११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चटक-मटक

चवदार, चटपटीत
शेफ मिलिंद सोवनी

response.lokprabha@expressindia.com
१९८३ पासून मिलिंद शेफ म्हणून कार्यरत आहेत. देशातील अनेक स्टार हॉटेलमध्ये शेफचे काम केल्यावर त्यांनी सिंगापूरमधील एका जगप्रसिद्ध चेन रेस्टॉरंटमध्ये कॉर्पोरेट शेफ म्हणून काम पहिले आहे. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसंच राजीव गांधींचे शेफ होते. सध्या ते पुणे, सिंगापूर, जपान आणि मलेशिया येथील पाच हॉटेलांचे मालक आहेत. पण मुळात त्यांचा आत्मा शेफचा आहे. त्यामुळेच ते आजही अनेक प्रयोग करत असतात.

चवदार, चटपटीत
अनेक भारतीय रेसिपी आंतरराष्ट्रीय स्तरावर हमखास जाऊ शकतात. फक्त त्यासाठी त्यांच्यामध्ये गरजेनुसार बदल करणे आवश्यक आहे. मी आजवर अशा अनेक रेसिपी आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे. आपल्या नेहमीच्या रेसिपीमध्ये थोडासा बदल करून त्यांची लज्जत वाढवणे सहज शक्य आहे.

गाजर-कोथिंबीर सूप (चार व्यक्तींसाठी)
साहित्य : गाजर ४०० ग्रॅम (किसून), चिरलेली कोिथबीर अर्धा कप, बडीशेप २ टी स्पून, तेल १ टे. स्पून, काळी मिरी १५-१८, मोठा कांदा बारीक चिरून, पाणी ६ कप, तमालपत्री, लो फॅट क्रीम १ टे स्पून
कृती: पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर काळीमिरी, तमालपत्री आणि बडीशेप घालावी. त्यातच कांदा घालून तांबूस रंगावर परतावा. किसलेले गाजर आणि पाणी घालावे. हे मिश्रण चांगले उकळू द्यावे. त्यावर कोिथबीर टाकून लगेच खाली उतरावा. नंतर हे सर्व मिश्रण ब्लेंडरमधून काढावे. नंतर हे मिश्रण सॉस पॅनमध्ये गरम करावे. जरुरीप्रमाणे पाणी घालून त्यात सिझिनग घालावे. क्रीमचा हलका थर देऊन गरम सर्व करावे.

खस मॉकटेल
साहित्य: स्रिटा २ बाटल्या, खस सायरप दोन टी स्पून, बारीक तुकडे केलेली फळे अर्धा कप, पुदिना दोन डहाळ्या, कॉकटेल स्टिक्स चार, ताजी चेरी ४-५, लेमन चेरी ४, उंच दांडय़ाचे काचेचे ग्लास ४
कृती: प्रत्येक ग्लासमध्ये खस सायरप सम प्रमाणात ओतावे. मिश्र फळे प्रत्येक ग्लासात ठेवून त्यावर स्रिटा ओतावे. कॉकटेल स्टिकला चेरी खोचून ती ग्लासात ठेवावी. पुदिन्याची पाने आणि लिंबाच्या चकतीने सजवावे.

पनीर अननस टिक्का
साहित्य: पनीर ५०० ग्रॅम, पूर्ण पिकलेला अननस २५० ग्रॅम, घट्ट दही ३०० ग्रॅम, क्रीम ५० मिली, बारीक तुकडे केलेले आले अर्धा टी स्पून, बारीक मिरी १ टी स्पून, सिमला मिरची लाल आणि हिरवी प्रत्येकी १, अननस चकत्या ४, साखर २ टी स्पून, मीठ चवीप्रमाणे
कृती : पनीरचे २ इंच लांबीचे आणि अर्धा इंच जाडीचे तुकडे करून घ्यावे. या तुकडय़ांना आतमध्ये मसाला भरण्यासाठी बाजूने हलकासा छेद द्यावा. २०० ग्रॅम अननसाची पेस्ट तयार करावी. उर्वरित ५० ग्रॅम अननसाचे बारीक तुकडे करावे. थोडेसे घुसळलेले दही, अननसाची पेस्ट, आले, मीठ, क्रीम, काळी मिरी यांचे एकजीव असे मिश्रण तयार करावे. अननसाचे बारीक तुकडे पनीरमध्ये भरावेत. सिमला मिरचीच्या बिया काढून टाकून तिचे २ इंचाचे तुकडे करावेत. नंतर सिमला मिरचीचे तुकडे आणि पनीर क्यूब वरील मिश्रणात मॅरिनेट करण्यासाठी १५-२० मिनटे ठेवून द्यावेत. अननसाच्या चकत्यांवर साखर आणि मीठ हलकेसे भुरभुरावे.
आता पनीर क्यूब, सिमला मिरची आणि अननसाच्या चकत्या कबाबच्या सळईमध्ये खोचाव्यात. आणि तंदूरमध्ये ६ ते ८ मिनिटांसाठी ठेवाव्यात. अथवा मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कबाबच्या सळईमध्ये खोचून २०० डिग्री तापमानावर
८-१० मिनटे ठेवाव्यात. गरम गरम सव्‍‌र्ह करावे.

फलधारी टिक्की
साहित्य:
कच्ची केळी दोन, कोथिंबीर १ कप, रताळी दोन, हिरव्या मिरच्या तीन, कांदा एक मध्यम, लिंबू अर्धा टे स्पून, मदा अर्धा कप, तेल एक कप, मीठ चवीपुरते.
कृती: कच्ची केळी आणि रताळे एकत्र शिजवून घ्यावे. साल काढून कुस्करावे. मिरची, कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून वरील मिश्रणाबरोबर एकत्र करावे. सिझिनग टाकून एकजीव करावे. त्याच्या हृदयाच्या आकाराच्या छोटय़ा छोटय़ा टिक्की बनवाव्या. मद्यामध्ये घोळून तव्यावर तांबूस रंगावर परतावे. वर चाट मसाला भुरभरून, हिरव्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावे.

शेफ विवेक ताम्हाणे
विवेक गेली २५ वष्रे शेफच्या क्षेत्रात आहेत. १९८९ साली देशपातळीवरील इंडियन कलनरी स्पर्धेत त्यांना सात पारितोषिके मिळाली होती; तर कॅनडाचे क्रिएटिव्ह शेफ अ‍ॅवार्डदेखील त्यांना मिळाले आहे. आपल्या कारकिर्दीतील बराच काळ त्यांनी भारताबाहेर काम केले आहे. भारतीय स्वादाला जगभरात चांगला वाव आहे, फक्त ते देताना बाहेरील लोकांच्या आरोग्य संकल्पनांचा विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे. सध्या ते डिश हॉस्पिटॅलिटीमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून काम पाहत आहेत.

सॅलड्सची दुनिया
सॅलड्स म्हणजे जास्त करून कच्च्या भाज्या, कडधान्ये, मोड आलेले मूग. हे सर्व पदार्थ त्वचेसाठी अत्यंत गुणकारक आहेत. तसेच सर्व सॅलडमध्ये एक गुणकारी अंश असतो, तो म्हणजे सॅलड्स खाल्ल्याने भूक वाढते व पचनास हलके असल्याने कोलेस्टेरॉल शरीरात जात नाही. त्यामुळे आपण सतत उत्साही राहतो. प्रत्येक आठवडय़ात कमीतकमी चार दिवस तरी सॅलड्स खावे. यासाठीच मी काही वेगळ्या पण सहजपणे करता येतील अशा सॅलड्सच्या रेसिपीज देत आहे. जरूर करून पाहा.

अननस-किलगड सॅलड
साहित्य :
१ मध्यम आकाराचे किलगड, ३-४ हिरव्या मिरच्या, १ सोललेला अननस, १/२ वाटी कोथिंबीर, १ चमचा चाट मसाला, मीठ चवीनुसार.
कृती : अननस-किलगडाचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्यावर बारीक केलेली हिरवी मिरची व कोथिंबीर, लिंबाचा रस व मीठ टाकावे. त्यानंतर त्यावर चाट मसाला टाकून सव्‍‌र्ह करावे. हे फ्रुट चाट म्हणूनही थंडगार सव्‍‌र्ह करता येते.

बार्ली- हिरवे वाटाणे सॅलड
साहित्य : १/२ वाटी बार्ली, १ वाटी हिरवे वाटाणे, १ चमचा काळीमिरी पावडर, ३-४ पातीचे कांदे, १ टोमॅटो, १ चमचा लिंबाचा रस, २-३ हिरव्या मिरच्या, १ वाटी दूध, मीठ चवीनुसार, १ चमचा मध.
कृती : बार्ली एक वाटी दुधात आदल्या रात्री भिजवत ठेवावी. बार्ली भिजल्यानंतर थोडीशी सुकी करून घ्यावी. बार्ली व वाटाणे थोडेसे वाफवून घ्यावेत. एका भांडय़ात काळीमिरी, बारीक पातीचा कांदा, बारीक केलेला टोमॅटो, बारीक केलेली हिरवी मिरची, लिंबाचा रस टाकून त्यात बार्ली व वाटाणे टाकून सर्व हळुवार मिक्स करून घ्यावे. सर्वात शेवटी मीठ व मध चवीनुसार टाकून फ्रीजमध्ये थंड करून, थंड सव्‍‌र्ह करावे. हे सॅलड लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे.

कॉर्न-सफरचंद सॅलड
साहित्य :
१ वाटी कॉर्न, १ सफरचंद, १/२ चमचा काळीमिरी पावडर, १/२ चमचा लिंबाचा रस, १/२ जुडी कोथिंबीर, १-२ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, १ चमचा साखर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल.
कृती : कॉर्न थोडेसे उकळवून घेऊन त्यातील पाणी काढून टाकावे. एका भांडय़ात काळीमिरी, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, साखर आणि ऑलिव्ह तेल टाकून मिश्रण तयार करावे. सफरचंदाचे छोटे तुकडे करून त्यावर हे मिश्रण टाकावे. त्यावर कॉर्न व मीठ टाकून थंड करून सव्‍‌र्ह करावे.

पालक-बीट कोशिंबीर
साहित्य : १ कांदा, २ टोमॅटो, २ मोठे उकडलेले बीट, १ जुडी पालक (बेबी पालक), १/२ चमचा जिरे पावडर, १/२ वाटी, कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, १ चमचा लिंबाचा रस.
कृती : बेबी पालक स्वच्छ धुवून घ्यावा. कांदा टोमॅटो, बीट यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यात जिरं पावडर, बारीक कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबाचा रस, मीठ टाकून मिक्स करावे. बेबी पालकमध्ये पानं खूप छोटी असतात. हे सॅलड विटामिन व आयर्नयुक्त असल्यामुळे भूक वाढविणारे आहे.

स्टार शेफ निवडणार तुमच्या रेसिपी
उत्तमोत्तम आणि नवनवीन खाद्यपदार्थ खायला आणि करायला कुणाला आवडत नाही? किंबहुना खाणे आणि खिलवणे हा माणसाचा मूलभूत गुणधर्मच आहे. अगदी पुराणकाळापासून ते आजपर्यंत आपल्याकडे खाद्यसंस्कृतीचे वर्णन आढळते. आपणदेखील आपल्या आवडीनुसार त्यात भर घालत असतो. वेगवेगळे प्रयोग करत असतो. काही तरी नवे करून आपल्या कुटुंबीयांना, मित्र मत्रिणींना खिलवत असतो. म्हणूनच तुमची वेगळी डिश जगासोबत शेअर करण्याची एक अनोखी संधी लोकप्रभाह्ण उपलब्ध करून देत आहे. या नव्या वर्षांत ‘लोकप्रभा’तील एक पान सजणार आहे ते आपण पाठवलेल्या वेगळ्या डिशने. चला तर मग, तुमची आगळीवेगळी, रुचकर रेसिपी आम्हाला पाठवून द्या. सोबत रेसिपीचा फोटोही पाठवायला विसरू नका. तुमच्या रेसिपीजमधून उत्तम रेसिपीची निवड करणार आहेत प्रसिद्ध स्टार मराठी शेफ.
रेसिपी शक्यतो टाइप करून पाठवावी. टाइप करणे शक्य नसेल तर लिहूनही पाठवू शकता.
लोकप्रभाह्ण, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०