४ जानेवारी २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ : कायदा करताय.. जरा सांभाळून !
भविष्य विशेष : भविष्याचे भूतकाळातले कुतूहल
भविष्य २०१३ : जन्मतारीख सांगतेय तुमचं भविष्य
भविष्य विशेष : वाटा भविष्याच्या

भविष्य विशेष : २०१३ मध्ये काय घडणार?

भविष्य विशेष : तळपायावरून भविष्य
भविष्य विशेष : टॅरो कार्ड आणि भविष्य
फ्लॅशबॅक : भविष्य नावाचा बंद लिफाफा
भविष्य विशेष :वास्तुशास्त्र म्हणजे काय?
नक्षत्रांचे नाते : हस्त - २
कोकणचो डॉक्टर : सुक्या गजाली..
सिनेमा आशिया : नीती चकवा!
गूज हुंदक्यांचे : भविष्यातले हुंदके टाळण्यासाठी..
साधनचिकित्सा : जागृत वामकुक्षी

लग्नाची वेगळी गोष्ट : मंगळ

जंगलवाचन : बिबळ्याने गुंगारा दिला, पण..
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य विशेष
भविष्याचे भूतकाळातले कुतूहल

‘अर्थार्जने सहाय:पुरुषाणामापदर्णवे पोत: यात्रसमये मत्रीजातकमहापाय नास्त्यपर:’ सारावली या कल्याणवर्मा याने लिहिलेल्या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे ‘ज्योतिषशास्त्र किंवा होराशास्त्र हे मनुष्याला अर्थार्जनात मदत करते तसेच ते संकटसमयी तारून नेणाऱ्या नौकेसारखे असते. मार्गक्रमणा करत असता वाट दाखवण्यासाठी याच्यापरता उत्तम मंत्री नाही’असे म्हणतात की, मनुष्य एकतर भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमतो तसेच त्या आठवणींनी त्रस्तही होतो, भविष्यकाळाची स्वप्ने रंगवण्यात रंगलेला असतो किंवा त्याच्या काळजीने ग्रासलेला तरी असतो. या ओढाताणीत तो वर्तमानकाळाचे भान सदैवच हरवून बसलेला असतो. त्याच्या या स्वभावातच त्याच्या दु:खाचे मूळ दडलेले असते. म्हणूनच एरवी विज्ञानाची कास धरणारी, अवैज्ञानिक परंपरांपासून आवर्जून दूर राहाणारी आधुनिक, सुशिक्षित व्यक्तीसुद्धा दैनंदिन जीवनातील समस्यांनी हतबल झाली म्हणजे भविष्यात डोकावून पाहण्याचे मार्ग धुंडाळायला लागते.

भविष्य विशेष
भविष्य २०१३ : जन्मतारीख सांगतेय तुमचं भविष्य
प्रत्येक राशीत सूर्य एक महिना असतो व अशा बारा राशी बारा महिन्यांचे नेतृत्व करत असतात. या प्रत्येक राशीचा एक ग्रह स्वामी असतो व त्या ग्रहाच्या अमलाखाली एक विशिष्ट अंक असतो. तो अंक आपल्या जन्मतारखेइतकाच महत्त्वाचा असतो.
खालील तक्त्याप्रमाणे रास, महिना व ग्रह आणि अंक
१. मेष - २१ मार्च ते १९ एप्रिल - ९ धनात्मक
२. वृषभ - २० एप्रिल ते २० मे - ६ धनात्मक
३. मिथुन - २१ मे ते २० जून - ५ धनात्मक
४. कर्क - २१ जून ते २० जुलै - २ व ७ धनात्मक
५. सिंह - २१ जुलै ते २० ऑगस्ट - १ व ४ धनात्मक
६. कन्या - २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर - ५ ऋणात्मक
७. तूळ - २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर - ६ ऋणात्मक
८. वृश्चिक - २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर - ९ ऋणात्मक
९. धनु - २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर - ३ धनात्मक
१०. मकर - २१ डिसेंबर ते २० जानेवारी - ८ धनात्मक
११. कुंभ - २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी - ८ ऋणात्मक
१२. मीन - २० फेब्रुवारी ते २० मार्च - ३ ऋणात्मक


भविष्य विशेष
वाटा भविष्याच्या

मनुष्य हा मुळातच जिज्ञासू प्राणी आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस आहे. त्याला अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. अनेक गोष्टींचा शोध घेतो. सापडलेल्या गोष्टींचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या जिज्ञासूपणातून अनेक शास्त्रे विकसित होत गेली. ज्योतिषशास्त्र हे याचं उत्तम उदाहरण आहे. निसर्गातील अनेक अनाकलनीय घटनांचा अर्थ लावणारा माणूस स्वत:चे भविष्य जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो. आपला भविष्यकाळ काय आहे हे जाणून घेण्यासाठी हातावरच्या रेषांपासून ते रात्री पडणाऱ्या स्वप्नांपर्यंत अनेक गोष्टींचे अर्थ लावायला माणसाने सुरुवात केली. संख्यांपासून ते आकाशातील ताऱ्यांपर्यंत सर्व गोष्टींचा अभ्यास त्याने केला. भविष्याचा शोध घेताना संख्याशास्त्राच्या गर्भातून गणिताचा जन्म झाला असे काही जणांचे मत आहे, मानणारे असेही मानतात की खगोलशास्त्राचा जन्मदेखील ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच झाला आहे.

भविष्य विशेष
२०१३ मध्ये काय घडणार?

वर्ष २०१२. मुठीतल्या वाळूप्रमाणे हे वर्ष हातातून निसटून गेले आहे. जाता जाता त्याने आपल्या उरात अनेक जखमा केल्या आहेत. त्या जखमा सुकतील पण त्यांचे व्रण तसेच राहणार आहेत. दरवर्षी असते ती भीती या वर्षीही खरी ठरली. कितीतरी मोठमोठय़ा माणसांना, आपल्या आवडत्या व्यक्तींना २०१२ ने आपल्यापासून दूर नेलं. कायमचं. त्यात नेते होते, अभिनेते होते. गायक होते, निर्माते होते. २०१२ या वर्षांने, म्हणजे काळाच्या या तुकडय़ाने कितीतरी नावं कायमची पुसून टाकली. २०१२ ने जाता जाता सत्तेच्या खेळात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांचीही वाट लावली. हवेत उडणारे काहीजण हवेतच गायब झाले तर काहीजण जमीनदोस्त झाले. नवनवीन घटना घडल्या. मीडियावर ब्लॅक मेलिंगचे आरोप झाले. सुप्रीम कोर्टात अनेक राजकीय नेत्यांचं वस्त्रहरण झालं. केजरीवाल यांच्या धमाक्यापुढे बडेबडे घायाळ झाले. तर दुसरीकडे सरकार पाडण्याची मनीषा बाळगणाऱ्या टीम अण्णाचे स्वत:चेच तुकडे झाले. नवीन वर्षांच्या सुरुवातीला शुक्राच्या तुळेत शनी आणि राहू प्रवेश करत आहेत. शुक्र स्वत: मंगळाच्या वृश्चिकेमध्ये आहे. बुध आणि सूर्य गुरूच्या राशीत म्हणजेच धनूमध्ये आहेत. केतू मंगळाच्या राशीत, मेषेत आहे. नवीन वर्षांचा सूर्य नवे प्रश्न, नव्या हुरहुरी घेऊन येतोच पण तो नवी उमेदही आणतो. पण पुढच्या वर्षांचे संकेत नेहमीपेक्षा थोडे जास्तच चढउतार दाखवत आहेत.

भविष्य विशेष
टॅरो कार्ड आणि भविष्य

लोकांना आपल्या भविष्यात काय मांडून ठेवले आहे हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता असते. किंबहुना उद्या काय होणार ते आज जाणून घेण्यासाठी लोक सदैव उतावीळ असतात. याच जिज्ञासेपोटी लोक ज्योतिषांकडे जातात. कधी एखाद्या समस्येने गांजून, तर कधी नेमका काय निर्णय घ्यावा हे ठरत असल्यामुळे लोकांना समस्येचे उत्तर हवे असते, कधी कधी फक्त मार्गदर्शन हवे असते. अर्थात काळाच्या ओघात ज्योतिषात अनेक विद्या शाखा विकसित झाल्या. देश, प्रांत, समूहाप्रमाणे नवनवे प्रयोग केले गेले. असाच एक अनोखा प्रकार म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग. भारतात पारंपरिक पद्धतीने म्हणजेच हस्तरेषा शास्त्र आणि फलज्योतिष या पद्धती लोकप्रिय असल्या तरी, त्यांची जागा सध्या हळूहळू का होईना पण टॅरो कार्ड रीडिंग व क्रिस्टल बॉल गेिझग या पद्धती घेत आहेत. आजच्या आधुनिक जगात या सर्व पद्धतींना विज्ञानाच्या आधारे मान्यता नसली, तरी वर्तविलेल्या भविष्याचा पडताळा मिळत असल्यामुळे लोक खरेच आश्चर्यचकित होत असतात.

भविष्य