११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा

मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
दिलीप ठाकूर
response.lokprabha@expressindia.com
सिनेमा कुठला बघायचा हे ठरवायचं तर आधी त्यात ‘कोण कोण आहे’ हा प्रश्न महत्त्वाचा असतो. आवडीच्या जोडीइतकीच महत्त्वाची ठरते फ्रेश जोडी. या वर्षी येणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये अशा काही नवीन जोडय़ा आपल्यापुढे येणार आहेत.

नव्या वर्षांमध्ये मराठी चित्रपटात ‘नवीन जोडय़ा’ पाह्य़ला मिळणार आहेत. थोडसं जरी मागे वळून पाहिलं, तरी सूर्यकांत-जयश्री गडकर, अरुण सरनाईक-जयश्री गडकर, रमेश देव-सीमा, दादा कोंडके-उषा चव्हाण असे करता करता महेश कोठारे-निवेदिता जोशी, सचिन-वर्षां उसगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे-प्रिया अरुण, भरत जाधव-दीपाली सय्यद अशा जोडय़ांची यशस्वी वाटचाल दिसते. जोडी शोभते म्हणून ‘पुढच्या चित्रपटा’त पुन्हा त्याच जोडीची निवड होते. एकत्र काम करता करता एकमेकांचा स्वभाव समजतो-आवडतो-सवयीचा होतो. एखादी जोडी फक्त ‘पडद्यापुरती राहत नाही, तर ते ‘जीवनाचे साथीदार’ही बनतात. एखाद्या जोडीबद्दल कुजबुज असते-नसते. (हिंदीसारखे ‘काय वाट्टेल ते’ गॉसिपिंग होत नाही.)
आता वक्त बहोत ही आगे निकल चुका है।
आता हेच बघा, पल्लवी सुभाष म्हटली की अनिकेत विश्वासराव आठवायला हवाच. एखाद्या पार्टीत दोघांतील एकच जण आला रे आला की ‘दुसरा का नाही’ असा प्रश्न सहज ओठावर येतो. मतलब, ‘ते दोघे एक आहेत’ अशी फ्रेम तयार झाली आहे. ‘असा मी अशी तू’च्या सेटवरही ‘ती’ आहे म्हणूनच ‘तो’ही असणार असे समजूनच पोहचलो. दिग्दर्शक अतुल काळे ‘आश्चर्याचा धक्का’ देत मला म्हणाला, यामध्ये पल्लवीचा हीरो सचित पाटील आहे.
का बरे? हे ओठावर आले तसेच अनिकेत का नाही बरे हे मनात होते.
अतुल म्हणाला, मला या वेगळ्या प्रेमकथेत महाराष्ट्रीय पिता व पंजाबी आई यांची मुलगी वाटणारी व ग्लॅमर क्षेत्रात सहज वावरणारी अशीच ‘नायिका’ हवी होती. पल्लवी सुभाष त्यासाठी ‘द बेस्ट’ वाटली. सचित तर कथाविस्तार करतानाच तिचे नाव डोळ्यासमोर ठेवून होता. यात मानसी साळवी त्याची पत्नी असून, तिच्या मृत्यूनंतर पल्लवीशी त्याची ओळख होते..
अतुलच्या बोलण्यात सचित पाटील-मानसी साळवी अशी पुन्हा एक वेगळी जोडी सापडली. तर राजेंद्र बांदिवडेकरच्या ‘धमक’मध्ये अनिकेत गिरिजा जोशीचा ‘चिकना हीरो’ आहे. ‘शोधा म्हणजे सापडेल’ हा नियम तूर्त बाजूला पडला. त्यातच गंमत आहे.
दिग्दर्शक मनोहर सरवणकर याच्या ‘मात’च्या चित्रनगरीतील सेटवरही असाच सुखद धक्का बसला. त्यात त्याने समीर धर्माधिकारी व ईशा कोप्पीकर अशी ‘नवीन जोडी’ जमवली.
..हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘मराठी मुलगी’ मराठीची नायिका झाली रे झाली की, तिचे मानधन मराठीतले की हिंदीतले, तिचे नखरे हिंदीतले मराठीत चालतात का, तिचा ‘हीरो’ म्हणून कोण शोभणार असे किती तरी ‘जालीम’ प्रश्न पडतात. पण ईशा कोप्पीकरला समीर धर्माधिकारी एकदम ‘सही’ हीरो. त्याच्याही ते लक्षात आणताच तो प्रामाणिकपणे म्हणाला, अरे माझ्या हे लक्षातच आले नाही. (खरंच की काय लबाडा?) या चित्रपटाची नायिका ‘मॉडेल’ आहे, आणि मग तशीच कोणी असेल तर बरेच होईल असा आम्ही विचार केला. ईशाशी माझा ‘जुना संबंध’ आहे व तिलाही ‘चांगली भूमिका असेल तर मराठी चित्रपटातून काम करायचे होतेच.’ समीर, म्हणजे खुद्द हीरोच आपल्या प्रेयसीची.. सॉरी सॉरी ‘नायिकेची बाजू’ घेऊन बोलतोय म्हटल्यावर काय हो? ईशाला मात्र ‘भरल्या सेटवर’ मराठी एके मराठी बोलताना खूप कष्ट पडत होते. कधी समीर, तर कधी तिचा मेकअपमन तत्क्षणी तिची ‘भाषिक संकटा’तून सुटका करून देत होते. ती सांगत होती, आय अ‍ॅम प्राऊड ऑफ. की मी महाराष्ट्रीयन आहे. मला या चित्रपटातला ‘रोल’ आवडला म्हणून मी पटकन ‘यस’ म्हटले. पिक्चर कम्प्लीट झाल्यावर मला डिटेलमध्ये बोलायला आवडेल.
ते काही असो, समीर धर्माधिकारी-ईशा कोप्पीकर मस्त जोडी आहे, ‘मॉर्डन’ आहे, ‘सुटेबल’ आहे. मराठी चित्रपटाकडे ‘युवा’ वर्ग आकर्षित करण्यासाठी अशा नवीन जोडीचे ‘फंडे’ जुळवायला- वापरायला हवेत. (मराठी चित्रपट प्रामुख्याने ‘चाळिशीपार’ रसिक पाहतात हा समज अशा पद्धतीने खोडून काढता येईल. (पहिली शस्त्रक्रिया ही व्हावी.)
महेश कोठारेनेही ‘झपाटलेला’ चित्रपटाचा सिक्वेल अर्थात पुढचा भाग निर्मित-दिग्दर्शित करताना ‘घरची सून’ ऊर्मिला हिलाच आपला ‘लाडका पुत्र’ आदिनाथ याची नायिका न करता सोनाली कुलकर्णीशी त्याची ‘जोडी’ जमवली. ‘दुभंग’ हीरो आदिनाथ व ‘नटरंग’नार सोनाली अशी जोडी खूपच वेगळी दिसेल असे आदिनाथच्या लक्षात आणून देताच तोही सुखावला (ऊर्मिलाची परवानगी घेतलीस ना रे?) मी या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलाची भूमिका साकारत आहे. चित्रपट पूर्णपणे फॅण्टसी असून त्यावरचे सगळे तांत्रिक करामत झाल्यावरच आमची जोडी पडद्यावर कशी दिसेल याची कल्पना येईल, आदिनाथ सांगत होता. पण ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ या नियमाने प्रत्येक वेळी ऊर्मिलाच त्याची नायिका राहिली तर आजचा पब्लिकच म्हणेल, तुमचे पती-पत्नीचे नाते घरी ठेवा, सिनेमात कथेनुसार जोडीदार ठरवा. ऊर्मिला कानेटकरही तशी काळजी घेत आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’मध्ये ती अंकुश चौधरी-स्वप्निल जोशीसोबत आहे. घरी पती-पत्नीचे नाते जपतानाच पुन्हा ‘भरल्या सेटवर’ही ‘जोडय़ाने’ काम करायचे, यात एकमेकांना ‘स्पेस’ देता येत नाही. तशी पक्की व्यावसायिकता मनात रुजवूनच ‘नव्याशी जोडी’ जमवावी लागते. आदिनाथ-ऊर्मिला तुम्हाला ‘जोडी’ने शुभेच्छा.

मराठी चित्रपटसृष्टीत काहीही नवीन घडत नाही, सदैव ‘मागील रिळावरून पुढे’ अशी स्थिती असते अशी कावकाव, चॅवचॅव करणाऱ्यांनी या ‘नवीन जोडी संस्कृती’वर लक्ष द्यायला हरकत नाही.

नवीन जोडी जमवण्यात ‘प्रेमाची गोष्ट’ने तो कमाल कर दिया। दिग्दर्शक सतीश राजवाडेने ‘परिपक्व प्रियकर’ भूमिकेसाठी अतुल कुलकर्णीला निवडले (एवीतेवी अतुल कुलकर्णीला आपण ‘प्रेमकथे’त कधी बरे पाहणार होतो? त्यासाठी असे ‘प्रेमयोग’ यावे लागतात.) तर मिराह एन्टरटेन्मेंटने सागरिका घाटगेने निवडून दिग्दर्शकाकडे सोपवले व एक अगदी वेगळी जोडी पाह्य़ला मिळतेय. (कलाकारांची निवड दिग्दर्शकानेच करायला हवी अशी ‘बेचव’ अपेक्षा ठेवण्यापेक्षा नवीन मस्त ‘जोडा’ जुळला हो जुळला याला दाद देऊ या.) सतीश राजवाडे सांगत होता. माझ्या या चित्रपटाची कथा थोडी वेगळी असल्याने मला ‘प्रेयसीच्या भूमिके’साठी वेगळाच ‘चेहरा’ हवा होता, तो मिळाला नि माझे काम सोपे झाले. आता चित्रपट पाहिल्यावर तुम्ही काय ते सांगा. (त्यासाठी एक फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल.)
‘नवीन जोडी जमवण्याच्या’ या नव्या खेळात भरत जाधव-विद्या माळवदे (हीदेखील हिंदीतून मराठीत, पण मराठीच्या सेटवर फारच छान इंग्रजी बोलते.. इंग्रजी बोलणे प्रगतीचे लक्षण आहे, गुन्हा नव्हे!), ‘शिखर’मध्ये, भरत जाधव-आकांक्षा जाधव ‘मी शिवाजी मराठे’मध्ये (हा मराठीतला ‘सिंघम’ बनतोय, हे ऐकून तुमची ‘सटकली नाही ना?’) अशाही बऱ्याच ‘नवीन जोडय़ा’ लागल्यात.
मराठी चित्रपटसृष्टीत काहीही नवीन घडत नाही, सदैव ‘मागील रिळावरून पुढे’ अशी स्थिती असते अशी कावकाव, चॅवचॅव करणाऱ्यांनी या ‘नवीन जोडी संस्कृती’वर लक्ष द्यायला हरकत नाही. सारखे सारखे आपले ‘मराठी चित्रपटसृष्टीत हे नाही, मराठी चित्रपटात ते नाही’ अशी ‘रडगाणी’ कायम ठेवू नका. अर्थात, आपल्या या मराठी चित्रपटवाल्यांनीही ‘नवीन जोडी’ जमवण्यात ‘जागरूकता’ दाखवली तशी ती ‘नवीन पिढीच्या रसिकांच्या नजरेत’ नवीन जोडी भरेल अशीही काळजी घ्या.
नवीन पिढीला ‘नवे नवे ते हवे हवे’, त्याचा एक मार्ग ‘नायक-नायिके’ची नवीन जोडी जमवण्यातून जातो. सलमान खान-सोनाक्षी सिन्हा (दबंग, दबंग २), शाहरुख खान-कैतरिना कैफ (‘जब तक है जान’च्या वेळी प्रथमच तर ‘एकसाथ’ आले.) यांना कसे ‘झ्याक’पणे स्वीकारले, तोच रसिकांचा ‘अलिखित नियम’ येथेही ‘लागू’ पडतो. पण ‘आपली जमेची बाजू’ बऱ्याचदा आपल्या मराठी सिनेमावाल्यांनाच लक्षात येत नाही, ते लक्षात आणून देण्यासाठी ‘जोडा’ झिझवावा की..