११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

माझं शेतघर

प्रदीप महाडिक
‘अहो! आपणसुद्धा घेऊ या की एखादी जमीन..’
‘अगं हे तू म्हणतेस? स्वप्नात तर नाही ना मी? की हा कोणत्या सीरियलमधला संवाद कानावर आलाय.’
‘कशाला चेष्टा करताय? ’
‘अगं. मनापासून बोलते आहेस की तुझ्या मैत्रिणींनी जमीन घेतली आहे किंवा शेजाऱ्यांनी त्यांच्या गावाकडचे रसभरीत वर्णन ऐकवले असणार.’
‘अहो मी मनापासूनच बोलते आहे. परवा आपण तुमच्या मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो तेव्हा किती छान वाटलं. मुलंसुद्धा खूश होती तेव्हा. सारखी भूक भूक करत होती. तीन चार दिवस कसे गेले कळलेच नाही.’
‘अगं..पण आपली गावी जमीन आहे ना. मग कशाला दुसरी जमीन.’
‘छे पप्पा! एवढय़ा लांब कोण जाणार? गावात जाई जाईपर्यंत शरीरातले त्राण संपणार.’
‘तर काय. त्यात ती गावाकडची जमीन म्हणजे चुलत भाऊ, नातेवाईक सर्वाच्यात सामायिक. आपलं काय?’
‘असूदे आपण मुंबईमध्ये राहून आपल्याला काय मिळणार, त्यापेक्षा ते करत आहेत ना त्यांना करू द्या. आपण कसलीही अपेक्षा न करता. चांगली नाती-गोती सांभाळायची कधी तरी गेल्यावर सन्मानाने राहता येईल.’
हे संवाद आहेत पुणे-मुंबईतल्या चौकोनी कुटुंबातले. पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे. बऱ्यापैकी अर्थप्राप्ती होत असणारे.
मग जमीन कुठं घ्यायची? किती अंतरावर घ्यायची? एखाद्या शहराजवळ घ्यायची की शहरापासून लांब घ्यायची. उद्योग व्यवसायासाठी घ्यायची की गुंतवणूक म्हणून घ्यायची. की निवृत्तीनंतर शांततेत राहण्यासाठी घ्यायची. या सर्वाचा विचार करावा लागेल. कारण वाढत जाणारे वय, आरोग्य आणि आपल्याकडे असणारी पुंजी तसेच दोघांच्याही नोकरीतून मिळणारा वेळ.. जमिनीवर जाण्यासाठी. दिवसेंदिवस वाढत जाणारे जमिनीचे दर, प्रवास भाडे, पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव या सर्वाचा पुढच्या काळात समतोल साधता आला पाहिजे. जमीन समुद्रकिनारी का डोंगरावर, वयोमान झाल्यावर किंवा असणाऱ्या वृद्ध मंडळींना चढता येईल का या सर्वाचा विचार जमीन खरेदी करताना करावा. कित्येकांना जमिनीच्या कायद्याचे ज्ञान नसते. निव्वळ आवड म्हणून किंवा पैसे आहेत म्हणून एकत्र मित्रमंडळी घेत असतात. कित्येकांना हे माहीत नसते की जमीन खरेदी केल्यावर अधूनमधून तेथे जावे लागते.
जमीन कशी आणि आणि कुठं घ्यायची हे ठरलं, की मग किती घ्यायची, मोठी घ्यायची की लहान विकेण्ड होमपुरती घ्यायची. इथेही एक गणित आहे. ते म्हणजे ‘नजर जाईल आणि हाक ऐकू येईल इतकी जमीन असावी’. वयोमानानुसार मोठय़ा आकाराच्या जमिनीवर चालणे किंवा ती जमीन विकसित करणे अवघड आणि खर्चीक असते. आजकाल वर्तमानपत्रामध्ये विकेण्ड होम किंवा सेकंड होमच्या अनेक जाहिराती येतात. निसर्गरम्य परिसरात, डोंगराच्या सान्निध्यात, स्वतंत्र कुंपण, पाणी, वीज आणि २४ तास सिक्युरिटीच्या ओपन प्लॉटच्या जाहिराती असतात. अशाच जाहिरातींना भुलून ग्राहक विशेषत: मध्यमवर्गीय अशा ‘विकेण्ड होम’सारख्या प्रस्तावाला बळी पडतात. ग्राहकाची मन:स्थिती ओळखून घरांचे आणि प्रकल्पांचे चित्र रंगवले जाते. ज्या जमिनीवर प्रकल्प राबवला जाणार आहे. त्याच्या मालकीची कागदपत्रे न पाहता मोठय़ा रकमेचे करार केले जातात आणि नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. विकेण्ड होमच्या प्रकल्पाला भेट देताना त्या जागेपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे का? वाहनाची सोय आहे का? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काय आहे? गरजेच्या वस्तूंची दुकाने जवळपास आहेत का? याची पाहणी करावी. मातीची पाहणी करावी कारण बरेच वेळा जमीन खडकाळ किंवा मुरमाड असते. त्यावर मातीची भर घालून ती समतल केलेली असते. सुरुवातीला आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. पण नंतर झाडे लावण्यासाठी खड्डे खणताना जमिनीचे खरे स्वरूप दिसते.
जमिनीची मालकी कूळ कायद्यानुसार मिळालेली असल्यास सरकारी कचेरीतून परवानगी घेणे आवश्यक असते. प्रकल्पाची जागा हरित क्षेत्र किंवा वन विभागाकरिता राखीव ठेवलेली आहे का याची खात्री करून घेणे जरुरीचे असते. तसेच बिनशेती परवानगी योग्य त्या अधिकाऱ्याकडून घेतली असल्याची माहिती करून घेणे आपल्या फायद्याचे ठरते. विकेण्ड होमसाठी दि. १६.१२.२०१०च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांना जिल्हा अधिकारी कार्यालयामधील उपसंचालक नगर रचना विभाग (टाऊन प्लॅनिंग) कार्यालयातून बांधकाम नकाशा मंजूर होणे व बांधकाम परवानगी मिळणे आवश्यक असते. अशा परवानगीअभावी महाराष्ट्र जमीन महसूल बांधकामाच्या कलम ४४ नुसार ती दंडनीय कृतीस पात्र ठरते.
वीकेण्ड होमची जागा खरेदी खताने विकत घेतलेली असल्यास बांधकाम व्यावयायिकाच्या मालकी हक्क हितसंबंधाचे कागदपत्र तपासून पाहावेत. बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यामधील करार लिखित स्वरूपात व नोंदणीकृत असावा. वीकेण्ड होमचा करार करताना खरेदी किंमत कशा प्रकारे द्यायची आहे आणि जागेचा ताबा कधी मिळणार आहे याचा स्पष्ट उल्लेख करारामध्ये करावा. कित्येक वेळा जमीन किंवा घर मिळणार याच्या आनंदात ग्राहक करारपत्रक न वाचता त्यावर सह्य़ा करतात. नंतर अनेक गोष्टींनी आपण बांधले गेल्याचे त्याच्या लक्षात येते. ज्या वेळी पूर्ण रक्कम भरून जागा ताब्यात घेण्याची वेळ येते त्यावेळी करारपत्रकात नमूद केलेल्या सर्व गोष्टी तेथे आहेत का हे तपासून पाहणे आवश्यक असते. यासाठी ग्राहकाने ताबा मिळेपर्यंत वकिलाचे मार्गदर्शन घ्यावे. बांधकाम व्यावसायिक ही भागीदारी संस्था असल्यास, ती संस्था नोंदणीकृत भागीदारी संस्था असल्याची खात्री करून घ्यावी मगच सगळा व्यवहार करावा. वकिलाचे मार्गदर्शन घेतले तरी आपण स्वत: कायदे काय आहेत. त्यात तरतुदी काय आहेत. हे समजावून घेतल्यास दुष्परिणामांना तोंड द्यावे लागत नाही. नोकरीअभावी किंवा उद्योगधंद्यामुळे वेळ मिळत नसेल आणि कागदपत्राची व्यवस्थित माहिती आणि योग्य काळजी घेतल्यास सेकंड होम किंवा विकेण्ड होम खरेदी करणे कठीण नाही.
response.lokprabha@expressindia.com