Lokprabha.com
११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य
दि. ४ ते १० जानेवारी २०१३
 

मेष आठवडय़ाच्या शेवटी राहू राशीबदल करून सप्तमस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील एक ते दीड वर्ष असेल. स्वत:च्या स्वास्थ्याकडेही लक्ष द्यावे लागेल. या आठवडय़ात एखादे मोठे स्वप्न किंवा कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. नोकरीमध्ये विविध पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. महिला पशाची पर्वा न करता स्वत:ची इच्छा पूर्ण करून घेतील. कलाकारांना नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.

.......................................................

वृषभ राहू राशीबदल करून षष्ठमस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे आता त्याचे वास्तव्य पुढील दीड वर्ष असणार आहे. व्यक्तिगत जीवनात मित्रमंडळी, नातेवाईक यांची असूया जाणवत राहील. प्रकृतीच्या तक्रारी असतील तर त्यावर वेळीच उपाययोजना करा. या सप्ताहात प्रतिकूल वातावरणातून प्रगती करायची तयारी ठेवा. व्यापारात सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागतील. वाढते खर्च हा एक तणाव निर्माण करणारा विषय असेल. नोकरीमध्ये सहकाऱ्याची अनुपस्थिती किंवा इतर कारणांमुळे कामाचा भार वाढेल. महिलांनी मन शांत ठेवावे
.......................................................

मिथुन रवी अष्टमस्थानामध्ये येईल. राहू हा ग्रह राशीबदल करून पंचमस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य आता दीड वर्ष राहील. या संपूर्ण कालावधीमध्ये प्रिय व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी किंवा प्रगतीविषयी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. मुलांकरता पसे खर्च होतील. नोकरी, व्यवसाय व व्यक्तिगत जीवनात नशिबापेक्षा प्रयत्नांवर विसंबून राहणे प्रशस्त ठरेल. हा आठवडा दगदग धावपळीचा जाईल. पण महत्त्वाची कामे तातडीने उरका. महिलांनी प्रकृतीला झेपेल तेवढेच काम करावे. तरुणांनी धाडस टाळावे.
.......................................................

कर्क शुक्र नुकताच षष्ठमस्थानात आलेला आहे. सप्ताहाच्या शेवटी रवी सप्तमस्थानात प्रवेश करेल. तो तुम्हाला नवचतन्य देईल. राहू राशीबदल करून चतुर्थस्थानात येईल. तेथे त्याचे वास्तव्य दीड वर्ष राहील. जुनी प्रॉपर्टी विकून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावेसे वाटेल. काही वडिलोपार्जित वाद असतील तर त्याला नव्याने तोंड फुटेल. या आठवडय़ात व्यापार-धंदा आणि नोकरीच्या ठिकाणी तुमचा उत्साह अपूर्व राहील. घरामध्ये कामाच्या वेळी तुमची खुशामत केली जाईल. महिलांना याचा त्रास होईल. तरुणांनी योग्य मित्रांशी संगत करावी.
........................................................

सिंह आवडत्या व्यक्तींचा सहवास आणि प्रगतीच्या दृष्टीने मिळणाऱ्या संधीचा फायदा या दोन्ही गोष्टी आपल्याला उत्तेजित करत असतात. तशा या आठवडय़ामध्ये घडल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगातील महत्त्वाच्या गाठीभेटी घ्या. छोटा प्रवास त्या निमित्ताने होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमच्या कौशल्याला सुयोग्य संधी मिळेल. या आठवडय़ात राहू राशीबदल करून तृतीयस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य आता पुढील दीड वर्ष असेल. या दरम्यान तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही अद्वितीय कामगिरी करू शकाल.
.......................................................

कन्या या सप्ताहात नोकरी आणि व्यवसायाच्या कामामध्ये तुमची कार्यतत्परता आणि वेग वाखाणण्याजोगा असेल. कारखानदारांना जादा भांडवलासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरीमध्ये कामाचा वेग हळूहळू वाढण्याचे संकेत मिळू लागतील. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या प्रश्नात लक्ष घालावे लागल्यामुळे नेहमीच्या कामाकडे थोडेसे दुर्लक्ष होईल. या सप्ताहात राहू राशीबदल करून धनस्थानात प्रवेश करणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य पुढील दीड वर्ष आहे. या कालावधीमध्ये तुमच्या नतिक आणि घरगुती जबाबदाऱ्या वाढणार आहेत. .......................................................

तूळ तुमच्या आनंदी आणि उत्साही राहण्याच्या स्वभावाला पूरक ग्रहमान लाभत आहे. या सप्ताहात राहू राशीबदल करून तुमच्याच राशीत येणार आहे. तेथे त्याचे वास्तव्य पुढील दीड वर्ष असेल. कर्मकारक ग्रह शनी त्याच्याच जोडीला आहे. व्यवसाय-धंदा आणि नोकरीमध्ये स्वप्न व सत्य वेगळे असते याची जाणीव होत राहील. घरामध्ये नतिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. प्रकृतीच्या तक्रारी असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. या आठवडय़ात नोकरी-व्यवसायातील महत्त्वाची कामे उरका. घरामध्ये तुमची कल्पकता उपयोगी पडेल.
.......................................................

वृश्चिक तुमच्या स्वभावामध्ये अनेक छटा असतात. जशी सभोवतालची परिस्थिती असते त्याप्रमाणे तुम्ही आपले रागरंग दाखवता. राहू या आठवडय़ात राशीबदल करून व्ययस्थानात प्रवेश करणार आहे. त्याचे तेथील वास्तव्य आता पुढील दीड वर्ष असेल. त्याच्या जोडीला शनीही तेथेच राहणार आहे. या दरम्यान ‘कर्तव्य हीच काशी’ हे तुमचे ब्रीदवाक्य ठेवा. व्यापार-नोकरी आणि व्यक्तिगत अनपेक्षित कारणांकरता उद्भवणाऱ्या प्रश्नांकरता वेळ, पसा आणि शक्ती राखून ठेवा. पण या दरम्यान गुरू तुम्हाला मनोधर्य देईल.
.......................................................

धनू धनस्थानात प्रवेश करणारा रवी तुमची आर्थिक स्थिती भक्कम करायला उपयोगी पडेल. सभोवतालची परिस्थिती तुमच्या आनंदी आणि उत्साही राहण्याच्या स्वभावाला पूरक असल्यामुळे अनेक गोष्टी हाताळण्याचा मोह होईल. व्यापारात जाहिरात, प्रसिद्धी आणि जनसंपर्क याला चांगला प्रतिसाद मिळेल. नवीन अशिल किंवा गिऱ्हाईक मिळेल. नोकरीत चांगली कामगिरी कराल. राहू राशीबदल करून लाभस्थानात येईल. तेथे तो पुढील दीड वर्ष राहील. हा संपूर्ण कालावधी आर्थिक दृष्टीने चांगला ठरेल.
.......................................................

मकर व्ययस्थानातील शुक्र तुमचे खर्च वाढवणार आहे. पण ते चांगल्या कारणांनी असल्यामुळे त्याचे वाईट वाटणार नाही. रवी आता तुमच्याच राशीत येणार आहे. तो तुम्हाला अधिक आशावादी बनवेल. या आठवडय़ात राहू राशीबदल करून दशमस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे वास्तव्य पुढील दीड वर्ष असेल. हा राहू यश आणि प्रतिष्ठा या दोन्ही दृष्टीने पूरक ठरेल. वडील किंवा त्यांच्या संबंधीचे इस्टेटीचे प्रश्न धसास लागतील. या सप्ताहाचे ग्रहमान व्यवसाय-नोकरी आणि सांसारिक जीवनाच्या दृष्टीने समाधानकारक आहे.
.......................................................

कुंभ शुक्र नुकताच राशीबदल करून लाभस्थानात आलेला आहे. रवी सप्ताहाच्या शेवटी व्ययस्थानात प्रवेश करेल. जेव्हा इतरांकरता पसे खर्च करण्याची वेळ येते त्यावेळेला बजेटचा विचार तुमच्या मनात येतो. व्यवसाय-उद्योगामध्ये गिऱ्हाईकांना विविध योजनांतून आकर्षति कराल. नोकरीमधल्या सुखसुविधांचा फायदा घ्याल. या आठवडय़ात राहू राशीबदल करून भाग्यस्थानात प्रवेश करेल. तो पुढील दीड वर्ष तेथेच राहील. हा राहू सर्वागीण प्रगतीला साथ देईल. नवीन हितसंबंध विशेष फलदायी ठरतील.
.......................................................

मीन सप्ताहाच्या शेवटी रवी लाभस्थानात प्रवेश करणार आहे. व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रात कष्टांनंतर नवीन उपक्रमाची सुरुवात होईल. नोकरीमध्ये वेगळी पद्धत अवलंबून शॉर्टकट मिळवू शकाल. या आठवडय़ात राशीबदल करून राहू अष्टमस्थानात प्रवेश करेल. तेथे त्याचे भ्रमण आता पुढील दीड वर्ष असेल. या दरम्यान तुमची प्रकृती, सांसारिक जीवनातील अडथळे, वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधीचे प्रश्न आणि अनपेक्षितरीत्या उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही सतर्क राहणे चांगले. नोकरी-व्यवसायात शक्यतो बदल न करता जैसे थे ठेवण्याचा प्रयत्न करा. .......................................................

विजय केळकर Email : response.lokprabha@expressindia.com