३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

समरतींचा संप्रदाय

आम्हीसुद्धा माणसंच आहोत!...
दुलारी देशपांडे

काही माणसांमध्येच समलैंगिक प्रवृत्ती का आढळून येते, याच्या आज तरी वेगवेगळ्या वैज्ञानिक उपपत्ती लावल्या जातात. मात्र अजूनपर्यंत विज्ञानाला याचं निश्चित उत्तर मिळालेलं नाही. आश्चर्य म्हणजे माणसांमध्ये जशी समलैंगिकता आणि उभयलैंगिकता आढळून येते तशीच ती अनेक जातींच्या पशू-पक्ष्यांमध्येही आढळत असल्याचं शास्त्रज्ञांना दिसलेलं आहे. त्यामुळे भिन्न लैंगिकतेइतकीच काहींच्या बाबतीत समलैंगिकताही ‘नैसर्गिक’ आहे, हे आता विज्ञानाने मान्य केलेलं आहे. पूर्वीच्या काळी समलिंगी वर्तन हे पाप समजलं जात होतं. समलिंगी वर्तन त्यामुळे कायद्याने गुन्हा समजला जात होता. (अजूनही काही देशात समलिंगी वर्तन हा गुन्हा समजला जातो.) १८ व्या शतकात समलैंगिकता ही ‘विकृती’ असल्याचं मानलं गेल्यामुळे ही मानसिकता ‘बदलली’ पाहिजे असं सर्व डॉक्टरांचं मत होतं. समलैंगिकांचा त्यामुळे लैंगिक कल बदलण्यासाठी समलैंगिकांवर शस्त्रक्रिया, औषधं, शॉक थेरपी, मोहिनी विद्या, काऊन्सेलिंग यांसारखे विविध उपचारांचे मार्ग अवलंबले गेले. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे कालांतराने मानसोपचारतज्ज्ञांनी हे मानायला सुरुवात केली की, ‘लैंगिक कल’ बदलता येत नाही. एका बाजूने हे प्रयोग सुरू असताना, दुसरीकडे समलिंगी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अधिकारांसाठी चळवळ सुरू केली. समलैंगिकता हे ‘वेगळे’पण आहे; आजार किंवा विकृती नाही.. रोगांच्या यादीतून म्हणून ‘समलिंगी कल’ला वगळावं, अशी मागणी समलिंगी कार्यकर्ते करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना बराच काळ लढा दिल्यानंतर यश आलं. आज ‘अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिस्ट असोसिएशन’ आणि ‘वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ समलिंगी असणं, हे आजारपण मानत नाहीत.

प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात लैंगिक विषयांवर उघडपणे चर्चा करणं फारसं चांगलं मानलं जात नाही, हे अर्थातच एक आश्चर्य आहे. चार पुरुषार्थामधला ‘काम’ हा एक पुरुषार्थ मानणाऱ्या ‘कामसूत्र’ ‘अनंगरंग’ यांसारख्या ग्रंथांनी कामशास्त्रात मोलाची भर घालणाऱ्याया देशात आज मात्र कामवासनेकडे एक पापवासना वा लपून-छपून करायची गोष्ट इतक्या संकुचित अर्थाने पाहिलं जात आहे ही खरोखरच खूप खेदाची गोष्ट आहे. लैंगिक विषयांसंबंधी घेतलेल्या या बंदिस्त भूमिकेमुळे, लैंगिकतेविषयीचा एखादा ‘वेगळा’ प्रश्न जेव्हा आपल्या समाजात उपस्थित होतो, तेव्हा आपण काय भूमिका घेणार हे वेगळं सांगायची आवश्यकता राहत नाही. भिन्न लैंगिकता असणाऱ्यांच्या लैंगिक प्रश्नांविषयीच जिथे इतकी बंदिस्तता असेल, तिथे समलैंगिक प्रवृत्ती असणाऱ्यांच्या प्रश्नांविषयी काय परिस्थिती असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.
१९४८ साली डॉ. आल्फ्रेड किनसे यांनी अमेरिकेत पुरुषांच्या लैंगिक वर्तनाचं सर्वेक्षण करून एक अहवाल प्रसिद्ध केला. या सर्वेक्षणामुळे पहिल्यांदा लोकांसमोर समलैंगिकतेबद्दलची आणि उभय लैंगिकतेबद्दलची आकडेवारी उपलब्ध झाली. यानंतर भारतातही लैंगिकतेवर काही सर्वेक्षण झाली. या सर्वेक्षणातून समलिंगी लैंगिक कल, समलिंगी लैंगिक वर्तन तसेच समलिंगी समाजाच्या समस्यांची माहिती मिळाली. या सर्व सर्वेक्षणांवरून आज असा अंदाज लावला जातो की, जगात तीन टक्के पुरुष पूर्णपणे समलिंगी कलाचे असतात, तर एक ते दीड टक्के स्त्रिया पूर्णपणे समलिंगी कलाच्या असतात. स्त्रियांच्या तुलनेत समलैंगिक वर्तनात पुरुषांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वैविध्य दिसून येते. मूळ पुरुष लोकसंख्येच्या तीन टक्के लोकसंख्येचे पुरुष पूर्णपणे समलिंगी प्रवृत्तीचे असतात हे आपण पाहिले. हे तीन टक्के सोडून उरलेल्या पुरुष लोकसंख्येपैकी १० टक्के पुरुष हे उभयलिंगी (बाय-सेक्शुअल्स) असतात आणि हे १० टक्के सोडून उरलेल्या पुरुष लोकसंख्येच्या दोन टक्के पुरुष हे ट्रान्स जेंडर म्हणजे तृतीयपंथी (गुरूंकडे जाऊन हिजडय़ांच्या समाजात स्वीकारले गेले हिजडे) असतात. यावरून आपल्या समाजातील १५ टक्के माणसं ही लैंगिक अल्पसंख्याकांमध्ये (सेक्शुअल मायनॉरिटीज्) मोडतात. ही माणसं समलैंगिक आहेत. याचा अर्थ त्यांचा नैसर्गिक लैंगिक ओढा भिन्न लिंगी व्यक्तीपेक्षा समलैंगिक व्यक्तीकडेच आहे. काही माणसांमध्येच समलैंगिक प्रवृत्ती का आढळून येते, याच्या आज तरी वेगवेगळ्या वैज्ञानिक उपपत्ती लावल्या जातात. मात्र अजूनपर्यंत विज्ञानाला याचं निश्चित उत्तर मिळालेलं नाही. आश्चर्य म्हणजे माणसांमध्ये जशी समलैंगिकता आणि उभयलैंगिकता आढळून येते तशीच ती चिंपांझी, गोरिला, हरीण, जिराफ, हत्ती, शेळी, सिंह, चित्ता, हनुमान लंगूर, मॅलर्ड बदक, फ्लेमिंगो, पाइड किंग फिशर यांसारख्या अनेक जातींच्या पशू-पक्ष्यांमध्येही आढळत असल्याचं शास्त्रज्ञांना दिसलेलं आहे. त्यामुळे भिन्न लैंगिकतेइतकीच काहींच्या बाबतीत समलैंगिकताही ‘नैसर्गिक’ आहे, हे आता विज्ञानाने मान्य केलेलं आहे.
पूर्वीच्या काळी समलिंगी वर्तन हे पाप समजलं जात होतं. समलिंगी वर्तन त्यामुळे कायद्याने गुन्हा समजला जात होता. (अजूनही काही देशात समलिंगी वर्तन हा गुन्हा समजला जातो.) १८ व्या शतकात समलैंगिकता ही ‘विकृती’ असल्याचं मानलं गेल्यामुळे ही मानसिकता ‘बदलली’ पाहिजे असं सर्व डॉक्टरांचं मत होतं. समलैंगिकांचा त्यामुळे लैंगिक कल बदलण्यासाठी समलैंगिकांवर शस्त्रक्रिया, औषधं, शॉक थेरपी, मोहिनी विद्या, काऊन्सेलिंग यांसारखे विविध उपचारांचे मार्ग अवलंबले गेले. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे कालांतराने मानसोपचारतज्ज्ञांनी हे मानायला सुरुवात केली की, ‘लैंगिक कल’ बदलता येत नाही.
एका बाजूने हे प्रयोग सुरू असताना, दुसरीकडे समलिंगी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अधिकारांसाठी चळवळ सुरू केली. समलैंगिकता हे ‘वेगळे’पण आहे; आजार किंवा विकृती नाही.. रोगांच्या यादीतून म्हणून ‘समलिंगी कल’ला वगळावं, अशी मागणी समलिंगी कार्यकर्ते करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना बराच काळ लढा दिल्यानंतर यश आलं. आज ‘अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिस्ट असोसिएशन’ आणि ‘वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ समलिंगी असणं, हे आजारपण मानत नाहीत.
आपल्याकडच्या मानसोपचारतज्ज्ञांचा याविषयी काय दृष्टिकोन आहे हे पाहण्यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध बाल-मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांना समलैंगिकता ही मनोविकृती आहे का, हा प्रश्न विचारला. त्यावर डॉ. भूषण शुक्ल म्हणाले, ‘‘अजिबातच नाही. समलैंगिकता ही अजिबातच मनोविकृती नाही. याबाबत आज मानसशास्त्राचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि ठाम आहे. मानवी लैंगिकतेचा समलैंगिकता हा वेगळा ‘आयाम’ आहे. इतकंच, समलैंगिकता हा जिथे मानसिक आजारच नाही, तिथे उपचार तरी कशावर करणार?’’
समलैंगिकता ही मनोविकृती नाही हे जरी आज वैज्ञानिक सत्य असले तरी भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार समलैंगिक संबंध करणं हा आजही गुन्हा मानला जातो. विसाव्या शतकाच्या शेवटास एचआयव्हीचा भारतात प्रसार होऊ लागला. एचआयव्ही आणि गुप्तरोगांच्या नियंत्रण कार्यक्रमाला ३७७ कलमाचा अडथळा होऊ लागला. समलिंगी लोकांबरोबर काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना, समलिंगी संबंध करणाऱ्या पुरुषांपर्यंत पोहोचणं अवघड होत होतं, कारण सुरक्षित संबंधांची माहिती देणं कंडोम पुरविणं म्हणजे गुन्हा करण्यासाठी समलिंगी संबंध करण्यासाठी उत्तेजन देणं, अशी काही जणांची धारणा होती. या सर्व कारणांमुळे ३७७ कायदा बदलला जावा, असं काही जणाचं मत बनलं. एड्स भेदभावविरोधी आंदोलन (ABVA) यांनी ३७७ कलम बदलावं, यासाठी १९९४ साली दिल्ली कोर्टात एक जनहीत याचिका दाखल केली. तिचा पाठपुरावा न झाल्यामुळे ती निकालात निघाली. पुढे २००१ साली नवी दिल्ली येथील ‘नाझ फाऊंडेशन इंडिया’ यांनी ‘जर दोन प्रौढ व्यक्ती (कोणत्याही लिंगाच्या) राजीखुशीने शरीरसंबंध करीत असतील तर त्यांना हा कायदा लागू होऊ नये; यासाठी ‘लॉयर्स कलेक्टिव्ह’च्या मदतीने नवी दिल्लीच्या हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली. या जनहित याचिकेचा २ जुलै २००९ ला समलिंगींच्या बाजूने निकाल लागला. हायकोर्टाच्या या निकालाने समलिंगींच्या ‘अस्मिते’वर शिक्कामोर्तब झालं. हायकोर्टाच्या निकालाने समलैंगिकांना जरी थोडासा दिलासा मिळालेला असला तरी.. समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्यांनी न्यायासाठी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली. आजघडीला सुप्रीम कोर्टात ही केस चालू आहे. या केसचा निकाल काय लागेल तो लागेल, परंतु तोपर्यंत आपल्या देशात १५ टक्के समलैंगिक (LGBTI) आहेत हे वास्तव्य नाकारता येणार नाही.
आज तरी समलैंगिकतेला कायदेशीर तसेच सामाजिक मान्यता नसल्यामुळे बरेचसे समलैंगिक त्यांच्या लैंगिक गरजा लपूनछपून पुरवताना दिसतात. समलैंगिकांचा शरीरसंबंध गुदद्वारातून होतो. समलैंगिक संबंधातल्या चोरटेपणामुळे समलैंगिक संबंध करताना समलैंगिक पुरेशा सुरक्षित साधनांचा वापर करण्याचे टाळतो. त्यामुळे अशा प्रकारे केलेल्या असुरक्षित संबंधातून बरेचदा एचआयव्ही पसरण्याचा फार मोठा धोका असतो. समलैंगिकांची संख्या बरीच मोठी असली तरी समलैंगिक समाजात ‘ओपन’ नसल्यामुळे समलैंगिकांकडून समलैंगिक समाजात नक्की किती प्रमाणात एचआयव्हीचा प्रसार होतो, याची निश्चित टक्केवारी आज तरी मिळणं अशक्य आहे.
आज तरी समलैंगिकांमध्ये त्यांच्या ‘रिलेशनशिप’ला स्थिरता येण्यासाठी आपल्याकडच्या लग्नसंस्थेसारखी वा कायदेशीर ‘सिव्हील युनियन’सारखी कुठलीही कायदेशीर वा सामाजिक व्यवस्था अथवा चौकट नाही. त्यामुळे बऱ्याचदा समलैंगिकांच्या ‘रिलेशनशिपस्’ अल्पजीवी ठरतात. काही काळातच संपुष्टात येतात. समलैंगिक संबंधांमध्ये असणाऱ्या स्थिरतेच्या अभावामुळे, या संबंधांना कायदेशीर व सामाजिक मान्यता नसल्यामुळे, तसेच आपल्या संबंधांसाठी एकंदरीतच आपल्या घरच्यांपासून व समाजापासून कराव्या लागणाऱ्या लपवाछपवी आणि काहीवेळा शेवटी वाटय़ाला येणाऱ्या अटळ एकटेपणामुळे.. काही समलैंगिक वैफल्यग्रस्त होतात. काहीवेळा हे वैफल्य विसरण्यासाठी ते ड्रग्जचाही आसरा घेतात.
आपल्या समाजात छॅइळक म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल्स, ट्रान्सजेंडर आणि इण्टरसेक्स या प्रकारच्या ‘सेक्शुअल मायनॉरिटीज्’ आहेत. L.G.B.T.I. मधल्या प्रत्येक सेक्शुअल मायनॉरिटीचे स्वत:चे वेगळे असे प्रश्न आहेत.
L.G.B.T.I. मधील पहिला प्रकार लेस्बियनचा. निर्सगत: एक ते दीड टक्के स्त्रिया लेस्बियन असतात. स्त्री असून स्त्रीविषयीचं लैंगिक आकर्षण असणाऱ्या स्त्रियांना ‘लेस्बियन्स’ म्हणतात. समजा एखाद्या लेस्बियन स्त्रीचं घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं. तर, ना तिचा नवरा या विवाहसंबंधातून सुखी होईल ना ती स्वत: उलट समलैंगिक प्रवृत्ती असणाऱ्या लेस्बियन मुलीसाठी नवऱ्याबरोबरचा तिचा संबंध हा ‘बलात्कार’ही ठरू शकतो.

आज समलैंगिकतेला कायदेशीर तसेच सामाजिक मान्यता नसल्यामुळे बरेचसे समलैंगिक त्यांच्या लैंगिक गरजा लपूनछपून पुरवताना दिसतात. या संबंधातल्या चोरटेपणामुळे समलैंगिक पुरेशा सुरक्षित साधनांचा वापर करण्याचे टाळतो.

L.G.B.T.I. मधला दुसरा वर्ग आहे ‘गें’चा. ‘गे’ हा पुरुष असून त्याला पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण असते. ‘गे’ पुरुषांमध्ये ढोबळमानाने आपण १) थोडेसे स्त्रण अथवा बायकी हावभाव करणारे ‘गे’ (अ‍ॅफिमिनेट ‘गे’) आणि २) स्ट्रेट पुरुषांसारखेच वागणारे (स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे) असा भेद करू शकतो. स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे इतर पुरुषांसारखेच वागत, बोलत असल्यामुळे ते जोपर्यंत स्वत:च्या तोंडाने त्यांच्या समलैंगिकतेविषयी सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांचं ‘वेगळे’पण लक्षात येत नाही. अगदी लहान वयापासून, ‘गे’ मुलाला त्याच्या लैंगिक आकर्षणातलं त्याचं ‘वेगळेपण’ जाणवत असतं. परंतु बरेचदा लाजेपोटी, घरच्यांच्या धाकापोटी व समाजाच्या दडपणाखाली तो आपलं हे वेगळेपण लपवतो. तो जर ‘स्ट्रेट अ‍ॅक्टींग गे’ असेल तर त्याला त्याची लैंगिकता लपवणं सोपं जातं. याउलट जे ‘अ‍ॅफिमिनेट गे’ असतात, त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या बायकी हावभावामुळे कुटुंबाच्या आणि समाजाच्या उपहासाला सामोरं जावं लागतं. कमी वयातच त्यामुळे ही मुलं बरेचदा एकलकोंडी, कुढी बनतात. पुढे मोठं झाल्यावरही त्यांच्यातल्या बायकीपणामुळे त्यांना कामाच्या ठिकाणीही उपहासाचीच वागणूक मिळते. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होण्याची शक्यता वाढते. ‘स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे’चं ‘वेगळे’पण याउलट लक्षात न आल्यामुळे वयात आल्यावर त्यांना इतर स्ट्रेट मुलांसारखंच समजून, त्यांचे आई-वडील त्यांचं ‘स्ट्रेट’ समाजातल्या मुलींशी लग्न लावायला बघतात. एखाद्या ‘गे’ने जर अशावेळी स्वत:च्या वेगळ्या लैंगिकतेविषयी घरच्यांना सांगायचा, त्यांच्यापुढे ‘ओपन’ व्हायचा प्रयत्न केला तर त्याचे कुटुंबियच त्याला तू ‘राक्षसी’ आहेस.. पापी आहेस.. यासारख्या दूषणं त्याला देतात. समलैंगिकतेविषयीच्या अज्ञानामुळे त्याची ‘वेगळी’ लैंगिकता हे काही काळापुरतं असणारं ‘फॅड’ आहे. किंवा वयात येताना वाईट मित्रांच्या संगतीत राहून त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली एक तात्पुरती ‘फेज’ आहे, जी लग्नानंतर जाईल, असं मानतात. ‘सब मर्ज की एक दवा’ या हिशेबाने लग्नानंतर सर्व काही सुरळीत होईल या भाबडय़ा आशेने, समलैंगिकता या विषयाबद्दल काहीच माहिती नसणारे त्याचे पालक त्याच्यावर लग्नासाठी ‘भावनिक दबाव’ आणतात. काही वेळा असे पालक आपल्या ‘गे’ मुलाला ‘बदलण्या’साठी मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जातात. हा मानसोपचारतज्ज्ञ खरोखरच जर सुज्ञ असेल तर तो त्या ‘गे’ मुलाला आणि त्याच्या पालकांना समलैंगिक प्रवृत्ती ही काही व्यक्तींमध्ये नैसर्गिक असते. त्यामुळे ती ‘बदलता’ येत नाही, या वास्तवाची जाणीव करून देतो.
परंतु अजूनही आपल्या भारतात असे काही मानसोपचारतज्ज्ञ आहेत, ज्यांची समलैंगिक प्रवृत्ती बदलायचा प्रयत्न केला पाहिजे’ अशी ठाम भूमिका असते. अशा विचारांच्या मानसोपचारतज्ज्ञांच्या या भूमिकेमागे परंपरेचा संस्कृतीचा जबरदस्त पगडा, जुन्या शिक्षणप्रणालीचा प्रभाव, निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन यासारखी अनेक कारणं असू शकतात. पुण्याच्या ‘समपथिक ट्रस्ट’ या समलैंगिकांच्या मानसिक-शारीरिक आरोग्याच्या विषयावर काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक बिंदुमाधव खिरे आपल्या ‘इंद्रधनुष्य’ या पुस्तकात याविषयी म्हणतात. ‘समलैंगिकांना ‘बदलायचे’ प्रयत्न अनेक प्रकारे केले जातात. यात पुरुषांना पुरुषांची नग्न चित्रं दाखवायची, ते उत्तेजित झाले की त्यांना विद्युत शॉक द्यायचा. यामागे पुरुषांकडून पाहून त्यांना लैंगिक उत्तेजना येणार नाही, हा विचार आहे. त्यानंतर मग स्त्रीची नग्न चित्रं दाखवायची, पण शॉक द्यायचा नाही. अथवा दुसरा प्रकार म्हणजे पुरुषांची लैंगिक चित्रं दाखवायची, बघून तो पुरुष उत्तेजित झाला की, त्याला मग मळमळायला होईल, ओकारी होईल, अशी औषधं, इंजेक्शन्स द्यायची किंवा काऊन्सिलिंगच्या नावाखाली त्यांचं ब्रेन वॉशिंग करायचं यासारखे काही अघोरी उपायही केले जातात.
काही वेळा आपण लग्नानंतर खरंच ‘बदलू’ या भाबडय़ा समजुतीतून तो ‘गे’ मुलगा ‘स्ट्रेट’ मुलीशी लग्नाला तयार होतो. ‘स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे’ हा इतर ‘स्ट्रेट’ मुलांसारखाच दिसत-वागत-बोलत असल्यामुळे तसंच आपल्याकडे मुलींचं वा मुलांचं लग्न ठरविताना ‘सेक्शुअ‍ॅलिटी’ विचारण्याची पद्धत नसल्यामुळे अशी लग्नं होतात. काही दिवसांतच पण ‘गे’ मुलाला आपली चूक कळते. मग अखेर त्या लग्नाची परिणती शेवटी घटस्फोटात होते. अशा प्रकारच्या लग्नामुळे केवळ दोन माणसंच नव्हेत, तर दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात. काही वेळा तर केवळ बघू या आपण ‘बदलू’ शकतो का? या भावनेतून घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाखाली लग्नाला ‘बळी’ पडलेली ही मुलं केवळ बघू या काय होतंय. या भावनेतून लग्न झाल्यानंतर त्या स्ट्रेट मुलीबरोबर ‘संबंध’ ठेवतात, पण थोडय़ाच दिवसांत या संबंधांचा त्यांना उबग येतो. त्यांचा नैसर्गिक लैंगिक कल त्यांना पुन्हा समलिंगी जोडीदार शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. असा ‘पार्टनर’ मिळाल्यावर काही वेळा ही ‘गे’ मुलं मग दुहेरी जीवन जगतात. स्ट्रेट मुलीशी लग्न केल्यानंतर मिळणारी सामाजिक सुरक्षितता- मानसन्मान यावर त्यांना पाणी सोडायचं नसतं. त्यामुळे ‘घरी पत्नी’ व बाहेर पार्टनर’ अशी त्यांची अवस्था असते. अर्थात या सगळ्या गोष्टी अगदी लपूनछपून चाललेल्या असतात. आपला नवरा ‘गे’ आहे याची ना त्या पत्नीला जाणीव असते ना घरच्यांना! आपल्या समाजात समलैंगिकतेबाबत असणारं पराकोटीचं अज्ञान, समलैंगिकता हे काही काळापुरतंच असणारं ‘फॉरेन’चं खूळ आहे यांसारख्या अपसमजुती, तसंच मुलाने लग्न करून वंश वाढवलाच पाहिजे यासारख्या रूढी-परंपरांचं ओझं यामुळे आजही जबरदस्तीने ‘गें’ची मोठय़ा प्रमाणावर लग्न लावून दिली जातात. त्यांच्याबरोबरच त्यांच्याशी लग्न करणाऱ्या अनेक निष्पाप ‘स्ट्रेट’ मुलींच्या आयुष्याशी खेळ केला जातो.
आपल्या समाजात आज लाखोंच्या संख्येने समलैंगिक आहेत. समाजात आज समलैंगिकतेला मान्यता नसल्यामुळे अजूनही बरेचसे समलैंगिक त्यांच्या घरच्यांकडेच ‘ओपन’ नाहीत. त्यामुळे आपल्या मुला-मुलींची लग्न ठरविताना सावधगिरी म्हणून याही बाबींचा गंभीरपणे विचार व्हावा. समलैंगिकता ही नैसर्गिक असल्यामुळे समलैंगिक हा कुठल्याही समाजात, जातीत, तसेच कुठल्याही आर्थिक परिस्थितीत जन्माला येऊ शकतो. समलैंगिकतेचा बुद्धिमत्तेशी काहीच संबंध नसल्यामुळे समलैंगिक हा उच्चशिक्षितही असू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, लग्नाच्या वेळी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याची लैंगिकता विचारात घेऊनच पुढचे पाऊल उचलावे. लग्नसंबंधात होणाऱ्या या प्रकारच्या फसवणुकीला त्यामुळे आळा बसेल.
L.G.B.T.I. मधला तिसरा घटक म्हणजे बायसेक्शुअल्स (उभयरति) बायसेक्शुअल्सना दोन्ही प्रकारचं लैंगिक व भावनिक आकर्षण असतं, पण त्यातही शक्यतो समलैंगिक ‘पार्टनर’ हा त्यांचा ‘चॉइस’ असू शकतो. आपल्या समाजात बायसेक्शुअल्सना ओळखणं खूपच कठीण आहे. कारण बायसेक्शुअल हा भिन्न लिंगीबरोबरही लैंगिक संबंध ठेवून असतो. तरीही त्याचा ‘लैंगिक कल’ समलिंगीकडे अधिक असतो. खूपशा ‘गे’शी स्ट्रेट समाजातले जे पुरुष संबंध ठेवतात. त्यांची ‘स्ट्रेट’ समाजातल्या मुलींशी व्यवस्थित लग्नं झालेली असतात. स्ट्रेट समाजातले असे पुरुष बऱ्याचदा बायसेक्शुअल असण्याची शक्यता असते. अर्थात समलैंगिकांबरोबर संबंध ठेवणारे असे सर्वच्या सर्व पुरुष ‘बायसेक्शुअल’ असतीलच असं म्हणणं जरासं धारिष्टय़ाचं ठरेल. काही वेळा लैंगिक संबंधातल्या वैविध्याच्या आकर्षणातून काही पूर्णत: ‘स्ट्रेट’ मंडळीही समलैंगिकांशी संबंध ठेवताना दिसतात. या स्ट्रेट मंडळींना खऱ्या अर्थाने ‘विकृत’ म्हटलं पाहिजे. कारण समलैंगिकाला समान लिंगाच्या व्यक्तीचं जे आकर्षण असतं त्यात शारीरिकतेच्या जोडीला भावनिकतेचा भागही मोठय़ा प्रमाणावर असतो. म्हणजे एखादा समलैंगिक जेव्हा समलैंगिक संबंध ठेवतो तेव्हा तो त्याच्या ‘पार्टनर’मध्ये शरीराच्या जोडीला बऱ्याचदा मनानेही तितकाच गुंतलेला असतो. या समलैंगिकाचं त्याच्या पार्टनरवर ‘प्रेम’ असतं. परंतु निव्वळ शरीरसुखासाठी ‘गे’शी शरीर संबंध करणाऱ्या स्ट्रेट समाजातल्या पुरुषांमध्ये मात्र ‘गें’च्या ‘समलैंगिक कला’चा गैरफायदा उठवत केवळ त्याच्याबरोबर ‘मजा’ मारण्याची वृत्ती दिसून येते. ‘स्ट्रेट’ समाजातल्या या ‘विकृत’ माणसांचा शोध घेणे शक्य नाही, कारण यासाठी आवश्यक असणारा ‘ओपननेस’ सध्या तरी आपल्याकडे नाही.
L.G.B.T.I. मधला चौथा प्रकार आहे ‘ट्रान्सजेंडर्स’. आपल्या समाजात आपण त्यांना ‘तृतीयपंथी’ म्हणून ओळखतो. तृतीयपंथींतले जे तृतीयपंथी ‘गुरूं’कडे जाऊन दीक्षा घेतात. अशा तृतीयपंथींना ‘हिजडा’ असं म्हटलं जातं. समलैंगिकता व ट्रान्सजेंडर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समलैंगिकता हा लैंगिक कलाचा एक प्रकार आहे तर ‘ट्रान्सजेंडर’ हा लिंगभावाचा एक प्रकार आहे. हिजडे स्वत:ला ‘स्त्री’ समजतात व पुरुषांकडे आकर्षित होतात. हिजडय़ांच्या समाजात आजच्या घडीला तरी ‘बस्ती’, ‘बधाई’, ‘पण’ ही तीनच उपजीविकेची साधनं उपलब्ध आहेत. ‘बस्ती’ म्हणजे भीक मागणे, ‘बधाई’ म्हणजे समारंभाच्या ठिकाणी नाचगाणी करून पैसा मिळविणे आणि ‘पण’ म्हणजे शरीरविक्रय करणे.
आपल्या ‘स्ट्रेट’ समाजाला समांतर असा हिजडय़ांचा एक स्वतंत्र समाज आहे. हिजडय़ांची दिल्लीवाला, पूनावालासारखी आठ घराणी आहेत. हिजडय़ांच्या समाजात त्यांचे ‘गुरू’ आहेत. या गुरूंवर हिजडय़ांच्या आठ घराण्यांचे ‘नायक’ आहेत. आज तरी हिजडय़ांना त्यांचे स्वत:चेच कुटुंबीय आणि समाज स्वीकारीत नसल्यामुळे, हिजडय़ांना त्यांच्या अस्तित्वासाठी ‘गुरू’ आणि ‘नायकांवर’ अवलंबून राहणं भाग आहे. पोलीस हिजडय़ांना भीक मागू देत नाहीत. सध्याच्या काळात समारंभातून केल्या जाणाऱ्या नाचगाण्यांवर पोट भरणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे सध्या तरी हिजडय़ांकडे ‘पण’ म्हणजे शरीरविक्रयाशिवाय चरितार्थासाठी चौथा पर्याय उपलब्ध नाही. बरेचसे हिजडे त्यामुळे साहजिकच शरीरविक्रय करून आपलं पोट भरताना दिसतात. हिजडय़ांना त्यांच्या कमाईतला बराचसा भाग त्यांच्या ‘गुरूं’ना आणि ‘नायकां’ना द्यावा लागतो. खूपदा हिजडय़ांचं त्यांच्या ‘गुरू’ आणि ‘नायकां’कडूनच आर्थिक शोषण केलं जातं. हिजडय़ांना ‘सेक्स वर्कर’ बनविण्यातही अनेकदा त्यांच्या ‘गुरूं’चाच हात असतो. परंतु आपल्या समाजात त्यांना काहीच स्थान नसल्यामुळे हिजडय़ांना नाइलाजाने का होईना ‘गुरू’ आणि ‘नायकां’ना शरण जाण्याशिवाय पर्याय नसतो. कारण ‘स्ट्रेट’ समाजात त्यांचा कुणीच वाली नसतो. हिजडय़ांकडे जाणारी ‘गिऱ्हाईकं’ ही आपल्या ‘स्ट्रेट’ समाजातली असतात. त्यांनी हिजडय़ांशी केलेल्या असुरक्षित शरीरसंबंधातून एडस्चा मोठय़ा प्रमाणावर प्रसार होतो. काही वेळा पोटासाठी दिवसाला १०-१० पुरुष ‘घेणाऱ्या’ हिजडय़ांचे गुद्द्वार या शरीरसंबंधांमुळे मोठे झालेले असते. बरेचदा शरीरसंबंधाच्या वेळी कुठल्याही प्रकारची ‘सुरक्षित साधनं’ न वापरल्यामुळे बऱ्याचशा हिजडय़ांना गुद्द्वाराच्या जागी विविध प्रकारचे भयानक लैंगिक रोग होतात. आपल्या समाजातले डॉक्टर अशा रोग्याला तपासायलाही फारसे उत्सुक दिसत नाहीत. बऱ्याचदा हिजडय़ांना त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांची माहिती डॉक्टरांनादेखील नसते. याचं कारण आपल्या चालू वैद्यकीय अभ्यासक्रमात समलैंगिकांच्या शारीरिक विकारांचा व त्यांच्यावरील उपचारांचा विशेष समावेश नसल्यामुळे आपल्याकडच्या डॉक्टरांना या विषयाची फारशी माहिती नसते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेले हिजडेही त्यांना कितीही शारीरिक त्रास झाला तरी त्यांच्या विशिष्ट ‘आयडेंटिटी’मुळे आपल्या समाजातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. त्यामुळे डॉक्टरांनाही त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक जीवनात ‘असे’ पेशंट तपासायलाच मिळत नाहीत. सध्या तरी पुरेशा योग्य वैद्यकीय मदतीअभावी एड्ससारख्या रोगाने अथवा एखाद्या भयानक लैंगिक रोगाचं शिकार होऊन तडफडून सडून मरणं हेच दुर्दैवानं त्यांचं भागधेय आहे. हिजडय़ांची आपल्या समाजातली लोकसंख्या लक्षात घेता, हिजडय़ांसाठी काम करणाऱ्या एनजीओज्चे हिजडय़ांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न फारच तोकडे आहेत, असं म्हणावं लागेल.
L.G.B.T.I. मधल्या पाचव्या प्रकाराला इण्टरसेक्स अर्थात उभयलिंगी म्हटलं जातं. या प्रकारच्या व्यक्तींना स्त्री आणि पुरुषाचे असे दोन्ही लैंगिक अवयव असतात. हा नैसर्गिक अपघातच असतो. मात्र या व्यक्तींची संख्या समाजात एक टक्क्य़ांहूनही कमी असते. त्यामुळे त्यांच्यावर योग्य संशोधन उपलब्ध नाही. मात्र इण्टरसेक्स व्यक्ती या खूपच गुंतागुंतीच्या भावनांची शिकार असतात. बऱ्याचदा श्रीमंत कुटुंबातल्या इण्टरसेक्स व्यक्तींचे आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय आणि स्त्री लैंगिक अवयव काढून टाकले जातात व त्यांना पुरुष म्हणूनच समाजात पुढे उभं केलं जातं.
L.G.B.T.I. च्या विविध प्रश्नांचा आताच आपण थोडक्यात आढावा घेतला. हे सगळेच प्रश्न लैंगिकतेशी निगडित असल्याने अतिशय गुंतागुंतीचे आहेत. डॉ. भूषण शुक्ल म्हणतात त्याप्रमाणे, समलैंगिकता हा मानवी लैंगिकतेचाच एक वेगळा ‘आयाम’ आहे. आपल्या ८५ टक्के ‘स्ट्रेट’ समाजाच्या भिन्न लैंगिकतेपेक्षा १५ टक्के समलिंगीयांची समलैंगितता ही ‘वेगळी’ आहे. याचा अर्थ एवढाच आहे की, समलैंगिक हे ‘मनोविकृत’ नसून आपल्यापेक्षा लैंगिकतेबाबत फक्त ‘वेगळे’ आहेत. समलैंगिकांच्या या ‘वेगळ्या’ लैंगिकतेला सध्या तरी कायदेशीर व सामाजिक पाठिंबा नसल्यामुळे त्यांच्या ‘वेगळ्या’ लैंगिकतेमुळे त्यांचे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
समलैंगिक संबंध हे गुन्हेगारी कृत्य समजण्यात येऊ नये म्हणून सध्या सुप्रीम कोर्टात समलैंगिकांचा लढा सुरू आहे. या संदर्भात ‘हमसफर’ या समलैंगिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अशोक रावकवी यांना या संदर्भात विचारलं असता, काहीसे चिडून ते म्हणाले. आमचा मूळ मुद्दा असाय की, ‘सेक्शुअल’ राइट हा ‘ह्य़ुमन’ राइट आहे. आम्ही काय कुणावर ‘जबरदस्ती’ करीत नाही. निसर्गत:च जशी डावरी माणसं असतात तशीच काही माणसं निसर्गत:च समलैंगिक असतात. असं असूनही इराणमध्ये गेल्या वर्षी ३० ते ४० समलैंगिकांना मारून टाकण्यात आलं. हे चाललंय तरी काय? समलैंगिक असलो म्हणून काय झालं? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहोत.. तेव्हा आम्हालाही जगण्याचा अधिकार आहेच. आमची लढाई कुठल्या धर्माविरुद्ध नाही.. तर आमच्या मूलभूत मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी आहे!
अशोक रावकवी म्हणतात ते अगदी खरंय. समलैंगिक हाही तुमच्या-आमच्यासारखाच एक माणूस आहे. तेव्हा माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं.. एवढी साधी अपेक्षा त्याने समाजाकडून का करू नये?
response.lokprabha@expressindia.com