१ फेब्रुवारी २०१३
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
मोबाइल टॉवर्स चलनी नाणं की कॅन्सरचा विळखा?
वाद : अर्थकारणामुळेच सरकारला या क्षेत्राबद्दल सॉफ्ट कॉर्नर - गिरीश कुमार, प्रोफेसर, आयआयटी, मुंबई
प्रतिवाद : सरकारनेच या प्रश्नाचा अभ्यास करावा - राजन मॅथ्यू, डायरेक्टर जनरल, सेल टॉवर ऑपरेटर्स असोसिएशन

लोकसंस्कृती

स्मरण

प्रासंगिक
सिनेमा
एक पुरस्कार द्या मज आणुनी...
टेरेन्टीनोचा जंगो ‘अडकलेला’!
माणसांच्या जंगलात
स्त्री-मिती
उपचार
दशकपूर्ती
युथ
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी...
कवितेचं पान
थरार
एकपानी
शब्दरंग
लग्नाची वेगळी गोष्ट
मध्यस्थ
कविताचं लग्न...
माझं घर
संख्याशास्त्र
ट्रॅव्हलोग्राफी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

आवळेजावळे वर्ण-२
सत्त्वशीला सामंत

( ‘ड-र’, ‘ड-ल’, ‘र-ल’)

‘य-ज’प्रमाणे ‘ड-र’ आणि ‘ड-ल’ याही जोडय़ा अशाच आहेत. देशी स्थलनामांची इंग्रजी स्पेलिंग्ज करताना, ‘ध’चा ‘मा’ करावा त्याप्रमाणे इंग्रजांनी ‘ड’ चा ‘र’ केला असावा, असा एकेकाळी माझा समज होता. पण हिंदी शब्दकोशांशी अधिकाधिक परिचय झाल्यावर माझा हा गैरसमज दूर झाला. हिंदूीमध्ये ‘खपडम/ रा’, ‘हावडम/रा’, ‘झाडम्खंड/ झारखंड’
‘खड्गपुर खडम्गपुर/ खरगपूर’, ‘उडिम्सा/ ओरिसा’, ‘(नक्शल)बाडम्ी/री’,
‘हुडम्दंगा/ हुरदंगा’, ‘चोपडम/ रा’, ‘पडम्ती/ परती (जम्मीन),
‘पडम्छत्ती/ परछत्ती’ ही प्रवृत्ति स्वाभाविक दिसते.
‘पाहन पूजै तो हरि मिले तो मैं पूजूँ पहार (डम्)’ असं संत कबीर म्हणतात.
मराठी-हिंदी यांची तुलना केली, तरी असं लक्षात येईल, की मराठीतला ‘ड’ अनेकदा हिंदीत ‘र’ मध्यें परिवर्तित होतो. उदा. ‘पडम्दा-पर्दा’, ‘पडकोट/परकोट (म). परकोटा,’ ‘पडछाया- परछाईं’, इ.
याउलट क्वचित् का होईना ‘र’ कडून ‘ड’ कडे प्रवास झालेला दिसतो. अक्षरवर्णमालेला ‘बाराखडी/ बारहखडम्ी’ ही संज्ञा प्रचलित असली तरी मूळची ती ‘बाराक्षरी/ बाराखरी’ आहे. फारसीला ‘बरतरफ़’ मराठीत ‘बडतर्फ’ झाला, तर पाहुण्याची ‘बरदास्त’ ठेवण्याऐवजी मराठी लोक त्याची ‘बडदास्त’ ठेवूं लागले. ‘र’चा सखा ‘ल’ वर्ण हा मित्राचा मित्र तो आपलाहि मित्र या न्यायाने ‘ड’शींहि सख्य जोडतो. त्यामुळे ‘ड’ आणि ‘ल’ यांचीही मैत्री होते. संस्कृत भाषेत आपणांस याचा पडताळा मिळतो. संस्कृतमध्ये नारळाला ‘नाडिकेर’ असा एक प्रतिशब्द असून तो ‘नालिकेर’ म्हणून रूपांतरित होतो. (पुढें वर्णविपर्यय होऊन त्याचाच ‘नारिकेल’ होतो हा भाग वेगळा!) त्याचप्रमाणें ‘गरुड/ल’, ‘गुड/ल (गूळ)’, ‘गुडिका/ गुलिका (गोळी)’ अशीही द्विविधा आहे.
सर्वसाधारणपणे ‘रलयो: अभेद:’ असे म्हणतात. लहान मुलं बोबडं बोलताना ‘र’ऐवजी सुरुवातीला ‘ल’ असाच उच्चार करतात (रडतो ऐवजी ‘ललतो.’) हिंदीमध्ये ‘बहराना/बहलाना’, ‘परकार/ल’, ‘बादर/ल (‘गिरिपर आए बादर देखत मोर’- सूरदास) अशा कांही शब्दांत हा प्रकार दिसतो. संस्कृतमध्यें तर याची विपुल उदाहरणं आहेत. ‘मुकुर-ल’, ‘रोध्र-ल’, ‘रोम/लोम’, ‘(अ) श्रीर-ल’, ‘नारिकेर/ नालिकेर/ नारिकेल/, ‘रेखा/ लेखा’, ‘रोहित/ लोहित’, ‘मार्जार-ल’, ‘वातर-ल’ इत्यादि.
बहिणाबाई चौधरी आपल्या अहिराणी बोलीतील ‘जयरामबुवाचा मान’ या कवितेत म्हणतात, ‘.. जाऊ आता सम्दे जनं
लोडगे (रोडगे) खायाले..’

एका कवितेत त्यांनी ‘रडतां’ ऐवजी ‘लळतां’ हा शब्द वापरला आहे. फारसीमध्यें घरसामान म्हणजे ‘काचार-ल’, तर लॅटिनमधील purpura वा purpure शब्दापासून purple हा शब्द उद्भवला आहे.
दिवसा समुद्राकडून जमिनीकडे खारा वारा वाहतो, तर रात्री जमिनीकडून समुद्राकडे मतलई वारा वाहतो. तसाच कांहीसा प्रकार याहि बाबतीत होतो. कांही शब्दांचा प्रवास ‘ल’कडून ‘र’ कडे होतो. संस्कृतमधला ‘लांगल’ हा शब्द प्राकृतमध्यें ‘नांगल’ होऊन पुढें मराठीत ‘नांगर’ बनतो. संस्कृतमध्यें ‘लांगूल’ म्हणजे शेपूट वा शेपटी. ‘लांगूलचालन’ म्हणजे शेपटीचा गोंडा घोळवणे हें आपल्याला माहीत आहेच. लांब शेपटीच्या वानराला ‘लांगूली’ असा शब्द आहे.
(गायीप्रमाणे गोंडेदार शेपटी असलेल्या वानराला ‘गोलांगूल’ असं म्हणतात.) हा संस्कृत शब्द इंग्रजीने उचलला आणि तशा वानराचं नामकरण केलं- langur. इंग्रजीमध्येंहि celebrum या लॅटिन शब्दापासून इंग्रजी cerebrum व्युत्पन्न झाला. याउलट, लहान मेंदू या अवयवाला cerebellum असा प्रतिशब्द आहे.
पण तरीहि ‘र’ आणि ‘ल’ हे एकमेकांचे डमी आहेत असं म्हणता येत नाही. कारण संस्कृतमध्यें ‘रभस’ म्हणजे जोर, वेग, आवेश, तर ‘लभस’ म्हणजे द्रव्य वा याचक; ‘रव’ म्हणजे आवाज, शब्द, तर ‘लव’ म्हणजे कापणी वा लेश; मराठीत ‘कार’ म्हणजे ‘काल’ नव्हे. इंग्रजीत root आणि loot या दोहोंचे अर्थ वेगवेगळे आहेत. हिंदीत ‘रखना’ आणि ‘लखना (देखना)’ यांत फरक आहे. फारसीत ‘रंग-लंग’, ‘रंज-लंज’ याहि जोडय़ा एकार्थक नाहीत. सारांश, ‘र’चा रंग वेगळा नि ‘ल’ची लज्जत आगळी!
response.lokprabha@expressindia.com