९ डिसेंबर २०११
लज्जतदार
तथास्तु
डेस्कटॉप
पर्यटन विशेष
कोकणचे पर्यटन
‘महाबळेश्वर’चे गारुड
उत्तर महाराष्ट्र म्हणजे पर्यटनाचा ‘गुलदस्ता’
विविधरंगी नागपूर
आडवाटांच्या प्रेमात
जागतिक अपंग दिनानिमित्त
जगण्याचे मूल्य
क्रिकेटनामा
मंत्र आरोग्याचा
खालीपेट
मेतकूट
चित्रपट
दास्ताँ-ए-दख्खन
आठवणी
इतिहास
माझी बाहेरख्याली
श्रीमान श्रीमती
शॉपिंग
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चित्रपट

यमुनाजळी खेळू खेळ...
प्रतिनिधी

मीनाक्षी शिरोडकर यांनी ब्रम्हचारी चित्रपटात यमुनाजळी खेळू खेळ.. हे गाणं आपल्या प्रत्येकाच्याच लक्षात आहे. याच गाण्यावर आधारीत आता पुन्हा एकदा प्रतिबिंब या चित्रपटात अंकुश चौधरी व सोनाली कुलकर्णी नृत्य करताना आपल्याला दिसणार आहेत.

यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता या मीनाक्षी शिरोडकर आणि मास्टर विनायक यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील प्रणयगीताने एकेकाळी सिनसृष्टीत प्रचंड खळबळ उडवून दिली होती. त्यावेळच्या मीनाक्षी बाईंच्या स्विमसूटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अलीकडे स्विमसूट म्हणजे काहीच नाही असं झालेलं आहे.
‘ब्रह्मचारी’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला व गाजला. आज इतक्या वर्षांनतरही तरुणाईच्या ओठांवर अगदी सहज रुळणा-या या गीताची लोकप्रियता इतकी की एका नाटकासाठी या गाण्याचा केलेला वापर देखील तितकाच हिट ठरला. आता हे लोकप्रिय गीत नव्या शैलीत प्रेक्षकांसमोर येत आहे. प्रशांत हिरे निर्मित, गिरीश मोहिते दिग्दíशत ‘प्रतििबब’ या आगामी रहस्यप्रधान चित्रपटात हे गीत सोनाली कुलकर्णी आणि अंकुश चौधरी या जोडीवर चित्रीत करण्यात आले आहे.
कृष्णधवल जमान्यात यमुनाकाठी रंगलेला खेळ आजच्या कलरफुल युगात सोनाली आणि अंकुश खेळताना दिसणार आहे. कॉम्बो म्युझिकच्या प्रेमात असणा-या संगीतकार-गायक अवधूत गुप्ते यांनी हे गीत लिहून संगीतबध्द केले असल्याने त्यांच्या आधुनिक संगीताची झलक यात नक्कीच पहायला मिळणार आहे. जुन्या गाण्यातील एखादी ओळ घेऊन त्याभोवती आपले वर्तमानकाळातील विचार गुंफणे हे कॉम्बो म्युझिकचे वेगळेपण अवधूत गुप्ते यांनी पहिल्यांदाच या चित्रपटातून मांडले आहे.
स्मित मुव्ही बॅनरच्या ‘प्रतििबब’ चित्रपटातून संपदा हिरे पाश्र्व गायिका म्हणून पदार्पण करीत आहेत. संपदा हिरे यांनी यमुनाजळी खेळू या गीताचे पाश्र्वगायन केले असून चित्रपटातील इतर गीते सुध्दा त्यांनीच गायली आहेत. चित्रपटातील कथेत हे गीत अचूक बसल्याने हा प्रयत्न करण्यात आला आहे. सोनाली आणि अंकुशच्या भन्नाट अदाकारीवर चित्रीत झालेलं हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे आहे. अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, रिवद्र मंकणी, गणेश यादव, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार, शमा निनावे, उज्वला जोग, भारत गणेशपुरे, प्रदीप नवले, अंकिता सकरे या कलाकारांच्या भूमिका असलेला ‘प्रतििबब’ ९ डिसेंबरला प्रदíशत होतोय.
lokprabha@expressindia.com