Lokprabha.com
७ सप्टेंबर २०१२
मथितार्थ

कव्हरस्टोरी
छुप्या शत्रूसंगे युध्द आपुले सुरू
रासायनिक, जैविक अस्त्रांचे मृत्युघोष
बनावट नोटांचा भस्मासुर

थरार

सार्थक
अर्जुन पुरस्काराने संजीवनी - कविता राऊत
स्वप्न ऑलिम्पिक पदकाचं... - नरसिंग यादव

संशोधन
स्मरण
मुलाखत
संवाद
फ्लॅशबॅक
साधनचिकित्सा
पुस्तकांचं जग
वाचू काही
नक्षत्रांचे नाते
जाहिरातीचं जग
कोकणचो डॉक्टर
मातीचं आकाश
गूज हुंदक्यांचे
सिनेमा आशिया
दुर्गाच्या देशा
पर्यटन
शॉपिंग
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य
दि. ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०१२
 

मेष कृतीवर तुमचा भर असतो. याचे बऱ्याच वेळेला फायदे मिळतात. या आठवडय़ात ग्रहमान या दृष्टीने उपयोगी पडणारे आहे. व्यवसाय- उद्योगात आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्याकरता धाडस करावेसे वाटेल. नोकरीमध्ये तुमच्या कार्यतत्परतेला एखाद्या विशेष स्पर्धेमुळे किंवा आव्हानामुळे चालना मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगले संकेत मिळतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नामुळे मनाला थोडीशी रुखरुख वाटेल. नवीन जागा किंवा वाहन खरेदीसंबंधीचे निर्णय घाईने घेऊ नका.
.......................................................

वृषभ नेहमीच्या कामामध्ये तुम्हाला कोणीही ढवळाढवळ केलेली चालत नाही. आपण बरे आणि आपले काम बरे असा तुमचा दृष्टिकोन असतो. पण एकदा व्यावसायिक कामातून मुक्तता झाली की मग मात्र आवडत्या व्यक्तीची साथसंगत तुम्हाला हवी असते. ती न मिळाल्यामुळे जीवन एकसुरी झाल्याप्रमाणे वाटेल. व्यापारातील बराच वेळ, नियोजन आणि भांडवलाची उपलब्धता करणे यात जाईल. नोकरीत अधिकार गाजवण्याकडे कल राहील. नवीन जागा, वाहन खरेदी करताना त्यातील आर्थिक बोजांचा विचार करा.
.......................................................

मिथुन कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा तेच काम तुम्ही स्वत: केले तर कामाचा दर्जाही चांगला राहील आणि वेगही मनाप्रमाणे असेल. व्यावसायिकांना नेहमीच्या दैनंदिनीपेक्षा ज्या नवीन योजना अमलात आणायच्या आहेत त्यावर लक्ष केंद्रित करावेसे वाटेल. जाहिरातबाजी आणि जनसंपर्क यामुळे मालाच्या विक्रीत व फायद्यात वाढ होईल. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या जादा कामाचे पैसे मिळतील. घरामध्ये काही विचार इतर सदस्यांशी जमणार नाहीत पण थोडीशी तडजोड केलीत तर सगळ्यांचाच आनंद वाढेल.
.......................................................

कर्क जशी परिस्थिती असते त्यानुसार तुम्ही तुमचे धोरण बदलत राहता, त्यामुळे ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण होते. ज्यांनी तुम्हाला मदतीचे आश्वासन दिले होते त्यांच्याकडून मदत न मिळाल्यामुळे थोडीशी गैरसोय होईल. व्यापार उद्योगात प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदत मिळवण्यासाठी त्यांच्या कलाने वागायला लागेल. खेळत्या भांडवलासाठी ताबडतोब प्रयत्न करा. नोकरीमध्ये कामही भरपूर कराल आणि मौजमजाही कराल. त्यामुळे तणाव असा जाणवणार नाही. घरामध्ये जोडीदाराशी तात्त्विक मतभेद असतील पण त्यावर इतरांच्या मध्यस्थीमुळे त्यात मार्ग मिळेल.
.......................................................

सिंह कोणाच्याही मदतीशिवाय तुम्हाला काम करायचे आहे. व्यापार- उद्योगातील कामाचे उद्दिष्ट मोठे असेल. भव्यदिव्य कल्पनेचा तुम्ही पाठपुरावा कराल. न टाळता येणाऱ्या आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याच्या कामाकरिता पैसे खर्च होतील. नोकरीमध्ये एखाद्या सहकाऱ्याची अनुपस्थिती असल्यामुळे तुम्हाला जादा काम करावे लागेल. घरामध्ये मौजमजेच्या वेळेला सर्वजण पुढे असतील. पण कामाच्या वेळेला मात्र कोणाचाही उपयोग होत नाही हे प्रकर्षांने जाणवेल. कलाकारांना त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करावी लागेल.
.......................................................

कन्या तुमच्या सभोवतालचे वातावरण काही कारणाने अचानक बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या हितसंबंधांत थोडीशी संदिग्धता असेल. व्यवसाय-धंद्यातील उत्पन्नाचे प्रमाण वाढवण्याकरता व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण किंवा नूतनीकरण करावेसे वाटेल. त्याकरता बँक किंवा इतर मार्गाने कर्ज घेणे भाग पडेल. नोकरीमध्ये भविष्यातील प्रगतीकरता मान मोडून काम करण्याची तुमची तयारी असेल. घरामध्ये वातावरण आनंददायी असेल. तरुणांना नवीन मित्र-मैत्रिणींचे आकर्षण वाटेल.
.......................................................

तूळ मौजमजा करण्याच्या वेळी सर्वजण पुढे येतात, पण कामाच्या वेळी मात्र आपण एकटेच असतो. त्यातून बाहेर पडून ठरविलेल्या उद्दिष्टाकरता तुम्हाला आता सिद्ध व्हायचे आहे. जास्त चिकित्सा न करता ज्या व्यक्तींची जशी साथ मिळेल तशी ती घेऊन प्रगती करत राहा. नोकरीमध्ये नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखादी जादाची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. पण तुम्ही स्वत:च्या फायद्याकरता ती स्वीकाराल. घराची रंगरंगोटी सजावट करताना बजेटचे भान ठेवा. तरुणांना एकाकीपणाची जाणीव होईल.
.......................................................

वृश्चिक प्रत्येक व्यक्ती आशावादी असते. छोटीशी चांगली घटनाही आपल्याला उत्तेजित करते. व्यापार- उद्योगात पैशाची फारशी साथ नसूनही तुम्ही त्याची कसर इतर मार्गाने भरून काढाल. तात्पुरते कर्ज काढून खेळते भांडवल उपलब्ध करून घ्याल. नोकरीमध्ये कामात कोणाचीही साथ मिळणार नाही. पण तुम्ही निश्चयाच्या बळावर ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण कराल. घरामध्ये तुमच्या एखाद्या निर्णयाला सुरुवातीला विरोध असेल पण नंतर तो हळूहळू निवळू लागेल. तरुणांना सामूहिक कामात भाग घ्यावासा वाटेल. कलाकारांना नवीन संधी दृष्टिक्षेपात येतील.
.......................................................

धनू ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून राहिले असाल त्यांनी आयत्या वेळेला माघार घेतल्यामुळे तुमची धावपळ होईल. पण अनपेक्षित व्यक्तींकडून साथ मिळाल्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. व्यापारीवर्गाला नजीकच्या भविष्यातील मोठे बेत सफल करण्याकरता विविध मार्गानी पैसे उपलब्ध होतील. पण त्यांनी परतफेडीकरता गरजेपेक्षा थोडीशी जास्त मुदत मागून घ्यावी. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या मतलबाकरता तुम्हाला हरबऱ्याच्या झाडावर चढवतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एकमत होणे कठीण होईल.
.......................................................

मकर कामाची वेळ आली की सगळेजण वेगवेगळी कारणे देतात. पण मेहनतीची तुमची नेहमीच तयारी असल्यामुळे या गोष्टीकरता न थांबता तुम्ही पुढे जात राहाल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढवण्याकरता पूर्वतयारी कराल. त्यात व्यावसायिक जागेचे नूतनीकरण वगैरे गोष्टींचा समावेश असेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. घरामध्ये तरुण आणि वयोवृद्ध व्यक्तींच्या विचारांतील तफावत जाणवेल. कलाकारांना नवीन कार्यक्रम मिळतील.
.......................................................

कुंभ एकीकडे परिस्थिती सुधारते आहे ही गोष्ट तुम्हाला उल्हसित करेल तर दुसरीकडे छोटे-मोठे अडथळे निरुत्साही बनवतील. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवून प्रगती करत राहा. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती हळूहळू सुधारेल. त्यासाठी जादा भांडवल जमा करावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ फारशी मदत किंवा मार्गदर्शन न देता तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील हे एक आव्हान समजून काम करा. घरामध्ये खर्चिक बेत इतरांकडून सुचवले गेल्यामुळे पैशासंबंधी चिंता वाटेल.
.......................................................

मीन प्रत्येक गोष्ट मिळविण्याकरता आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागत आहे असे तुम्हाला वाटेल. सध्या तुमचे धोरण कोणालाच बोलून दाखवू नका. संकटकाळात खरे हितचिंतक आणि साथीदार यांच्यातील फरक लक्षात येतो. तसा अनुभव तुम्हाला येईल. व्यवसाय-धंद्यातील महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार स्वत:च हाताळा. नोकरीमध्ये काम करूनही वरिष्ठांकडून त्याची दखल न घेतली गेल्याने वाईट वाटेल. घरामध्ये आपल्या भावनेला फारसे कोणीच महत्त्व देत नाही असे जाणवेल. प्रकृतीचे चढउतार जाणवतील.
.......................................................

विजय केळकर Email : response.lokprabha@expressindia.com