२५ जानेवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ : देशप्रेमाची बोलाचीच कढी
चित्रकथी : कचऱ्याचे एव्हरेस्ट
कव्हरस्टोरी : अैसे कैसे झाले भोंदू?
भंकसगिरी : एक इतिहास संशोधन
(भाग दोन)

चर्चा : स्त्रियांच्या असुरक्षिततेला पुरुषांची लैंगिकता जबाबदार आहे का?

वाचन : वाचनसंस्कृती आणि ललित
प्रासंगिक : ..जखमांची उजळणी ६५ वर्षांची!
उपक्रम : पक्षिमित्रांची मांदियाळी..
आरोग्यम् : तुमची आमची दंतकथा
विज्ञान तंत्रज्ञान : खरंच अशनी येणार?
सेकंड इनिंग : निरोगी उतारवयासाठी..
चटक-मटक
चटक-मटक : ओरिएंटल स्पेशल रेसिपीज!
युवा : रेणूची सायकल यात्रा

क्रीडा : भारतीय हॉकीला संजीवनी मिळेल?

पुस्तक : अभ्यासकांसाठी आदर्श
कवितेचं पान
एकपानी : काटेरी हलवा
शब्दरंग : आवळेजावळे वर्ण
सिनेमा :तब्बूचं काय चाललंय?
लग्नाची वेगळी गोष्ट : लग्नासी जाता..विघ्ने येती नाना..
लग्नाची वेगळी गोष्ट : चारचौघींसारखी वेगळी!
पाठलाग : केवळ एका फायलीवरून..
माझं शेतघर : डोळस व्यवहार
संख्याशास्त्र : भाग्यांक
पर्यटन : स्वर्गातून जमिनीवर
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चित्रकथी
कचऱ्याचे एव्हरेस्ट
सरगमाथा, सागरमाथा अर्थात एव्हरेस्ट म्हणजे जगातील सर्वोच्च शिखर. तिथे पोहोचणे म्हणजे आयुष्यात आपण काही तरी अतिमहत्त्वपूर्ण बाब केल्याचे समाधान. एव्हरेस्ट सर करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मेहनत, जिद्द, चिकाटी यांचा अपूर्व मिलाफच; पण हे सारे करताना आपले लक्ष हे केवळ वैयक्तिक विक्रमाकडे असते आणि पर्यावरणाचे तर आपल्याला काहीच पडलेले नसते. म्हणूनच तर एव्हरेस्टवर आपल्याला आता कचऱ्याचा ढीग नव्हे, खरे सांगायचे तर कचऱ्याचाही एव्हरेस्ट पाहायला मिळतो. कचऱ्याचाही एव्हरेस्ट म्हणण्याचे कारण म्हणजे हा कचरा टनावारी असतो. केवळ २०११ या एका वर्षांत एव्हरेस्टवरून गोळा केलेला कचरा हा तब्बल आठ हजार १०० किलो भरला होता; तर २०१२ सालच्या केवळ पहिल्या तीन महिन्यांमध्ये गोळा केलेला कचरा हा एक हजार ९५७ किलो होता. एव्हरेस्ट हे नेपाळचे आकर्षण तर आहेच आणि त्याच्यामुळे मिळणारा महसूलही मोठा आहे, याचे भान नेपाळींना आहे. त्यामुळेच त्याचे संरक्षण आणि संवर्धन याकडेही लक्ष द्यायला हवे, याची जाणीव काही वर्षांपूर्वी झाली आणि त्यानंतर एव्हरेस्टवर असलेला हा सर्व कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली.कृपा राणा साही या साऱ्या घटनाक्रमाकडे पाहत होती आणि दर खेपेस ती अस्वस्थ व्हायची. कृपा ‘दा माइंड ट्री’ नावाची एक संस्था चालवते. प्रसंगी इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारीही ही संस्था घेते आणि ते काम पार पाडते. याच संस्थेचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आर्ट क्लब नेपाळ. नेपाळमधील अनेक उद्यमी कलावंत या आर्ट क्लबचे सभासद आहेत.

कव्हरस्टोरी :
अैसे कैसे झाले भोंदू?

दिल्लीतील बलात्कार पीडित तरुणीच्या मृत्यूने सारा देश व्यथित झाला. संताप उसळला. पुन्हा असे घडू नये यासाठी अनेक उपाय सर्व समाजघटकांतून व स्तरांतून पुढे आले. मग कथित आध्यात्मिक गुरू तरी मागे कसे राहणार? आसारामबापू व अनिरुद्धबापू या दोघांनी सुचवलेले उपाय सर्वत्र गाजले. आसारामबापूंच्या मते घरी सरस्वती स्तोत्र म्हणून जर ती तरुणी बाहेर पडली असती, तर तिच्यावर बलात्कार होऊच शकला नसता. अत्याचार करणाऱ्यांपैकी काही जणांना तुम्ही माझे भाऊ आहात, मला वाचवा, अशी मनधरणी तिने करावयास हवी होती. अनिरुद्धबापूंचे म्हणणे असे की, जर स्त्रीने ‘अनिरुद्ध चालीसा’ रोज १०८ वेळा असे अकरा दिवस म्हटले तर बलात्काराचा प्रयत्न करणारी व्यक्ती आपोआप नपुंसक होईल व तसे सर्वाना कळेल. मुळात ‘अनिरुद्ध गुरुक्षेत्र’ मंत्राचा जप केला तर बलात्कार होऊच शकणार नाही. शिवाय त्यांच्या चंडिका गटाच्या व अहिल्या संघाच्या महिलांना ते असे टेक्निक शिकवणार आहेत की, बलात्कार करणाऱ्याला त्या नपुंसक करतील. आसारामबापूंनी याही पुढे जाऊन एका हाताने टाळी वाजत नाही, असेही तारे तोडले. याबाबत टीका करणाऱ्या माध्यमांना त्यांनी भुंकणाऱ्या कुत्र्याची उपमा दिली. प्रश्न या कथित आध्यात्मिक गुरूंच्या बरळण्याचा नाही, तर आज अशा स्वयंघोषित बाबा, बापू, स्वामी, भगवान, महाराज यांची जी साम्राज्ये उभी राहिली आहेत आणि त्यांना लक्षावधीचा अनुयायी वर्ग लाभत आहे, त्या सामाजिक मानसिकतेच्या व व्यवस्थेचा शोध घेण्याचा आहे. विशेषत: साडेतीनशे वर्षांपूर्वी तुकाराम महाराज म्हणाले,


वाचन
वाचनसंस्कृती आणि ललित
१९८० आणि त्या सालाच्या आगेमागे जन्मलेली पिढी वाढत्या वयासोबत तंत्रज्ञान प्रगतीच्या प्रत्येक क्रांतिकारी बदलाची साक्षीदार बनली. या पिढीच्या कोवळ्या मनावर साहित्यिक प्रभावक्षेत्राचा परिणाम घडू शकला नाही; कारण संगणक, टीव्ही चॅनल्स, एमटीव्ही, वृत्त माध्यम, एमटीव्ही, मोबाइल, इंटरनेट आदी कैक क्रांतिघटक मराठी साहित्य वाचन या पर्यायापासून या पिढीला लांब ठेवण्यात सक्रिय राहिले. ही पिढी आता तिशी-बत्तीशीत असून तिचे आटलेल्या स्वरूपात दिसणारे वाचन ग्रंथधुरिणांना वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचे चित्र रंगविण्यात मदत करणारे ठरले आहे. साहित्यिक आणि लेखक यांतील समानार्थाबद्दल अनभिज्ञ असलेल्या या पिढीतील निम्म्याहून अधिक आज ग्रंथकेंद्रापासून लांब राहण्यात धन्यता मानत असले तरी त्यांच्या अ-वाचक अवस्थेबाबत सर्वस्वी त्यांना अथवा त्यांच्या भवतालामध्ये होत असलेल्या घटकांना जबाबदार धरता येणार नाही.
वाचन संस्कृती मराठीच वाचल्याने समृद्ध होते, इंग्रजी वाचणारे वाचन संस्कृतीचा भाग नसल्याचे आपल्याकडे अलीकडे बरेचसे मानले जाते. त्यामुळे मराठीतील अर्धीअधिक पिढी सुजाण, चोखंदळच काय, तर सामान्य वाचकही बनू शकली नाही, हे मान्य केले, तरी या पिढीला वाचनवर्तुळ अथवा प्रभावी वाचनसंस्कृती प्रदान करण्यात विद्यमान साहित्यविश्वच तोकडे पडले आहे. नव्या पिढीच्या वाचकांना आकर्षति करण्यासाठी किती उत्तम मासिके या काळात सज्ज झाली, वाचनवेड अथवा पुस्तक भारावलेपण देणारी किती ग्रंथनिर्मिती या काळात झाली, याकडे पाहिल्यास आपल्या साहित्यिक गरिबीची कल्पना येईल.

प्रासंगिक :
..जखमांची उजळणी ६५ वर्षांची!
एक उजळणी. कटू, अप्रिय, पण अपरिहार्य.
मंगळ. ८ जाने. २०१३ रोजी पूँछ सेक्टरच्या कृष्णा व्हॅलीत घडलेली घटना ऐकली. टीव्ही चॅनल्सवर त्यावरच्या चर्चा ऐकल्या आणि मनात सुरू झाली उजळणी, गेल्या ६५ वर्षांची. कारण मंगळवारी घडलेली घटना अपवाद नव्हती. या घटनेची जोरदार प्रतिक्रिया एवढय़ासाठीच उमटली की सध्या सगळीकडे, खासकरून दिल्लीत होत आहेत उद्रेक, अस्वस्थ मनांचे. कारण घटनाच अशा घडत आहेत की, एरवी सरळमार्गी, सामान्य, कोणाच्या अध्यात ना मध्यात असणाऱ्या माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. तरीही काही काळानं आम्ही हे सारं विसरतो आणि विसरतो म्हणूनच परत परत या घटना घडत राहतात. गेली ६५ वर्षे हेच घडत आहे. खरं तर ८ जानेवारीसारखी घटना जेव्हा घडते तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली पाहिजे. तो प्रत्येकाला स्वत:चा अपमान, स्वत:ची हत्या आहे असं वाटलं पाहिजे, कारण सीमेवर युनिफॉर्ममधला तैनात सैनिक प्रतिनिधित्व करत असतो भारतमातेचं, प्रत्येक भारतीयाचं. म्हणूनच तर त्याच्या सर्वोच्च बलिदानानंतर त्याला लपेटलं जातं तिरंग्यात. सर्वाचा प्यारा तिरंगा, आकाशात सदैव डौलत राहणारा. त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी कित्येकांनी लाठय़ा झेलल्या, प्राण दिले तो तिरंगा शहिदासाठी खाली झुकतो. जणू त्याला सांगतो की, आम्ही सारे भारतीय तुझ्या सर्वोच्च बलिदानासमोर नतमस्तक झालो आहोत आणि त्याच वेळी या प्रेमाने भारावलेला तरी कर्तव्याचा विसर न पडलेला शहीद उत्तर देतो,

पर्यटन
स्वर्गातून जमिनीवर
नामचे बझार येथे दोन रात्री मुक्काम केल्यावर आमचा ट्रेक पुढे सुरू झाला. नामचे बझार येथून श्यांगबोचे (३७६०मी.) एव्हरेस्ट बेस कँप, गोकीओ री, थामे, वगैरे ठिकाणी जाण्यासाठी वाटा आहेत. आम्ही एव्हरेस्ट बेस कँपची वाट धरली. नामचे येथून थोडय़ा उंचीवर असलेल्या वू पॉइंटवरून एव्हरेस्टसह इतर हिमालयन शिखरांचे दर्शन होते. मध्यभागी काळाकभिन्न खुंबेला, नेपाळी लोकांचा पवित्र डोंगर खडा पहारा देत असल्यासारखा उभा आहे. ह्य डोंगरावर चढाईला सक्त मनाई आहे. डावीकडे काँगदे, थामे तर मागून तावूचे डोकावतो, बाजूलाच नुप्से रिज, ल्होत्से आणि धीरगंभीर एव्हरेस्ट. निळ्या आकाशाच्या पाश्र्वभूमीवर कधीमधी विरळ ढगात लपलेला एव्हरेस्टचा शेंडा पाहून मला दडपण आल्यासारखे झाले. पण बाजूलाच असलेला अमाडाबलम् पाहून ह्य गोंडस शिखराला शहेनशाही तख्त म्हणावे की बाळाला कवेत घेण्यासाठी हात पसरून उभी राहिलेली प्रेमळ माऊली म्हणून जरा संभ्रमात पडले. मी आतापर्यंत तीनवेळा अमाडाबलमचे दर्शन घेतले आहे, पण प्रत्येक वेळा तो मला अधिकच आवडत गेला.
वू पॉइंटवरून दिसणाऱ्या मोंगडाडा किंवा तेंगबुचेपर्यंत जाताना चांगलाच दम निघतो. पण लव्हली अमाडाबालम आपल्याला कंपनी देत असतोच. डोंगराच्या कडेकडेने उन्हातून जाताना आपल्याला कणकणल्यासारखे होतेच. पण मध्येमध्ये थांबून अमाडाबलम, एव्हरेस्टचे फोटो व सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत चालल्यास तेव्हढे श्रम जाणवत नाहीत.

भविष्य