३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

दृढदोस्ती

क्वियर आझादीसाठी...
नितीन

उपेक्षित समलैंगिक समूह आपल्या मागण्यांसाठी दरवर्षी मार्चचं आयोजन करतोय. या मार्चबरोबरच समाजाचंही सकारात्मक दिशेने एकेक पाऊल पुढे पडतंय. अधिक खुलेपणाने आणि सजगपणे समलिंगी आता पुढे येत आहेत. केवळ लैंगिकतेच्या अनुषंगानेच किंवा कायदेशीर बाबी, उपेक्षा, अन्याय या संदर्भातच नाही, तर सामाजिक संवेदनशीलता, कला-साहित्य या क्षितिजावरही ते अधिक आत्मविश्वासाने आपला ठसा उमटवू लागले आहेत.

‘क्वियर’ हा शब्द LGBTI-लेस्बियन (समरती-स्त्री), गे (समरती-पुरुष), बाइसेक्शुअल (उभयरती), ट्रान्सजेण्डर (किन्नर), इण्टरसेक्स (उभयिलगी) तसेच हिजरा, कोथी, पन्थी ह्यांच्यासाठी वापरला आहे.
हा भारतीय समाजाकडून उपेक्षित लंगिक अल्पसंख्याक समूह आहे. कारण आपला समाज दोनच िलग ओळखतो आणि विषमिलगी नात्यांनाच वैध मानतो. क्वियर अझादी मार्च ही या उपेक्षित लैंगिक समूहाची अभिव्यक्ती आहे. हा त्यांचा आवाज, एक उत्सव किंवा एक मंच म्हणा हवं तर.
क्वियर व्यक्तींच्या समान अधिकार मागणीसाठी मुंबईमध्ये वार्षकि पातळीवर पदयात्रेच्या स्वरूपात हा मार्च आयोजित करण्यात येतो.
मुंबईत १६ ऑगस्ट २००८ रोजी आयोजित पहिल्या क्वियर आझादी मार्चचं उद्दिष्ट होतं भारतीय दंड संहिता कलम ३७७ पासून मुक्त करणे. २ जुल, २००९ मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेऊन भारतीय दंड संहिता कलम ३७७ ला पारित केले. ह्य निर्णयानंतर एकाच िलगाच्या वयस्क व्यक्तींमधील वैयक्तिक पातळीवर समरती वर्तणुकीला यापुढे अपराधिक मानलं जाणार नाही, हे अधोरेखित झाले. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही भेदभावरहित समाजाच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
२००८ मध्ये, आम्ही पहिल्या गर्व पदयात्रेत जास्त मुखवटे आणि थोडेच खुले चेहरे बघितले. आता आमचे बरेच लोक क्वियर असल्याची कुठलीही भीती किंवा लाज न बाळगता पदयात्रा करतात.
इथे शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे सकारात्मक सुधारणा झाली आहे. ते कुठल्याही बहिष्काराची पर्वा न करता क्वियर लोकांच्या मुद्दय़ांना त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाचा भाग बनवून घेत आहेत. चित्रपट, टीव्ही यांसारख्या माध्यमांनीही चाकोरीबाहेर येऊन क्वियर पात्राला प्रमुख भूमिकेत प्रक्षेपित करायला सुरुवात केली. क्वियर मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनेक चर्चासत्रं सुरू केली. हे केवळ स्वागतार्हच नाही तर असंही सिद्ध करतं की हळूहळू का होईना, पण स्थिरपणे भारतीय समाजाकडून क्वियर व्यक्ती स्वीकारल्या जात आहेत.
या सकारात्मक सुधारणेनंतरही क्वियर व्यक्तींसाठीचा भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. ज्याप्रमाणे सामान्य भारतीय क्वियरला सदृश्यता मिळत आहे, तसेच ‘द्वेष’सुद्धा आपले डोके वर काढत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा, प्रत्येक वर्णाच्या धार्मिक कट्टरपंथी लोकांकडून तीव्रपणे विरोध होत आहे. त्यांचा अपसमजामुळे असा दावा आहे की, आमचे जीवन आणि इच्छा-आकांक्षा ‘भारतीय संस्कृती’च्या विरुद्ध आहे किंवा आम्ही ‘रोगग्रस्त आहोत’ किंवा आणखी खूप काही.
जबरदस्तीने करण्यात आलेल्या विवाहाच्या घटना क्वियर व्यक्तीला मानसिक दडपणाखाली नेतात आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात.
आमचे एक प्राध्यापक होते, ज्यांना एका आघाडीच्या विश्वविद्यालयीन व्यवस्थापनाकडून अपमान आणि भेदभाव सहन करावा लागला. अखेरीस तोच त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला.
एका वृत्तवाहिनीने समलंगिकतेची वाईट बाजू प्रक्षेपित केली आणि आधीच कुंपणावर राहणाऱ्या समुदायाच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करून कायद्याचे उल्लंघन केले.
क्वियर व्यक्तीला रक्तदान करणे किंवा मूल दत्तक घेण्यास मनाई आहे. आणि त्यापेक्षाही वर म्हणजे बहुतांश लोक आम्हा ‘क्वियरना’ घाबरतात आणि द्वेष करतात.
भारतीय दंड संहिता कलम ३७७ ला संविधानातून पूर्णत: काढून टाकून क्वियर लोकांनाही समाजात मानाचे आणि समान हक्काचे स्थान मिळावे यासाठी आमची ही लढत चालू आहे. म्हणूनच या क्वियर आझादी मार्चचं आयोजन केलं जातं. यंदाच्या आझादी मार्चची तारीख आहे २८ जानेवारी २०१२. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत ऑगस्ट क्रांती मदानापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मार्च मार्गक्रमण करेल. त्याबरोबर आम्ही २१ ते २७ जानेवारी हा अख्खा आठवडाच क्वियर प्राइड सप्ताह म्हणून साजरा करतोय. त्यासाठी तो क्वियर मार्चच्या आधी आम्ही क्वियर साप्ताह पण साजरा करणार आहोतष ज्यात विविधरंगी स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
क्वियर आझादीच्या अधिकृत वेबसाइट
इंग्रजी :
https://queerazaadi.wordpress.com/
मराठी :
https://marathiqueerazaadi.wordpress.com
हिंदी :
https://hindiqueerazaadi.wordpress.com

response.lokprabha@expressindia.com