१ फेब्रुवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
मोबाइल टॉवर्स चलनी नाणं की कॅन्सरचा विळखा?
वाद : अर्थकारणामुळेच सरकारला या क्षेत्राबद्दल सॉफ्ट कॉर्नर - गिरीश कुमार, प्रोफेसर, आयआयटी, मुंबई
प्रतिवाद : सरकारनेच या प्रश्नाचा अभ्यास करावा - राजन मॅथ्यू, डायरेक्टर जनरल, सेल टॉवर ऑपरेटर्स असोसिएशन

लोकसंस्कृती

स्मरण

प्रासंगिक
सिनेमा
एक पुरस्कार द्या मज आणुनी...
टेरेन्टीनोचा जंगो ‘अडकलेला’!
माणसांच्या जंगलात
स्त्री-मिती
उपचार
दशकपूर्ती
युथ
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी...
कवितेचं पान
थरार
एकपानी
शब्दरंग
लग्नाची वेगळी गोष्ट
मध्यस्थ
कविताचं लग्न...
माझं घर
संख्याशास्त्र
ट्रॅव्हलोग्राफी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी
मोबाइल टॉवर्स चलनी नाणं की कॅन्सरचा विळखा?
साधारण दहापंधरा वर्षांपूर्वीचा काळ असेल. गृहनिर्माण सोसायटीच्या मीटिंगमध्ये इमारतीवर मोबाइल टॉवर उभा करण्याचा प्रस्ताव कोणी तरी हमखास आणायचे. टॉवरच्या भाडय़ापोटी मिळणारे तीनचार लाख रु पये, विनाव्यत्यय मिळणारी रेंज अशी सगळी जमेची बाजू ठामपणे मांडली जायची. कोणी तरी इमारतीच्या बांधकामावर येणारे वजन धोकादायक होईल, असा एखादा प्रश्न उपस्थित करायचे, तरीही प्रस्ताव मंजूर व्हायचा, पण कोणीही आरोग्यावर परिणाम होईल का, अशी शंका मांडायचे नाही. त्याचे कारणदेखील तसेच होते. मोबाइल टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ लहरी आपल्या शरीरावर परिणाम करतात का याबाबत त्या काळी सर्वसामान्यांना फारसे काही माहीतच नसायचे. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये गळेकापू स्पर्धा सुरू झाली. परदेशी कंपन्यांना भारताची भली मोठी बाजारपेठ खुणावू लागली. ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याची चढाओढ सुरू झाली. आकर्षक योजना, मोफत इनकमिंग कॉल, फुकट मेसेज सव्‍‌र्हिस असे जाळे टाकले जाऊ लागले. त्याचबरोबर आपल्या सेवेची रेंज सर्वदूर असली पाहिजे यासाठी चढाओढ सुरू झाली आणि मोबाइल टॉवरचे जाळे पाहता पाहता फोफावू लागले. गल्लीबोळात, डोंगरदऱ्यात सर्वत्र मोबाइल टॉवर दिसू लागले. मोबाइल टॉवरचे जणू काही पेवच फुटले होते. एखाद्या ठिकाणी मोबाइलला रेंज मिळत नाही हे त्या जागेचे वैगुण्य ठरू लागले. इतके सगळे होत असतानाच अनेक प्रश्नदेखील उभे राहात होते.

कव्हरस्टोरी
वाद : अर्थकारणामुळेच सरकारला या क्षेत्राबद्दल सॉफ्ट कॉर्नर - गिरीश कुमार, प्रोफेसर, आयआयटी, मुंबई
आतापर्यंत मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो का, याविषयी गेली काही वर्षे चर्चा सुरू आहे. मोबाइल टॉवरमुळे कोणालाच काहीही मोठा आजार अथवा कॅन्सर झाल्याची ठोस नोंद नाही, त्यामुळे मोबाइल टॉवरमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत नाहीत, अशी भूमिका असणाऱ्या सर्वच घटकांना माझे थेट आव्हान आहे, त्यांनी स्वत: फक्त १० दिवस अशा मोबाइल टॉवरसमोर उभे राहून दाखवावे. त्यांच्या आरोग्याला काही त्रास झाला नाही तर मी आयुष्यात या विषयावर बोलणे बंद करेन. हे माझे थेट आव्हान आहे. मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो, याची ठोस उदाहरणे नाहीत, असे टॉवरच्या बाजूने असणाऱ्यांचे म्हणणे आहे, पण आपल्याकडे त्या संदर्भातील काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. ज्यांच्या घरासमोर मोबाइल टॉवर आहे अशा काही लोकांनी, कॅन्सरमुळे आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत, अनेक ठिकाणी टॉवरसमोर राहणाऱ्या लोकांच्या मागे विविध आजार लागले आहेत. मोबाइल टॉवरच्या परिसरात राहणाऱ्या माणसांच्याच नव्हे तर परिसरात असणाऱ्या कोणत्याही सजीव घटकांवर टॉवरमधून होणाऱ्या रेडिएशनचा दुष्परिणाम होऊ शकतो. तेव्हा आपल्याला वेळीच पावले उचलून मोबाइल टॉवर परिसरातील पॉवर डेन्सिटी किमान ०.०००१ वॅट पर स्क्वेअर मीटर इतकी कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील तीन वर्षांत या रेडिएशनचे अनेक गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तेव्हा वेळ निघून गेली असेल.


कव्हरस्टोरी
प्रतिवाद : सरकारनेच या प्रश्नाचा अभ्यास करावा - राजन मॅथ्यू, डायरेक्टर जनरल, सेल टॉवर ऑपरेटर्स असोसिएशनदिल्ली बलात्कारानंतरची
मोबाइल टॉवरमधून होणाऱ्या रेडिएशनचे मानवी शरीरावर नेमके काय परिणाम होतात या संदर्भात सरकारने तज्ज्ञांची समिती नेमावी. आपल्या देशासाठी रेडिएशनची मर्यादा काय असावी हे ठरवावे. आम्ही ते मान्य करू. सध्या डीओटीने (Department of Telecommunication) जी मर्यादा आखून दिली आहे ती आंतरराष्ट्रीय मानांकापेक्षा १/१० ने कमी आहे, आम्ही त्याप्रमाणे काम करत आहोत, किंबहुना आमचे ९०% टॉवर आधीपासूनच ही मर्यादा पाळत आहेत. इतर देशांच्या तुलेनेत आपण सुरक्षेचे उपाय खूपच कडक केले आहेत. कमी रेडिएशनसाठी ऑस्ट्रियाचे उदाहरण दिले जाते, पण तिथेदेखील एखाद्याच शहरात ही मर्यादा कमी आहे, मग आमच्याविरुद्ध उगाच आगपाखड करण्यात काहीच अर्थ नाही. गिरीश कुमार हे आयआयटीतील प्रोफेसर आहेत, ते बुद्धिमान आहेत.

लोकसंस्कृती
दरडवाडीचे भारूड
एकूणच तुमच्या-माझ्या सांस्कृतिक जीवनाच्या संक्रमणाचा हा काळ. पदार्थातील भेसळ काहींना जिवे मारते पण सांस्कृतिक भेसळ उभा देश असंस्कृत करू शकते. काय पाहायचं, ही नतिक जबाबदारी प्रेक्षागारातील समूह विसरला, त्यामुळे या समूहाला रिझवत ठेवण्यासाठी प्रसंगी वाट्टेल ते दय़ायचं हे ठरवायला रंगमंचावरील समूह मोकळा झाला. याचाच परिणाम म्हणून रंगमंचीय थिल्लरपणाचं उदात्तीकरण व्हायला लागलं. तद्नंतर उथळपणा बाजारभावात बोली लावून विकला जाऊ लागला. देशातल्या ऐंशी टक्के लोकांची सांस्कृतिकता व त्यांचे जीवन-मरणाचे प्रश्न दडवून मूठभरांच्या जीवनाच्या थोतांड झगमगाटाने सांस्कृतिक विश्व झळाळून निघण्याचा हा काळ.
माणसाचा इतिहास सांगतो की, प्रत्येक कालखंडात सर्वच क्षेत्रांत अशा उथळापणाशी मूलभूत विचारांनी दोन हात केले आहेत. सांस्कृतिक जीवनात तर या संघर्षांला प्राचीन पाश्र्वभूमी आहे. संस्कृतीशिवाय माणसे जगू शकत नाहीत. पण संस्कृतीप्रमाणे ती वागूही शकत नाहीत, ही वर्तमान युगातील समस्या. मग महानगरामधून संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली लोकपरंपरांचे ‘इव्हेन्ट’ सुरू होतात. या झगमगाटाखाली पसरलेला मोठा अंधार काहींच्या नजरेत, तो त्यांना अस्वस्थ करतो आणि मग पेटते एक मिणमिणणारी ज्योत. ‘राष्ट्रीय भारूड महोत्सव, दरडवाडी’ हे या ज्योतीचं नांव.

ट्रॅव्हलोग्राफी
लडाखचा हिवाळा
गेल्या सतरा वर्षांंत मी केलेल्या लडाखवाऱ्यांची आता शतकाकडे वाटचाल सुरू आहे तरीदेखील एक छायाचित्रकार म्हणून लडाख मला अजूनही खुणावत असतो. एवढय़ा वेळा लडाखला गेल्यावरही लडाख माझ्या मनात घर करून बसला आहे. खऱ्या फोटोग्राफरला लडाखचा अख्खा प्रांत म्हणजे फोटोसाठी पर्वणीच आहे. लडाखला कितीही वेळा जा तिथला नित्य बदलत असणारा निसर्ग छायाचित्रकारासाठी नवनवीन संधी सतत देतच आला आहे. लडाखचा उन्हाळा मी अनेक वेळा अनुभवला पण तिथला हिवाळा मला अनुभवायचा होता. २००६ च्या हिवाळ्यात मला ती संधी मिळाली आणि नंतर मी सातत्याने लडाखला हिवाळ्यातही जातच राहिलो.
आपल्याला माहीतच आहे की काळ हा कधीच थांबत नाही, पण काळही थांबलेला पाहायचा असेल तर हिवाळ्याच्या दिवसात लेह लडाखला गेलं पाहिजे. अतिशय विरळ लोकवस्ती असलेल्या या प्रदेशातील जनजीवन त्या काळात ठप्प झालेलं असतं. पण त्याच वेळी निसर्गाचे विभ्रम टिपण्यासाठी खऱ्या भटक्याने या काळात लडाखला गेलंच पाहिजे. उन्हाळ्यातलं रूप पालटलेला लडाख प्रांत टिपण्यासाठी जायचं म्हणजे तयारी ही तशीच करावी लागते. उणे वीस ते उणे तीस तापमानात लागणारे कपडे घेऊन जसे आपण तिथे जातो, जी काळजी स्वत:साठी घेतो तशीच काळजी कॅमेरा आणि त्याच्या इतर उपकरणांसाठीही घ्यावी लागते. दूपर्यंत दिसणारा हा प्रांत फोटोत बंदिस्त करायचा असेल तर येथे एसएलआर कॅमेऱ्याला पर्याय नाही.

भविष्य