११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संख्याशास्त्र

उल्हास गुप्ते
संख्याशास्त्राचा अभ्यास करताना अशा कितीतरी गोष्टी सापडल्या, की त्यातून मानसिक बदल घडून खूपशा आशादायक घटना जवळ येऊ लागल्या. खूपशा यशस्वी माणसांच्या जन्मतारखेची आणि नावाची स्पंदने एक गूढ सकारात्मक संवाद साधताना आढळली आणि हा स्पंदनाचा अभ्यास तर एक प्रकाशमय स्वच्छ पाऊलवाट दिसू लागली. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखांचा अभ्यास करताना संख्याशास्त्र विषयाकडे थोडेसे थांबावेसे वाटले, कारण ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखांच्या अभ्यासात उपाय आणि तेही ठोस सापडले नाहीत; पण संख्याशास्त्राच्या अभ्यासात जन्मतारीख आणि त्या व्यक्तीचं नाव यांच्यात सकारात्मक स्पंदने खूप काही चांगले काम करतात, की त्यातून होणाऱ्या उन्नतीचे मोजमाप आपण शब्दात करू शकणार नाही.
अनेक लहान-मोठय़ा व्यक्तींच्या जन्मतारखांचा अभ्यास करताना असं आढळून आलं, की जन्मतारीख आणि नावाची स्पंदने जर एकमेकाशी सकारात्मक संवाद साधत असतील तर भावी आयुष्याचा प्रवास सुखदायक होतो. पण ती अक्षरं जुळत नसतील तर नावात लहानसा बदल करणे हितकारक ठरते. नाव बदलल्यावर काही चांगले अनुभव आले असे सांगणारेही भेटतात, पण नाव बदलताना या शास्त्राबाबत योग्य ती काळजी घेऊन नाव बदलणे हिताचे ठरते, नाही तर ते कधी कधी त्रासदायक होऊ शकते. संख्याशास्त्राचे गाढे अभ्यासक मॉन्ट्रय़ूज म्हणतात,‘हे शास्त्र पणतीत तेवत असलेल्या वातीसारखे आहे. गवताने शाकारलेल्या सुंदर घरात याचा वापर प्रकाशासाठी करताना हा दिवा योग्य ठिकाणी सुरक्षित जागी ठेवावा, अन्यथा गवताला आग लागून घर भस्मसात होईल.’ सांगण्याचा मुद्दा हा, की जीवनात या शास्त्राचा वापर करताना तो काळजीपूर्वक करावा.
ज्या काळाचा इतिहास आपल्याला माहीत नाही, अशा प्राचीन काळात संख्यांची निर्मिती झाली. दहा प्रतीकांच्या साह्य़ाने अंकाची अभिव्यक्ती सादर करण्याची पद्धत जगात सर्वप्रथम प्राचीन भारतात निर्माण झाली. आपल्या हाताच्या दहा बोटांचा उपयोग केवळ पोट भरण्यासाठी नसून त्याचा उपयोग बुद्धीच्या साहय़ाने अंक मोजण्यासाठी आहे. आणि या बोटांचा उपयोग करता करता या दहा अंकात प्रचंड गणिताचे ज्ञान संख्येच्या रूपाने वावरू लागले.
आज जगातील प्रत्येक लहान-मोठय़ा आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण संख्येच्या माध्यमातून केली जाते. सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या नैसर्गिक स्थितीची कालगणना आपण संख्येच्या माध्यमातून लहानशा घडय़ाळात बसवली. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की तिचा थेट संबंध संख्येशी आला नाही. इतकेच नव्हे, तर ब्रह्मांडातील ग्रहताऱ्यांच्या गतीची गणितेही आपण संख्येच्या माध्यमातून करता करता ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली.
संख्याशास्त्र हे एक ज्योतिषशास्त्रातीलच एक अंग आहे. जसा कुंडलीशास्त्रात ग्रहाचा आधार घ्यावा लागतो तसाच संख्याशास्त्रातही प्रत्येक अंकावर नऊ ग्रहातील एका ग्रहाचा अंमल असतो व तो खालीलप्रमाणे.
१ = रवी; ४ = हर्षल; ७ = नेपच्यून; २ = चंद्र; ५ = बुध; ८ = शनी; ३ = गुरू; ६ = शुक्र; ९ = मंगळ.
कोणत्याही ग्रहाबरोबर शून्याचा उल्लेख केलेला आढळत नाही. पण शून्य ही एक प्रचंड शक्तिशाली गोष्ट आहे. संख्याशास्त्रात शून्याला फार महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा शून्य संपूर्ण तारखेत अधिक वेळा प्रवेश करते तेव्हा ती तारीख क्रांतिकारक ठरते. इतकेच नव्हे तर ज्या अंकानंतर शून्य येईल त्या अंकाच्या सद्गुणाची बऱ्याच प्रमाणात वाढ करते. तर फार हळव्या अंकामागे शून्य उभे राहिले तर दु:खाचे डोंगर उभे करते. पण संख्याशास्त्रात नावात बदल करण्याच्या एका लहानशा किमयेने या हळव्या अंकामागच्या शून्याची तीव्रता सहज कमी करता येते. संख्याशास्त्रातील हा लहानसा उपाय नुसता व्यक्तीच्या नावातच नाही तर आपल्या उद्योगधंद्याच्या नावातही केलेला बदल लाभदायक ठरतो. संख्याशास्त्रातून माणसाला मिळालेला हा एक मोठा दिलासा आहे.
संख्याशास्त्रात आरोग्य, उत्कर्ष, सांपत्तिक स्थिती, राजकारणातील नेतृत्व, सामाजिक जीवनातील स्थान आदींचा बोध या शास्त्राचा अभ्यास करताना होतो.
जन्म ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. ती कोणत्या तारखेला व्हावी हे नैसर्गिक जन्माच्या वेळी ठामपणे सांगणे कठीण असते. तसेच जन्माला लाभणारा महिना व सालही तितकेच महत्त्वाचे असते पण तूर्त आपण फक्त जन्मतारखेचाच विचार करूया.
मूलांक म्हणजे काय? - एक ते एकतीस तारखांमध्ये येणाऱ्या अंकाचे मूळ स्वरूप एक ते नऊ अंकात सामावलेले असते. थोडक्यात मूलांक म्हणजे मूळ अंक, जे एक ते नऊपर्यंत मर्यादित आहेत. उदा. १५-८-१९८१ या तारखेमध्ये १५ तारखेचा मूलांक काढायचा आहे. तो खालीलप्रमाणे.
१५= १+५=६ हा पंधरा तारखेचा मूलांक तसेच १-९-१९३३ या तारखेमध्ये एक हाच मूलांक असेल.
तसेच भाग्यांक काढताना जन्मतारखेची पूर्ण बेरीज करून येणारा क्रमांक यास आपण भाग्यांक असे म्हणतो. उदा.
१९-११-१९३३ चा भाग्यांक
१+९+१+१+१+९+३+३=२+८=१०
=१ हा वरील तारखेचा भाग्यांक
समजा, एखाद्या जन्मतारखेचा मूलांक व भाग्यांक सारखाच आला किंवा पूर्ण जन्मतारखेत एकाच विशिष्ट अंकाचे वर्चस्व जास्त वेळा आले तर त्या अंकाचा त्या शक्तीवर जास्त प्रभाव असतो.
उदा. १-१०-१९११ या तारखेत एक अंकाचे अस्तित्व एकूण पाच वेळा आले आहे. तारखेत, महिन्यात व वर्षांमध्ये एक अंकाचे वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे अशा व्यक्तीवर एक अंकाचा प्रभाव जास्त असेल. त्यामुळे एक अंकाला लाभणारे चांगले-वाईट परिणाम या तारखेत जास्त प्रभावी ठरतील. त्यामुळे इतर तारखेतील येणाऱ्या एक मूलांकापेक्षा या तारखेवर असलेला एकचा परिणाम खूपच प्रभावी असेल. प्रत्येक व्यक्तीवर त्या त्या मूलांकाचा परिणाम होत असतो. या परिणामात मानसिक स्थिती, आरोग्य, स्वभाव आदी गोष्टी सहज कळू शकतात. आता पुढील प्रकरणात १ ते ९ मूलांकाची वर्णने पाहू.
response.lokprabha@expressindia.com