११ जानेवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हर स्टोरी
एका अस्वस्थ पिढीची भाषा..
मुक्ता मनोहर

त्या मुलीचा मृत्यू झाला आणि अक्षरश दिल्ली आणि इतरत्रही मोठय़ा संख्येने तरुण-तरुणी जंतरमंतर किंवा गेट वे ऑफ इंडियासारख्या ठिकाणी जमले आणि जमतच राहिले. तसं तर दिल्लीत त्या मुलीवर झालेल्या घृणास्पद बलात्कार आणि हल्ल्यानंतर मोठय़ा संख्येने तरुण मुली आणि मुलंही आपला राग त्वेषानं सामुदायिकपणे व्यक्त करतच होत्या. रोज आंदोलन सुरू होतं. आंदोलन तसं वैशिष्टय़पूर्ण म्हणावं लागेल. आंदोलनाचं कोणी पुढारपण करत नव्हतं. त्याचा कुठला बॅनर नव्हता. त्यांची कोणती संघटना नव्हती. त्यांचा कोणता पक्षही नव्हता. म्हटलं तर त्यांच्यामध्ये तशा कोणी राजकारणात मुरलेल्या व्यक्तीही नव्हत्या. पण एक पराकोटीची सामुदायिक भावना होती. घडलेल्या घटनेबद्दलचा राग, चीड, दुख असं बरच काही होतं. त्यांची एकमेकांशी संपर्क करण्याची यंत्रणा स्वतंत्र होती. फेसबुक, ट्विटर, एस.एम.एस. यातून ते एकमेकांशी संवादी होते.
मात्र तरुणांच्या या उत्स्फूर्त जमण्याबरोबरच पार्लमेंटमध्येही मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हल्ल्याची तीव्र चर्चा होत होती. ती चर्चा टी.व्ही.च्या अनेक वृत्तवाहिन्यांतून सतत दाखवली जात होती. सर्वच पक्षांच्या खासदार महिला मोठय़ा त्वेशानं प्रश्न विचारत होत्या, (मुख्यत्वे सुषमा स्वराज) अशा नराधमांना फाशीशिवाय दुसरी कोणती शिक्षा असू शकते? तेव्हापासून बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या हा आवाज देशभर घुमतो आहे.

कव्हर स्टोरी
लढू या तिच्यासाठी!
वंदना खरे

पुन्हा एकदा हिंसाचाराने एका स्त्रीचा बळी घेतला - असंख्य शारीरिक आणि मानसिक दुखापतींसहित मृत्यूशी चाललेली तिची झुंज शेवटी अपयशी ठरली..! पण जाताजाता ती सगळ्यांच्या मनात एक चिंगारी पेटवून गेली. एका तरुण मुलीवर राजधानीमध्ये सामूहिक बलात्कार झाला आणि अख्खा देश संतापाने पेटून उठला होता. दिल्लीमधल्या त्या घटनेबद्दल सगळीकडे संतापाचा आगडोंब उसळला होता. या घटनेबद्दल देशभरात जवळजवळ पंधरा दिवस मोच्रे, निदर्शने, चर्चा सुरू होते. तिच्या मृत्यूची बातमी येईपर्यंत तिच्यासाठी प्रार्थना सुरू होत्या; त्या मुलीचा सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची बातमी जाहीर झाली आणि या बातमीसोबतच दिल्लीत संचारबंदीही जाहीर झाली. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी शांतता पाळायचे आवाहन केलं. तरीही दिल्लीच्या पोलिसांना हिंसक आंदोलनाची भीती वाटत होती; त्यामुळे दिल्लीतली दहा मेट्रो स्टेशन्स बंद केली गेली, इंडिया गेटकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले गेले. तरीही काही दिवसांपूर्वी हिंसक झालेले लोक आज अतिशय शांतपणे रस्त्यावर आले आहेत. तिला ‘भारताची लेक’ म्हणून श्रद्धांजली वाहिली जाते आहे. तिच्या मृत्यूनंतर सगळा देश हळहळतो आहे. तिचा मृत्यू व्यर्थ जाऊ देणार नाही अशा शपथा घेतल्या जात आहेत.


कव्हरस्टोरी
मनावरचे बलात्कार!
वैशाली चिटणीस

ती असेल १२-१३ वर्षांची. गणपती बघायला चालली होती. आई, बाबा, तिचा लहान भाऊ, आजी. आजीबरोबर तिचं गूळपीठ जास्त. त्यामुळे ती आजीचा हात धरून आणि छोटा आई-बाबांबरोबर असे ते सगळे मजेत फिरत होते. वेगवेगळय़ा गणपती मंडळांचे गणपती, सजावट बघत होते. गप्पा चालल्या होत्या. कोण कोण ओळखीचं भेटत होतं. आणखी एक-दोन गणपती बघायचे. मस्तपकी काहीतरी खायचं आणि मग घरी जाऊन झोपायचं असा प्लान होता. गणपती बघायला ठिकठिकाणी ही गर्दी होती. पण ती काय असणारच. ते काय या वर्षी पहिल्यांदा थोडेच आले होते गणपती बघायला. पण यावर्षी नेहमीपेक्षा तिला जास्त गंमत वाटत होती. एक तर गणपतीबद्दल पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या ती वाचत होती. मत्रिणींबरोबर चर्चा व्हायची. आपल्यालाही बरंच समजतंय असं वाटायचं. त्यामुळेच आई-बाबांच्या मागे लागून आज ते सगळे दुसऱ्यांदा गणपती बघायला बाहेर पडले होते. आजीचा हात धरून त्या गर्दीतून त्या दोघी हळूहळू फिरत होत्या. तेवढय़ात.. तिला काहीतरी विचित्र जाणवलं. पाठीमागून कुणाचातरी ओंगळवाणा स्पर्श.. ती एकदम शहारली. हा काय प्रकार आहे.. तिनं एकदम मागे वळून पाहिलं. सगळेच चेहरे काहीच न घडल्यासारखे. तो भास होता की काय.. ती तशीच पुढे सरकली. शक्य तेवढं अंग चोरून घेत.. दोन-तीन मिनिटं गेली..पुन्हा तेच..यावेळी तिनं मागे वळूनही पाहिलं नाही. नकळत वेग वाढवला. पण त्या गर्दीत म्हाताऱ्या आजीचा हात धरून ती किती वेगाने चालणार. इतक्या वर्षांत कधीच न जाणवलेलं गर्दीचं ओझं तिला जाणवायला लागलं. तेवढय़ात एक हात मागून तिच्या खांद्यावरून पुढे आला, तिची छाती दाबत फिरला आणि परत मागे गेला. यावेळी तिने झपकन मागे वळून पाहिलं.

प्रासंगिक
सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
अलका साहनी
प्रसिद्ध निर्मात्या मीरा नायर २००४ मध्ये पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या. त्याचं सगळं लहानपण गेलं ते ओडिशामध्ये. पाकिस्तानशी त्यांचा तसा काहीच थेट संबंध नव्हता. तरीही त्या उठल्या आणि पाकिस्तानात गेल्या त्याला एक अप्रत्यक्ष कारण होतं. ते म्हणजे त्यांच्या वडिलांच्या काही दु:खद आठवणी लाहोर शहराशी जोडल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना ते लाहोर एकदा तरी अनुभवायचं होतं. पाकिस्तानात त्यांचं चांगलं स्वागत झालं. तिथे त्या अनेकांना भेटल्या. पाकिस्तानातून परत आल्यावर त्यांना ते दिवस आठवत राहिले. पाकिस्तानमध्ये घालवलेल्या याच दिवसांमुळे त्यांना आजच्या पाकिस्तानातील परिस्थितीवर चित्रपट करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी मोहसीन हमीद यांच्या ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’ या कादंबरीची निवड केली. मोहसीन यांच्या कादंबरीबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘या कादंबरीमध्ये आजच्या पाकिस्तानचं चित्र पाहायला मिळतं. त्याशिवाय पाकिस्तान आणि अमेरिका या देशांच्या निमित्ताने दोन वेगळी जगं पाहायला मिळतात. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यामध्ये होणारा संवाद, या दोन देशांचे एकमेकांशी असणारे संबंध यांच्यावर या कादंबरीत प्रकाश टाकला गेला आहे.’’

प्रासंगिक
विकेट ‘कीपर’
शमिक चक्रवर्ती / वजिशा शहा

ते १९९८ सालं होते, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. कोलकात्यात ईडन गार्डन मैदानावर सामना होणार होता. सरावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू रिकी पॉन्टिंग खेळपट्टीवर गेला. खेळपट्टी कठीण आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने बुटाच्या स्टडने खेळपट्टीचा काही भाग उकरण्याचा प्रयत्न केला. ईडन गार्डन मैदानाचे ‘पिच क्युरेटर’ प्रोबीर मुखर्जी यांच्या करडय़ा नजरेतून पॉन्टिंग वाचला नाही. त्यांनी त्याला हटकले. त्याची चूक त्याच्या लक्षात आणून दिलीच. पण त्याची चांगली कानउघाडणी केली. मुखर्जी यांचे नाव मागच्या महिन्यात पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले ते धोनीशी झालेल्या वादामुळे. इंग्लंड आणि भारत कसोटी मालिकेदरम्यान कोलकाता येथे एक सामना झाला. या सामन्यापूर्वी धोनीने मुखर्जी यांच्याकडे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल बनवण्याची विनंतीवजा मागणी केली. यावर ८३ वर्षीय मुखर्जी यांनी हे काम अनैतिक असल्याचे सांगितले. त्यांच्या वक्तव्याची जाहीर चर्चादेखील झाली आणि ‘पिच क्युरेटर’ हा पडद्यामागचा कलाकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. मुखर्जी यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती १९८५मध्ये ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल’ च्या ग्राऊंड कमिटीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. सुरुवातीला ते साहाय्यक म्हणून पिचचे काम बघत असत. १९९३ पासून मात्र त्यांच्याकडे ‘पिच क्युरेटर’ची सर्व सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हापासून आजपर्यंत ते ईडन गार्डनचे सर्वेसर्वा आहेत. कथित वादानंतर धोनी मुखर्जी यांना भेटला तेव्हा त्याने त्यांना मिठी मारली आणि ‘बॉस ऑफ ईडन’ असे उद्गार काढले.

भविष्य