११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक


थोडी सजगता आणि पथ्य
वैद्य स. प्र. सरदेशमुख

response.lokprabha@expressindia.com
कॅन्सर झाला हे समजलं की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मलाच का कॅन्सर व्हावा? या प्रश्नामागे हतबलता असते. कॅन्सरच्या भीतीने त्यांचे खरोखरच हातपाय गळून गेलेले असतात. अशा वेळी गरज असते, योग्य उपचारांची. योग्य मार्गदर्शनाची.

भाग-५
आजच्या वैज्ञानिक युगात विज्ञान, माहिती व तंत्रज्ञान यांच्यातील अत्याधुनिक शोधांमुळे उपलब्ध झालेल्या बऱ्याच सोयी-सुविधांमुळे मानवाचे आयुष्य सुकर झाले आहे, परंतु त्याचबरोबर यामुळे बदललेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम म्हणून हृदयरोग, ब्लडप्रेशर, कॅन्सर यांसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाणही झपाटय़ाने वाढत आहे. कॅन्सर झाला हे समजले तर अजूनही रुग्णाचे व नातेवाईकांचे अवसान गळते. याला कारण म्हणजे कोणत्याही एकाच उपचार पद्धतीने कॅन्सरची परिपूर्ण व खात्रीलायक चिकित्सा उपलब्ध नसणे व कॅन्सर बळावल्यावर रुग्णाला सोसाव्या लागणाऱ्या मरणप्राय वेदना.
आपल्या देशात कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही तोंड, अन्ननलिका, आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, गुदभाग या प्रत्यक्ष अन्नसेवनाशी संबंध असलेल्या अवयवांच्या कॅन्सरचे प्रमाण अधिकच वाढत आहे. या सर्व अवयवांना आयुर्वेदाने अन्नवह (तोंडापासून पचनसंस्थेपर्यंत पचनाशी संबंधित यंत्रणा) व पुरीषवह (पचन प्रक्रियेनंतर नको असलेले अन्नघटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेतील सर्व यंत्रणा) स्रोतसांमध्ये समाविष्ट केले आहे. या प्रकारचे कॅन्सर हे चिकित्सकाला अधिकच आव्हानात्मक असतात. कारण यात रुग्णाच्या अन्नसेवन व अन्नपचन यावरच आघात झाल्याने रुग्ण अतिशय दुर्बळ झालेला असतो. त्यात कॅन्सरमुळे आलेल्या दौर्बल्याची भर पडल्याने रुग्णाची चिकित्सा अधिकच कठीण होऊन बसते. म्हणूनच अन्नवह व पुरीषवह स्रोतसांमधील अवयवांच्या कॅन्सरची आयुर्वेदानुसार संभाव्य कारणे, लक्षणे, चिकित्सा, पथ्यापथ्य व प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेण्यासाठी या लेखाचा प्रपंच.
आमच्या यांना जेवणात रोज मिरचीचा खर्डा लागतो. सासूबाई व सासऱ्यांना तिखटमिठाचा एक तरी पदार्थ रोजच्या जेवणात असल्याशिवाय जेवणच जात नाही. कॉलेजमध्ये जाणारे अभि व आकांक्षा म्हणतात नाश्त्याला वडापाव, भजी तर दुपारी जेवणाच्या वेळी पावभाजी, रगडा पॅटिस, पंजाबी डिशेस याशिवाय आमच्या ग्रुपमधील कोणी खातच नाही. रोहनला रोज शाळेतून आल्यावर मॅगी नूडल्स, कुरकुरे, बिस्किटस्, चॉकलेटस् यांची मेजवानी लागते. आजकाल सर्वच घराघरांतील गृहिणींच्या तोंडून ही वाक्ये ऐकली की लक्षात येते की, हीच तर सगळी मुखाच्या, अन्ननलिकेच्या, आमाशयाच्या, आतडय़ांच्या आणि गुदाच्या कॅन्सरची आहारातील संभाव्य कारणं आहेत. याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे, सतत बठं काम करणं, अजिबात व्यायाम न करणे, खूप दगदग प्रवास करणं, भूक-तहान-मल-मूत्र यासारख्या नसíगक जाणिवांची भावना झाल्यावरही बराच वेळ या रोखून ठेवणे, अशा विहारात्मक गोष्टीही या प्रकारच्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात. आजच्या धकाधकीच्या युगाचा अविभाज्य घटक म्हणजे मानसिक ताण-चिंता! आयुर्वेदीय संहिताकारांनी एक उद्बोधक सूत्र लिहून ठेवलं आहे. तुम्ही कितीही पोषक - षड्रसात्मक आहार सेवन करा, पण जर त्याला सततची चिंता, ताण, राग यांचं गालबोट लागलं तर सगळंच मुसळ केरात!
या सगळ्या खाण्या-पिण्यातील, वागण्यातील चुकीच्या सवयीप्रमाणेच पान, सुपारी, तंबाखू-दारू, गुटखा यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाणे हेही या सर्व कॅन्सरचे महत्त्वाचे कारण आहे. काही विशिष्ट रसायनांशी व्यवसायाच्या निमित्ताने सतत संपर्क असणे हेही एक संभाव्य कारण असते.
सामान्यत: अन्नवह व पुरीषवह स्रोतसांच्या अवयवांच्या कॅन्सरमध्ये भूक मंदावणे, उलटय़ा होणे, वजन घटणे, अशक्तपणा, अम्लपित्ताचा त्रास होणे ही सर्वसामान्य लक्षणे आढळतात. याशिवाय विशिष्ट अवयवांच्या कॅन्सरमध्ये त्यांच्या अवयवानुसार विशेष लक्षणे दिसतात. जसे मुखाच्या विविध भागांच्या कॅन्सरमध्ये वरचेवर तोंड येणे, जिभेवर / गालांच्या आतल्या बाजूस लवकर न भरून येणारी जखम होणे, तर अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये पातळ पदार्थ किंवा घट्ट पदार्थ गिळण्यास त्रास होणे, अन्न गिळताना छातीत /पाठीत दुखणे/ठसका लागणे, खोकला येणे ही लक्षणे दिसतात. बऱ्याचशा आमाशयाच्या कॅन्सरच्या रुग्णांत भूक मंदावणे, तोंडाची चव जाणे, उलटय़ा होणे, क्वचित उलटीतून रक्त पडणे, अम्लपित्त, पोटात दुखणे, मलप्रवृत्ती काळ्या रंगाचे होणे ही लक्षणे दिसतात. पोटात दुखणे, उलटय़ा, जुलाब किंवा मलबद्धता, भूक मंदावणे अशी लक्षणे एक महिन्यापेक्षा अधिक काळ औषधांनीही कमी न झाल्यास आतडय़ांच्या कॅन्सरची शक्यता असू शकते. मलप्रवृत्ती समयी वेदना, आग होणे; मलप्रवृत्तीबरोबर रक्तस्राव होणे, पोटात दुखणे, अशी लक्षणे गुदाच्या कॅन्सरमध्ये दिसू शकतात.
म्हणूनच उपरोक्त लक्षणे दिसल्यावर कॅन्सरचे निदान निश्चित करण्यासाठी विशिष्ट तपासण्या करणे आवश्यक ठरते. इ्रस्र्२८ म्हणजेच कॅन्सरग्रस्त भागाचा तुकडा काढमून त्याची प्रयोगशाळेत तपासणी करणे ही कॅन्सरसाठी सर्वात खात्रीलायक तपासणी असते. याशिवाय सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., पेट सीटी स्कॅन, ट्युमर मार्कर , रक्ततपासण्या, मलाची तपासणी यांच्या सहाय्यानेही त्या त्या अवयवाच्या कॅन्सरचे निदान होते.

आयुर्वेदाच्या सहाय्याने मात
१९९९ मध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर झालेल्या ६५ वर्षांच्या कुसुमताईंचे शस्त्रकर्म झाले व त्यात कॅन्सरने ग्रस्त असलेला अन्ननलिकेचा भाग काढून टाकला होता. प्रयोगशाळेत या भागाची तपासणी केली असता अन्ननलिकेच्या आसमंतातील िलफ नोड्समध्येही कॅन्सरचा प्रादुर्भाव झाल्याचे निश्चित झाल्यावर त्यांना केमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला. परंतु केमोथेरपी घेण्यास कुसुमताईंनी नकार दिला व केवळ आयुर्वेदिक चिकित्सा १० वर्षे नियमितपणे घेतली. ३ वर्षांपूर्वी त्यांच्या सर्व तपासण्यांचे रिपोर्टस् नॉर्मल आहेत याची खात्री करून डॉक्टरांनी त्यांची आयुर्वेदिक औषधेही थांबविण्याचा सल्ला दिला. गेली ३ वर्षे कुसुमताई वर्षांतून एकदा तपासणीसाठी येतात. आज ७८व्या वर्षीही त्या स्वस्थ आयुष्य जगत आहेत.
सुशीलाकाकूंना १९९८ मध्ये मोठय़ा आतडय़ांचा कॅन्सर झाला. त्यासाठी शस्त्रकर्म व केमोथेरपी घेऊनही २००२ मध्ये गुदस्थानी कॅन्सरचा पुनरुद्भव झाला. त्यासाठी पुन्हा शस्त्रकर्म व केमोथेरपी घ्यावी लागली. आता मात्र त्यांनी पुनरुद्भव होऊ नये म्हणून आयुर्वेदिक औषधे सुरू केली. त्याबरोबर त्यांना पंचकर्मापकी बस्ती चिकित्साही दिली. गेली १० वर्षे नियमितपणे आयुर्वेदिक औषध घेणाऱ्या सुशीलाकाकूंना कॅन्सरचा पुनरुद्भव झालेला नाही.

आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार या सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये शस्त्रकर्म, केमोथेरॅपी, रेडीयोथेरेपी यापकी आवश्यक चिकित्सा केली जाते. या उपचार पद्धतींना आयुर्वेदिक चिकित्सेची जोड दिल्यास केमोथेरपी, रेडियोथेरपीमुळे उद्भवणारे उपद्रव आटोक्यात राहतात, रुग्णांची व्याधिप्रतिकारशक्ती वाढमून जीवनाची गुणवत्ता सुधारते व कॅन्सरचा पुनरुद्भव अथवा अन्य अवयवांत प्रादूर्भाव होण्याची शक्यता कमी करता येते.
अन्नव्रह व पुरीषवह स्रोतसांच्या अवयवांच्या कॅन्सरमधील आयुर्वेदीय चिकित्सेत औषधी वनस्पतीपासून तयार केलेली चूर्ण, वटी, अवलेह, सिद्ध घृत, आसवारिष्ट, अशा स्वरूपातील शमन चिकित्सा (तोंडावाटे घेण्याची व्याधिनाशक औषधे), शोधन चिकित्सा मन-विरेचन-बस्ती-रक्तमोक्षण-नस्य अशी पंचकर्म-चिकित्सा), शरीरातील रस रक्तादी ७ धातूंचे बल वाढविणारी रसायन चिकित्सा, औषधी काढय़ांच्या गुळण्या, औषधी तेल/तुपांचे प्रतिसारण - नाभिबस्ती-गुदपिचू यांसारखे स्थानिक उपक्रम आणि पथ्यकर आहार यांचा समावेश होतो. याशिवाय कॅन्सरशी समर्थपणे लढण्यासाठी रुग्णांचे मनोबल वाढविणारी ‘सत्वावजय’ चिकित्साही महत्त्वपूर्ण ठरते.

आयुर्वेदाने शरीर स्वस्थ राहण्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, वेगधारणाबाबतचे नियम सांगितले आहेत, त्यांचे पालन करावे.

व्याधी होऊच नये म्हणून आहार विहारादी आयुर्वेदोक्त विशिष्ट नियमांचे पालन केल्यास मुख - अन्ननलिका - आमाशय - आंत्र - गुद यांच्या कॅन्सरचे प्रमाण आटोक्यात ठेवणे शक्य आहे. यासाठी तांदूळ भाजून भात, मूग-मसूर डाळीचे वरण, साजूक तुपाची फोडणी दिलेल्या फळभाज्या-पालेभाज्या,भाज्यांचे सूप, गोड ताजे ताक, फुलका - पोळी - भाकरी, पुदिना- लसूण- खोबरे यांची चटणी, आवळा-िलबू-हळद यांचे गोड लोणचे अशा प्रकारचे भोजन, तसेच तांदळाचे धिरडे - मुगाचे धिरडे - मुगाचे-रव्याचे लाडू- शेवयांचा शिरा- गोड शिरा - उपमा - साळीच्या लह्य़ांचा चिवडा - गोड ताजी द्राक्षं- अंजिर, खजूर, डाळिंब, सफरचंद अशी फळे असा आहार नित्यनियमाने करावा. जेवणाच्या व नाश्त्याच्या, झोपण्याच्या वेळा शक्यतो नियमित असाव्या. प्रसन्न मनाने जेवावे. आयुर्वेदाने शरीर स्वस्थ राहण्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, वेगधारणाबाबतचे नियम सांगितले आहेत, त्यांचे पालन करावे. तसेच त्या त्या ऋतूत नसíगकरीत्या आपल्या शरीरात वाढणाऱ्या दोषांचे शोधन करण्यासाठी आयुर्वेदीय संहितामध्ये ऋतूसापेक्ष पंचकर्मे सांगितली आहेत. जसे वसंत ऋतूत वमनाने वाढलेला कफदोष, वर्षां ऋतूत बस्ती घेऊन वाढलेला वातदोष व शरद ऋतूत विरेचन व रक्तमोक्षण करून वाढलेला पित्तदोष यांचे निर्हरण करावे. ज्यायोगे कॅन्सरसारख्या आजारांना प्रतिबंध घालणे शक्य होते.