१५ फेब्रुवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी

पर्यटन विशेष
स्मार्ट भटकंती
भटक्यांचं घर
देखणं स्पेन
मी आणि माझा ट्रॅव्हल शो
डोळे मिटण्यापूर्वी हे पहाच!
सांधण गॉर्ज : राकट निसर्गशिल्प...
नळदुर्ग : रोमँटिक पाणीमहाल!
चौल परिसर : नाते अरबस्तानाशी..स्पेन
जुन्नर परिसर : दुर्लक्षित वारसा!
घाटघर परिसर : महाराष्ट्राचं चेरापुंजी
निळ्या नभाची दक्षिणभूमी
बुडापेस्ट
लडाखमधील राफ्टिंग

स्त्री-मिती

द्या टाळी..

कविता
शून्य प्रहर
संख्याशास्त्र
रेषाटन
वाचक प्रतिसाद
संपर्क
मागील अंक

पर्यटन विशेष (कव्हर स्टोरी)
डोळे मिटण्यापूर्वी हे पहाच!
काय पाहायचं, कुठे भटकायचं, वेगळं काय असे प्रश्न अनेकदा पडतात. मग आपण त्याच त्याच वर्षांनुवर्षे ऐकत आलेल्या नावांपैकी कोणत्या तरी एका नावावर शिक्कामोर्तब करतो आणि मोकळे होतो, पण ‘लोकप्रभा’ आता या ‘पर्यटन विशेषांका’च्या निमित्ताने तुम्हाला देत आहे, राज्यातीलच पाच स्थळांची अशी यादी की, त्या ठिकाणांना भेट दिल्याशिवाय माणसाने अखेरचे डोळे मिटूच नयेत!
महाराष्ट्राला स्वत:चा असा वेगळा भूगोल आणि इतिहासही आहे. हा इतिहास पार इसवी सनापूर्वीच्या कालखंडापर्यंत जातो.. त्या वेळेस इथे भारतातील सर्वात मोठे आणि समृद्ध बंदर होते.. त्याचा उल्लेख पार अगदी ह्य़ू एन त्संगच्या नोंदीमध्येही सापडतो. चौलच्या बंदराच्या त्या खाणाखुणा आणि समृद्ध इतिहास आजही आपल्याला इथे घर आणि वाडय़ांमधून फिरताना डोकावताना दिसतो.

पर्यटन विशेष
स्मार्ट भटकंती
गुगल मॅप्स
विचार करा तुम्ही ग्रामीण भागात कुठेतरी जात आहात. एखाद्या ठिकाणी तीन-चार वाटा फुटल्या आहेत. रात्रीची वेळ. पुढचा रस्ता विचारणार तरी कोणाला, असा प्रश्न पडला आहे. अशा वेळेस आपल्याला हमखास मदत करणारा आपला मित्र आपल्या मोबाइलवरच आपल्याला उपलब्ध असेल तर? गुगल मॅप्स हे अ‍ॅप्लिकेशन म्हणजेच अ‍ॅप्स आपल्याला अशा वेळी योग्य दिशा दाखविण्याचे काम करते. आपले निघण्याचे ठिकाण आणि गंतव्य स्थान याची माहिती या अ‍ॅप्सवर टाकून आपण आपला प्रवासाचा मार्ग निश्चित करू शकतो. शंका आली तर या अ‍ॅप्सची मदत घेऊन आपण आपला प्रवास बिनचूक करू शकतो. जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय असे ट्रॅव्हल अ‍ॅप्स म्हणून गुगल मॅप्स ओळखले जाते. जगातल्या बहुतांश मोबाइल प्रणालीवर हे अ‍ॅप्स वापरता येते. नकाशावर आपले स्वत:चे ठिकाण शोधणे, इच्छित स्थळ शोधणे, त्या स्थळापर्यंत जाण्याचा मार्ग कसा आहे ते पाहणे, अंतर किती आहे, वाटेत कोठे कोठे सुविधा काय आहेत, अशा प्रकारची अनेक कामे हे अ‍ॅप्स करू शकते. मुख्य म्हणजे हे अ‍ॅप्स हाताळण्यास अगदीच सोपे आहे, कदाचित म्हणूनच ते सर्वात जास्त लोकप्रिय झाले आहे. गुगलवरून तुम्ही हे अ‍ॅप्स सहज डाउनलोड करून घेऊ शकता. हे अ‍ॅप्स मोफत उपलब्ध आहे. ते वापरताना मात्र तुमचा फोन इंटरनेटशी जोडलेला असावा लागतो.

पर्यटन विशेष
भटक्यांचं घर
युथ होस्टेलची संकल्पना सन १९०९ मध्ये जर्मनीच्या रिचर्ड शिरमन या शिक्षकाला सुचली. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण मिळावं, ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी व त्यातून विद्यार्थ्यांचं विश्व अनुभवानं समृद्ध व्हावं असं त्यांना वाटे. त्यासाठी कमीत कमी खर्चात राहण्याची सोय असायला हवी असं त्यांना वाटत होतं. त्यांनी आपली संकल्पना इतर समविचारी लोकांना सांगितली. या विचार मंथनातून युथ होस्टेलची संकल्पना आकार घेऊ लागली व त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू झाले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १९१२ मध्ये जर्मनीमध्ये पहिले युथ होस्टेल सुरू झाले. हळूहळू ही संकल्पना संपूर्ण जर्मनीमध्ये पसरली व त्यानंतर युरोपभर तिला प्रतिसाद मिळाला. युरोपातून युथ होस्टेलची संकल्पना जगभरात पोहोचली. परिणामी १९३२ मध्ये युथ होस्टेलची पहिली जागतिक परिषद आयोजित करण्यात आली. तेव्हापासून युथ होस्टेल ही संकल्पना आंतराष्ट्रीय स्वरूपात कार्यरत आहे.
मुळात विद्यार्थ्यांकरिता सुरू झालेली युथ होस्टेलची संकल्पना आता सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी खुली झालेली आहे. सध्या लंडन येथील कार्यालयातून आंतरराष्ट्रीय युथ होस्टेलचा कारभार पाहिला जातो. आज जगभरातील ८५ देश या संघटनेचे सदस्य आहेत. जगभरात ४५०० पेक्षा जास्त युथ होस्टेल तयार झालेली आहेत.


पर्यटन विशेष
देखणं स्पेन
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातून स्पेन बघितला तेव्हाच मी ठरवलं होतं, हनिमूनला जायचं तर स्पेनलाच. तिथले ते लँडस्केप्स, तिथलं ते पर्यटकांचं स्वागत करणारं वातावरण मला खुणावत होतं. त्यामुळे लग्न झाल्यावर हनिमूनला आम्ही इतर कुठेही नाही, तर स्पेनलाच पोहोचलो. तिथे गेल्यावर कोणत्याही शहरात राहण्यापेक्षा एखाद्या टुमदार गावातच राहायचं असं आम्ही ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही बार्सलिोनाजवळचं सिटगेज नावाचं समुद्रकिनाऱ्यावर असलेलं गाव निवडलं. तिथं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात एकूणच स्पेनमध्ये पर्यटकांची फारशी गर्दी नसते. पर्यटकांचा ऑफ सीझनच असतो हा. त्यामुळे एक तर हॉटेिलग वगरे चांगलंच स्वस्तात पडलं आणि दुसरं म्हणजे गर्दी अजिबातच नव्हती. त्यामुळे निवांत रस्त्यांवरून मस्त भटकता आलं. ला राम्बालास हा तिथला परिसर म्हणजे पर्यटकांना शॉिपगसाठीचं नंदनवनच. शिवाय या परिसरात बरीच भारतीय उपाहारगृहे आहेत. तुम्हाला भारतीय पद्धतीचं जेवण हवं असेल तर ते इथं मिळू शकतं.

पर्यटन विशेष
मी आणि माझा ट्रॅव्हल शो
स्टुडिओत बसून दुनियाभरच्या लोकांशी बोलायचं हेच माझं काम आहे, पण प्रत्यक्षात मला फिरायला फार आवडतं. त्यामुळेच ‘इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया’ या फॉक्स हिस्ट्री चॅनलच्या ट्रॅव्हल शोसाठी मला विचारलं गेलं तेव्हा मला फार आनंद झाला. कारण या शोची संकल्पनाच फार छान होती. आपला देश हा वेगवेगळय़ा घडामोडी सतत घडत असलेला देश आहे. त्यामुळे देशात वेगवेगळय़ा ठिकाणी फिरून ठिकठिकाणच्या अद्भुत गोष्टी, प्रथा, परंपरा, कला, वेगळी माणसं या सगळय़ाचा शोध घ्यायचा होता. एक तर या ट्रॅव्हल शोसाठी लोकांमध्ये जायचं होतं. माझं लोकांशी एक वेगळंच नातं आहे. मी लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामधलीच एक होऊन त्यांच्याशी बोलू शकते. शिवाय शोच अत्रंगी आहे तर तो सादर करणारी व्यक्तीही अत्रंगीच असायला हवी असं त्यांना वाटत होतं म्हणून फॉक्स हिस्ट्रीने माझी निवड केली असावी.

 

भविष्य