८ फेब्रुवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ : तहात हरणारा देश!
चित्रकथी : समकालीन स्पंदने!
कव्हर स्टोरी
प्रवाह : संघात घडलं तरी काय?

सुवर्णमहोत्सव : वाटचाल फ्रीमेसनरीची

स्वागत : प्रेमाची गोष्ट
क्रीडा : नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का
आरोग्यम् : खासगी रु ग्णालयांना कायद्याची वेसण
यूथ : जिद्दीला सलाम!
विज्ञान तंत्रज्ञान : बायोसेन्सची संवेदना
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : म्हणे गुलाबी थंडी!
कवितेचं पान
सेकंड इनिंग : नीज न ये तर..

एकपानी : काय फायदा?

शब्दरंग : सत्त्वशीला सामंत
सिनेमा : तिरपागडी प्रेमकथा!
लग्नाची वेगळी गोष्ट : फॅमिली मेंबर
लग्नाची वेगळी गोष्ट : ‘लग्नगाठ’
वाईल्डक्लिक : गुजरातनो सृष्टिवैभव
पाठलाग : ‘सिनेमा स्टाइल’ उकल
माझं शेतघर : कुटुंबाचे अर्थनियोजन
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हर स्टोरी
तरुण तुर्क, घराणेशाहीचा अर्क
आपण सारे घराणेशाहीविरुद्ध तावातावाने बोलत असतो.
‘‘पण घराणेशाहीत गर काय? पंतप्रधानाचा मुलगा वा मुलगी पंतप्रधान बनली; पक्षाध्यक्षांचा मुलगा त्याच्या कारकीर्दीनंतर पक्षाध्यक्ष बनला तर त्यात काय गर आहे?’’ असा प्रश्न विचारणारेही लोक भेटतात. त्यांच्या मते, राजकीय क्षेत्रात उच्च्पदावर असलेली व्यक्ती आपली जन्मदाता किंवा जवळची नातलग असणं हा काही त्या मुलाचा गुन्हा नाही. उच्चपदावरल्या व्यक्तीशी जवळचं नातं आहे एवढय़ा कारणावरून एखादा नागरिक, त्या पदाबद्दलची अभिलाषा बाळगण्याला किंवा त्या पदावर नियुक्त व्हायला अपात्र कसा काय ठरतो? घराणेशाहीचं समर्थन करणारे नेहमीच अशा प्रकारचा युक्तिवाद करत असतात. वरकरणी या समर्थकांचं म्हणणं एकदम पटून जातं. पण थोडा विचार केला की त्यातली खोच लक्षात येते. आपले जन्मदाते किंवा जवळचे नातलग राजकारणात विशिष्ट पदावर असल्यानं एखादी व्यक्ती त्या पदाला अपात्र ठरत नाही हे खरं पण केवळ त्या कारणामुळे ती त्या पदासाठी पात्र ठरवली जात असेल तर? तर तेही बरोबर नाही. पद प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या पात्रतेचे निकष वेगळे आहेत. घराणेशाहीतून पुढं आलेल्या राजकीय व्यक्तींना हे निकष लावले तर त्या पदाला ते पात्र ठरतात काय? हा खरा प्रश्न आहे. घराणेशाहीत गर काय हो, असं साळसूदपणे विचारणारे या मुद्दय़ाला सोयीस्करपणे बगल देतात. किंबहुना या प्रश्नाला सामोरे जायची तयारी या वकिलांपकी कोणीही दाखवत नाही.

कव्हर स्टोरी
तारे सारे परप्रकाशी..
राजकारणाच्या क्षितिजावर अनेक ताऱ्यांचा उदयास्त होत असतो. काही तारे दीर्घकाळ प्रकाशत राहतात, तर काही अंधारात गडप होऊन जातात. काहींच्या व्यक्तिमत्त्वात उद्याचे नेतृत्व फुलत असते, तर काहींच्या नेतृत्वाची उमेदच अकाली कोमेजून जाते. महाराष्ट्रदेखील या वास्तवापासून दूर नाही. गेल्या काही वर्षांपासून देशात आणि महाराष्ट्रातही, एकपक्षीय सत्ताकारणाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आघाडीची सरकारे हा सत्ताकारणाचा पाया होऊ लागला आहे. साहजिकच, सत्तेतील सहभागाच्या संधींचा पायादेखील विस्तारू पाहात आहे. सत्तासंपादनासाठी हातमिळवणी करण्याची संधी सहज मिळू लागल्याने, एखादा लहानसा राजकीय पक्षदेखील सत्ताधीश होऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांच्या सत्ता-आकांक्षांना धुमारे फुटू लागले आणि सत्तेची नेमकी गणिते मांडत अनेकांना सत्तास्थानापर्यंत पोहोचणेही साध्य होऊ लागले. सत्तासंपादनाच्या संधींना अशा नव्या वाटा मिळू लागल्याने प्रस्थापित नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि अपेक्षाही वाढू लागल्या. त्यातूनच, घराणेशाहीच्या प्रयत्नांनाही जोर आला. आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात असे ‘उद्याचे तारे’ उदयाला येऊ लागले आहेत. त्यांचे नेतृत्व फुलविण्याचा, जोपासण्याचा आणि जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्नही पद्धतशीरपणे सुरू आहे. पण या ताऱ्यांमधील अनेकजण अजूनही ‘परप्रकाशी’च आहेत. ‘स्वयंप्रकाशी’ नेतृत्व उभे राहण्याची प्रतीक्षा जनतेलाही असते. असे नेतृत्व आढळले, तर जनता त्याचा स्वीकारही करते. सध्या प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या नेत्यांमध्ये असे ‘स्वयंप्रकाशित्व’ अभावानेच आढळत असल्याने, उद्याचा महाराष्ट्र खांद्यावर पेलण्याची क्षमता या नवनेतृत्वाकडे आहे की नाही, याचा लेखाजोखा वेळोवेळी मांडला गेलाच पाहिजे. केवळ वारसा हक्काने अंगावर चढलेली नवनेतृत्वाची झूल जनतेला भुलवू शकणार नाही. अनेक नेत्यांना याचे भानच आलेले नसते. आपला राजकीय वारसदार निर्माण करणे एवढय़ा एकाच ध्यासापोटी अनेक नेते झपाटलेले दिसतात.


प्रवाह
संघात घडलं तरी काय?
नितीन गडकरींना नागपुरातून उचलून भाजपच्या अध्यक्षपदी बसवून रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी इतक्या वर्षीचे अनेक संकेत, पायंडे उडवून तर लावलेच, पण नवा पायंडा घालून दिला यात शंकाच नाही. त्या जागी कुणाला बसवले हा थोडासा दुय्यम विषय आहे. माझ्या मते तरी मोहन भागवत यांनी एक चांगले दणकेबाज काम केले. केले ते केले वर दिल्लीत तर त्यांनी तळ ठोकला, कुणाला किती मनवले, किती सुनावले, कुणावर डोळे वटारले हे एक मोहन भागवतच जाणे!
याबाबत थोडी पूर्वपीठिका सांगायला हरकत नाही. जनसंघ स्थापन झाल्यावरसुद्धा गोळवलकर गुरुजींना त्या कामात फारसा रस नव्हता, ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली’ अशा शब्दांत त्यांनी त्या कामाची विल्हेवाट लावली. तरीदेखील दीनदयाळ उपाध्यायांना पाठवून, स्वत: दूरच राहून, तेवढी काळजी घेतली होती. बाळासाहेब देवरसांनी एकदा(च) सरकार्यवाह असताना जनसंघाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सरळ बठकच घेतली. साल १९६५/६६. पण पुन्हा असे काही गुरुजींनी होऊ दिले नाही. १९५१ ते १९७३ जून. सगळे दूर दूर. नाही म्हणायला दीनदयाळ आणि सुंदरसिंग भंडारी येऊन प्रतिनिधी सभेत व खासगीत वृत्त सांगत. गुरुजींनी थेट फक्त एकदाच अटलबिहारींना फटकारले होते, तेही खासगीत! तेही जनसंघविषयी नव्हे, तर इंदिराजींच्या ‘आप की तो वाणी सुंदर है (आपसे विवाद में कैसे जीते)’ अशा अर्थाच्या विधानाला अटलजींनी जे उत्तर दिले त्याबद्दल! अटलजी म्हणाले, ‘मेरी तो वाणी सुंदर ही, लेकिन आप तो स्वयं सुंदर हो!’ (आजच्या मीडियात काय कहर माजला असता विचार करा!)

सिनेमा
तिरपागडी प्रेमकथा!
गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऑस्करच्या सवरेत्कृष्ट चित्रपट गटातील नामांकनांची संख्या वाढल्यामुळे दावेदारांच्या संख्येत अधिक चित्रपटांची भर पडत आहे. अर्थात या संख्यात्मक भरणीमुळे मुद्रा उमटवणाऱ्या चित्रपटाला कसलाही धक्का पोहोचत नाही. (‘किंग स्पीच’ किंवा ‘द आर्टिस्ट’ हे दोन्ही गतविजेत्यांच्या काळात इतर नावे महिन्याआधीपासून केवळ सोहळेदाखल उरली होती.) प्रेक्षक मात्र बडय़ा-बडय़ा दिग्दर्शक, कलाकारांचे नाव लागलेल्या आणि तुल्यबळ भासणाऱ्या चित्रपटामुळे ऑस्कर निकालाबाबत अंतिम क्षणापर्यंत संभ्रमात राहतात. जर सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकन गटामध्ये पाचापेक्षा अधिक चित्रपट नसते, तर यंदा कोणत्या चित्रपटांना बाहेर राहावे लागले असते, याच्या माझ्या यादीमध्ये पहिला क्रमांक ‘सिल्व्हर लायनिंग प्लेबुक’ या चित्रपटाचा लागला असता. याचा अर्थ इतर चित्रपटांपेक्षा तो कमकुवत नाही. उलट तो ऑस्करच्या इतर गटांमधील सर्वात तगडा स्पर्धक आहे आणि बऱ्याच वर्षांत न झालेली अभिनयाच्या चारही गटांसह दिग्दर्शनामध्येही नामांकन मिळविण्याची किमया त्याने करून दाखविली आहे. यापूर्वी २००४ चा ऑस्कर सोहळा झळाळून काढणाऱ्या ‘मिलियन डॉलर बेबी’ या चित्रपटाने हे केले होते. त्यामुळे नामांकनात जरी पाचच सिनेमे असते, तरी सवरेत्कृष्ट चित्रपटाखेरीज इतर गटांतील त्याची हजेरी नक्कीच चुकली नसती.

वाईल्डक्लिक
गुजरातनो सृष्टिवैभव
अनेकांना फिरायला जायचं म्हणजे ठिकठिकाणची मंदिरं आणि काही पुरातत्त्व स्थळांना भेटी द्यायच्या असतात. तर काहीजणांना शहराच्या कल्लोळातून निसर्गाच्या सान्निध्यात जायचं असतं आणि फोटोग्राफी करायची असते. त्याच अनुषंगाने हे नवं सदर. त्यात आपण वाइल्ड लाइफ फोटोग्राफीच्या दृष्टीने गुजरातमधील वेगळ्या फोटोग्राफीला वाव असणाऱ्या जागा आणि हटके गोष्टींचा परिचय करून घेणार आहोत. आता त्यासाठी गुजरातच का, असा प्रश्न पडू शकतो. एक तर गुजरात हे आपलं शेजारी राज्य. ते इतक्या जवळ आहे की आपण खूप सहजपणे गुजरातला फिरायला जाऊ शकतो. पण तिथे काय काय बघायचं हेच खूपदा माहीत नसतं. म्हणून आपण गुजरातपासून सुरूवात करूया.
नळसरोवर - स्थलांतरित पक्षी
भौगोलिकदृष्टय़ा मध्य गुजरात आणि पूर्व सौराष्ट्रच्या मध्ये मोडणारा नळसरोवर हा थोडासा सखल भाग आहे. त्याच्या या भौगोलिक स्थानामुळे असं मानलं जातं की ईशान्येकडील लिटिल रण आणि दक्षिणेकडील खंबातच्या मधला समुद्री भाग जोडण्याचं काम हा परिसर करतो. या तलावात ३६० बेटं आहेत. यातील बरीच बेटं जेव्हा पाण्याची पातळी कमी असते तेव्हा अधिक स्पष्ट दिसतात. या तलावामध्ये पावसाळ्यात सुरेंद्रनगर आणि अहमदाबाद जिल्हय़ाच्या आजूबाजूच्या परिसरातून पाणी येते. या ताज्या पाण्यामुळे तलावातील पाण्याचा खारट आणि मचूळपणा कमी होतो.

भविष्य