४ फेब्रुवारी २०११
कव्हर स्टोरी
पुण्यात सध्या सामाजिक कलहाचा राजकीय फड रंगात आलेला आहे. हवेत गारठा असला तरी सामाजिक पर्यावरण मात्र तापलेले आहे. दादोजी कोंडदेव समर्थक आणि विरोधक अशी पुण्याची फाळणी करण्यात आलेली आहे. ह्या प्रश्नावर विवेकी भूमिका घेणारांनाही ब्राह्मणांचे हस्तक ठरवले जात आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कृतीचे समर्थन केले नाही तर बहुजनविरोधी ठरवले जाण्याच्या दहशतीमुळे पुण्यातील तमाम विचारवंत भेदरलेले आहेत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्याविरुद्ध ‘ब्र’ उच्चारणे म्हणजे जगणे असुरक्षित करून घेणे होय. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून हटविण्यासाठी ब्रिगेडने ३१ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. पुण्याच्या कारभाऱ्यांनी तत्पूर्वीच २७ डिसेंबरच्या मध्यरात्री २.१५ वाजता दादोजींची लालमहालातून उचलबांगडी केली. दादोजींची हकालपट्टी अटळच होती. लोकशाहीत वर्चस्वाच्या लढाईचा शेवट बहुमताच्या बाजूनेच होणार!

प्रतिक्रिया
७ जानेवारीच्या लोकप्रभात ‘दादाजीपंती सिउबांस शाहणे केले’ हा पांडुरंग बलकवडे यांचा लेख वाचण्यात आला. लेख वाचून वाईट वाटले. आपल्याला पुढे याच विषयाच्या अनुषंगाने काही नवीन माहिती येईल, ती संशोधित केलेली असेल, त्याचा अर्थ लावण्यासाठी खूप खल केला असेल, शक्य आहे तेवढय़ा सर्व बाजूने तपासला असेल, त्या प्रत्येक बाजूवर विचारपूर्वक विचार मांडला असेल, आणि सर्वात महत्त्वाचे हे की, यामध्ये कोणाचीही बाजू न घेता शोध लेख सादर केला असेल, असे वाटले होते. परंतु पूर्ण निराशा झाली. बलकवडे यांनी दिलेली जंत्री पाहिल्यानंतर प्रथमदर्शनीच एक बाब लक्षात येते की, त्यांनी दिलेल्या जंत्रीचे कागद त्यांनी वाचले असावेत. परंतु त्यातील खरे-खोटेपणा त्या कागदपत्रातून निघत असलेला अर्थ, लिहिणारांस अभिप्रेत असणारा अर्थ लावण्याच्या भानगडीत ते पडले नसल्याचे दिसून येते. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचे असे की, तो कागद बनावट नाही ना? त्यामधील मजकुरात काही फेरफार केला नाही नां? हे तपासण्याची तसदी त्यांनी घेतल्याची दिसून येत नाही.

चळवळ
स्त्रियांवरील हिंसाचार वाढतो आहे. आपल्या विभागात मुलींवरील सामूहिक बलात्काराच्या घटना वारंवार घडताहेत व यात भाग घेणारे ऐन विशीतील मुलगे आहेत. स्त्रियांसाठी सुरक्षित व आश्वासक वातावरण अजूनही नाही आणि त्याला जबाबदार आपल्या समाजातील पुरु षी अहंकार आहे. पण सारेच पुरु ष यात दोषी नाहीत. तरीही हिंसाचाराच्या छोटय़ामोठय़ा घटना आपल्या आसपास घडत असताना आपण पुरु षांनी त्या मूग गिळून पाहत बसणं यात मर्दानगी नाही. बिघडलेली ही परिस्थिती आता आपण पुरु ष बदलवू शकतो. आपण आपल्याप्रमाणेच इतरांना संवेदनशील बनवू शकतो. पुणे जिल्ह्यातील सासवडच्या एसटी स्टँडमध्ये मेगाफोन हातात घेऊन अमोल काळे, गणेश फुले व इतर कॉलेजात शिकणारे तरु ण आवाहन करत होते. एकविसाव्या शतकात आजही स्त्रियांना असमानतेची वागणूक दिली जाते. घरापासून याची सुरुवात होताना दिसते. मुलाला घराबाहेर मैदानी खेळ खेळायला परवानगी दिली जाते. पण मुलींना घरातच खेळायला सांगितले जाते, असे का?

सुरक्षा
अलाहाबादमधली एक प्रचंड तापलेली दुपार.. अलाहाबाद रेल्वे स्टेशन खूप अवाढव्य आहे. तिथल्या अधिकाऱ्यांकडे केवळ एवढीच माहिती होती की, एक माणूस मुंबईहून ट्रेनने अलाहाबादला येत आहे. त्याच्याबद्दल इतर काहीच कळलं नव्हतं. त्याच्या बेहरामपाडय़ामध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांशी बोलल्यानंतर त्याच्या काही सवयींबद्दल थोडीशी माहिती मिळाली होती. एवढय़ा माहितीच्या आधारे स्थानिक सवरेत्कृष्ट अधिकाऱ्यांना या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या माणसाचा फोटो ई-मेलने पाठवण्यात आला होता. असा फोटो अधिकाऱ्यांकडे असला तरी एवढय़ा गर्दीच्या ठिकाणी एखाद्या माणसाला सहजासहजी शोधून काढणं तसं कठीणच. मात्र उत्तम प्रशिक्षण घेतलेले अधिकारी असं कठीण कामही चांगल्या पद्धतीने करून दाखवतात. अर्थात त्यासाठी यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित असणं आवश्यक आहे.

खाली पेट
हजार मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो.. आणि दरवेळी एक पाऊल अशा पद्धतीने पूर्णही होतं.
- एक चिनी म्हण.
तर घरातील बाबांना शेफ बनण्यासाठीचे पहिले पाऊल उचलायची वेळ आली आहे.
तत्पूर्वी, हे किचनच्या दिशेने (आयुष्यात पहिल्यांदाच) उचललेले पाऊल नेमके कुठे घेऊन जाणार आहे, याची झलक दाखवण्यासाठी एक माहिती.
आजकालचा जमाना हा दृश्य माध्यमांचा आहे, असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे ही माहिती चित्रपटातील दृश्यातून दिली की अधिक रंजक वाटेल.

दास्ताँ-ए-दख्खन
शाळेत असल्यापासून फलकनुमा पॅलेसचे नाव ऐकू येई. निजामाचा तो राजवाडा, असं बुजुर्ग सांगत. निजाम कोण, हे कळण्याचं ते वय नव्हतं. तो राजा होता, अन् त्याचा तो शानदार महाल दूर हैदराबाद शहराबाहेर उंच टेकडीवर होता, एवढंच काय ते कळत होतं! राजवाडय़ातले सोन्याचे पलंग; हिरे-माणकांचे साठे; चित्र-विचित्र प्रतिबिंबे दाखवणारे भलेथोरले आरसे; इ.इ.ची रसभरीत वर्णनं कधी-मधी ऐकताना फलकनुमा जणू एखाद्या परीकथेतला अद्भुत राजवाडाच वाटे! त्या स्वप्नवत राजमहालात कधी पाऊल ठेवू ही कल्पनाही तेव्हा अशक्यप्राय भासे! पण तसं झालं खरं. खूप वर्षांनी फलकनुमा नावाच्या स्वप्ननगरीत प्रवेश करण्याचा योग आला! फलकनुमा म्हणजे आकाशाचा आरसा! प्रतिस्वर्ग! काही काळ त्या स्वर्गाची द्वारे आम आदमीसाठी खुली करण्याचा निर्णय निजामांच्या वारसदारांनी तेव्हा घेतला होता- माणशी पन्नास रु पयांची एंट्री फी आकारून! तरीही हैदराबादकरांनी रांगा लावून फलकनुमा पाहिला!


भविष्य