२४ एप्रिल २००९

तथ्यांश
फॉरवर्ड
विडंबन काव्य
exफुल्या @ डॉट कॉम
कोकण पर्यटन विशेष
पर्यटन
माइण्ड ओव्हर मॅटर
बखर संगणकाची
मेतकूट
लाइफ झिंगालाला
गोसीप कोलम
आपलं बुवा असं आहे!
थरारक निसर्ग
चित्रदृष्टी
ग्लिटरिंग गिझमोज
यात्रा जत्रा
या कानाचं त्या कानाला
चिनी कम
घरचा शेफ
रॉक - ऑन
शॉपिंग
अंडरवर्ल्ड
झोडियाक झोन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

यात्रा जत्रा

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात वसलेलं व शिवप्रभूंच्या उतुंग कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं पार गाव आणि त्या गावचं कुलदैवत आदिशक्ती श्रीरामवरदायिनी.
संजय चोचे

छत्रपती शिवप्रभूंच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेली पारची पावन भूमी! एक छोटंसं गांव! शिवरायांची प्रेरणा येथे नसानसात भिनलेली आहे. पूर्वी इथे बाजारपेठ होती, त्याच्या खाणाखुणा आजही आगंतुकाला खुणावतात. श्रीरावरदायिनी आईच्या वास्तव्यामुळे या गावाला एक वेगळंच तेज प्राप्त झालंय!
श्री रामवरदायिनीआईचे सुंदर देवालय हेमांडपंथी पद्धतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभिकरण केले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात अमाप भर पडली आहे. मंदिराच्या समोरील मंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूला अनुक्रमे श्रीमानाई व श्रीझोळाईची पवित्र स्थाने आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील सिंहासनावर दोन मूर्ती विराजित असून अडीच कूट उंचीची छोटी मूर्ती उजव्या बाजूस असून ती वरदायिनी या नावाने ओळखली जाते. छत्रपती शिवप्रभूंनी तिची प्रतिष्ठापना केल्याचे मानले जाते तर तीन फूट उंचीची मूर्ती डाव्या बाजूस असून ती श्रीरामवरदायिनीची असून

 

समर्थ रामदासांनी तिची प्रतिष्ठापना केली होती. २५ डिसेंबर १९९१ रोजी याच मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती बसवून तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. दोन्ही मूर्ती चतुर्भुज असून हातात विविध आयुध असून गळ्यात नरमुंड माळा आहेत. पायाखाली महिषासुराला वधले आहे. मंदिराच्या समोर पूर्वेला महाबळेश्वरचे दिसणारे डोंगर मन मोहून टाकतात तर उत्तरेकडे असलेला प्रतापगड किल्ला पाहून मन हेलावतं.
पौराणिकदृष्टय़ा देवीची एक महत्त्वाची कथा सांगितली जाते - एकदा श्रीशंकरपार्वती या ठिकाणी विहार करीत असताना प्रभू श्रीरामचंद्र त्या ठिकाणी सीतामाईच्या शोधासाठी आले असता पार्वतीने सीतेचे रूप घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांची परीक्षा घेण्याचे ठरविले. मात्र प्रभू श्रीरामचंद्रांनी पार्वतीचे अर्थात आदिशक्तीचे मूळ रूप ओळखले. आदिशक्ती मूळ रूपात प्रकट झाली व तिने प्रभू श्रीरामचंद्रांना विजयी भव असा वर दिल्याने ती ‘श्रीरामवरदायिनी’ या नावाने प्रसिद्ध पावली व हे ठिकाण ‘श्रीक्षेत्र पार्वतीपूर’ या नावाने प्रसिद्ध झाले. कालांतराने पार्वतीपूरचे पार हे संक्षिप्त रूप प्रसिद्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनीच श्रीरामवरदायिनीची विधीवत स्थापना केल्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या तटबंदीला शिवाजी महाराजांच्या बांधकाम शैलीचा स्पर्श झाल्याचे जाणवते.
दरवर्षी चैत्र अमावस्येला श्रीरामवरदायिनी देवीची यात्रा पार येथे सुरू होते. या दरम्यानच्या काळात मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. अक्षय तृतियेला सुवासिनींचे हळदीकुंकू मोठय़ा उत्साहात पार पडते. पंचमीच्या दिवशी मंदिरात लघुरुद्राभिषेक, होमहवन इ. विधी होतात. षष्ठीला पहाटे देवीच्या पालखिची मिरवणूक निघते, लळीताच्या पूजेने व महाप्रसादाने वार्षिक यात्रेची सांगता होते. बगाडाखाली पालखी आल्यानंतर केलेला नवस हमखास फालद्रुप होतात अशी भक्तांची धारणा आहे. यंदा ही यात्रा दि. २४ एप्रिल २००९ ते ३० एप्रिल २००९ या कालावधीत पार पडणार आहे.
मंदिरावर सुंदर असा कळस बांधण्यात आला आहे. कळसाच्या सभोवताली दहा दिशांना असलेल्या दहा छोटय़ा देवळ्यांमध्ये दशदिशाभिमुख देवांच्या मूर्ती आहेत. ह्या सगळ्या देवळ्यांवर दहा छोटे कळस बांधण्यात आले आहेत. छोटय़ा देवळ्यांवर उभारलेल्या उंच खांबांवर आणखी दहा कळस उभारण्यात आले असून, त्यावर सुमारे ३६ फूट उंचीच्या मुख्य कळसाची बांधणी करण्यात आली आहे.
श्रीरामवरदायिनी हितचिंतक मंडळातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी सामाजिक क्षेत्रातील बहुमुल्य कामगिरीसाठी एका थोर व्यक्तीला श्रीरामवरदायिनी आईचे प्रतीक व आशीर्वाद असलेल्या प्रतिष्ठेच्या आदिशक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.
मंदिराच्या जवळपासच्या परिसरात घनदाट जंगल असल्याने पारमधून मजल दरमजल करीत ट्रेकींग करीत आपण तासाभरात शिवप्रभूंच्या प्रतापगड किल्ल्यावर पोहोचतो.
येथून महाबळेश्वर अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर, तर वाईच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी इथून जेमतेम दोन तासांचाच प्रवास!
अशातऱ्हेने या तीर्थक्षेत्राचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. मुंबई - महाड - पोलादपूर मार्गे महाबळेश्वरकडे येताना वाडा (कुंभरोशी) येथून श्रीक्षेत्र पार्वतीपूर, पार येथे थेट देवस्थानाच्या दारात जाता येते तसेच पुणे, वाई किंवा सातारा येथून महाबळेश्वर मार्गे श्रीक्षेत्राला जाता येते.
chochesanjay@gmail.com