वाढणाऱ्या मुलांच्या हक्कांबाबत फारसा निराळा विचार करावा लागत नाही, कारण त्यांना संरक्षण आणि विकासाची संधी आपोआप मिळते; परंतु सगळेच तेवढे नशीबवान नसतात. दररोज जगातील हजारो मुले कुपोषण आणि रोगराईने मरतात. काही कोटी मुलांना शाळेचा लाभ घेता येत नाही. लक्षावधी मुले त्यांच्या वयाला व ताकदीला न झेपणाऱ्या कामाखाली पिचतात व अनेक आपत्तींना तोंड देतात.

चित्रकथी
दृश्य जिज्ञासापूर्ती!
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी म्हणजे अगदीच नेमके बोलायचे तर १३ जानेवारी १८८८ रोजी भटकंतीमध्ये रस असलेले विद्वान, संशोधक आणि त्यांच्याच बरोबर आजूबाजूच्या निसर्गचक्रातून माणसाने शिकावे, जिज्ञासापूर्ती करावी, अशी धारणा असलेली काही श्रीमंत मंडळी वॉशिंग्टन डीसीमधील एका खासगी क्लबमध्ये एकत्र आली आणि त्यातूनच एक जिज्ञासापूर्तीची ‘विचार करा, पुन्हा एकदा’ असे जगाला सांगणारी चळवळ उभी राहिली. या चळवळीला आज आपण ‘नॅशनल जिओग्राफिक’ (एनजी) या नावे ओळखतो. पिवळ्या रंगाची एक चौकट ही त्यांची दृश्यओळख. म्हणजेच आज जगभरात कुठेही गेलात तरी पिवळी चौकट पाहिली की, थेट नॅशनल जिओग्राफिकचीच आठवण येते, एवढी ती पिवळी चौकट आता जगभरातील मनांमध्ये रुजली आहे. दृश्यात्मकतेच्या प्रभावी वापराचे हे एक चांगले परिणामकारक उदाहरण आहे. दृश्यात्मकतेच्या प्रभावी वापराचे हे एक चांगले परिणामकारक उदाहरण आहे.

भविष्य