६ एप्रिल २०१२
मथितार्थ
  कुतूहल
  स्टार्टर
केल्याने रेषाटन

IPL विशेष
IPL आणि मी
IPL पर्दाफाश
IPL सबकुछ
IPL संस्कृती
IPL यशाचा फॉम्र्युला
IPL ब्रँडिंग
IPL चीअरफुल
IPL इंटरॅक्शन
IPL स्पॉटलाइट
IPL पुणे
IPL विवाद

आठवणी ग्रेसच्या
दुर्गाच्या देशा
सांस्कृतिक
सिनेआशिया
पर्यावरण
क्रिकेटनामा
जंगल वाचन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पर्यावरण

पुन: गिधाडे..
सुहास जोशी

गिधाडे सृष्टीचक्रातील एक अतिशय महत्वाचा घटक. जंगलातील, गावाजवळ टाकण्यात येणारी मृत जनावरे हे त्याचे मुख्य खाद्य. त्याच्या या कृतीमुळे न कळत तो निसर्गातील एक महत्वाची भूमिका बजावतो ती म्हणजे सफाई कामगाराची. अर्थात वरील आकडेवारी पहिली असता त्याचा आजचा प्रवास कसा सुरु आहे याची कल्पना येऊ शकेल.

सन १९९०-९२ च्या दरम्यान गिधाडांच्या संख्येत तबल ९९०% इतकी घट.
मृत जनावराच्या शरीरातील Diclofenac या औषधामुळे गिधाडांवर परिणाम होत असल्याच निष्कर्ष.
२००६ मध्ये जनावरांच्या औषधात डायक्लोफिनेकला पूर्ण बंदी
२००२-२००७ गिधाडांच्या मृत्यूचे प्रमाण ४०%
२०११ गिधाडांच्या मृत्युच्या प्रमाणात घट १८%
याच दरम्यान गिधाडांना अन्नाचा तुटवडा देखील भासू लागला.
गिधाडांना काही प्रमाणात खाद्य पुरवणारी केंद्रे ((Vulture Restaurant) सुरु करण्यात आली...
हा सारा घटनाक्रम आठवण्याचे कारण म्हणजे दोन बातम्या. मुरुडजवळील फणसाड अभयारण्यात मागील महिन्यात तीन गिधाडांची पिल्ले आढळून आली. तर दुसरी बातमी मागच्याच आठवड्यातील ’बेंगलोर नजीकच्या Ramadevarabetta राखीव जंगलातील ‘रामनगरम’ (शोले चित्रपटाच्या चित्रीकरणाची जागा) येथील २२ चौरस किलोमीटरची जागा आता देशातील पहिली Vulture Sanctury म्हणून घोषित करण्यात आली आहे. गिधाडांच्या संरक्षण संवर्धनाच्या बाबतीत घडून येणाऱ्या अनेक उपक्रमातील या दोन आशादायक अशा घटना.
गिधाडे सृष्टीचक्रातील एक अतिशय महत्वाचा घटक. जंगलातील, गावाजवळ टाकण्यात येणारी मृत जनावरे हे त्याचे मुख्य खाद्य. त्याच्या या कृतीमुळे न कळत तो निसर्गातील एक महत्वाची भूमिका बजावतो ती म्हणजे सफाई कामगाराची. अर्थात वरील आकडेवारी पहिली असता त्याचा आजचा प्रवास कसा सुरु आहे याची कल्पना येऊ शकेल.
फणसाड वन्यजीव अभयारण्यात गिधाडांचे अस्तित्व असण्याचे पूर्वी अनेक दाखले मिळाले आहेत. २००७ च्या वन्यजीव (वाघांच्या ) प्रगणने दरम्यान तेथे गेलेल्या स्वयंसेवकांना गिधाडे आढळून आली होती. त्यावर लोकसत्ताने सर्वप्रथम बातमी केली होती. त्यानंतर देखील तेथील गिधाडांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. पण गिधाडांच्या संरक्षण संवर्धनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणीमध्ये सद्यस्थितीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अन्नाची कमतरता. ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत काही गावांनी मेलेली जनावरे उघड्यावर टाकणे बंद केले, तसेच मृत्यू पंथाला लागलेले जनावर खाटिकखान्याकडे नेण्याकडे देखील कल वाढल्यामुळे गिधाडांना अन्न मिळणे मुश्कील होऊ लागले आहे. या कालावधीत देखील फणसाड येथे गिधाडांचे अस्तित्व होतेच. म्हणूनच त्यांच्या संवर्धनासाठी वन खात्याने यासाठी एक योजना कार्यन्वित केली ती म्हणजे Vulture Restaurant. २०१० च्या डिसेंबरमध्ये उपवन संरक्षक डॉ. गुजर यांनी हि संकल्पना मांडली. अर्थात गिधाडांना अन्न पुरविण्याचे ठिकाण. फणसाड अभयारण्यातील चिखलगान परिसरातील चाकाचा माळ येथे गिधाडांसाठी मेलेली जनावरे ठेवण्याची हि योजना आकार घेऊ लागली. मागील वर्षी म्हणजेच जानेवारी पासून येथे अशा प्रकारे मृत जनावरे टाकण्यात येऊ लागली. साधारण २ चौरस किलोमीटरचा परिसर गिधाडासाठी संरक्षित करण्यात आला. येथेच पाण्याचीपण सोय करण्यात आली आहे. त्याचा परिणाम लवकरच दिसू लागला.गिधाडांचा वावर वाढू लागला. मध्यंतरी काहीसे थंडावलेले हे काम पुन: उपवन संरक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरात सुरु झाले. आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करून मृत जनावरे गिधाडांसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले. कांबळे यांनी लोकप्रभाला सांगितले ‘आमच्या आवाहनाचा परिणाम चांगला झाला. तसेच आम्ही मृत जनावराला Diclofenac दिले गेले नाही याची पशु वैद्यकाकडून तपासणी करून मगच गिधाडांना देत आहोत. त्यामुळे आता येथील गीधादना येथे अन्न मिळते याची खात्री झाली आहे.’ मुख्य म्हणजे या सा-याचे चांगले दस्त ऐवजीकरण वनरक्षक नाईक व सहायक वनरक्षक पाटील यांनी यांनी केले आहे. गिधाडांनि घरटे बांधल्याची नोंद, पिल्लांची नोंद ठेवण्यात आली आहे.

गिधाडं संरक्षणाची गरज.. - आदेश शिवकर
गिधाडांना जर अन्न म्हणजेच मृत गुर-ढोरे मिळत नसतील तर सृष्टी चक्रात घाणच राहत नाही असा अर्थ होतो. मग अशा वेळेस गिधाडे संरक्षण करण्यासाठी उपक्रम करायची गरज आहे का?
‘गिधाडे मुख्यत: जंगलातील मृत जनावरांवर उपजीविका करत, आपण म्हणजेच मानव जातीने अतिशय हव्यासाने निर्दयपणे जंगलातील प्राणी वैभव नष्ट केले आहे, त्यामुळेच ती जंगलाबाहेर गावातील जनावरांवर जगू लागली. तेथही आपण Diclofenac वापरून त्यांचे अस्तित्वच संपविण्यापर्यंत कृत्य केले आहे. त्यांच्या सर्व नसíगक कृत्यांवर आपण आजवर घाला घातला आहे, गिधाडांची सृष्टीचक्रातील अन्य भूमिका अजून काय आहे हे आपणास उलगडले नाही त्यामुळे आताच त्याचा उपयोग काय हे म्हणणे चुकीचे आहे. आज तरी तो जेथे जेथे उपलब्ध आहे तेथील मृत जनावरे साफ करतोच आहे. (उदा: बांधवगड, दुधवा, कॉब्रेट इ.) त्यामुळे आपल्याच उपद्व्यापामुळे अस्तंगत होणारा एक पक्षी वाचविण्यासाठी थोडे परिश्रम करण्यास काहीच हरकत नाही.

आज फणसाड अभयारण्यात सुमारे १५ च्या आसपास गिधाडांचा मुक्त वावर आहे. पूर्वी चिखलगान परिसरात आढळणारी हि गिधाडे आता फणसाड नाल्याच्या बाजूस दरीमध्ये संचार करीत असतात. त्याच परिसरात त्यांनी घरटी देखील केली आहेत. Vulture Restuarant मुळे त्याच्या पोटाची काळजी काही प्रमाणात तरी भागली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अर्थात या योजनेचा त्वरित काही निष्कर्ष काढणे थोडेसे घाईचे ठरू शकते. कारण गिधाडांचा अन्न वावर हा तब्बल १५० किलोमीटर परिसरात असतो. आणखीन किमान २ एक वर्षांचा अभ्यास तरी आवश्यक आहे. एक मात्र नक्की या खटाटोपामुळे गिधाडांचे भविष्यातील चित्र काही प्रमाणात आशादायक होऊ शकते.
याच संदर्भात पक्षी तज्ञ आदेश शिवकर यांनी लोकप्रभाला सांगितले, Vulture Restaurant हा एक पर्याय झाला. त्याशिवाय महत्वाचे म्हणजे Diclopenac पर्याय असणारे Meloxicam चा वापर. त्याच्या किमतीत सवलत देऊन ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे लागेल. गिधाडां पुढील दुसरे संकट म्हणजे कुत्र्यांचा वावर.कुत्र्यांनी पूर्णपणे घेरल्यामुळे मृत जनावरच्याजवळ फिरकू हि न शकलेली गिधाडे नुकतेच त्यांनी राजस्थानमध्ये पहिली आहेत. अर्थातच कुत्री गिधाडांच्या सफाई कामगार या भूमिकेवर आक्रमण करीत आहेत असे दिसून येते. तसेच मोठ्या जनजागरण आवश्यक आहे. कत्तलखान्यात झालेली वाढ देखील अभ्यासाने गरजेचे असल्याचे ते सांगतात.
गिधाडांच्या बाबतीत अशी सारी अडचणीची यादी असली तरी आज गिधाडे आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहेत. बेंगलोर नजीकच्या रामनगर येथे परिसरात प्रस्तर भतींचे प्रमाण बऱ्यापकी असल्यामुळे येथे Rapelling चे उपक्रम घेतले जात. येथील गिधाडांचे अस्तित्व सुमारे १५ च्या आसपास आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने आता हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित होत आहे. या साऱ्या पाश्र्वभूमीवर फणसाड मध्ये नजीकच्या कळत Vulture फेस्टिवल देखील घेण्यात येणार आहे. विविध माहितीफलक, गावांमध्ये जन जागृती आणि गिधाडांचे निरीक्षण असे उपक्रम करण्यात येतील.
response.lokprabha@expressindia.com