१८ जानेवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी

कव्हरस्टोरी
‘कामकोंडी’तील यक्षप्रश्न
गोष्ट धास्तावलेल्या पालकांची दिल्ली बलात्कारानंतरची
गोष्ट धास्तावलेल्या शिक्षकांची दिल्ली बलात्कारानंतरची

क्रीडा

प्रेरणा

प्रासंगिक
उपचार
महिला
आरोग्यम्
चटक-मटक
शेफ निलेश लिमये
शेफ सुधीर पै
युवा
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी
कवितेचं पान
एकपानी
शब्दरंग
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
।। ही तो श्रींची इच्छा।।
जोडीदार
पुस्तक
माझं शेतघर
संख्याशास्त्र
पर्यटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी
‘कामकोंडी’तील यक्षप्रश्न
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुलीच्या बाबतीत जे काही घडले त्याची कल्पना करता येत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. तरीही त्या बीभत्स घटनेने सारा देश हादरला आहे हे नाकारता येत नाही. यापूर्वीही पाशवी प्रवृत्तीने केलेले बलात्कार आपण वर्तमानपत्रात वाचले आहेत, टीव्हीवरील बातम्यांमधून पाहिले आहे, पण या घटनेने मात्र अनेक प्रश्नांना गंभीरतेने वाचा फोडली आहे हे खरे. आपली विद्यार्थीदशेतली मुलगी, वयाने लहान असलेली मुलगी, लैंगिकदृष्टय़ा सुरक्षित नाही, याची खंत आपल्या मनाला आहे. तिला यातून वाचवायला हवे ही जाणीव पालकांना व शिक्षकांना सर्वाना आहे, पण मग हे करायचे कसे, समजवायचे कसे. त्या दुर्दैवी घटनेनंतर भावूक झालेल्या सर्वानी विविध प्रकारांनी या घटनेचा निषेध केला, अनेक चर्चा घडल्या, अनेक मोर्चेबांधणी झाली, मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे झाले. युवापिढी या घटनेमुळे पूर्णपणे चिडून गेली होती. बलात्कार पीडित मुलीसाठी निषेध करताना, न्याय मागताना प्रत्येक नागरिक आक्रंदत होता, बऱ्याच शाळांतील मुला-मुलींनीही या सगळ्या कृतीसत्रांत भाग घेतला खरा, पण अनेक प्रश्नांबद्दल त्यांच्या मनात शंका होती. अनेक शंकांचे निरसन थोरामोठय़ांना करता येत नव्हते, एक मेंटल ब्लॉक प्रत्येकाच्या मनात होता.

कव्हरस्टोरी
गोष्ट धास्तावलेल्या पालकांची दिल्ली बलात्कारानंतरची
पप्पा, बलात्कार म्हणजे काय ?

‘पप्पा, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला म्हणजे नेमकं काय केले आणि त्यामुळे देश बंद करायची भाषा का केली जाते..’ इयत्ता सहावीत शिकणाऱ्या माझ्या मुलीने विचारलेल्या या प्रश्नाने मी पुरता हादरलो. स्त्रियांवर होणारे अत्याचार म्हणजे नेमकं काय हे बारा वर्षांच्या मुलीला कसे समजावून सांगावे हे क्षणभर सुचलेच नाही. बलात्कार किंवा महिलांवरील अत्याचाराविषयी तिच्याशी मी स्पष्टपणे बोलू शकलो नाही. पण एकटय़ा मुलीला किंवा महिलेला गाठून टारगटांनी तिला अकारण त्रास देणे, त्या मुलीला किंवा महिलेला गंभीर जखम होईल असे वागणे म्हणजे अत्याचार किंवा बलात्कार होय, अशा पद्धतीने मी तिचे समाधान केले.
माध्यमांमधून लैंगिक शिक्षणासंदर्भात काही विशिष्ट पद्धतीने प्रचार व प्रसार सुरू असला तरी ते कार्यक्रम माझ्या चिमुरडीने पाहावेत, अशी माझीही इच्छा नसते. बलात्कार किंवा अत्याचाराबाबत जेव्हा आपल्या अल्पवयीन पाल्याकडून शंका विचारली जाते तेव्हा मात्र लैिगक शिक्षणाच्या अशा कार्यक्रमांचे महत्त्व पटते. उच्च मध्यमवर्गीयांच्या घरात एखाद्या वेळी अशा विषयावर मुक्तपणे मुलांशी चर्चा होत असेल, परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरात या प्रश्नावर मुलांशी बोलणेही शक्य नसते, हे वास्तव आहे.


कव्हरस्टोरी
गोष्ट धास्तावलेल्या शिक्षकांची दिल्ली बलात्कारानंतरची
शिक्षक समुपदेशकही हवा
दिल्लीत घडलेली घटना अंगावर येणारीच होती, पण या प्रकारच्या घटनांपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही. उलट या घटनेसंबंधात लोकांनी वर्तमानपत्रांतून लिहिलेली पत्रे आम्ही मुलांना वाचायला लावली. त्यानंतर आमच्या शिक्षकांनी मुलांशी खूप चर्चा केली आणि घटनेवर आधारित एक लेख लिहायला सांगितला. मुलांना आलेला राग, संताप, चीड त्यांनी लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त केली. त्यातून या प्रकारच्या घटनांकडे पाहताना मुले किती संवेदनशील असता याची जाणीव आम्हाला झाली. मुलांच्या मनात बरेच काही खदखदत असते. पालक जागरूक असले तर ठीक, पण जेथे अशिक्षित पालकांचा प्रश्न असतो तिथे ही जबाबदारी सर्वार्थाने शाळेला पेलावी लागते. साधारणपणे चौथीपर्यंत मुले शिक्षकांशी जोडलेली असतात. पाचवीपासून ती दूर जायला सुरुवात होते. ही दरी वेळीच भरून निघाली नाही तर ती पुढे पुढे न जुमानणारी होतात. मुलांच्या हातून जेव्हा आततायी कृत्य घडते तेव्हा त्यामागे मोठी पाश्र्वभूमी असते. त्यांच्या मानसिक दुखण्याचे, आजाराचे निदान वेळीच झाले नाही की मग गोष्टी पराकोटीला जातात.

सिनेमा
मटरू, बिजली आणि मंडोला
बॉलीवूडचे ‘हॅपी न्यू इयर’ यंदा पहिल्या शुक्रवारी एकदम तीन चित्रपटांनी झाले. ‘राजधानी एक्स्प्रेस’, ‘देहराडून डायरी’ आणि ‘टेबल नंबर ट्वेन्टीवन’ हे तीन चित्रपट नवीन वर्षांतील पहिल्या शुक्रवारी प्रदर्शित झाले. परंतु या तिन्ही चित्रपटांमध्ये मोठी स्टारकास्ट नव्हती. त्यामुळे खऱ्या अर्थाने बॉलीवूडतर्फे प्रेक्षकांना ‘हॅपी न्यू इयर’ केले जाणार आहे तो चित्रपट आहे ‘मटरू की बिजली का मंडोला’. आज शुक्रवार ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट नावाप्रमाणेच वेगळा आहे असे म्हणायला हरकत नाही.
गेल्या वर्षांत या चित्रपटाचे प्रोमो आणि फर्स्ट लूक दिसायला लागला झाला तेव्हापासून इंग्रजीत शीर्षक प्रकाशित झाल्यामुळे मटरू नव्हे तर ‘मातृ’ असा उच्चार केला जात होता. त्यामुळे नेमके या चित्रपटात काय पाहायला मिळणार याविषयी कुतूहल निर्माण झाले होते. चित्रपटाचे ट्रेलर आणि टीव्ही प्रोमोज् झळकल्यानंतरच ‘मातृ’ नव्हे ‘मटरू’ आहे याचा उलगडा झाला.

पर्यटन
तिसरा ध्रुव...
एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखराला स्थानिक नेपाळी भाषेत सगरमाथा असे म्हटले जाते. त्याचा अर्थ आहे स्वर्गाचा माथा. पूर्वी यालाच सरगमाथा असे म्हटले जायचे. कालौघात त्याचेच सगरमाथा झाले. काही स्थानिक त्याला सागरमाथा असे देखील म्हणतात. लाखो वर्षांपूर्वी हिमालय पर्वत अस्तित्वातच नव्हता. भू-गर्भात सतत हालचाली चालूच असतात. त्यामुळे भूकंप होणे, सुनामी, भू-स्खलन, खंड विभक्त होणे अथवा जवळ येणे हे चालूच असते. त्याप्रमाणेच हजारों, लाखो वर्षांपूर्वी भू-गर्भातील इंडियन प्लेट व युरेशिअन प्लेट यामध्ये रेटारेटी होऊन जो भाग उचलला गेला तो वर्तमानातील हिमालय व तिबेटचे पठार. एवढेच होऊन हालचाल थांबली नाही तर दरवर्षी हिमालया, बरोबर एव्हरेस्टही पाच मि.मी.ने उंचावतोच आहे. आपल्या सह्यद्री, अरवली, विंध्य ह्य पर्वतांच्या तुलनेत हिमालय हा सर्वात तरुण पर्वत गणला जातो.

भविष्य