११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संगीत

आठवणी वाद्यवृंदाच्या!
दीप्ती नागपाल- डिसोझा

response.lokprabha@expressindia.com
नव्वदच्या दशकामध्ये आपल्या चित्रपट संगीतात तंत्रज्ञानाचा वरचष्मा वाढला आणि शंभर वादकांच्या ताफ्याची जागा एका सिंथेसायझरने घेतली. साहजिकच वाद्यवृंदाची, त्याचे संयोजन करणाऱ्यांची गरजच उरली नाही. या सगळ्या काळाबद्दल सांगत आहेत, गेली वीस वर्षे ए. आर. रेहमानसोबत काम करणारे श्रीनिवासन मूर्ती

ए. आर. रेहमान याचा कोणताही लाइव्ह शो म्हणजे एक सोहळाच असतो. एका भव्य व्यासपीठावर रेहमान आपल्या गायन, वादन आणि संगीत संयोजन या सर्वच आघाडय़ांवर काम करत असतो. त्या पाठीमागे एक मोठा वाद्यवृंद असतो. या वाद्यवृंदावर प्रकाशझोत नसल्याने प्रेक्षकांना हा वाद्यवृंद स्पष्टपणे दिसत नाही. पण त्यांच्या वाद्यांचे सूर वातावरण भारून टाकतात. या वाद्यवृंदासमोर ६४ वर्षांचे श्रीनिवास मूर्ती उभे असतात. संगीताच्या रचनेप्रमाणे त्यांचे हात हलत असतात. आपल्या हातवाऱ्यांच्या साहाय्याने ते वाद्यवृंदाला वादनाबाबतच्या सूचना करत असतात. मूर्ती १९९४पासून रेहमान यांच्या सोबत काम करतात. देशातील प्रसिद्ध वाद्यवृंदांसोबत त्यांनी काम केले आहे. ७०च्या दशकाचा एक काळ असा होता की, भारतीय चित्रपटातील कोणत्याही संगीत प्रकारामध्ये मूर्ती यांच्या रचना अपरिहार्य होत्या. आज संगीतातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाद्यवृंद संयोजकाची फारशी गरज भासत नाही. अशा काळातदेखील मूर्ती यांच्याकडे चेन्नई आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी सातत्याने खूप काम आहे. त्यांच्या काळातील अनेक संयोजकांनी संगीत संयोजन करणे बंद केले आहे किंवा बंद करण्याच्या मार्गावर आहेत.
भारतीय उपखंडामध्ये चित्रपट संगीताची एक वेगळी संस्कृती आहे. या संस्कृतीचे सी. रामचंद्र, नौशाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल व आर. डी. बर्मन असे चार कालखंड आहेत. या चौघांच्याही काळामध्ये वाद्यवृंदाशिवाय चित्रपट संगीत अशी कल्पनादेखील करता येत नव्हती. चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर वाद्यवृंदाची गरज भासे. संगीताच्या एका वैभवशाली कालखंडाबद्दल मूर्ती सांगतात, एक काळ असा होता की वाद्यवृंद हा चित्रपटांचा कणा असायचा. त्या वेळी आपल्याकडे चित्रपटगृहांची नुकतीच सुरुवात झाली होती. चित्रपटगृहामध्ये एकीकडे चित्र दाखवलं जाई आणि दुसरीकडे त्याला पूरक असे स्ांगीताचे वादन होई. चित्रपटगृहामध्ये पडद्यासमोर सारा वाद्यवृंद असे. या काळामध्ये चित्रपट संगीतामुळे अनेकांना रोजगार मिळाले आणि नवीन वादक, संयोजक, संगीतकार पुढे आले. भारतीय चित्रपट संगीताचा हा खऱ्या अर्थाने वैभवकाळ होता. त्याकाळच्या संगीत संयोजनाबद्दल मूर्ती सांगतात, ‘‘त्याकाळी ध्वनिमुद्रण करणे म्हणजे दुसरा चित्रपट करण्यासारखेच होते. साधारणपणे ३५ ते १०० वादक असणारा वाद्यवृंद स्टुडिओमध्ये असे. एका सेशनमध्ये किमान आठ वादक वादन करीत असत. एक गाणं एका प्रयत्नातच ध्वनिमुद्रित करण्यावर संगीतकाराचा भर असे. अशी अनेक गाणी आहेत जी पहिल्या प्रयत्नातच ध्वनिमुद्रित झाली आहेत. संगीत संयोजकाच्या एखाद्या चुकीच्या इशाऱ्यामुळे सारं गाणं पुन्हा ध्वनिमुद्रित करावे लागत असे. त्यामुळे आमचं काम फार जबाबदारीचे होते.’’

‘चक दे इंडिया’ चित्रपटामध्ये जेव्हा भारतीय महिला हॉकी टीम निर्णायक गोल करते त्यावेळी मैदानामध्ये दिसणारा प्रचंड आनंद, प्रकट करण्यासाठी वाद्यवृंदाचा वापर केला गेला.

९०च्या दशकामध्ये भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आविष्कार झाला आणि १०० लोकांच्या वाद्यवृंदाची जागा एका सिंथेसायझरने घेतली. एका सिंथेसाझरमधून सर्व प्रकारच्या वाद्यांचे आवाज मिळतात. त्यामुळे वाद्यवंृदांची गरज उरली नाही. पर्यायाने संगीत संयोजकदेखील काळाच्या पडद्याआड गेला. ध्वनिमुद्रणाची पद्धतच बदलून गेली. गायक येऊन त्याचे गाणे म्हणून जातो. गरज असेल तर वादक वाद्याचे वादन करून जातो. अनेक तुकडय़ात गाणे ध्वनिमुद्रित केले जाते व नंतर एक केले जाते. (बप्पी लहरी मात्र वाद्यवृंदाचा वापर करत. नंतरच्या काळात ते वाद्यवृंदाचे पोशिंदेच ठरले) संगीत संयोजनामध्ये पाश्चात्त्य देशामध्ये काही अभ्यासक्रम आहेत. जे संगीत संयोजनाचे प्राथमिक धडे देतात. याबद्दल संगीतकार सलीम र्मचट सांगतात की, ‘‘आपल्याकडे अनेक चांगले वादक आणि संयोजक आहेत. पण त्यांच्याकडे वेस्टन क्लासिकलचे मूलभूत शिक्षण नाही. जे अशा प्रकारचे शिक्षण घेतात. त्यांना मोठय़ा संधी मिळतात. अनेक ‘लाइव्ह शो’मध्ये ते संगीत संयोजन करतात. परदेशामध्ये त्यांना चांगली मागणी आहे. ते मोठय़ा वाद्यवृंदाचे नेतृत्व करतात.’’
जोड मिळाली असेल पण पारंपरिक पद्धतीने संगीताचे शिक्षण पूर्वीपासून दिले जाते. आपल्याकडचे अनेक चांगले संगीतकार आणि स्पहिल्यांदा गिटारवादक होते. योगेश प्रधान हे पूर्वी वादक होते आज ते आशा भोसले आणि सोनू निगम यांच्या ‘लाइव्ह शो’ मध्ये संगीत संयोजक म्हणून काम करतात. त्याचबरोबर ते संगीतकार सलीम-सुलेमान यांच्याबरोबर संगीत संयोजनाचे काम करतात. संगीतकार हरिहरन शर्मा यांचे नातू इंद्रजित शर्मा आज शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटासोबत संयोजक म्हणून काम करतात. संगीत संयोजनाचे धडे त्यांनी आपले वडील किशोर शर्मा यांचे काम बघत बघत घेतले आहेत. किशोर शर्मा हे आघाडीचे संयोजक आणि संगीतकार होते.
ज्यांच्याकडे संगीताचे आकलन करण्याची क्षमता आणि संगीत संयोजनाचे कौशल्य होते असे फार थोडे संगीत संयोजक काळाच्या कसोटीला पुरून उरले आहेत. ज्यांनी काळाची पावले ओळखली नाहीत त्यांना मात्र नंतर काम मिळणे अवघड झाले. याबद्दल प्रधान सांगतात, संगीत संयोजकांचे काम नव्या तंत्रज्ञानामुळे कमी झाले असले तरी काही संगीत संयोजकांकडे संगीत रचना करण्याचे कौशल्यदेखील होते. त्यामुळे त्यांना काम मिळत गेले पण गेल्या दशकापासून पुन्हा परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे. संगीतातील काही भाग असा असतो की जो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तितका प्रभावी बनू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वाद्यवृंदाची किंवा चांगल्या वादकांची आणि संगीत संयोजकांची गरज भासतेच. त्यामुळे चांगल्या संगीत संयोजकांना आजही मोठय़ा प्रमाणात काम मिळते.
साजिद खान यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंमतवाला चित्रपटातील एका गाण्यामध्ये संगीतकार साजिद-वाजिद यांनी वाद्यवृंदाचा वापर केला होता. या वाद्यवृंदाचे संयोजन राजपूत यांनी केले होते. याबद्दल साजिद अली सांगतात, ‘‘वाद्यवृंदाचा केलेला वापर ही जुन्या संगीत संयोजकांना आणि त्यांच्या कौशल्याला केलेली मानवंदना होती.’’ अनेक चित्रपटांमध्ये संगीतकार वाद्यवृंदाचा वापर करू लागले आहेत. शंकर-एहसान-लॉय यांनी आपल्याकडे एक वाद्यवृंद पगारी ठेवला आहे. कारण वाद्यवृंदाचा वापर करणे म्हणजे बजेटच्या बाहेर खर्च जातो. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील काही गाण्यांसाठी वाद्यवृंदाचा वापर करण्यात आला होता. इंद्रजित यांनी याचे संयोजन केले आहे. या बाबत इंद्रजीत सांगतात, ‘‘वादकाच्या वादनातून संगीताचा जो प्रभाव जाणवतो त्याच्या ८० टक्के प्रभावच तंत्रज्ञानामुळे साध्य करता येतो. शंभर टक्के प्रभाव आणायचा असेल तर वाद्यवृंद वापरणे क्रमप्राप्त ठरते. पण यामुळे तुमचे बजेटदेखील वाढते. चांगले वादक हे बहुतेक वेळा फिल्म असोसिएशनशी जोडलेले असतात. त्यामुळे त्यांचे दरदेखील ठरलेले आहेत. चांगले वादक एका सेशनचे वादन करायला म्हणजे एका दिवसाला सुमारे ८ लाख रुपये घेतात.’’ कदाचित म्हणून संगीतकार वाद्यवृंदाचा वापर फक्त पाश्र्वसंगीतासाठी करत असावेत. वाद्यवृंदाच्या वापराविषयी संगीतकार सलीम र्मचट सांगतात, ‘‘वाद्यवृंदाचा वापर करून उत्कट मानवी भावनांचे दर्शन संगीताच्या माध्यमातून घडवता येते. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटामध्ये जेव्हा भारतीय महिला हॉकी टीम निर्णायक गोल करते त्या वेळी मैदानामध्ये दिसणारा प्रचंड आनंद, खेळाडूंच्या मनातील कृतकृत्य झाल्याची भावना संगीताच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी वाद्यवृंदाचा वापर केला गेला.’’
संगीताच्या ध्वनिमुद्रणाची पद्धत आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलली. आज कोणताही वादक आपल्या वेळेनुसार येऊन वादन करून जातो. संगीतकारालासुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन वादन करण्याची आवश्यकता वाटत नाही. याबद्दल मूर्ती सांगतात, ‘‘पूर्वी वादक एकत्र येऊन तासन्तास तालीम करत असत. आज तसे दिसत नाही. त्यामुळे कदाचित पूर्वी एका टेकमध्ये गाणं ध्वनिमुद्रित व्हायचे. अचूकतेवर भर दिला जायचा. प्रत्येकजण आपल्या परीने बिनचूक वाजवण्याचा प्रयत्न करायचा. आजदेखील सगळ्यांनी एकत्र येऊन सराव करण्याची गरज वाटते. वाद्यवृंद हा चित्रपटसंगीताचा भाग आहे. तो शेवटपर्यंत तसाच राहील. पण आजची पद्धत वेगळी आहे. काळानुसार झालेले बदल आपल्याला स्वीकारावेच लागतील. नवीन कौशल्ये आत्मसात करावीच लागतील.’’